आजकालचे ग्रामीण चित्रपट

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
3 Jul 2011 - 1:18 am
गाभा: 

गेल्या काही वर्षापासून मराठीमधे अनेक ग्रामीण चित्रपट येऊ लागले आहेत
मराठीतले काही ठराविक कलाकार तर दिवसेंदिवस ग्रामीण चा रतिब घालू लागले आहेत.

हे सर्व चित्रपट पाहताना नेहमी प्रश्न पडतो

ग्रामीण म्हणजे नेमके काय ?

खटकणारी गोष्ट म्हणजे
यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही

धोतर टोपी घातली किंवा नऊवारी लुगडं नेसलं की जमलं ग्रामीण
असा एक भ्रम दिसतो या कलाकारांचा.

आणि मग ग्रामीण म्हणून जी भाषा बोलली जाते त्यामधे
आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय या शब्दांची नुसती भरमार होत राहते

शिवाय ग्रामीण म्हणून एक विचित्र हेल काढून आणि अंमळ ओरडून हे कलाकार बोलतात
तो सगळाच प्रकार तापदायक होतो. कृत्रिमता असह्य होते.

आपला अनुभव काय आहे याबद्दल !

प्रतिक्रिया

आपला अनुभव काय आहे याबद्दल !

असाच!

मराठीला ग्रामीण चित्रपट ही गोष्ट नवी नाही, सुर्यकांत चंद्रकांत, निळुभाऊ फुले यांनी ते गाजवून ठेवले आहे
त्यांचा अभिनय सहज, नैसर्गिक वाटत असे.

त्या तुलनेत आजचे कलाकार कुठे आहेत

कानडाऊ योगेशु's picture

3 Jul 2011 - 2:03 pm | कानडाऊ योगेशु

नटरंग मध्ये अतुल कुलकर्णीने साकारलेले पात्र सुरवाती सुरवातीला ग्रामीण भाषा बोलत असते पण शेवटी शेवटी शुध्द आणि शहरी बोलायला लागते.

अतुल कुलकर्णीसारख्या अभ्यासु अभिनेत्याने अशी चूक कशी केली हा प्रश्न मला चित्रपट पाहील्यानंतर पडला होता.

शेवटी शेवटी शुध्द आणि शहरी बोलायला लागते.

हेच म्हणते.
नटरंगमध्ये अजूनही काही चुका सहजपणे दिसत होत्या.
त्यावेळी फार अपेक्षा ठेवून हा सिनेमा पाहिला आणि म्हणावे तसे मनोरंजन झाले नाही.

इष्टुर फाकडा's picture

13 Apr 2018 - 1:46 am | इष्टुर फाकडा

नटरंग मध्ये अतुल साहेब ग्रामीण बोलण्याचा अभिनय करतात फक्त. बोलायला जमलं नाहीये त्यांना :)

मी-सौरभ's picture

3 Jul 2011 - 2:30 pm | मी-सौरभ

फार काय बघितले नाहीत त्यामुळे पाआआआआआआआआआअ स

तुझ्याच शोधात....'s picture

3 Jul 2011 - 6:11 pm | तुझ्याच शोधात....

जर एखादा ग्रामीण चित्रपट करायचा असेल तर त्यानी तिथे जाउन सवय करायला हवी..

तरच ते नीट्स जमेल..

"हा पन चित्रपटामधी तो जी भाषा बोलत व्हता
ती क्वनची ग्रामीन ?"

चित्रपटात दाखवली जाणारी ग्रामीन भाषा ही फार नाटकी असते
प्रत्यक्षात ती तशी कुठेच ऐकू येत नाही.

न चा ण करा, ण चा न करा
आत्ता ग बया, आगं बाबो, आंग आश्शी, आरं बाबा
असले काही बोला

टकुरं डोसकं, मेल्या मुडद्या, बिगी बिगी हे शब्द वापरा की झालं ग्रामीन

खेड्यामधे राहीलेला कुणीही माणूस सांगेल ही भाषा खोटी आहे, यांच्या स्वत:च्या मनातली आहे

पण शहरात राहीलेल्या माणसांना फसवायला बरी असते ही चित्रपटातील ग्रामीन बोली
ग्रामीन म्हणून काही दाखवा, त्यांना ते पटतं

रमेश आठवले's picture

11 Apr 2014 - 1:48 pm | रमेश आठवले

मिसळ पावच्या काही मान्यवर सदस्याना कधी कधी ग्रामीण भाषेत प्रतिसाद लिहिण्याची हुक्की येते. त्यांच्या अशा प्रतिसादात बरेच वेळा दिसणारा एक शब्द म्हणजे निषेध च्या ऐवजी णिशेध .

विजुभाऊ's picture

4 Jul 2011 - 12:02 am | विजुभाऊ

ग्रामीण भाषा या सदराखाली मकरंद अनासपुरे जे काही बोलतो त्यावरून तर वाटते की तो कॉकने , गेलीक , या भाषा देखील तितक्याच ग्रामीण पणे सहज बोलू शकेल

कार्लोस's picture

4 Jul 2011 - 12:45 am | कार्लोस

मराठी सोडा हो जरा भोजपुरी बघायला जाम मज्जा येते

आई मिलन कि बेला.

