थोडं समजून घ्या ना... भाग ३
लेखनविषय (Tags)
थोडं समजून घ्या ना... भाग १
थोडं समजून घ्या ना... भाग २
'आयला धमाल!! मग?'
'मग काय!! फाटली ना माझी...'
कट्ट्यावर माझं कथाकथनसत्र चालू होतं. चार दिवस कॉलेजला बुट्टी मारल्यानंतर आणि त्यापाठोपाठ आलेल्या वीकांतात सुखाचा अत्यानंद मिळवल्यानंतर मी एकदाचा सोमवारी कॉलेजला गेलो. कट्ट्यावर ग्रुप आधीच जमा झालेला दिसला. मी तिथे पोचल्यावर मैत्रीणींकडून प्रश्नांची आणि मित्रांकडून शिव्यांची सरबत्ती सुरू झाली. (हो, नाही म्हटल्या तरी दोन-तीन मैत्रीणी होत्या माझ्या, अर्थात त्याचं सारं श्रेय माझ्या काही स्टड मित्रांना जातं. असो ते राहू दे.) मग थोडी भंकस, आणि मग मूळ मुद्याला हात घातला गेला.
'पण साहेब मला एक सांगा, आज तुम्ही दाढी का करून आलायत!!??' बटली.
'गेले चार-पाच दिवस रोज करतोय!' मी.
'काय???????????????????????' अख्खा ग्रुप चकित झाला. 'ए कोण आहे ती सांग लौकर सांग!!' मुलींचा उत्साही पुढाकार!
मग मी त्यांना सगळी कहाणी सांगत गेलो. मुली मन लाऊन आणि मुलगे रनिंग कमेंटरी देत ऐकत होते. गाडी रेडिओ प्रकरणाच्या वृत्तांतावर आली :
'हा हा हा हा!!! मी असली हसत होते ना... तुम्ही मुलं कशालाही इगो प्रॉब्लेम समजता रे!!' ती. 'हे हे... बघ ना... कसे असतात एकेक...' 'ए पण त्याची आणि आपली स्टोरी एकदम सिमिलर आहे नई?' मी बावचळलो. पण नाकारून उपयोग नव्हता. 'हो ना. मला तर असं वाटत होतं की कोणीतरी माझ्याच वतीने सगळी स्टोरी सांगतंय!!' 'ए म्हणजे तू सुद्धा ऐकलास तो शो?' 'छे छे अगं तू आत्ता सांगत होतीस ना तेव्हाचं म्हणतोय मी.' 'ओह.. ए पण तो तू नव्हतास ना?' 'कोण... मी??' 'मला असं सारखं वाटतंय की तो तूच होतास...' (इथे सगळ्या मुलींनी ओ शीट/फक आणि मुलांनी आईचा घो /+ भेन्चो* असे उद्गार काढले) 'अगं खरंच तो मी नव्हतो गं. एवढुशा कारणासाठी मी रेडिओवर फोन लावून स्वतःचं हसं का करून घेईन बरं? मी खरं तर खूप दमलो होतो त्या दिवशी म्हणून लवकर झोपून गेलो होतो.' 'हं'* 'नशीब तिला पटलं तुझं म्हणणं. नाहीतर बंबू होते.' 'तिला कळलं असणार. मुलीना कळतात अशा गोष्टी पटकन... गर्ल्स आर स्मार्ट!' बटली.. 'उगाच रेड करू नकोस स्वतःच्या जेंडरची. तिला कळलं असतं तर जिवंत ठेवला असता का सुकड्याला?' - पक्या. हा बटलीला पटवायच्या प्रयत्नात होता. तिच्या येता-जाता विंग्रजी फाडण्याच्या कौशल्याची उडवायला त्याला भारी मजा यायची. सुकड्या म्हंजे मी. 'अरे तिला सुद्धा सुकडा आवडतो म्हणून ती काही म्हणाली नाही. मी असते ना तर दात तोडून हातात दिले असते एखाद्याच्या!' 'आधी माझ्या दातापर्यंत तुझा हात तरी पोचू दे!!' हशा. 'ए पण तुला खरंच असं वाटतं की तिला मी आवडत असेन?' 'अफ कोर्स!! तुम्ही चॅट करता ना रोज?' 'तासन् तास!! रात्री सुद्धा भरपूर चॅट करतो आम्ही! म्हणून तर इतके दिवस आलो नाही!! रोजच्या उठायच्या वेळेला झोपलो मी!!' 'ए पण तुझ्याकडे मेसेज स्कीम नाहीये म्हणतोस ना?' 