अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी..
लेखनविषय:
नभी काजळी दाटता सूर ओला
उरा अंतरातून बरसून गेला
झरा आत वाहे,तरीही सुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी
कुणी हासते वा कुणी गीत गाते
कुणी प्रेमरंगात रंगून जाते
उभी एकटी दूर सार्याहुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी
झरावे किती मेघ आतून सारे
फुलावे किती अंतरंगी शहारे
फिरो गार वारा किती आसमंती
तरी कोरडासा उरे जीव अंती
नव्याने नटो ही धरा मेघवेडी
नवी बावरी लाजुदे सांज थोडी
उभी पायथ्याशी नव्याने जुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी
सख्या,एकदा जीव ऐसा झुरावा
सुटावे जिणे,श्वास माझा सरावा
उरो शेवटाला तुझी होवुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी
© डॉ.अदिती शरद जोशी
वाचने
3540
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
वा छान
उभी पायथ्याशी नव्याने जुनी मी
वा !!
क्या बात है! हृदयाचा ठाव
मस्तच कविता
In reply to मस्तच कविता by एस
+१
सुंदर
आवडली.
क्या बात है.
In reply to क्या बात है. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच कडवं आवडलं मलाही.
In reply to हेच कडवं आवडलं मलाही. by इनिगोय
+२
आवडली
रचना आवडली
सुंदर
मस्तं! खूप आवडली कविता.
सुंदर कविता
असे वाचुनी जाहले दीस फार
In reply to असे वाचुनी जाहले दीस फार by बॅटमॅन
आले आले.
कविता ाआवडली.
खुप छान !!!!