मुलूखावेगळी's picture

4 Jul 2011 - 10:16 am | मुलूखावेगळी

मराठी सोडा हो जरा भोजपुरी बघायला जाम मज्जा येते

नावे वाचुनच मज्जा येते
गवनवां ले जा राजाजी

नावे वाचुनच मज्जा येते

+१ सहमत...
हा हा हा एजुन एक पोस्टर आठवलं "पलना में खेलत ललनवाँ हमार"

इरसाल's picture

11 Apr 2014 - 3:35 pm | इरसाल

ससुरा बड़ा पइसावाला ! लै जबरी पिच्चर हाये.

नन्दादीप's picture

4 Jul 2011 - 5:31 pm | नन्दादीप

अजून एक... खतर्नाक नाव...

"तोहार सजन हमार"........

किसन शिंदे's picture

4 Jul 2011 - 10:09 am | किसन शिंदे

ग्रामीण चित्रपटच कशाला, आजकाल ज्या तथाकथित मराठी सिरीयल धुमाकूळ घालताहेत त्यातल्या सासुला किंवा सुनेला त्रास देण्यासाठी जे खलपात्र घुसवलं जातं ते सुध्दा आत्ता ग बया अश्याच ढंगाची ग्रामीण मराठी बोलतं.

उदाहरणादाखल बरेच आहेत...कुंकू, मन उधान वारयाचे...

एक नवी मालीका झी वर येत आहे. पैलवानाच्या जीवनावर आधारीत असावी असे वाटते. त्या मालीकेतील प्रमुख पात्र अस्सल ग्रामीण भाषा बोलते.

निल्या१'s picture

4 Jul 2011 - 10:35 am | निल्या१

सहमत आहे. आपले बरेचसे कलाकार एकाच साच्यामध्ये बोलत असतात. पात्र बदलले तरी लकबी त्याच राहतात. उदा.सचिन खेडेकर शिवाजीराजे मध्ये जसे बोलतात अगदी तसेच ता-यांचे बेट मध्ये. इकडे पात्राला थोडी ग्रामीण पार्श्वभूमी असूनही टोन मध्ये अजिबात फरक जाणवत नाही. भरत जाधव यांच्या ब-याच भूमिकांमध्ये एकच टोन वाटतो.

सचिन खेडेकर व तत्सम लोकांच्या बोलण्याच्या लकबी बद्दल थोडा प्रश्न पडतो. त्यांच्याकडून काही शब्दांमध्ये विनाकारण अ लांबवला जातो. उदा. व्यासपीठ चा उच्चर ते व्यासsपीठ असा करतात. इथे स चा उच्चर विशेष लांबवला जातो. स हलंत नसला तरी तो पूर्ण उच्चरला जात नाही. तो लांबवला म्हणजेच बोली शुद्ध होते असा काही त्यांचा व इतरांचा समज आहे का? तुमची कारs घेऊन तुम्ही आजs कोठे जाणार? असं आपण म्हणतो का? मग शब्दांमध्ये हे असे लांबवलेले हेल कशासाठी?

बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो ती मराठवाड्याची बोली नक्कीच नाही. फक्त ग्रामीणच नव्हे तर प्रत्येक भूमिकेप्रमाणे भाषा, उच्चार, लकबी बदलतात. मराठी कलाकरांना या क्षेत्रात सुधारणा करण्यास बराच वाव आहे असे वाटते.

मराठी_माणूस's picture

4 Jul 2011 - 10:44 am | मराठी_माणूस

बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो ती मराठवाड्याची बोली नक्कीच नाही

तिकडच्या माणसांच्या बोलण्याचा बाज असाच असतो

आशु जोग's picture

11 Apr 2018 - 2:47 pm | आशु जोग

मराठी मानूस हाही सदाशिव ग्रामीण चित्रपट वाटतोय

मुलूखावेगळी's picture

4 Jul 2011 - 10:51 am | मुलूखावेगळी

बाकी मकरंद अनासपुरे जे बोलतो ती मराठवाड्याची बोली नक्कीच नाही
तिकडच्या माणसांच्या बोलण्याचा बाज असाच असतो

-१
मराठवड्यात पण जिल्हा बदलला कि बाज बदलतो.सगळ्यांचा बाज १ सारखा नाहीये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jul 2011 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> मराठवड्यात पण जिल्हा बदलला कि बाज बदलतो.सगळ्यांचा बाज १ सारखा नाहीये.

अगदी-अगदी, आणि स्पेशल अशी ’मराठवाडी’ बोली नाहीहे राव.....!
(आणि असेल अशी बोली तर घ्या बरं काथ्याकूटाला विषय)

ग्रामीण चित्रपटातील बोली आणि वेषभूषा संशोधनाचे विषय ठरावेत.

-दिलीप बिरुटे

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Jul 2011 - 10:54 am | llपुण्याचे पेशवेll

बोलीभाषा तशीच्या तशी सिनेमात आणणे शक्य आहे असे मला वाटत नाही. महाराष्ट्रात दर १२ कोसावर बोली बदलते असे म्हणतात. आता साधे कोकणातले उदाहरण घ्यायचं झालं तर. कोकणात राहीलेला दुसर्‍या कोकणी माणसाच्या बोलीवरून तो माणूस कोकणातल्या कोणत्या भागातील आहे हे सहज ओळखू शकतो. कोकणी नसलेल्या माणसाला देखील पोलादपूर, संगमेश्वर, कणकवली, मालवण इथल्या मराठी - कोकणी बोलीचे प्रकार सहज ओळखता येतात.

