मित्रानो या गोष्टीवर विष्वास बसत नाहिय्ये.
पण आपली ड्रीमगर्ल हेमा मालिनी चक्क ६० वर्षांची होत्येय.
अजूनही ती तितकीच सुंदर दिसते.
तिच्या वयाच्या तारका आत्ता आज्जी झाल्यात. त्यांच्याकदे पाहुनही असे वातत नाही की खंडहरों से पता चलता है के कभी इमारत बुलंद हुवा करती थी.
ऐन उमेदीची ती सर्वार्थाने ड्रीमगर्ल होती. मध्यम वय तीने सहजतेने स्वीकारले. ( आठवा तिच्या मुलीबरोबर जेट सुगंधी मॅट्ची जहिरात )
बिजवर माणसाशी लग्न केले त्याने समाजात तीला कधीच स्वतःबरोबर वागवले नाही. त्याची कोणतीही तमा खन्त न ठेवता तीने आपल्या मुलीना मोठे केले. त्याना स्वतःच्या पायावर उभे कहाण्यात मदत केली.
कधी नृत्याचे वेगळे प्रयोग तर कधी तेराह पन्ने सारखी वेगळी मालीका यातून ती काही प्रयोग करतच राहिली. चेहेर्यावरचा गोडवा अजूनही तस्साच टवटवीत आहे. तीच्या हास्यात तीच जादु अजूनही कायम आहे.
अजूनही ती एखाद्या समारंभात येताच तिच्या आगमनाने चांदणे फुलावे तशी जादु होते.
वय लपवण्याचा तिने कधी खोटा प्रयत्न केला नाही. लग्नानंतर कधीच ती गॉसीप/ पेज थ्री वर झळकली नाही.
तीने "जिंदगी" सहज स्वीकारली. आणि मिळेल त्यात आनन्दी राहिली.
स्वतःच्या उणीवा मान्य करुन ती जगत राहिली
सीता और गिता मधल्या बहिणीं तिच्या इतक्या तन्मयतेने कोणीच साकार करु शकले नाही
शोले मधली बडबडी बसन्ती तर निव्वळ स्वतः जगत असावी इतकी उत्तम होती.
खुशबु मधली खेडूत / रजिया सुलतान मधली रजिया /
तर ऋषी कपूर बरोबर केलेल्या एका चित्रपटात तीने धाकट्या दीराबरोबर लग्न करावे लागणार्या वहिनी ची भुमिका तीने योग्य भावानिशी सादर केली.
बागबान मधली तीने सादर केलेली पोक्त गृहिणी पहाताना सुद्धा तिच्यातला आत्मविष्वास ठायी ठायी जाणवत होता. परिपक्व सौंदर्य म्हणजे याचा ती वस्तुपाठच होती .
तिची गणना उत्कृष्ठ अभिनेत्रींमध्ये होऊ शकणार नाही कदाचित.
पण तिच्यातल्या तजेलदार स्त्रीला साठ लाख सलाम,
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4933
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
तिच्यातल्
या धाग्यात
In reply to तिच्यातल् by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
वाटत नाही...
In reply to या धाग्यात by भडकमकर मास्तर
सहमत
-१
In reply to सहमत by सखाराम_गटणे™
कॉस्मेटीक सर्जरी
In reply to -१ by टारझन
वा!
खरंच?
माझीही ड्रीम्-गर्ल!
भारीच दिसते
हेमावरचे पुस्तक वाचनीय असे आहे.
मलाही खूप
साठीची?!
५४ पुर्ण...
In reply to साठीची?! by वर्षा
रेखा हल्ली
वीरूप्राज
मधुमेह असलातर वयापेक्षा जास्त वृद्धत्व वाटते.
मधुमेह..
In reply to मधुमेह असलातर वयापेक्षा जास्त वृद्धत्व वाटते. by कलंत्री