तिच्या' घरी आज बरीच वर्दळ होती ,एरवी कुणी फिरकतही नसे .
पाहटेच आलेला 'तिचा' भाऊ आणि धाकटा दीर
लोकामध्ये या घटनेच धार्मिक महत्व आणि पूर्वी याचा कसा उत्सव व्हायचा यावर चर्चा करत पुढची तयारी करत होते .
'तिची' ओटी भरण्यासाठी बायकांची झुंबड उडाली होती.
आठ दिवसापूर्वी चेत्रागौरीला 'तिच्या' घरी कुणी हि बाई फिरकली नव्ह्ती.
घरामध्ये 'तिचा' वेडा नवरा कधी नव्हे तो शहाण्या सारखा शांत बसला होता .
'तिच्या' शेजारी बसलेली 'तिची' भावजयी 'तिची' तुलना लक्ष्मिशी करत होती ,
धाकट्या जावेला 'तिच्या' नशिबाचा हेवा वाटत होता .
असे उत्सवी वातावरण असताना ती मात्र
जीवनात पहिल्यादाच मिळालेला शालू पांघरून
शांतपणे आपलं सौभाग्य कपाळी मिरवत
शेवटच्या प्रवासाला पहाटेच निघून गेली होती .
वाचन संख्या
5349
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मृत स्त्रीची ओटी कशी काय
.
In reply to मृत स्त्रीची ओटी कशी काय by आतिवास
शेवटाबद्दल सहमतच नाही तर
In reply to मृत स्त्रीची ओटी कशी काय by आतिवास
***
सुंदर ! शेवट छान साधलाय !
.
In reply to सुंदर ! शेवट छान साधलाय ! by डॉ सुहास म्हात्रे
:(
धन्यवाद
दाहक लिखाण.
:(
सहमत
In reply to :( by पैसा
समर्पक शिर्षक..
टोचलं.
सहमत
In reply to टोचलं. by प्यारे१
अरे हो
In reply to सहमत by तुमचा अभिषेक
धन्यवाद
कथा 'आवडली' असं तरी कसं म्हणू
धन्यवाद .
उत्तखनन करताना हि कथा सापडली.
मस्तच..
कथा पुन्हा वर आणावीशी वाटली
जेपी कथा खूप परिणामकारक आहे.
अहेवपणी मरण . च्या आयला .
विदारक
सूड ची 'नवमी' वाचल्यावर "बाई