धन्या's picture

5 Jul 2011 - 9:39 pm | धन्या

कोकणात राहीलेला दुसर्‍या कोकणी माणसाच्या बोलीवरून तो माणूस कोकणातल्या कोणत्या भागातील आहे हे सहज ओळखू शकतो. कोकणी नसलेल्या माणसाला देखील पोलादपूर, संगमेश्वर, कणकवली, मालवण इथल्या मराठी - कोकणी बोलीचे प्रकार सहज ओळखता येतात.

अगदी योग्य म्हणालात...

(माणगांव, महाड, रोहा तालुक्यांमधील ग्रामिण मराठी बोलणारा)
धनाजीराव वाकडे

धमाल मुलगा's picture

11 Jul 2011 - 2:39 pm | धमाल मुलगा

मान्य, की दर बारा मैलाला बोली बदलते, बाज बदलतो. त्याबाबत प्रत्यवाय नाहीच.
परंतु, प्रत्येक सिनेमा हा कोणत्या ना कोणत्या ठिकाणी घडणार्‍या वास्तव/काल्पनिक घटनांवर आधारित असतो. तर 'त्या ठिकाणची बोली' ही तर एकमेवच असेल ना?

वानगीदाखल असं म्हणूया की अबक नावाच्या सिनेमाचा हिरो हा मालवणचा आहे. सिनेमाचा पुर्वार्ध मालवणातला आहे. तर मग त्या हिरोची, त्याच्या आजूबाजूच्या पात्रांची संवादफेक ही मालवणातल्या मराठी लहेजाचीच हवी ना? की ती नगरी चालेल? कानाला खटकणार ना?

प्रस्तुत लेखामध्ये लेखकाचे म्हणणेही असेच आहे असे दिसते. केवळ ण चा न केला, आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय आणि विचित्र हेल काढून हे सगळं 'प्याकेज' ग्रामिण मराठी म्हणून माथी मारण्याचा जो उद्योग चालू आहे त्याबद्दल लेखकाने उद्वेग व्यक्त केलेला दिसतो आहे.

>>बोलीभाषा तशीच्या तशी सिनेमात आणणे शक्य आहे असे मला वाटत नाही.
ह्याबाबत असहमती वर नोंदवली आहेच. कोल्हापूर जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर घडणार्‍या सिनेमामध्ये मराठवाड्यातला औरंगाबादी किंवा बीडचा लहेजा योग्य नसतो. पण कोल्हापूरातली मराठी बोली जशीच्या तशी आणणं मात्र १०१%शक्य असतं. अर्थात....दिग्दर्शक, अभिनेते ह्यांची निरनिराळ्या बोलीभाषांवर कष्ट करण्यची तयारी असेल तर आणि निर्मात्याला तेव्हढा वेळ असेल तरच! नाही का?

रघुनाथ.केरकर's picture

16 Sep 2016 - 1:29 pm | रघुनाथ.केरकर

सहमत,

चिपलुन , रत्नाग्री, ची मालवणी वेगळिय, आणी तळ कोकणातली मालवणी वेगळिय, सातार्डा-पेडण्यातली मालवणी वेगळिय.

छान चर्चा ...

सध्या मराठी शी णे मे एवढ्या ढिगाने येत आहेत कि बापरे ....
सगळा अनुदान लाटायचा खेळ आहे बास...
प्रेक्षकांशी काही देणघेण नसत

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jul 2011 - 12:54 pm | परिकथेतील राजकुमार

ऑह्ह गॉड ! व्हाय व्हाय ? तुम्ही मराठी मूव्हिज का वॉच करता ?

हे आले मराठी द्वेष्टे.

ऑह्ह गॉड ! व्हाय व्हाय ? तुम्ही मराठी मूव्हिज का वॉच करता ?

-महेश कोठारे तळहातावर मूठ आपटून "डॅम इट्" म्हणतो ते ऐकायला.
-अशोक सराफ आणि निवेदिता हेल मोगॅम्बो पोजमधे एक हात वर धरून तिरतिरतिर करत एकमेकांपासून दूर तिरके तिरके पळत जातात ती कोरियोग्राफी बघायला.
-कोल्हापूरच्या कर्दळीच्या फुलांनी भरलेल्या म्युनिसिपल गार्डन्स बघायला.
-"तुझी माझी जोडी जमली ग झक्कास पोरगी पटली" अशासारख्या अद्वितीय रचना ऐकायला आणि त्यावर हिरो हिरविणीचा झिम पोरी झिम डान्स बघायला
-वैभवलक्ष्मीच्या व्रताने सुटलेली संकटे बघायला
-कुंकवाच्या बळकटीच्या साक्षात् अनुभव घ्यायला.

आणि किती कारणं सांगू.. ????? आता वेगळे मराठी सिनेमे निघतात असे ऐकतो, पाहतो. त्याविषयी विशेष भाष्य काही नाही.

किसन शिंदे's picture

4 Jul 2011 - 2:43 pm | किसन शिंदे

अशोक सराफ आणि निवेदिता हेल मोगॅम्बो पोजमधे एक हात वर धरून तिरतिरतिर करत एकमेकांपासून दूर तिरके तिरके पळत जातात ती कोरियोग्राफी बघायला.

