मनमोहक बाली : ०८ : बारोंग लोकनाट्य आणि बाली सफारी पार्क
...किनारपट्टीने पायवाटेवरून फिरून मंदिराला अनेक कोनांतून आणि मावळत्या सूर्याच्या अनेक छटांत पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. शेवटी तो सोन्याचा गोळा समुद्रात पूर्णपणे बुडून गेल्यावर झालेला काळोखच आपल्याला धक्के मारून तेथून बाहेर काढतो.
चवथ्या दिवसाची सकाळ जरा उत्सुकतेतच उजाडली. कारण आज बालीचे पारंपरिक बारोंग लोकनाट्य बघायला जायचे होते. दोन दिवसापूर्वी पारंपरिक केचक नृत्यनाट्याने चकीत केले होते. म्हणून उत्सुकता अधिकच वाढली होती.
न्याहरी घ्यायला गेलो तर तेथे टेबलावर उभा असलेला हा गरूडराज समोर आला...
बारोंग लोकनाट्य
बारोंग नाटकाच्या रंगमंदिरावर पोहोचलो. त्याच्या आवारातून फिरताना बालीच्या कलाकुसरीचे काही नमुने दिसले...
बारोंग
बाली सफारी पार्क
बारोंग लोकनाट्याची मजा मनात घोळवत बालीच्या नयनरम्य परिसरातून आमचा प्रवास पुढच्या आकर्षणाकडे सुरू झाला. सफारी पार्क म्हणजे प्राणिसंग्रहालयापेक्षा जास्त काय असू शकते अश्या विचाराने रुपरेखेत हा कार्यक्रम आम्ही जरासा मागेच सरकवला होता. पण नंतर तो चुकवला नाही त्याबद्दल स्वत:चे आणि कार्तिकचे आभार मानले. शिवाय पार्कच्या आवारात असलेल्या बालीतल्या एका खास आकर्षणामुळे ती भेट फारच संस्मरणीय झाली ते वेगळे. ते खास आकर्षण पुढच्या भागात येईलच. बाली सफारी पार्कचे संपूर्ण नाव "बाली सफारी आणि मरीन पार्क" असे आहे... "मरीन" भाग केवळ नावापुरताच आहे, पण सफारी भाग मात्र जागतिक तोडीचा आहे. येथे प्राणिसंग्रहालयाबरोबरच संपूर्ण कुटुंबासह मजेत वेळ घालविण्यासाठी अनेक मनोरंजक क्रीडाविभाग, जलक्रीडा विभाग, प्राण्यांबरोबर खेळ / सफारीसाठी विभाग, प्राणिनाट्यमंच, राहण्याची सोय असणार्या झोपड्या / बंगले आणि या सगळ्याची मजा घेत असताना लागणार्या भुकेची चमचमीत सोय पाहणारी अनेक रेस्तराँ आहेत. इथल्या प्राणिसंग्रहालयाचा विशेष म्हणजे इथे प्राणी विशाल जंगलसदृश्य भागांत आरामात मोकळे राहतात आणि त्यांना बघायला येणार्या पर्यटकांना बंदिस्त बसमधून फिरून त्यांचे दर्शन करावे लागते. जगभरचे प्राणी येथे त्यांच्या मूळ स्थानाच्या खंडांची नावे दिलेल्या वेगवेगळ्या विभागात राहतात. मार्गदर्शकासह असलेली बससेवा आपल्याला सगळ्या प्राणिसंगहालयाचा फेरफटका मारून आणते. एक भाग प्राण्यांची खास प्रदर्शने आणि प्राण्यांवर बसून करण्याच्या सफारीसाठी राखून ठेवलेला आहे. रात्रीच्या, शैक्षणिक आणि प्राणिसंरक्षणासंबद्धी खास सफारीही असतात. एकंदरीत केवळ "प्राणिसंग्रहालयाची चक्कर" असे नसून "दिवसभर प्राणी-पक्षांच्या सहवासात मजेत दिवस घालवायचे आणि त्याबरोबरच काही माहितीची शिदोरी बरोबर घेऊन परतायचे ठिकाण" असे या पार्कचे स्वरूप आहे. चला तर फेरफटका मारायला या सफारी पार्कमध्ये. सर्वात प्रथम आम्ही प्राणिनाट्यगृहाकडे मोर्चा वळवला...
प्राणी-पक्षी-नाट्यगृह
सर्पकन्या
ओरांगउटान आणि त्याची मैत्रीण
खास मैत्रिणीने सांगितल्यावर त्या ओरांगउटानने मिनीटाभरात अख्खा नारळ सोलून दिला तर नवल काय !
सुमात्राच्या हत्तींचे खेळ
पांढरा वाघ
अस्वल
सुमात्राचे वाघोबा
हिप्पो
विल्डsबीस्ट / नू
आरामात निगुतीने बसून पावसाचा आनंद लुटणारे सिंहकुटुंब
वेगवेगळ्या रंगांचे जिराफ
झेब्रा
तीनरंगी झेब्रा
आफ्रिकन खिल्लार
पुरा सफारीचे कोरी अगुंग
गणेश पार्कच्या प्रवेशव्दाराजवळील गणेशमूर्ती
In reply to वाह! भारीच! by रेवती
In reply to ह्यो भाग पण मस्त! by अत्रुप्त आत्मा
In reply to नेहमीचीच प्रतिक्रिया. समजून by प्यारे१
In reply to नेहमीचीच प्रतिक्रिया. समजून by प्यारे१
नेहमीचीच प्रतिक्रिया. समजून घेणे.आमचीपण. :-) रच्याकने, ते नीलगाय नसून आफ्रिकेतील ब्लॅक विल्डेबीस्ट आहे. नीलगाय हे भारतातील सर्वात मोठे कुरंगप्रवर्गातील हरीण आहे.
In reply to असेच म्हणतो. by एस
In reply to आतापर्यंतचे सर्वच फोटो by विशाल चंदाले
In reply to हाही भाग झकास !! by सूड
In reply to छान आहे..पाच वर्षापूर्वी by रायनची आई
आणि मला वाटत तुम्ही ज्याना चिंपॅन्ज़ी म्हटले आहे ती खरे तर orangutan आहेत..बरोबर. ओरांगउटान. The name "orangutan" (also written orang-utan, orang utan, orangutang, and ourang-outang) is derived from the Malay and Indonesian words orang meaning "person" and hutan meaning "forest", thus "person of the forest". - साभार विकिपीडिया.
In reply to छान आहे..पाच वर्षापूर्वी by रायनची आई
अरे वा मी पहिला का??