काल ऑफीसमधून घरी जाताना कसा कोण जाणे माझा मोबाईल हरवला. कदाचित ऑफीसमध्ये राहीला असेल असे वाटून कॉल केला. रींग जात होती. म्हटलं ऑफीसलाच राहीला असावा. सकाळी उठल्यावर पहिले काम रिंग देण्याचे केले. फोन स्विच्ड ऑफ. दुपारी बॅटरी अर्धी झाली होती. म्हटले बॅटरी संपली असेल. ऑफीसला आलो. फोन नाही. अगदी फ्लोअर रीसेप्शनला विचारुन पाहिले. उत्तर "हमको मालूम नही सर."
फोन हरवला आहे ही वस्तूस्थीती मनाने स्विकारली. आता पुढचे काम सिम ब्लॉक करणे. कस्टमर केअरला फोन लावला. संयम बाळगून त्यांचे एक दाबा, दोन दाबा ऐकून मला हवा असलेला पर्याय निवडला. मला ऑफीसरशी बोलण्यासाठी पैसे पडतील हे एक दाबून मान्य केल्यावर फोन लागला.
मी: नमस्कार मी धनाजीराव वाकडे बोलतोय. माझा पोस्टपेड सिम असलेला मोबाईल काल हरवला. त्यामुळे मला सिम ब्लॉक करायचे आहे.
कके वरची मुलगी: सर तुम्ही आता त्याच नंबरवरुन बोलताय का?
तिने माझं म्हणणं ऐकलंच नव्हतं सवयीने "तुम्ही आता त्याच नंबरवरुन बोलताय का?" असं विचारुन मोकळी झाली होती.
मी: (मनातल्या मनात, भवाने) मी सिम हरवला आहे म्हणतोय तर त्याच नंबरवरुन कसा बोलेन?
कके वरची मुलगी: सॉरी सर. पुन्हा सांगता का?
मी: नमस्कार मी धनाजीराव वाकडे बोलतोय. माझा पोस्टपेड सिम असलेला मोबाईल काल हरवला. त्यामुळे मला सिम ब्लॉक करायचे आहे.
कके वरची मुलगी: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. मी पोस्टपेडला ट्रान्स्फर करते. कृपया लाईनवर राहा.
बयेने मला लाईनवर राहायला सांगितले खरे मात्र तीन चार मिनिटे लाईनवर राहूनही कुणी उत्तर दिलंच नाही. मी वैतागून फोन कट केला आणि पुन्हा लावला. पुन्हा एकदा एक दाबा, दोन दाबाचे सोपस्कार पार पाडून मी त्यांच्या माणसापर्यंत पोहचलो. त्या मुलाला माझा प्रॉब्लेम सांगितला.
कके वरची मुलगा: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. पोस्टपेडसाठी मी तुम्हाला एक नंबर देतो त्यावर कॉल करा.
त्य दादाने नंबर दिला. मी कॉल केला. पुन्हा एक दाबा, दोन दाबा सुरु झाले. मी ती दाबादाबी करत मला हव्या असलेल्या पर्यायापर्यंत पोहचलो. फोन अटेंड करणार्या मुलाला माझी समस्या सांगितली.
कके वरची मुलगा: सर आता आमच्या सिस्टीमचे अपग्रेडेशन चालू असल्यामुळे सिस्टीम डाऊन आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता आम्ही काही करु शकत नाही. तुम्ही नांव आणि नंबर देऊन ठेवा आणि दोन तासांनी फोन करा.
नांव आणि नंबर देऊन ठेवण्यापलिकडे माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता.
मी दोन तासांनी फोन केला. यावेळी थेट पोस्टपेडचा नंबर लावला. पुन्हा एक दाबा, दोन दाबाचा मंत्र सुरु झाला. मी स्टार सिक्सने मला हव्या असलेल्या पर्यायापर्यंत गेलो.
कके वरची मुलगा: सर तुम्ही याआधी चार वेळा कॉल केला होता. हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. सर कसं आहे तुम्हाला साखर हवी असेल तर किराना मालाच्या दुकानातच जावे लागेल. पेट्रोल पंपावर साखर कशी मिळेल.
मी पोस्टपेडवाला नंबरच डायल केला होता हे सांगायच्या आत त्याने फोन ठेवला. त्याने बहुतेक नुकतंच डॉ. रमा मराठेंचं "रंग सुखाचे" पुस्तक वाचलेलं असावं. साखर, किराणा मालाचे दुकान आणि पेट्रोल पंपाचे उदाहरण त्याच पुस्तकात आहे.
