फॅण्ड्री आवडणे , न आवडणे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
एकदाचा फॅण्ड्री पाहिला. फेसबुकवर रोज येणारी परीक्षणं पाहून फॅण्ड्री पाहीलेले लोक आपल्याला खिजवतात असं वाटू लागल होतं. मग ज्या जिद्दीने सिनेमाबद्दल खूप काही कळत नसतानाही पाहीला त्याच जिद्दीने गद्यात लिहीणं जमत नसतानाही लिहायचं ठरवलं. लिहायचं ठरवलंच आहे तर तांत्रिक गोष्टी कळत नसताना काय लिहायचं ?
तर एक गोष्ट खरी की हा सिनेमा असा आहे की तो पाहीलेल्यांना त्याबद्दल चांगलं वाईट इतरांना सांगावंसं वाटत राहतंं हे खर आहे. एक अॅव्हरेज प्रेक्षक म्हणून मला काय वाटलं हे सांगण्याचा घटनादत्त अधिकार बजावण्यासाठी लिहायचंच असं ठरवलं (मिपावर वाभाडे काढले गेले की दुरुस्त्या करून फेसबुकवर लिहायचं हे पण अभिव्यक्तीस्वातंत्र्यच ). इतरांनी बरंच काही लिहीलं आहे त्यामुळे ते सगळं पुन्हा सांगण्याचं काम कमी झालं हा सर्वात शेवटी लिहीण्याचा फायदा. :)
सिनेमा पाहताना आपल्याला त्याच्याबद्दल लिहायचं आहे अशा अभिनिवेशात काही स्वयंघोषित समीक्षक नेटकर सिनेमा पाहतात. मग ते धड एंजॉयही करत नाहीत आणि दुस-याला एंजॉयही कऊ देत नाहीत. तर एकदा थेटरात गेलं आणि खुर्चीत बसलं की आधी खुर्चीखाली कुणी पिशवी ठेवलीय का हे पहायचं. खुर्ची स्वच्छ आहे का हे ही पहायाचं हा शिरस्ता पार पाडायचा. मग आपलंही डोकं स्वच्छ करायचं. सगळी परीक्षणं झाडून झटकून साफ करायची हे सगळं आवर्जून केलं. मगच सिनेमा पाहीला.
नेहमीच्या चटपटीत संवादांना संपूर्ण फाटा, वेगळं पार्श्वसंगीत हे जाणवणारे ठळक मुद्दे वाटले. नेहमीच्या आयुष्यात आपण मसालेदार संवाद वापरून (खेडवळ किंवा शहरी भाषेत) एकमेकांशी बोलत नाही. काही सिनेमात किंवा मालिकांमधे प्रत्येक पात्रं हे साहीत्यिक असल्याप्रमाणे लच्छेदार गोडगोड सवाद असतात. अंगावर कपडे जितके भरजरी तितकेच संवादही बोजड. नेहमी नेहमी पाहून कंटाळलेल्या माझ्यासारख्यांना आपण जसं बोलू तसे संवाद सिनेमात पाहणे हा एक सुखद धक्का होता. तसंच खेड्यात घडणा-या घटना आहेत तशा दाखवणे हा एक छान अनुभव होता.
हा सिनेमा पाहताना तो एखाद्या आत्मचरित्रासारखा पहायला पाहीजे. तो कुणाचा तरी अनुभव आहे हे लक्षात ठेवायला पाहीजे. एखाद्याचा अनुभव आपण बदलू शकत नाही. नागराज मंजुळे स्वतः कवी आहे, त्याचा पहिलाच सिनेमा असला तरी त्याने सिनेमा या विषयाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे. त्याची याआधीची एक पिस्तुल्या ही शॉर्टफिल्मही पुरस्कार मिळवणारी ठरलेली आहे. अनेक जण म्हणतात तसा हा समाजव्यव्स्थेवर भाष्य करणारा सिनेमा आहे असं मला अजिबात वाटलं नाही. ही एक त्या वयातली प्रेमकथाच आहे. काहींचं प्रेम सफल होतं तर काहींचं असफल होतं. असफल होण्यामागे प्रेम व्यक्त न करता येणं असतं. त्याची अनेक कारणं असतात, त्यातलं एक न्यूनगंड हे एक कारण आहे हे सिनेमा पाहताना ठळक होतं. अशी अनेक मुलं असतात ज्यांना एखाद्या मुलीकडे पाहत राहणं आवडतं पण जाऊन सांगणं जमत नाही. त्याची कारणे फॅड्री सांगतो तेव्हां जंब्याची भूमिका पटत जाते. कोवळ्या वयात कुणाला कोण आवडावं याबद्दल बंदी घालता येत नाही. पण ते सांगता न येणं हे दुर्दैव सिनेमात जाणवत राहतं. पण त्याबद्दल सहानुभूती नको असल्याचं दिग्दर्शकाचं म्हणणं असावं असं वाटत राहतं. जंब्याचं पात्र तिला जाऊन का सांगू शकलं नाही हे सिनेमा पटवून सांगतो.
