काल ऑफीसमधून घरी जाताना कसा कोण जाणे माझा मोबाईल हरवला. कदाचित ऑफीसमध्ये राहीला असेल असे वाटून कॉल केला. रींग जात होती. म्हटलं ऑफीसलाच राहीला असावा. सकाळी उठल्यावर पहिले काम रिंग देण्याचे केले. फोन स्विच्ड ऑफ. दुपारी बॅटरी अर्धी झाली होती. म्हटले बॅटरी संपली असेल. ऑफीसला आलो. फोन नाही. अगदी फ्लोअर रीसेप्शनला विचारुन पाहिले. उत्तर "हमको मालूम नही सर."
फोन हरवला आहे ही वस्तूस्थीती मनाने स्विकारली. आता पुढचे काम सिम ब्लॉक करणे. कस्टमर केअरला फोन लावला. संयम बाळगून त्यांचे एक दाबा, दोन दाबा ऐकून मला हवा असलेला पर्याय निवडला. मला ऑफीसरशी बोलण्यासाठी पैसे पडतील हे एक दाबून मान्य केल्यावर फोन लागला.
मी: नमस्कार मी धनाजीराव वाकडे बोलतोय. माझा पोस्टपेड सिम असलेला मोबाईल काल हरवला. त्यामुळे मला सिम ब्लॉक करायचे आहे.
कके वरची मुलगी: सर तुम्ही आता त्याच नंबरवरुन बोलताय का?
तिने माझं म्हणणं ऐकलंच नव्हतं सवयीने "तुम्ही आता त्याच नंबरवरुन बोलताय का?" असं विचारुन मोकळी झाली होती.
मी: (मनातल्या मनात, भवाने) मी सिम हरवला आहे म्हणतोय तर त्याच नंबरवरुन कसा बोलेन?
कके वरची मुलगी: सॉरी सर. पुन्हा सांगता का?
मी: नमस्कार मी धनाजीराव वाकडे बोलतोय. माझा पोस्टपेड सिम असलेला मोबाईल काल हरवला. त्यामुळे मला सिम ब्लॉक करायचे आहे.
कके वरची मुलगी: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. मी पोस्टपेडला ट्रान्स्फर करते. कृपया लाईनवर राहा.
बयेने मला लाईनवर राहायला सांगितले खरे मात्र तीन चार मिनिटे लाईनवर राहूनही कुणी उत्तर दिलंच नाही. मी वैतागून फोन कट केला आणि पुन्हा लावला. पुन्हा एकदा एक दाबा, दोन दाबाचे सोपस्कार पार पाडून मी त्यांच्या माणसापर्यंत पोहचलो. त्या मुलाला माझा प्रॉब्लेम सांगितला.
कके वरची मुलगा: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. पोस्टपेडसाठी मी तुम्हाला एक नंबर देतो त्यावर कॉल करा.
त्य दादाने नंबर दिला. मी कॉल केला. पुन्हा एक दाबा, दोन दाबा सुरु झाले. मी ती दाबादाबी करत मला हव्या असलेल्या पर्यायापर्यंत पोहचलो. फोन अटेंड करणार्या मुलाला माझी समस्या सांगितली.
कके वरची मुलगा: सर आता आमच्या सिस्टीमचे अपग्रेडेशन चालू असल्यामुळे सिस्टीम डाऊन आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता आम्ही काही करु शकत नाही. तुम्ही नांव आणि नंबर देऊन ठेवा आणि दोन तासांनी फोन करा.
नांव आणि नंबर देऊन ठेवण्यापलिकडे माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता.
मी दोन तासांनी फोन केला. यावेळी थेट पोस्टपेडचा नंबर लावला. पुन्हा एक दाबा, दोन दाबाचा मंत्र सुरु झाला. मी स्टार सिक्सने मला हव्या असलेल्या पर्यायापर्यंत गेलो.
कके वरची मुलगा: सर तुम्ही याआधी चार वेळा कॉल केला होता. हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. सर कसं आहे तुम्हाला साखर हवी असेल तर किराना मालाच्या दुकानातच जावे लागेल. पेट्रोल पंपावर साखर कशी मिळेल.
मी पोस्टपेडवाला नंबरच डायल केला होता हे सांगायच्या आत त्याने फोन ठेवला. त्याने बहुतेक नुकतंच डॉ. रमा मराठेंचं "रंग सुखाचे" पुस्तक वाचलेलं असावं. साखर, किराणा मालाचे दुकान आणि पेट्रोल पंपाचे उदाहरण त्याच पुस्तकात आहे.