हे एक नंबर
:D :D :D :D

अजुन एक-
केवळ स्वतःच्याच सिनेमात महागुरु पिळगावकरांनी हट्टाने गायलेली गाणी ऐकायला.

मैत्र's picture

9 Jul 2011 - 8:17 am | मैत्र

हे सर्वात उत्तम गाणं आहे मराठी कोरिओग्राफीच्या इतिहासातलं असं माझं ठाम मत आहे. :)
त्यामुळे गविंना +११११

माहितगार's picture

17 Apr 2014 - 11:01 pm | माहितगार

गवि, कारण पटली नी प्रतिसाद आवडला.

फारएन्ड's picture

17 Apr 2014 - 11:56 pm | फारएन्ड

गवि, मेलो हसून. तुमचा तो 'निशाणा' पुन्हा वाचायला हवा. जबरी होता तो. :)

स्मिता.'s picture

4 Jul 2011 - 1:41 pm | स्मिता.

पहिला प्रश्न हा की आज काल एवढे ग्रामीणच चित्रपट का निघतात? त्याकरता काही जास्तीचे अनुदान वगैरे आहे का?

या ग्रामीण चित्रपटांत भाषा तर नाटकी असतेच पण त्यातल्या हिरवणी सुद्धा मुंबईमध्ये उच्चवर्गीय भागात राहणार्‍या मुली वाटतात. कित्येक अश्या चित्रपटात दाखवतात की नायक खेडवळ, कमी शिकलेला आणि 'सो कॉल्ड' गावराण भाषा बोलणारा असतो तर नायिका मात्र अगदी नेहमीच कॉकटेल ड्रेसेस घालून, इंग्रजाळलेलं मराठी बोलणारी बोल्ड मुलगी असते.

अगदी मुंबई-पुण्यातही मुली पार्टी वगैरे सोडल्यास रोजच्या व्यवहारात असले कपडे घालत नाहीत आणि ग्रामीण भागात राहणार्‍या मुली मात्र कायम अश्या कश्या?

धमाल मुलगा's picture

4 Jul 2011 - 4:21 pm | धमाल मुलगा

वस्तुस्थिती आहे हे खरं.

आता त्यात सत्रा लफडी आहेत बघा. म्हणजे कसंय ना, पुर्वीचे ग्रामिण सिनेमे होते त्यात कामं करणारे बहुतांश कलाकार ग्रामिण पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणांचे होते. (मी बहुतांश म्हणतोय..लगेच राजा परांजपे वगैरे नावं तोंडावर फेकायला यायची घाई करु नये.) हा एक मुद्दा आहे. आता मला सांगा, मुंबई अन पुण्यात आयुष्य गेलेल्यांना नवखी बोली कितपत घोळवता येणं शक्य आहे? मग कुठंतरी (कुठंतरी कसलं, सत्राठिकाणी) फाफलतोच बाज.

पुर्वी माडगुळकर, मिरासदार, शंकर पाटील अशी दिग्गज मंडळी होती जे कथा-पटकथा लिहायचे. ज्यांना ग्रामिण जिवन, तिथल्या भाषेचा बाज, तिथला लहेजा ह्यांची पुरेपूर माहिती होती.
आज आहे का त्या ताकदीचा कथा-पटकथाकार?

'सामना'च्या वेळी हिंदूरावांच्या रोलसाठी निळूभाऊंची शंकर पाटलांनी अस्सल कोल्हापूरी गावठाणांमधल्या बोलीची शिकवणी घेतली होती. आज आहे का कुणाला एव्हढा वेळ आणि सवड? आणि इच्छा?

मग कचरा होईल नाहीतर काय चंदन?

यकु's picture

4 Jul 2011 - 5:05 pm | यकु

>>>पुर्वी माडगुळकर, मिरासदार, शंकर पाटील अशी दिग्गज मंडळी होती जे कथा-पटकथा लिहायचे. ज्यांना ग्रामिण जिवन, तिथल्या भाषेचा बाज, तिथला लहेजा ह्यांची पुरेपूर माहिती होती.
आज आहे का त्या ताकदीचा कथा-पटकथाकार?

आहेत ना.. चार दिवस पुस्तकं वाचली नाहीत की लगेच घंटाभर मुलाखती देणारे. ... आणि दोन लावण्या काय गाजल्या की गावोगावी जाऊन तोंड नको इतकं उघडं ठेऊन गाणं म्हणणारे गायक पण आहेत..

पल्लवी's picture

10 Jul 2011 - 12:02 pm | पल्लवी

..

मंदार कात्रे's picture

10 Apr 2014 - 3:28 pm | मंदार कात्रे

पुर्वी माडगुळकर, मिरासदार, शंकर पाटील अशी दिग्गज मंडळी होती जे कथा-पटकथा लिहायचे. ज्यांना ग्रामिण जिवन, तिथल्या भाषेचा बाज, तिथला लहेजा ह्यांची पुरेपूर माहिती होती.
आज आहे का त्या ताकदीचा कथा-पटकथाकार?

'सामना'च्या वेळी हिंदूरावांच्या रोलसाठी निळूभाऊंची शंकर पाटलांनी अस्सल कोल्हापूरी गावठाणांमधल्या बोलीची शिकवणी घेतली होती. आज आहे का कुणाला एव्हढा वेळ आणि सवड? आणि इच्छा?

मग कचरा होईल नाहीतर काय चंदन?