किशोर कदमांचा अभिनय अतिशय संयत आणि नैसर्गिक झाला आहे. विशेषतः अजिजीचे भाव आणि शेवटच्या प्रसंगात मुलावर राग व्यक्त करणारा बाप खूप मस्त. राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हां. राष्ट्रगीताला उभं राहतात इतपत जनरल नॉलेज असणारा पण राष्ट्रगीतापेक्षा डुक्कर हातातून निसटतंय हे भाव किशोर कदमांनी जबरदस्त उभे केले आहेत. कुणी म्हणतं या प्रसंगात हसू नये, पण तो ब्लॅक कॉमेडीचाच प्रकार वाटला. विषण्ण करणारा विनोद. शेवट शेवटी सर्वच पात्रांच्या बाबतीत तो विनोद पडदा व्यापून टाकतो, ज्याची खबर जंब्याच्या घरच्यांना नसते, पण जंब्याच्या संवेदनशीलतेला असते. जंब्याच्या घरचे, गावातले हे सगळे एका बधीरतेचे प्रतिनिधी आहेत तर जंब्याच्या संवेदनशीलतेमधून त्याची होणारी घुसमट आणि त्यातून परिस्थितीला मनाविरुद्ध शरण गेल्याने एका क्षणी त्याचा होणारा विस्फोट हे एखाद्या कवितेसारखं उलगडत जातं. त्याच्या उलगडण्याच्या पद्धतीने फॅण्ड्री हा प्रत्येकासाही वेगळा अनुभव असू शकतो. प्रेक्षकाला विचार करता येतो हे दिग्दर्शकाने गृहीत धरलेलं असल्याने त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून अनेक गोष्टी बिटवीन द लाईन्स येतात. पण त्या बिटवीन द लाईन्स नाहीत. तिथे पडद्यावर सूचक प्रतिमा किंवा ध्वनी यांचा वापर आहे. जंब्याच्या घरी अठरा विश्वे दारीद्र्य आहे, ज्याची त्यांना सवय आहे. बुडालेला अभ्यास विचारायला जंब्या जातो तेव्हां त्याच्या वर्गातला हुषार मुलगा बाहेर येऊन त्याला काय शिकवलं होतं हे सांगतो तेव्हां कार्टून सिरीयल्सचे आवाज येत राहतात. हे खूप आवडलं. इतकं की त्याबद्दल विस्कटून सांगावंसं असंही वाटत नाही. ज्यांना अशा जागा टिपता आल्या नाहीत त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. शेअटी एखादी कलाकृती पाहताना आपली अनुभूतीही महत्वाची. प्रेक्षकांना काहीच समजत नाही असं समजून काढलेले राऊडी राठोड किंवा बायको चुकली स्टँडवर पाहील्यानंतर एके दिवशी अचानक कहानी पाहण्यात येतो तेव्हां बरं वाटतं. वळू पाहताना खूप बरं वाटतं. तर फॅण्ड्री पाहताना सिनेमा आवडणे किंवा न आवडणे या पलिकडची काही तरी गोष्ट आहे हे जाणवायला लागतं. आवडनिवड या पलिकडे एक अनुभवणे असतं त्याबद्दल नेमकं कसं सांगायचं ?
- संध्या
(टीप :सिनेमा पाहील्यानंतर आणि हा लेख इथपर्यंत लिहील्यानंतर नागराज मंजुळेचं निवेदन वाचलं. त्याने सिनेमात अभिनय करणे अपेक्षित नसल्याचं सांगितलं आहे. किशोर कदमला जेव्हां जेव्हां तो अभिनय करतोय असं वाटलं तेव्हां त्याने तसं सांगितलं. म्हणूनच सर्वांचा वावर नैसर्गिक आहे. जसं काही आजूबाजूला वावरणारी माणसंच पडद्यावर आहेत असं वाटतं).
प्रतिक्रिया
आवडलं प्रकटन.
आत्तापर्यंत आलेल्या फॅण्ड्री
+११११
+१
मस्त
आवडलं
छान कि हो
न्युमेरो उनो!
टाईमपास काय किंवा फॅन्ड्री
टाईमपास काय किंवा फॅन्ड्री काय,
सहमत. अत्यंत कटाक्षाने
हेच म्हणतो
टिव्ही वर आला तर नक्की बघेन
प्रसाद, एक जरा वेगळे मत
विनोद
फॅन्ड्री पाहिला. आतून हललो.
तुम्ही जग फक्त काळ्या आणि
अहो तेच तेच पाहून कंटाळा
आणखी एक नोंदवतो.
अमेरिकेत निर्वासित म्हणुन
ते नसतीलही काढत...
कुणी जबरदस्ती करुन तर सिनेमा पाहायला थियेटरात नेत नसतं.
लेखन आवडलं.
@(मिपावर वाभाडे काढले गेले की
छान लिहिलय.
सर्वांचे आभार. नाही म्हटलं
श्री किरण चव्हाण उर्फ
तुच्छतावादी मनोवृत्तीचे एक
बॅटमॅन, यात तुच्छतावादी
पिक्चर बघणे हेच्च्च सार्थक
नाही नाही. पिक्चर विचार
(No subject)
वाह ! सुंदर परीक्षण !!
छानच लिहिलंय
सिनेमा पाहताना आपल्याला
शांत संयत समिक्षण.
चित्रपट पण आवडला आणि आपले
रूढ अर्थाने परीक्षण नाहीच.
च्याआयला जब्या ने मारलेला
फँड्री पाहिला.
मधे मधे त्याच्या चेहर्यावरचे
सामाजिक भाष्य करणारा वगैरे नाही
नाव मंदार त्यामुळे आडनाव
>> मी शहरात राहिलेला, वाढलेला
मराठी कथालेखक साहेब तुम्हा
...
एकदा