Skip to main content

उत्सव -शतशब्द कथा

लेखक जेपी
Published on शनीवार, 12/10/2013
तिच्या' घरी आज बरीच वर्दळ होती ,एरवी कुणी फिरकतही नसे . पाहटेच आलेला 'तिचा' भाऊ आणि धाकटा दीर लोकामध्ये या घटनेच धार्मिक महत्व आणि पूर्वी याचा कसा उत्सव व्हायचा यावर चर्चा करत पुढची तयारी करत होते . 'तिची' ओटी भरण्यासाठी बायकांची झुंबड उडाली होती. आठ दिवसापूर्वी चेत्रागौरीला 'तिच्या' घरी कुणी हि बाई फिरकली नव्ह्ती. घरामध्ये 'तिचा' वेडा नवरा कधी नव्हे तो शहाण्या सारखा शांत बसला होता . 'तिच्या' शेजारी बसलेली 'तिची' भावजयी 'तिची' तुलना लक्ष्मिशी करत होती , धाकट्या जावेला 'तिच्या' नशिबाचा हेवा वाटत होता . असे उत्सवी वातावरण असताना ती मात्र जीवनात पहिल्यादाच मिळालेला शालू पांघरून शांतपणे आपलं सौभाग्य कपाळी मिरवत शेवटच्या प्रवासाला पहाटेच निघून गेली होती .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 5349
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

मृत स्त्रीची ओटी कशी काय भरतात - असा प्रश्न मनात आला. ती बहुधा प्रतिकात्मक असावी. प्रयत्न चांगला आहे. अवांतर: सगळ्या शतशब्दकथांमध्ये 'शेवटच्या ओळीत रहस्यभेद' असा पायंडा तर पडत नाही चाललाय ना अशी एक शंका. हे मत केवळ तुमच्या कथेबद्दल नसून आजवर प्रसिद्ध झालेल्या शतशब्दकथा वाचून झालेले साधारण मत आहे - चुकीचेही असू शकते :-)

In reply to by आतिवास

सौभाग्यवती असताना मेली तर पूजा करतात. तिचे मंगळसूत्र देखील पवित्र मानून ते सोने इतर बायका घालतात. असे ऐकून आहे.

In reply to by आतिवास

शेवटाबद्दल सहमतच नाही तर काहिसा आग्रही ! शंभर शब्दांचे स्फुट / त्रोटक लेखन वाचनीय व्हायला प्रथम उत्कंठापूर्ण आणि शेवट धक्कादायक असणे जरूर आहे असेच वाटते.

***

सुंदर ! शेवट छान साधलाय ! "...शांतपणे आपल्या सौभाग्य कपाळी मिरवत..." याऐवजी तुम्हाला "...शांतपणे आपल्या कपाळी सौभाग्य मिरवत..." असं म्हणायचं आहे असं वाटलं.

कधि काय कस का वगैरे वगैरे वगैरे अन वगैरे...

@ अतिवास्,इस्पिकचा एक्का, वल्लि ,उद्दाम, प्रतिक्रिये बद्दल, @ अतिवास ,मृत स्त्रीची ओटी कशी काय भरतात - असा प्रश्न मनात आला. ती बहुधा प्रतिकात्मक असावी. उत्तरः सौभाग्यवती असताना मृत झाल्यास स्त्रीची ओटी नाहि तर वाजन्त्रि हि आसते, प्रेत न्यायच रस्तावर हळदि कुन्कु चे सडे टाकले जातात . विदारक आसत ते पाहणे.

दाहक लिखाण. शंभर शब्दात खुपच मोठा परिणाम साधलाय.

भयंकर आहे. पण जग हे असंच असतं.

In reply to by पैसा

बाकी या प्रकारात लिहिण्याचा प्रयत्न आवडला.

मोजक्या शब्दात बोचरं सत्य.. विदारक, करुण आणि अगतिक, आपण सारे कसे समाजव्यवस्थेचे बळी आहोत हे क्षणात दाखवून देणारं.. असं लेखन ठळक आणि पुन्हा पुन्हा छापून आलं पाहिजे हे खरचं! जाणिवा जिवंत ठेवायला मदत केल्याबद्दल धन्यवाद तथास्तु...

टोचलं. दुर्दैवानं ज्या समाजामध्ये विधवा स्त्रीला जेव्हा माणसांची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा वाळीत टाकल्यासारखा अनुभव येतो त्या समाजात असं मरण 'उत्सव' ठरलं नाही तरच नवल.

In reply to by प्यारे१

नेमके असेच विचार मनात आलेले वाचून.. आपण योग्य शब्दांत मांडलेत म्हणून इथेच +७८६ देतो..

In reply to by तुमचा अभिषेक

आणि कथा आवडलीच

प्यारे1,श्रीरंग जोशी ,सौंदाळा ,उपास ,पैसा ताई .. प्रतिक्रिये साठी धन्यवाद

बॅटमॅन , अभिषेक प्रतिसादासाठी धन्यवाद .

मस्तच.. सुड ने काढलेले चित्र आठवले.

अहेवपणी मरण . च्या आयला . कुणाचं तरी 'अजब सोहळा ' नावचं १ भारी गाणं आहे . माहित आहे का कुणाला ?