आशु जोग's picture

10 Apr 2014 - 3:45 pm | आशु जोग

भाषा शिकून येत असती तर काय पाहिजे होतं
सदाशिवपेठेतल्यांनी सदाशिव भाषा बोलावी.. तरच ती नॅचरल वाटेल

पूर्वीचे कलाकार हे आपल्या कलेबाबत मेहनती आणि दक्ष होते. याची अनेक उदाहरणे आहेत.

१)'शेजारी' या प्रभातच्या चित्रपटात गजानन जागीरदार यांना मुस्लिम मिर्झाची भूमिका साकारायची होती. त्यांनी चित्रीकरणाच्या काळात एका मुसलमान मौलवीची शिकवणी लावून नमाज काटेकोर कसा अदा करायचा आणि भाषेत उर्दू लहेजा कसा आणायचा याचे धडे घोटले. परिणामी त्यांचा अभिनय पाहून मुस्लिम प्रेक्षकांनीही तारीफ केली.

२) सुलोचनाबाईंनी स्वतःच्या आठवणीत नमूद केले आहे, की सुरवातीला त्यांचे उच्चार ग्रामीण असल्याने शहरी/ब्राह्मणी वळणाची मराठी बोलणे त्यांना कठीण जाई. भालजींनी त्यांना एकदा समजाऊन सांगितले, की खर्‍या कलाकाराला सर्व भूमिका कराव्या लागतात. त्यामुळे शुद्ध उच्चार आणि विविध भाषा शिकून घ्याव्यात. सुलोचनाबाईंनी आपल्या भाषेवर मेहनत घेतली. पुढे त्या अगदी हिंदी चित्रपटांतही सहजपणे रुळल्या.

३) लता मंगेशकरांच्या मराठी साजूक वळणाच्या उच्चारांचा कुणीतरी (बहुधा दिलीपकुमार. चू. भू. दे. घे) उल्लेख केल्यानंतर लताबाईंनी परिश्रमाने आणि हिंदी चित्रपट दुनियेतील उर्दू जाणकारांशी बोलत आपला लहेजा परफेक्ट केला. नंतर त्यांनी विविध भारतीय भाषांमधील गाणी गाताना आपले उच्चार त्या भाषेप्रमाणे आहेत ना, याची कायम द्क्षता घेतली.

आजकालच्या कलाकारांना कुठे एवढा वेळ असतो? सगळे कसे प्रोफेशनल. डायरेक्ट स्क्रिप्ट बोलायला तय्यार.

आशु जोग's picture

4 Jul 2011 - 5:38 pm | आशु जोग

पक पक पकाक, वळू, खबरदार हे चित्रपट खरोखरच वेगळ्या अर्थाने अंगावर काटा आणतात.

बाबांनो झेपत नाही ती भाषा बोलता कशाला,
आईने शिकवली असेल ती भाषा बोला ना.

खबरदारमधे संजय नार्वेकर रसिका जोशी
पक पक पकाक - उषा नाडकर्णी
आणि बाकी संधी मिळेल तिथे अमृता सुभाष, ज्योती सुभाष या मायलेकी,
फेटा घातलेले मोहन आगाशे,
जितेन्द्र जोशी, नंदू माधव हे लोक ग्रामीण बोलीचा जो रतीब घालतात तो डोक्यात जातो

इंटरनेटस्नेही's picture

9 Jul 2011 - 2:47 am | इंटरनेटस्नेही

आम्ही खेड्यापाड्यातला / ग्रामीण / शहरी / निमशहरी असा कोणताही मराठी चित्रपट बघत नाही. एवढा पेशन्स आणि मह्त्तवाचे म्हणजे वेळ नाही आमच्याकडे.
-
इंट्या इंग्लिश.

शिल्पा ब's picture

9 Jul 2011 - 7:31 am | शिल्पा ब

अरे हो, तुम्ही कार्यव्यग्र असता नै का!!

चित्रगुप्त's picture

11 Apr 2014 - 8:46 am | चित्रगुप्त

कामातिरेकामुळे बर्‍याच मराठी लोकांना मराठी चित्रपट बघाण्यास वेळ मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे खरी.

बॅटमॅन's picture

11 Apr 2014 - 6:17 pm | बॅटमॅन

कामातिरेकामुळे

अगदी अगदी. कामातिरेकामुळे अजून काहीच करता येत नाही.

ग्रामीण भागातला कामातिरेक हा एक वेगळाच विषय आहे.

१९६७ च्या कोयना भूकंपामध्ये बर्‍याच घरांची पडझड झाली.
एकदा आमचे तीर्थरुप बोलता बोलता बोलून गेलेले... ६७ च्या भूकंपामुळं नेमकं कोण कुणाचं कोण ते समजलं. ;)

..पण मला "अग्निहोत्र" ही मालिका आणि त्यातलं मुक्ता बर्वेचं काम आठवलं..
फार घसेफोड न करता , बळचकर हेल न काढताही तिने ग्रामिण मुलीची भुमिका छानच वठवली होती.

बाकी, कुणीतरी वर सचिन खेडकरांबद्दल केलेल्या विधानाशी सहमत. त्यांच्या अभिनयात्/बोलण्यात तोच तो पणा आलाय खरा..