मी हताश, हतबल आणि हतबद्ध. त्याने फोन चालू ठेवला असता तर त्याच्या पुढच्या सात पीढयांना तो शिकवू शकेल इतकं मानसशास्त्राचे ज्ञान मी त्याला दिले असते. पण त्याने फोन फोन ठेवला होता. सिम ब्लॉक कारावाच लागणार होता त्यामुळे मी पुन्हा एकदा उरले सुरले अवसान गोळा करुन मी पुन्हा एकदा थेट पोस्टपेडचा नंबर डायल केला. दाबादाबीचे सोपस्कार पार पाडून मी हव्या त्या पर्यायाला गेलो.
कके वरची मुलगा: सर हे प्रिपेड डीपार्टमेंट आहे. मी तुम्हाला पोस्टपेड डीपार्टमेंटचा नंबर देतो.
माझ्या सहनशक्तीचा अंत पाहीला जात होता. पण यावेळी मात्र मी "आलीया भोगाशी का घ्यावी माघार" म्हणून जे घडेल त्याला सामोरे जायचे ठरवले. तो मुलगा त्याचा "पोस्टपेड"चा नंबर सांगत होता. हा तोच नंबर होता जो पोस्टपेडचा थेट नंबर डायल करुन दाबादाबी करत मी त्याच्यापर्यंत पोहचलो होतो. लहानपणी मुखोद्गत असणारी घरातील सार्यांचा सत्कार करणारी सारी शब्दमौक्तिके त्याच्यावर उधळावीत अशी प्रचंड ईच्छा झाली होती. मात्र मला माझ्या ध्येयाप्रत जायचे असल्यामुळे मी तो मोह आवरला.
मी: मित्रा तू जो पोस्टपेडचा नंबर सांगितलास तोच नंबर डायल करुन तुझ्यापर्यंत आलोय.
कके वरची मुलगा: असं का? थांबा मी पाहतो. मी तुमचा डेटा चेक करेपर्यंत लाईनवर राहा. तुमचे नांव आणि ब्लॉक करायचा आहे तो नंबर सांगा.
मी त्याला नाव आणि नंबर सांगितला. त्याने माझा सिम ब्लॉक केला. मी डुप्लिकेट सिम मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते विचारुन घेतले.
कके वरची मुलगा: अजून आपली काय सेवा करु शकतो सर?
मी: झाली एव्हढी सेवा खुप झाली.
कके वरची मुलगा: धन्यवाद सर. आपला दिवस शुभ होवो.
वाचने
28191
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्चा, असं जालं तर!
मी तर सरळ त्यांच्या ऑफिसला
प्रीपेड वापरणे हां उत्तम
@आकाशवालीशी झालेलं बोलणं>>>
In reply to प्रीपेड वापरणे हां उत्तम by प्रचेतस
=)) =))
येप!! शक्य तितक्या शांत
In reply to =)) =)) by किसन शिंदे
खात्रीने सांगतो, ही" एअरलेट"
होय. एयरलेटच आहे.
In reply to खात्रीने सांगतो, ही" एअरलेट" by नानासाहेब नेफळे
यरटेल नि आयड्यात काडीमात्रही
In reply to होय. एयरलेटच आहे. by धन्या
थोडयाफार फरकाने सार्या
In reply to यरटेल नि आयड्यात काडीमात्रही by किसन शिंदे
सध्याचं काम करण्याचं ठिकाण
In reply to थोडयाफार फरकाने सार्या by धन्या
>>>> "हा कॉल गुणवत्तेच्या
In reply to थोडयाफार फरकाने सार्या by धन्या
"बाबा रे/बाई ग, तू याबद्दल
In reply to थोडयाफार फरकाने सार्या by धन्या
ही" एअरलेट" नावाची कंपनी
In reply to खात्रीने सांगतो, ही" एअरलेट" by नानासाहेब नेफळे
तर काय ,एअरलेट एक विश्वव्यापी
In reply to ही" एअरलेट" नावाची कंपनी by शिद
मग थोड्या वेळात टुऽऽ ऊऽऽ डुऽऽ
In reply to तर काय ,एअरलेट एक विश्वव्यापी by नानासाहेब नेफळे
नेफळेबुवा रॉक्स =)) =)) =)) =
In reply to तर काय ,एअरलेट एक विश्वव्यापी by नानासाहेब नेफळे
:(
धन्यासेठ फोन हरवला का इतक्यात
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फार हार्डवर्किंग आहात;
हा हा हा .... सहानभूती ;-)
या कॉल सेंटर वाल्यांबद्द्ल....
अशा वेळेला चार शिव्या घालून
प्रतिसादाचा उपास सुटला
In reply to अशा वेळेला चार शिव्या घालून by विश्वनाथ मेहेंदळे
ऑ... ऐकावे ते नवलंच. हे कुठले
In reply to प्रतिसादाचा उपास सुटला by किसन शिंदे
खरड केली आहे. बघुया किती दिवस
In reply to प्रतिसादाचा उपास सुटला by किसन शिंदे
हे असे उत्तर खरेच मिळाले ?
