Skip to main content

गोफ - २

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 15/12/2007 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग -१ ला ५० प्रतिसाद झाले आहेत. आता नव्या चारोळ्या पान-क्र्.२ वर जाऊ नयेत व सगळ्या चारोळ्यांचा एकत्रीत आस्वाद घेता यावा म्हणून पुढिल चारोळ्या इथे लिहाव्यात तेथील शेवटची चारोळी श्रीपाद, वल्लभ, दत्त, दिगंबर विरु, बसंती, जय नि गब्बर ! आपण आठ मिळूनी टाकू मेंढिकोटचा डाव जब्बर! ;))) हं चालू दे पुढे.. हर हर....
लेखनविषय:

वाचने 13083
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

देवगिरीला गरजत होती कोटावरची मेंढा तोफ तरी किल्ला गारद झाला नियती विणते मुश्किल गोफ (चारोळी हा प्रकार मला अजून समजलेला नाही, गोखल्यांच्या बहुतेक रचना मला आवडलेल्या नाहीत :-( तरी या वाटेला मी बहुधा जात नाही... मागे एकदा चार लिहिल्या होत्या तितक्याच...)

वरवर कोरड्या वाटणार्‍या नारळात थंड मधूर पाणी असतं मृगजळ का असेना, अहो वाळवंटातही पाणी असतं

ऋषिकेशराव गोफ बाकी मस्त विणलाय तुम्ही आणि इथल्या समस्त कवींनी. मस्त आहे हा खेळ. चालू द्या.

आहे तर खरच आहे काय? नाही तर खरच नाही काय? पंचायत समीती आहे काय? नाहीतर पंचाईत झालीय काय?

In reply to by सहज

आम्ची पंचाईत झाली अशी इथली पंचायत गेली तशी आहे आमचा क्रमांक चार पण कोण करतो आमचा विचार ? आमच्या नावावर येते लिहून ते असेल कुणाही कडून पण त्याचा आम्ही करता निषेध देती आम्हाला भावनात्मक छेद.. (च्यामारी हे चारोळी लिहिणे वाटले तितके सोपे नाही हो !) - सर्किट

वा वा, गोफ अगदी छान विणलाय सर्वांनी. आम्हालाही लिहायची इच्छा आहे. पण हा काव्यप्रकार आम्ही कधी हाताळलेला नाही. बघतो प्रयत्न करुन काही जमताय का? आपला, (नवखा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रकाशरावांच्या सुचनेनुसार एक पाचोळीचा प्रयत्न.... आता चोरि बंद करा! अशी मुजोरी बंद करा! अश्लीलता बंद करा! पंचायत, मालक बंद करा! अहो मग बंद करा की बंद करा.. आरडाओरड करून हे सगळं चालू कोण ठेवतय? (झालं गेलं विसरू पाहणारा) ऋषिकेश

समाजकंटकाना मारा चिंचेचा फोक आणि मिसळपावचा विणा छान छान गोफ! ही कशी आहे?-:)

In reply to by शलाका पेंडसे

कंटक कुणाला म्हणावे ? ज्यांनी आजवर केली सेवा, समाजाची, पण कुणीतरी, समजते मालक समाजाचा, कंटकांचा कंटक, कुणीतरी ? (ही मराठी साहित्यप्रकारांच्या विष्ठावळीतील, आमची पाचोळी) - सर्किट

का समाजाच्या नावने बोंबलायचे.. तो ही माणसांनीच बनवलेला.. केला कितीही आरडाओरडा तरी गांव तिथे उकिरडा........! - प्राजु.

मी आहे समाजसेवक* असेच सारे म्हणतात कर्तृत्व त्यांचं पाहून ते समाजसेवक** ठरतात *अर्थः समाजाची सेवा करणारा **संधीविग्रहः माजासहित असलेले सेवक ;)

समाजाचे नितीनियम आणि संस्कृतीची जाणीव पाळणा-यांसाठी सर्वकाही.. नाहीतर सगळ्याचीच उणीव.. - प्राजु.

मिसळपाववर खोदलेले खड्डे बुजवतांना आम्ही दक्ष राहिलो होतो. म्हणतात की, प्रत्येक खड्ड्यात त्यांनी सुरुंग पेरले होते. ( कोणता प्रकार हाताळला आम्ही कोणास ठाऊक )

मोकळ्या स्वच्छंदी गगनातही पेरू शकतात सुरुंग.. स्वातंत्र्य झेपत नाही, कारण सवयीचे असती तुरुंग!

मंडालेच्या तुरूंगात घडले गीतारहस्य.. सुखावल्या त्या भित्ती अन गजांवर उमटले हास्य.. - प्राजु.