आशु जोग's picture

10 Jul 2011 - 12:46 pm | आशु जोग

>>अतुल कुलकर्णीने साकारलेले पात्र सुरवाती सुरवातीला ग्रामीण भाषा बोलत असते पण शेवटी शेवटी शुध्द आणि शहरी बोलायला लागते.

शहरी बोलला तर चालेल
पण रेकत रेकत आणि अस्तित्वात नसलेली ग्रामीण मात्र फारच हे वाटते

आशु जोग's picture

12 Jul 2011 - 9:56 pm | आशु जोग

>>प्रस्तुत लेखामध्ये लेखकाचे म्हणणेही असेच आहे असे दिसते. केवळ ण चा न केला, आत्ता, आत्ता ग बया, कंच, वाइच, व्हय व्हय आणि विचित्र हेल काढून हे सगळं 'प्याकेज' ग्रामिण मराठी म्हणून माथी मारण्याचा जो उद्योग चालू आहे त्याबद्दल लेखकाने उद्वेग व्यक्त केलेला दिसतो आह <<

धमाल मुलगा
तुमचे म्हणणे अगदी पटले

आशु जोग's picture

10 Apr 2014 - 3:14 pm | आशु जोग

पोपट नावाचा एक मराठी चित्रपट येवून गेला
त्यातही हाच प्रकार

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Apr 2014 - 3:46 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अरे असले कसले चित्रपट बघतोस रे?
असले चित्रपट येवून जातात तेच बरे आहे.
(नाटकप्रेमी) माई

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2014 - 7:36 am | चौथा कोनाडा

आजो, तुमचा आक्षेप योग्य आहे. ग्रामिण सिनेमा ग्रामीण वाटतच नाही. नटरंग बघताना तर डोकंच उठलं होतं. त्यातले तमासगीर तर तमासगीर वाटलेच नाहीत. झी च्यानेलचे पेड आर्टिस्ट वाटले. एव्हड्यात चांगला ग्रामिण सिनेमा म्हटलं तर फॅन्ड्रीने खुपच वेगळा असा सुंदर अनुभव दिला. क्लास अन मास दोन्हीचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला सिनेमाला. अंतरराष्ट्रीय प्रेक्षकांची या कलाकृतीविषयी उत्सुकता शमवायला, दिग्द. नागराज मंजुळे निघाले युरोप दौरयावर . . . . !

आशु जोग's picture

15 Apr 2014 - 1:49 pm | आशु जोग

फॅन्ड्री पाहणे चालू आहे

मृगनयनी's picture

17 Apr 2014 - 8:36 pm | मृगनयनी

आजो, तुमचा आक्षेप योग्य आहे. ग्रामिण सिनेमा ग्रामीण वाटतच नाही. नटरंग बघताना तर डोकंच उठलं होतं. त्यातले तमासगीर तर तमासगीर वाटलेच नाहीत. झी च्यानेलचे पेड आर्टिस्ट वाटले.

सहमत!!.. सोनाली कुलकर्णीचा आवाज तुपात भिजवलेल्या आणि नन्तर पाण्यात बुडवून मग पेटवायला घेतलेल्या वातीसारखा वाटतो. :) :) :) 'अतुल कुलकर्णी'ने या पिक्चरसाठी खूप मेहनत घेतलीये... ते त्याच्या बॉडीवरून जाणवतेही.... पण "नाच्या"च्या भूमिकेचा खरंतर त्याने पूर्ण विचका केलाये.. असं वाटतं... त्याचा मुद्दाम काढलेला किरटा आवाज, रसभंग करतो...