सर कसं आहे तुम्हाला साखर हवी असेल तर किराना मालाच्या दुकानातच जावे लागेल. पेट्रोल पंपावर साखर कशी मिळेल.सहसा विनोदी वा आगाऊ कुठल्याही सदरात मोडणारी उत्तरे ते लोक देत नाहीत. आणखी एक शंका (कोणीही दूर करा) - आपण केलेला फोन दरवेळी एकाच व्यक्तीकडे जातो का? कि कुठेही लाईन फ्री असेल तिथे जातो ?फोन एकाच व्यक्तीकडे जात नाही.
In reply to हे असे उत्तर खरेच मिळाले ? by तुमचा अभिषेक
आपण केलेला फोन दरवेळी एकाच
In reply to हे असे उत्तर खरेच मिळाले ? by तुमचा अभिषेक
हे असं ...
In reply to आपण केलेला फोन दरवेळी एकाच by धन्या
सातवाहन काळातील गोष्टच वेगळी
In reply to हे असं ... by चौकटराजा
दर्पण सुंदरी ह्या
In reply to सातवाहन काळातील गोष्टच वेगळी by धन्या
नाही?
In reply to दर्पण सुंदरी ह्या by प्रचेतस
चाहनेवाले की आँखो में ;)
In reply to नाही? by धन्या
ती शिळा वीरगळ होती का गधेगाळ
In reply to हे असं ... by चौकटराजा
दोन्ही
In reply to ती शिळा वीरगळ होती का गधेगाळ by प्रचेतस
कहर !!!
In reply to दोन्ही by चौकटराजा
मग धवांच्या चेहर्यावर
In reply to दोन्ही by चौकटराजा
कारण
In reply to मग धवांच्या चेहर्यावर by प्रचेतस
परत कहर
In reply to कारण by चौकटराजा
"नेक्स्ट अवेलेबल एजंट"कडे
In reply to आपण केलेला फोन दरवेळी एकाच by धन्या
सहानुभूती (खोटी, खोटी) ;)
फोनचं कै नै हो तै. ती सारी
In reply to सहानुभूती (खोटी, खोटी) ;) by यशोधरा
LOL! सिम नाही का मिथ्या?
In reply to फोनचं कै नै हो तै. ती सारी by धन्या
सिमही आहेच मात्र ते जर "सत्य
In reply to LOL! सिम नाही का मिथ्या? by यशोधरा
अहो मिथ्या वस्तू काय ग्यान
In reply to सिमही आहेच मात्र ते जर "सत्य by धन्या
अस कस अस कस
In reply to फोनचं कै नै हो तै. ती सारी by धन्या
मी: मला अनवाँटेड नंबर वरून
वेड लावतात हे कके वाले.
वेड लावणारे कके वाले
In reply to वेड लावतात हे कके वाले. by वेल्लाभट
या निमित्ताने एक अफलातून
In reply to वेड लावणारे कके वाले by सामान्यनागरिक
ते असं आहे...
In reply to या निमित्ताने एक अफलातून by धन्या
ही
काही वेळा या सिस्टीमच्या मागे
In reply to ही by vikramaditya
आदर!
हम्म........ खरच वैताग! एकदा
केअरफुली कस्टमरना गंडवलेलं का
In reply to हम्म........ खरच वैताग! एकदा by रेवती
हॅहॅहॅ... लयं जुने दिवस आठवुन
हा हा हा ... अमेरिका, युरोप
In reply to हॅहॅहॅ... लयं जुने दिवस आठवुन by मदनबाण
आवाज हाॅवी मँडेलचा वाटतोय जो
In reply to हा हा हा ... अमेरिका, युरोप by सुहास झेले
लय भारी ! जै महाराष्ट्र !!
In reply to हॅहॅहॅ... लयं जुने दिवस आठवुन by मदनबाण
ह्या
घरोघरी तेच दुखणे
पोलीस तक्रार जरूरी.
स्वानुभव
मी तुमच्या वरिष्ठांशी संपर्क करेन" हे वाक्य ह्मखास कामास येत !
In reply to स्वानुभव by भाते
याहून भयानक टेक्निकल सपोर्ट
कोणत्या मायक्रोसोफ़्ट प्रोडक्ट टेक्निकल सपोर्ट सोबत भयानक अनुभव आ
In reply to याहून भयानक टेक्निकल सपोर्ट by खटपट्या
मायक्रोसोफ़्ट टेक्निकल सपोर्ट
In reply to कोणत्या मायक्रोसोफ़्ट प्रोडक्ट टेक्निकल सपोर्ट सोबत भयानक अनुभव आ by प्रणित
" टिव्हीच झाल थोडं अन् मोबाईलन धाडल घोडं "