मानसीचा चित्रकार तो,
तुझे निरंतर चित्र काढतो,चित्र काढतो.
हृदयनाथांच्या आवाजात अशी सुंदर पदं ऐकतांना हलकेच डोळा लागावा अन कानावर पडणारे अमुर्त शब्द मुर्त व्हायला लागावेत. मानसीचा चित्रकार खरोखरीच अवतरावा अन त्याने स्वच्छ निरभ्र आकाशालाच त्याचा कॅनव्हास बनवावा. कल्पनेच्या कुंचल्याने सरासर त्याने हात चालवायला सुरुवात करावी अन कल्पनाचित्रांची जादुगरी त्या कॅनव्हासवर उतरु लागावी. साधी साधीशी रानफुले कुंचल्याच्या फराट्यातुन साकारु लागावीत, कधी नितळ वहाणारे पाणी दिसावे तर कधी उमटावे जाळीदार झालेले एखादे पिंपळाचे पान.
झराझरा ती चित्रं मागे पडावीत अन कुंचला गुंतावा एक अगम्य चेहरा रेखाटण्यात. तो चेहरा रंगवण्यात कुंचला पार गुंगुन जावा अन आपण मनाशी तो चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करत रहावा. जसाजसा चेहरा अधिकाधिक उतरावा तसा तसा मी आणिकच प्रश्नांकित होत जावा ! खुद्द चित्रकाराला अव्हेरुन त्या चेहर्याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करावा. मला पुसटशी ओळख लागावी असे वाटताच त्या आसंमतात एक अस्वस्थता भरुन यावी. अचानक चित्रकाराच्या हातुन कुंचला निसटावा अन खोल खोल गर्तेत अदृश्य व्हावा . त्या अर्धवट अनोळखी चेहर्यावर जणु हलकेसे स्मित उमटलेय असे वाटावे अन क्षणात सगळे पुसले जावे, तो चित्रकारही दिसेनासा व्हावा. आता मात्र आकाश मगासारखे नितळ निरभ्र नसावे, काळे कभिन्न आभाळ भरुन आलेले असावे अन सुरु व्हावा चेहर्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वांझोटा प्रयत्न, सतत निरंतर, टोचत रहाणारा.
श्वास अडकवणार्या आठवणींचा पाउस मुसळधार पडत रहावा अन विरघळवुन टाकावे साला .... या जाणिवेला .. या स्वप्नाला .. आणी या अस्तित्वाला !!

वाचने
13377
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
वाहवा सुंदर
मस्तच रे !
क्या बात है.
स्सही !!!
सुंदर
कुछ बाते अनकहीसी ...
>काय जबरा
In reply to कुछ बाते अनकहीसी ... by छोटा डॉन
हेच म्हणतो..
In reply to >काय जबरा by मनस्वी
सहमत!
In reply to हेच म्हणतो.. by baba
सहामत
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
+१
In reply to सहामत by टारझन
+१
In reply to कुछ बाते अनकहीसी ... by छोटा डॉन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अ..श..क्य !!!
In reply to कुछ बाते अनकहीसी ... by छोटा डॉन
मी देखील
In reply to कुछ बाते अनकहीसी ... by छोटा डॉन
क्लास...
सुंदर..
छान
ओमेगा नेब्युला
आईग, काय
सुंदरच
सुंदर
+१
In reply to सुंदर by बेसनलाडू
दोन ढोबळ चुका!
बरोबर!
In reply to दोन ढोबळ चुका! by प्रमोद देव
सहमत !!
चित्र ..
आंद्या, मार
वा..
मस्त लिहिल
सुरेख....
झकास रे!
छान
ग्रेस ची त्या ओळी
वा वा!
आनंदा ,
धन्यवाद