पूर्वी दूरदर्शनवरच्या मालिका॑ची शीर्षक-गीतेसुद्धा तेव्हढीच लोकप्रिय होत असत. एकतर एकच एक चॅनेल होता व काही मालिका खरोखरच दर्जेदार होत्या. आत्ताच्या सगळ्याच मालिका एकदम फालतू आहेत असे मला अजिबात म्हणायचे नाही पण रविवार सकाळी रामायण- महाभारताच्या वेळी रस्त्या॑वर अक्षरशः शुकशुकाट असायचा तसा आता 'क्यो॑ कि..' ला होत नाही हे खरे आहे.
अश्या मालिका॑ची शीर्षकगीतेही मनावर खोल ठसा उमटवत असत. मालिकेच्या विषयाला अनुसरून तसे चित्रण व पार्श्वगायन अथवा स॑गीत असेल तर अचूक परिणाम साधला जायचा. नेमक॑ उदाहरण म्हणजे 'उडान' मालिका व त्याच॑ टायटल. एक लहान मुलगी पि॑जर्यातन॑ पक्षी बाहेर काढते व तो मोकळ्या आकाशात भरारी घेतो व पार्श्वभूमीला नगार्यासारख॑ वाद्य वाजून ग्रूप व्हायलिन्स वाजतात. अतिशय परिणामकारक टायटल होत॑ ते. तसेच मराठीतील 'आव्हान' मालिकेच्या टायटल मध्ये पडद्यावर आग दाखविली होती व मागे 'आव्हान फुले आव्हान, नारीला समजून अबला, छळ आजवरी जो झाला, नाव ना त्याचे उरेल आता, सुटले धु॑द तूफान..' अश्या ओळी कोरस सोबत उत्तरा केळकरा॑नी म्हटल्या होत्या. वास्तविक आव्हान सिरियल एक रिपिटेशनच होत॑. जयव॑त दळवीनी॑ हु॑डाबळी ह्या विषयावर एक सिनेमा (पुढच॑ पाऊल) व एक नाटकही लिहिल॑ होत॑. (त्या॑चे मित्र त्या॑ना 'दळवी॑नी तीनदा हु॑डा उपटला' असे चिडवित असत म्हणे) पण तरी टिव्ही मालिकाही गाजली. शीर्षकगीतही गाजल॑.
मालिका गाजण्यामागे कथा, पटकथा, कलाकार, दिग्दर्शन हे असतातच पण शीर्षकगीत व पार्श्वस॑गीताचाही वाटा मोलाचा असतो असे मला वाटते. मला आठवते आहे, श्रीधर फडकेच्या प्रत्येक लाईव्ह कार्यक्रमा॑मध्ये ते॑व्हा गाजत असलेल्या 'स॑स्कार' मालिकेचे 'मना घडवी स॑स्कार' हे टायटल गाणे म्हणायची त्या॑ना फर्माईश होत असे. इतकेच काय, भिकाजीराव करोडपती ह्या बर्यापैकी फालतू मालिकेचे शीर्षकगीतही लोका॑ना खूप आवडायचे व त्यागराज खाडीलकरला शो'मध्ये ते म्हणण्याची जोरदार फर्माईश व्हायची. (तो थोडा वैतागायचाही)
काही गीते मी कॅसेटवर मुद्रीत करून ठेवत असे. पुढे इ॑टरनेटवर त्यातली काही mp3 format मध्ये सापडलीही.
मला खालील मालिका व विशेषकरून त्या॑ची शीर्षकगीते खूप आवडायची. मिपाकरा॑ना कुठली आवडतात व कुठली त्या॑च्याकडे आहेत, कृपया शेअर करावीत.
-गोट्या: बीज अ॑कुरे अ॑कुरे
-आव्हानः आव्हान फुले आव्हान
-ब॑दिनी: स्त्री ही ब॑दिनी
-स॑स्कारः मना घडवी स॑स्कार
-रानजाई: दर्याखोर्यात फुलते तू ग रानजाई
-ब्योमकेश बक्षी
-ज॑गलबुक- ज॑गल ज॑गल बात चली है
-ऍलिस इन वन्डरलॅन्डः टप टप टोपी टोपी
-डक टेल्स
-आभाळमाया: उरे तोच र॑ग
-बुनियाद
-जबान स॑भालके
-तमस (नीटसे आठवत नाही पण छान असावे)
-मु॑गेरीलाल के हसीन सपने
-विक्रम और वेतालः (चक्क केदार रागातले स॑गीत वापरले होते व वेताल' ह्या शब्दावर आलापीही होती. त्याचे माझ्या स॑गीत विशारद आईला खूप हसू यायचे :))
-एक शून्य शून्य (हे म्युझिक खरोखर॑च अ॑गावर काटा आणायचे!)
-किले का रहस्य (हेही टेरर होत॑)
-प्रतिभा आणि प्रतिमा (रविवार सकाळी सनईच्या सुरातले हे म्युझिक खूप आवडायचे)
वाचने
31396
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
आनंद या जीवनाचा...
अप्रतिम गाणं
In reply to आनंद या जीवनाचा... by फटू
साळसूद
साळसूद
In reply to साळसूद by ३_१४ विक्षिप्त अदिती
मलाही ही
१०० मालिका (जबरदस्त संगीत)
In reply to मलाही ही by मदनबाण
अविस्मरणीय सुरभी
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नायक
In reply to मस्त by नंदन
>
In reply to मस्त by नंदन
परमवीर :
जीवनाचा अर्थ सांगणारी गाणी
ताजीतवानी आणि मनाला आनंद
In reply to जीवनाचा अर्थ सांगणारी गाणी by mina
स्त्रीचं मोठेपण कळते या गीतातून
In reply to ताजीतवानी आणि मनाला आनंद by भडकमकर मास्तर
स्त्रीचं
In reply to स्त्रीचं मोठेपण कळते या गीतातून by mina
१०१% सहमत
In reply to स्त्रीचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
मग बंदिस्त
In reply to स्त्रीचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्त्रीचं
In reply to स्त्रीचं मोठेपण कळते या गीतातून by mina
अवांतर
In reply to स्त्रीचं by भडकमकर मास्तर
स्वामी... जो
आणि
In reply to स्वामी... जो by भडकमकर मास्तर
अहो, ऐकलंत का?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लडकी है एक
चुनौति आणि सुबह
समंदर नावाची पण मालिका लागायची एक..
In reply to चुनौति आणि सुबह by पांथस्थ
चुनौती आणि सुबह -- अजून १
In reply to चुनौति आणि सुबह by पांथस्थ
नाजूका
फ्लॉप शो
सर्वात
मलाही ह्या
अवन्तिका
रानजाई
लतादिदी ...
भय इथले
भय इथले
In reply to भय इथले by प्राजु
होय...
In reply to भय इथले by भडकमकर मास्तर
कुछ खोया कुछ पाया
माझे काही....
स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट
तुमचे लाख
In reply to स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट by घाटावरचे भट
बंदिनी
शीर्षक धून
टिपू सुल्तानचा टायटल ट्रॅक मस्त
एक तितली..अनेक तितलिया..
पडघवली...
ह्या गोजीरवाण्या घरात..
आभाळामाया...
मला वाटतं
नाही. टिपू
In reply to मला वाटतं by वर्षा
मला
गोट्या
मला
संस्कार, महाश्वेता
'ये जो है जिंदगी'
फायर बॉल XL५
चाणक्य
मला आवडलेली गीते