तिच्या' घरी आज बरीच वर्दळ होती ,एरवी कुणी फिरकतही नसे .
पाहटेच आलेला 'तिचा' भाऊ आणि धाकटा दीर
लोकामध्ये या घटनेच धार्मिक महत्व आणि पूर्वी याचा कसा उत्सव व्हायचा यावर चर्चा करत पुढची तयारी करत होते .
'तिची' ओटी भरण्यासाठी बायकांची झुंबड उडाली होती.
आठ दिवसापूर्वी चेत्रागौरीला 'तिच्या' घरी कुणी हि बाई फिरकली नव्ह्ती.
घरामध्ये 'तिचा' वेडा नवरा कधी नव्हे तो शहाण्या सारखा शांत बसला होता .
'तिच्या' शेजारी बसलेली 'तिची' भावजयी 'तिची' तुलना लक्ष्मिशी करत होती ,
धाकट्या जावेला 'तिच्या' नशिबाचा हेवा वाटत होता .
असे उत्सवी वातावरण असताना ती मात्र
जीवनात पहिल्यादाच मिळालेला शालू पांघरून
शांतपणे आपलं सौभाग्य कपाळी मिरवत
शेवटच्या प्रवासाला पहाटेच निघून गेली होती .
वाचने
5407
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मृत स्त्रीची ओटी कशी काय
मृत स्त्रीची ओटी कशी काय भरतात - असा प्रश्न मनात आला. ती बहुधा प्रतिकात्मक असावी.
प्रयत्न चांगला आहे.
अवांतर: सगळ्या शतशब्दकथांमध्ये 'शेवटच्या ओळीत रहस्यभेद' असा पायंडा तर पडत नाही चाललाय ना अशी एक शंका. हे मत केवळ तुमच्या कथेबद्दल नसून आजवर प्रसिद्ध झालेल्या शतशब्दकथा वाचून झालेले साधारण मत आहे - चुकीचेही असू शकते :-)
.
In reply to मृत स्त्रीची ओटी कशी काय by आतिवास
सौभाग्यवती असताना मेली तर पूजा करतात. तिचे मंगळसूत्र देखील पवित्र मानून ते सोने इतर बायका घालतात. असे ऐकून आहे.
शेवटाबद्दल सहमतच नाही तर
In reply to मृत स्त्रीची ओटी कशी काय by आतिवास
शेवटाबद्दल सहमतच नाही तर काहिसा आग्रही !
शंभर शब्दांचे स्फुट / त्रोटक लेखन वाचनीय व्हायला प्रथम उत्कंठापूर्ण आणि शेवट धक्कादायक असणे जरूर आहे असेच वाटते.
***
***
सुंदर ! शेवट छान साधलाय !
सुंदर ! शेवट छान साधलाय !
"...शांतपणे आपल्या सौभाग्य कपाळी मिरवत..." याऐवजी तुम्हाला "...शांतपणे आपल्या कपाळी सौभाग्य मिरवत..." असं म्हणायचं आहे असं वाटलं.
.
In reply to सुंदर ! शेवट छान साधलाय ! by डॉ सुहास म्हात्रे
आपल ऐवजी आपल्या झाल
:(
कधि काय कस का वगैरे वगैरे वगैरे अन वगैरे...
धन्यवाद
@ अतिवास्,इस्पिकचा एक्का, वल्लि ,उद्दाम,
प्रतिक्रिये बद्दल,
@ अतिवास ,मृत स्त्रीची ओटी कशी काय भरतात - असा प्रश्न मनात आला. ती बहुधा प्रतिकात्मक असावी.
उत्तरः सौभाग्यवती असताना मृत झाल्यास स्त्रीची ओटी नाहि तर वाजन्त्रि हि आसते, प्रेत न्यायच रस्तावर हळदि कुन्कु चे सडे टाकले जातात . विदारक आसत ते पाहणे.
दाहक लिखाण.
दाहक लिखाण.
शंभर शब्दात खुपच मोठा परिणाम साधलाय.
:(
भयंकर आहे. पण जग हे असंच असतं.
सहमत
In reply to :( by पैसा
बाकी या प्रकारात लिहिण्याचा प्रयत्न आवडला.
समर्पक शिर्षक..
मोजक्या शब्दात बोचरं सत्य.. विदारक, करुण आणि अगतिक, आपण सारे कसे समाजव्यवस्थेचे बळी आहोत हे क्षणात दाखवून देणारं.. असं लेखन ठळक आणि पुन्हा पुन्हा छापून आलं पाहिजे हे खरचं! जाणिवा जिवंत ठेवायला मदत केल्याबद्दल धन्यवाद तथास्तु...
टोचलं.
टोचलं.
दुर्दैवानं ज्या समाजामध्ये विधवा स्त्रीला जेव्हा माणसांची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा वाळीत टाकल्यासारखा अनुभव येतो त्या समाजात असं मरण 'उत्सव' ठरलं नाही तरच नवल.
सहमत
In reply to टोचलं. by प्यारे१
नेमके असेच विचार मनात आलेले वाचून.. आपण योग्य शब्दांत मांडलेत म्हणून इथेच +७८६ देतो..
अरे हो
In reply to सहमत by तुमचा अभिषेक
आणि कथा आवडलीच
धन्यवाद
प्यारे1,श्रीरंग जोशी ,सौंदाळा ,उपास ,पैसा ताई
..
प्रतिक्रिये साठी धन्यवाद
कथा 'आवडली' असं तरी कसं म्हणू
कथा 'आवडली' असं तरी कसं म्हणू? पण परिणाम साधला हे नक्की.
धन्यवाद .
बॅटमॅन , अभिषेक
प्रतिसादासाठी धन्यवाद .
उत्तखनन करताना हि कथा सापडली.
उत्तखनन करताना हि कथा सापडली.
शंभर शब्दात दाहक लिखाण.
एकुणच शतशब्दकथा प्रकार फक्त इथे चांगला रुळलाय.
मस्तच..
मस्तच..
सुड ने काढलेले चित्र आठवले.
कथा पुन्हा वर आणावीशी वाटली
कथा पुन्हा वर आणावीशी वाटली
जेपी कथा खूप परिणामकारक आहे.
जेपी कथा खूप परिणामकारक आहे. खूप दुर्दैवी आहेत असले समज अजून प्रचलित असणे. धक्कातंत्र चांगलं जमलंय.
अहेवपणी मरण . च्या आयला .
अहेवपणी मरण . च्या आयला . कुणाचं तरी 'अजब सोहळा ' नावचं १ भारी गाणं आहे . माहित आहे का कुणाला ?
विदारक
विदारक
सूड ची 'नवमी' वाचल्यावर "बाई
सूड ची 'नवमी' वाचल्यावर "बाई गेली" आठवल आणी नंतर हे :-(