मी हताश, हतबल आणि हतबद्ध. त्याने फोन चालू ठेवला असता तर त्याच्या पुढच्या सात पीढयांना तो शिकवू शकेल इतकं मानसशास्त्राचे ज्ञान मी त्याला दिले असते. पण त्याने फोन फोन ठेवला होता. सिम ब्लॉक कारावाच लागणार होता त्यामुळे मी पुन्हा एकदा उरले सुरले अवसान गोळा करुन मी पुन्हा एकदा थेट पोस्टपेडचा नंबर डायल केला. दाबादाबीचे सोपस्कार पार पाडून मी हव्या त्या पर्यायाला गेलो.
कके वरची मुलगा: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. मी तुम्हाला पोस्टपेड डीपार्टमेंटचा नंबर देतो.
माझ्या सहनशक्तीचा अंत पाहीला जात होता. पण यावेळी मात्र मी "आलीया भोगाशी का घ्यावी माघार" म्हणून जे घडेल त्याला सामोरे जायचे ठरवले. तो मुलगा त्याचा "पोस्टपेड"चा नंबर सांगत होता. हा तोच नंबर होता जो पोस्टपेडचा थेट नंबर डायल करुन दाबादाबी करत मी त्याच्यापर्यंत पोहचलो होतो. लहानपणी मुखोद्गत असणारी घरातील सार्यांचा सत्कार करणारी सारी शब्दमौक्तिके त्याच्यावर उधळावीत अशी प्रचंड ईच्छा झाली होती. मात्र मला माझ्या ध्येयाप्रत जायचे असल्यामुळे मी तो मोह आवरला.
मी: मित्रा तू जो पोस्टपेडचा नंबर सांगितलास तोच नंबर डायल करुन तुझ्यापर्यंत आलोय.
कके वरची मुलगा: असं का? थांबा मी पाहतो. मी तुमचा डेटा चेक करेपर्यंत लाईनवर राहा. तुमचे नांव आणि ब्लॉक करायचा आहे तो नंबर सांगा.
मी त्याला नाव आणि नंबर सांगितला. त्याने माझा सिम ब्लॉक केला. मी डुप्लिकेट सिम मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते विचारुन घेतले.
कके वरची मुलगा: अजून आपली काय सेवा करु शकतो सर?
मी: झाली एव्हढी सेवा खुप झाली.
कके वरची मुलगा: धन्यवाद सर. आपला दिवस शुभ होवो.
वाचने
28191
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेनोव्हो सपोर्ट्चा अनुभव
आम्चा अणभव
ईमेल करवा ए उत्तम
होय.
In reply to ईमेल करवा ए उत्तम by प्रभो
>>>>>> इथून पुढे गरज पडल्यास
In reply to होय. by धन्या
एअरलेटवाले प्रीपेड असले तरी
सगळे फोन वाले तसेच आहेत. उडदा
सगळ्यात भयानक
वेडाफोन
हाहा
In reply to वेडाफोन by अत्रन्गि पाउस
स्वीडन आणि सुदान एकच आहे
मला तरी..
शिंग मोडून घुसलो पण पस्तावा
अभिनंदन.
In reply to शिंग मोडून घुसलो पण पस्तावा by देशपांडे विनायक
भारी.
In reply to अभिनंदन. by प्रभाकर पेठकर
पंधरा हजाराचा फोन वाया गेला
In reply to शिंग मोडून घुसलो पण पस्तावा by देशपांडे विनायक
हे असले अनुभव ७२ व्या वर्षी
In reply to शिंग मोडून घुसलो पण पस्तावा by देशपांडे विनायक
युनिनौर इतके
जुन्या पिढीला नवी पिढी वाया
हरामखोर लेकाचे!
@८ दिवसांनी शेजारच्या खांबावर
In reply to हरामखोर लेकाचे! by पैसा
हाहाहा!
In reply to @८ दिवसांनी शेजारच्या खांबावर by अत्रुप्त आत्मा
आव्टाप्कवरेजेरिया
In reply to हरामखोर लेकाचे! by पैसा
हाहाहा!
In reply to आव्टाप्कवरेजेरिया by धन्या
अरेरे!
In reply to हरामखोर लेकाचे! by पैसा
भारी!
In reply to अरेरे! by बहुगुणी
छ्या... तुम्ही जून्या पीढीतील
In reply to भारी! by पैसा
ह्यावर सगळ्यात सोपा उपाय
शंभरीकडे ढकलत आहे.
आणि हा गोल!
In reply to शंभरीकडे ढकलत आहे. by एसमाळी