बाकी "जैत रे जैत" मधली स्मिता पाटील .. परफेक्ट वाटते. अर्थात तिचा चेहरा आणि एकन्दर देहबोली आणि भाषा ग्रामीण बाजाला साजेशी होती. आणि त्यांच्याबरोबर डॉ. मोहन आगाशे!!!... आsssssहाssss.. अजुनही म्हणजे त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी ते इतके हॅन्डसम दिसतात...तर 'जैत रे जैत' मधले मोहन आगाशे.... खरोखर कातर-जमातीतला एक रांगडा गडी म्हणून शोभले. हिन्दी आणि मराठी दोन्हीमधला स्मिता पाटलांचा वावर सहज होता. 'उंबरठा' मधल्या स्मिता पाटील..म्हणजे एक करारी स्त्री!!!! आजच्या कोणत्याच अभिनेत्रीत ही प्रतिभा नाही.
अपवाद फक्त "धोबीपछाड" मधल्या मुक्ता बर्वे'ची "सुलक्षणा दांडगे".. तिची ती गावठी पद्धतीने "दादाss" म्हणण्याची स्टाईल........ अ प्र ति म !!! तिचं एकन्दर सिनेमातलं बोलणं हे शहरात वाढलेल्या गावंढळ तरूण मुलीचं होतं. तिचं गावंढळ हिन्ग्लिश.. अत्यंत मोहक वाटलं!!!... तिचे ते दोन दात पुढे काढून हसणं.. आणि राग आल्यावर ते दात पटकन आत घेऊन डोळे भिरभिरवणं........ केवळ अप्रतिम!!!!! तसंच "जोगवा" मधली देवदासी- मुक्ता आणि तिची बोली आणि देहबोली.... म्हणजे या सगळ्यावर कळस्स्स्स!!!!..... :)
रंगीत पिक्चर्स'मधली सगळ्यात पर्फेक्ट ग्रामीण भाषा वाटते, ती मधू कांबीकरांची!!.. अर्थात येवढ्यात कुठला त्यांचा ग्रामीण बाजा'चा पिक्चर आलेला आठवत नाही. पण "झपाटलेला" मधली त्यांची "लक्ष्याची आई" मनाला खूप भावली. ग्रामीण भाषेला एक सहज लय असते. आणि ती लय पकडण्यासाठी ती अंगात मुरावी लागते. या पिक्चरमधल्या मधू'जींच्या "गप्पे.ए.ए.ए माकडतोंड्या".. सारख्या शिव्या खरोखर नॅचरल वाटतात.. आणि उचित परिणाम साधतात....
काही वर्षांपूर्वीच्या.. कुठल्याश्या पिक्चरमध्ये - बहुधा "घराबाहेर" असावा... त्यात "रीमा लागू" यांच्या तोंडी पण बर्‍यापैकी गावरान भाषा आहे.. पण तितकीशी प्रभावी वाटत नाही. तीच गोष्ट- "स्मिताजी तळवलकर" यांची!!!... खरं सांगायचं तर या दोघींच्याही तोंडी ग्रामीण भाषा तितकीशी शोभत नाही. या दोघी ग्रामीण भाषेत बोलत असतानाही त्यांची ओरिजिनल शुद्धता जाणवल्यावाचून राहत नाही.
सध्या काही पिक्चर आणि सिरियल्स मध्ये काम करणार्‍या "सुरेखा कुडची" ऑल्सो व्हेरी इम्प्रेस्सिव्ह!!!!!!
कजाग सासू, मुलीला सासूविरूद्ध भरवणारी आई, नवर्‍याला मुठीत ठेवणारी बायको... या सगळ्या त्यांच्या भूमिका बर्‍याचदा ग्रामीण भाषेत बघायला आणि ऐकायला मिळतात...... खूप सुन्दर!!!!!!!!!

हुप्प्या's picture

13 Apr 2018 - 5:01 am | हुप्प्या

जैत रे जैत मध्ये कातकरी लोक असणे अपेक्षित आहे परंतु जे दाखवले आहेत त्यांची भाषा, गाणी वगैरे काहीही कातकरी वाटत नाही. गाणी तर ना धो महानोरांची वर्‍हाडी भाषेतली आहेत. वेषभूषा तरी कातकरी लोकांची आहे का शंकाच आहे.

आशु जोग's picture

13 Apr 2018 - 9:04 am | आशु जोग

होय तो ही एक सदाशिव ग्रामीणच चित्रपट होता

भाषेचा वेगळा लहेजा आत्मसात करण्यासाठीसुध्दा काही स्किल्स अपेक्षित असावेत. निव्वळ याच कारणासाठी आशुतोष गोवारीकरने "लगान" मधे एकही मराठी कलाकार घेतला नाहीये. जितक्या मराठी कलाकारांची ऑडिशन घेतली गेली त्यांना अवधी हिंदी अपेक्षितरित्या बोलताच आली नाही.तसेही MTI (Mother Tounge Influence) कमी करणे सर्वांना शक्य नसतेच. त्यामुळेच इंग्रजी सुद्धा तमिळ, तेलुगु, गुजराती (आणि मराठी पण) लोकांची ओळखू येते :)

आशु जोग's picture

11 Apr 2014 - 1:12 pm | आशु जोग

असेल असेल...
सुहासिनी मुळे तशा दिल्लीबेस्ड आहेत... अर्थात मराठीही छान बोलतात

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Apr 2014 - 8:25 pm | निनाद मुक्काम प...

त्यांचे मराठी हे एक हिंदी भाषिक कलाकाराचे वाटते.
एखाद्या भाषेचा लेहेजा , उच्चार शिकून ती बोलणे हे कुठल्याही कलाकाराच्या दर्जावर अवलंबून असते.
नसरुद्दिन शहा देऊळ सिनेमात उपकार केल्याच्या थाटात छोटी भूमिका हिंदी उच्चारात मराठी संवाद म्हणून करतो तर नाही म्हणा त्याने राजपूत व्यक्ती रेखा उत्कृष्ट केल्या आहेत.
नाना भोजपुरी व्यक्तीरेखा उत्कृष्ट करतो,
दिलीप कुमार भोजपुरी उत्कृष्ट बोलतो.
तर मंगेशकर कुटुंबीयांनी उर्दू भाषा शिकण्यासाठी ,खास शिक्षक नेमले होते.

घन निल's picture

11 Apr 2014 - 10:32 am | घन निल

+१

पांथस्थ's picture

11 Apr 2014 - 2:09 pm | पांथस्थ

हाच अनुभव येतो जवळपास सगळ्या ग्रामीण ढंगाच्या मराठी चित्रपटात!

त्यामानाने "७२ मैल एक प्रवास" ह्या चित्रपटात स्मिता तांबे यांचा अभिनय मला (चांगला) अपवाद वाटला. तुमचे काय मत लोकहो?

रघुनाथ.केरकर's picture

16 Apr 2014 - 1:51 pm | रघुनाथ.केरकर

मित्रानो ७२ मैल एक प्रवास हा सिनेमा मात्र ह्याला अपवाद होता......

दिव्यश्री's picture

16 Apr 2014 - 8:11 pm | दिव्यश्री

एक डाव धोबीपछाड मध्ये मुक्ता लैच आवडली . :D सगळा पिच्चरच आवडला .

