Skip to main content

(काय राव सांगू)

लेखक सूड यांनी शुक्रवार, 31/08/2012 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
काय राव सांगू, कसं मी सांगू? 'पुण्यास भारी आहे माज' काडी अशी सारुन आलोय आज उगीच पिऊनी आलो फूल उगीच मनाला पडली भूल कळफलकाचा अन् शब्दांचा दावियला मी भलता बाज काडी अशी सारुन आलोय आज जरी झिंगलो मारुन 'नीट' लिहीत राहिलो होऊन धीट जमली सारी पोरं कशी ही प्रतिसादांची घुमते गाज काडी अशी सारुन आलोय आज सहज बोलूनि फसलो मी उगाच बरळत बसलो मी पंख लागूनि गेला धागा नाहि चालला काही ईलाज काडी उगा सारुन आलो आज
लेखनविषय:

वाचने 6618
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

सगळ्या मात्रा मोजून घेतल्या. परफेक्ट्ट!

संपादित

=))

विडंबन मस्तच जमलंय