आंद्या,
किती सुंदर लिहीले आहेस!
आता मात्र आकाश मगासारखे नितळ निरभ्र नसावे, काळे कभिन्न आभाळ भरुन आलेले असावे अन सुरु व्हावा चेहर्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वांझोटा प्रयत्न, सतत निरंतर, टोचत रहाणारा.
आहाहा! सुंदर..
पण खाली डकविलेले चित्र उगाच रणरणत्या उन्हाची आठवण करून देते. त्या ऐवजी मारव्यासारखे संध्याकाळच्या गूढतेचं आकाश मला भावले असते चित्रात. :)
(साला काही म्हणा पण "मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो,चित्र काढतो" असे म्हणणारा चित्रकार कायम संध्याकाळीच उन्हं कलल्यावर सुंदरशा पण खिन्न युवतीचे चित्र काढत आहे असे कायम वाटते.)
पुण्याचे पेशवे
>>>श्वास अडकवणार्या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!
आनंदयात्री,
सह्ही लिहिले आहेस. :)
चेहर्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वांझोटा प्रयत्न, सतत निरंतर, टोचत रहाणारा.
श्वास अडकवणार्या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!
आता नक्की कविता आठवत नाही पण एकच ओळ आठवते ती लिहीतो
जीवाच्या अशा सांजराती कळेना
मी मला शोधतो की तुला शोधतो
(बहुतेक ग्रेस)
शब्दसामर्थ्याला सलाम !!!
एकदम झकास लिहले आहेस, लगे रहो ...
खुद्द चित्रकाराला अव्हेरुन त्या चेहर्याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करावा. मला पुसटशी ओळख लागावी असे वाटताच त्या आसंमतात एक अस्वस्थता भरुन यावी. अचानक चित्रकाराच्या हातुन कुंचला निसटावा अन खोल खोल गर्तेत अदृश्य व्हावा . त्या अर्धवट अनोळखी चेहर्यावर जणु हलकेसे स्मित उमटलेय असे वाटावे अन क्षणात सगळे पुसले जावे, तो चित्रकारही दिसेनासा व्हावा. आता मात्र आकाश मगासारखे नितळ निरभ्र नसावे, काळे कभिन्न आभाळ भरुन आलेले असावे अन सुरु व्हावा चेहर्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वांझोटा प्रयत्न, सतत निरंतर, टोचत रहाणारा.
आई आई गं !!!!
काय जबरा पॅराग्राफ आहे, नुसते वाचत रहावेसे वाटते ...
प्रतिभा प्रतिभ अम्हणतात ती हिच ....
पुलेशु ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
हा आंद्या तो तोच का? जो आमच्यासारख्यांबरोबर इतका टारगटपणा करतो?
इतकं हळवं लेखन वाचवत नाही रे भावा!
पण डान्या म्हणतो तसंच, सलाम!!!
...अचानक चित्रकाराच्या हातुन कुंचला निसटावा अन खोल खोल गर्तेत अदृश्य व्हावा .
...श्वास अडकवणार्या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!
काय बोलु????
तुच सांग आंद्या, आता काय बोलु ह्यावर?
गावावरुन ओवाळुन टाकलेल्या तुझ्या ह्या टारगट दोस्ताला इतका हळवेपणा सोसवतच नाही रे.....च्छ्या!! उगाचंच खिन्नपणाची भावना आलीये मनात. :(
लिही आंद्या, लिही...अजुन लिही...
जे काही लिहिलं आहेस ते अफलातून आहे पण तितकचं त्या खालच्या चित्राशी विसंगत आहे..
ते चित्र बदल..
अभिनंदन!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
श्वास अडकवणार्या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!
वा..
सुंदर लिहिले आहेस.. प्राजु म्हणते तसे चित्र बदल,
स्वाती
आनंदयात्री,
>>जसाजसा चेहरा अधिकाधिक उतरावा तसा तसा मी आणिकच प्रश्नांकित होत जावा ! खुद्द चित्रकाराला अव्हेरुन त्या चेहर्याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करावा. <<
छान आहे प्रकटन...आवडले.
--लिखाळ.
लेख अतिशय छान आहे. सुंदर लिहिले आहे पण वर इतरांनी म्हण्टल्याप्रमाणे चित्राशी थोडसं विसंगत वाटतं.
हे चित्र 'ओमेगा नेब्युला' (एम-१७) किंवा 'स्वान नेब्युला' चे आहे. हबल टेलिस्कोपने घेतलेले चित्र अतिशय सुंदर आहे यात काही शंकाच नाही. सुमारे ५५०० प्रकाशवर्षे दूर असलेली ही नेब्युला "हॉर्स्-शू" नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.
आंद्या, तू (खरडवही भरवण्याऐवजी पुन्हा खरीखुरी) लेखणी उचललीस आणि झकास लिहिलं आहेस रे! आणि हो ते चित्र जरा विचित्र वाटतंय तिथे!
(तो काय मी लिहिलेला बेकंबे प्रकारचा रटाळ लेख आहे का, हबल स्पेस टेलिस्कोपनी घेतलेला फोटो त्याबरोबर डकवायला! बरं डकवला तर तो वाकडा का केलास बे?)
अदिती
आवडले. एकंदर हा लेखनप्रकार तुम्हाला (आणि आम्हा सगळ्यांनाही) फार आवडलेला आणि जमलेला दिसतो आहे. सोबतच्या पूरक चित्राने आणखी मजा आली, छान आहे.
(चित्रकार)बेसनलाडू
मानसीचा चित्रकार...हे गाणे बाबुजींनी गायलेले नसून हृदयनाथ मंगेशकरांनी गायलंय.
आणि इतक्या सुंदर लेखानंतर त्याबरोबर डकवलेलं चित्र लेखातल्या सहजसुंदर भाषेला अजिबात शोभत नाही.
पहिल्यांदा लेख वाचला तेव्हा काहीतरी खटकले (आधी मनात अरुण दाते असे नाव आले होते पण तेही फिट्ट बसेना..).
(संगीत - वसंत प्रभू आणि गीत - पी.सावळाराम)
आनंदयात्री लेखन छान झाले आहे. तुला अशा स्फुटांमधे चांगली गती आहे आणी वाचायला सुद्धा छान वाटतेच.
लिहिता रहा!
चतुरंग
सर्वांनी दिलेल्या दादेबद्दल केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे, ऋणी आहे.
बहुतांशी लोकांनी केलेल्या सुचनेनुसार चित्र बदलले आहे, काही चुका दुरुस्त केल्या आहेत. आभारी आहे.
प्रतिक्रिया
...
वाहवा सुंदर
मस्तच रे !
क्या बात है.
स्सही !!!
सुंदर
कुछ बाते अनकहीसी ...
>काय जबरा
हेच म्हणतो..
सहमत!
सहामत
+१
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अ..श..क्य !!!
मी देखील
क्लास...
सुंदर..
छान
ओमेगा नेब्युला
आईग, काय
सुंदरच
सुंदर
+१
दोन ढोबळ चुका!
बरोबर!
सहमत !!
चित्र ..
आंद्या, मार
वा..
मस्त लिहिल
सुरेख....
झकास रे!
छान
ग्रेस ची त्या ओळी
वा वा!
आनंदा ,
धन्यवाद