बाकी लेखकाच्या विचारांशी / प्रश्नांशी सहमत .
( ग्रामीण भाषा ऐकूण माहिती असलेली . )

मैत्र's picture

17 Apr 2014 - 11:38 am | मैत्र

एकदम..
ए भुसनळ्या.. :) एकूण चित्रपट हा स्पूफच्या मार्गाने जाणारा आणि विनोदी असल्याने तिचं बोलणं झकास जमून गेलं आहे.

पण परवाच दे धक्का मधले काही धमाल सीन - उदा. "सेनापती आमचे अश्व कुठे आहेत" पाहताना, सक्षम कुलकर्णीचं अतिशय ओढून ताणून ग्रामीण अगदी डोक्यात गेलं.. यायाम..

टिंग्या हा चित्रपट, त्यातली वर्‍हाडी बोली आणि एकूण साधा गाव शोभेल असं दिग्दर्शन आणि कला दिग्दर्शन जास्त अपील (मराठी?) झालं..

दिव्यश्री's picture

17 Apr 2014 - 4:51 pm | दिव्यश्री

अपील (मराठी?) झालं..>>> मनाला भावलं

अतिशय ओढून ताणून ग्रामीण अगदी डोक्यात गेलं..>>>++++++++++++++++++++++++++++++++++ 111111111111

हे नेहमीच होत . उदाहरणे आत्ता आठवत नाहीत . नंतर लिहिते . एक आठवल महेश मांजरेकरची बायको, मकरंद अनास्पुरेंची झालेली बायको त्याच शिनेमात . *DASH* माझ तर अजूनही डोक उठत . त्या उलट काकस्पर्श मध्ये ती जास्त आवडली . :)

आशु जोग's picture

16 Sep 2016 - 11:22 am | आशु जोग

टिंग्या हा चित्रपट, त्यातली वर्‍हाडी बोली

आता वर्‍हाडी कुठून कहाडलं

आशु जोग's picture

17 Apr 2014 - 1:48 pm | आशु जोग

>> टिंग्या हा चित्रपट, त्यातली वर्‍हाडी बोली
टिंग्या हा जुन्नरजवळच्या नारायणगावचा आहे... वर्‍हाडी असेल तर ... प्रश्नच आहे

मैत्र's picture

17 Apr 2014 - 6:41 pm | मैत्र

मपलं तुपलं ऐकून मला तसं वाटलं. वर्‍हाडी किंवा अस्खलित अहिराणीचा मी काही जाणकार नाही.
आणि बहुधा जुन्नर तालुक्यात असं बोलत नसावेत.

आजानुकर्ण's picture

17 Apr 2014 - 8:51 pm | आजानुकर्ण

बहुधा जुन्नर तालुक्यात असं बोलत नसावेत

जुन्नर-आंबेगाव तालुक्यात असेच बोलतात

(आंबेगाव तालुक्यातला) आजानुकर्ण

फारएन्ड's picture

17 Apr 2014 - 10:15 pm | फारएन्ड

हो टिंग्यामधली भाषा जुन्नर्/मंचर भागात ऐकलेली आहे. त्यामुळे त्यातील संवाद चपखल वाटले.

मला 'देऊळ' मधली गावाकडची भाषासुद्धा अस्सल वाटली होती, जरी ती सहसा चित्रपटांत गावाकडचे लोक बोलताना दाखवतात तशी नव्हती. हायवे वर असलेल्या गावांमधल्या बोलीभाषेत अनेक इंग्रजी, पॉप कल्चर मधले शब्द असतात. तसे बरोब्बर दाखवले आहेत त्यात.

स्वरालि's picture

17 Apr 2014 - 6:27 pm | स्वरालि

मला वळू आवडतो…

हा चित्रपट मी कधीही कितीही वेळा पाहू शकते. तो डायलॉग ``किती चटणी खाता…. उगा लोकाच्या चेष्टेला भर …`` *lol*

तसाच देऊळ चा पहिला अर्धा भाग आवडतो. डायलॉग ``पिंकी पडली… पिंकी….`` आणि ``ये येडा फोफाटा`` *lol*

आशु जोग's picture

16 Sep 2016 - 9:40 am | आशु जोग

आपण कधी स्वतः खेड्यात राहिला आहात का

नसला तर या चित्रपटावर अवलंबून राहू नका

सदाशिवातल्या गिरीश उमेश कुलकर्ण्यांनी काढलेले चित्रपट म्हणजे ग्रामीण असा एक सोयीस्कर समज अनेकांचा झालेला दिसतोय

पण हा शॉर्ट कट योग्य नाही

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Sep 2016 - 4:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

खटकणारी गोष्ट म्हणजे
यातील कलाकारांचे ग्रामीण बोलणे जे त्यांना जमत नाही

सहमत, फारच कमी कलाकारांना म्हणजे बहुतेक सद्ध्या भारत गणेशपुरेलाच वऱ्हाडी नीट बोलता येत असावी, बाकीचे उगाच वऱ्हाडीतसुद्धा ते उचक्या लागल्यागत की की की घुसडत असतात. असो

ग्रामीण / मराठी चित्रपटांचे प्रमुख २ प्रकार -

१. सैराटच्या आधीचे

२. सैराटच्या नंतरचे