'पोस्ट पेड आहे!! बिल आलं की मान पिरगाळणार आहेत घरचे(- नाही मी तंतोतंत असं म्हटलं नाही. पण वृत्तांतकथनात शक्य तिथे अश्लीलपणा टाळावा... जिथे रसभंग होणार नाही अशा ठिकाणी सेंसॉर करून आशय समजावला म्हंजे झालं... काय!! जिथे स्वाभाविकपणे त्याची गरज असते तिथे मात्र तो जरूर वापरत राहीन.)' 'धन्य आहेस तू! पण पोरगी नक्कीच जाळ्यात अडकलीये, आणि तुझ्यासारख्या कंजुषाने चक्क चॅटिंग सुरू केलं म्हणजे तुला सुद्धा पुरता जाळ्यात अडकवलाय तिने!!!! लगे रहो भाई!!!!' मी अस्वस्थ झालो होतो. आमच्या ग्रुपात एकूण तीन मुली होत्या. टकली, बटली आणि रूपा. रूपा ही तिघींमध्येही सगळ्यात समंजस आणि त्यामुळेच त्यातल्या त्यांत मला ब-यापैकी जवळची होती. तिच्याशी माझं बरंच पटायचं. ती मात्र अद्याप कट्ट्यावर आली नव्हती. मी तिची वाट बघत बसलो होतो. ती येईस्तोवर सगळ्या भुक्कड लोकांनी 'पार्टी पार्टी' म्हणत आणि मी आढेवेढे घेतल्यावर मला 'कंजूष-कंजूष' म्हणत हिणवत माझ्याकडून ४ सँडविचेस मिळवली. त्यातले फक्त दोनच पिस माझ्या वाट्याला आले. रूपा आली. (तिचं रूपा हे खरं नाव नाही. एकदा कॉलेजमधल्या कसल्याशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सरावाच्या वेळी पुढे मांडी घालून बसलेल्या मुलाची भोक पडलेली 'रुपा' तिला दिसली; त्यातनं काही कृष्ण-केशर बाहेर डोकावत होते. तिथे तिच्याबरोबर मी सुद्धा बसलो होतो, तिने मला ते दाखवलं आणि तिथेच ती फुटली. तात्काळ तिला रूपा नाव पडलं.) तिला मी काही सांगायच्या आतच सगळ्यांनी किलकिलाट करून माझी सगळी कहाणी रंगवून रंगवून सांगून टाकली. 'हं... म्हंजे तुझ्यापरीने तू घोळ घालण्याचा पूर्ण प्रयत्न केलास पण तिनेच तुला सांभाळून घेतलं.' 'म्हंजे तुलाही वाटतंय की तिने मला रेडिओवर ओळखलं असेल?' 'अर्थात!!! तेवढं कोणाच्याही लक्षात येईल.' 'हं.. मग आता काय करू?' 'जरा बेताने जा आता... उगाच घाई करू नकोस, पडशील घसरून.' 'अगं तिच्या सोशल अॅक्टिविटीज भरपूर आहेत. त्या सध्या थंडावल्यात तोवर काहीतरी हालचाल केलीच पाहिजे. एकदा का ती तिच्या कामात बिझी झाली, की मग हात चोळत बसावं लागेल नुसतं.' 'तुम्ही चॅट करताय ना? तेवढं पुरेसं आहे. मला वेगळीच काळजी वाटतेय.' 'कसली?' 'तिच्या भाषेच्या किती चुका काढल्यास आत्तापर्यंत?' 'व्यक्तपणे एकही नाही. मनातल्या मनात एखाद-दुसरी. तिचं मराठी ब-यापैकी चांगलं आहे.' 'आणि जर चुक्कून तिनं कधी रस्त्यात कचरा टाकलाच तर तिला तो सगळ्यांसमोर उचलायला लावू नकोस. इट्झ रिअली एम्बॅरसिंग यू नो!!' 'त्याची तू चिंताच करू नकोस!! तो सीन कालच झाला!!' 'काय???? झालं कल्याण!!' 'अगं ऐक तर आधी. आम्ही रस्त्याच्या कडेला उभे होतो. तिथे बाजूने एक कपल चाललं होतं. त्यातल्या हिरवीणने लेजचं रॅपर खाली टाकलं. तर मॅडम गेल्या ना तिच्या अंगावर धावून!! आधी अगदी गोंडसपणे समजावत होती, पण त्या मुलीने माज खाल्ला, रॅपर उचलत नाही म्हणाली. मग जी काय आग पेटलीये म्हणता!! अगं दोन हॉट मुलींना भर रस्त्यात एकमेकींशी तावातावाने भांडताना पाहण्यात जो आनंद असतो ना, आहाहाहा!! दुर्मीळ अगदी दुर्मीळ!! (मित्रांच्या चेह-यावरून त्यांच्या मनःपटलावर त्या तमाशाचं चित्र उभं राहिल्याचं मला जाणवलं. मुलींनी साहजिकच नाकं मुरडली होती) तिचा बॉयफ्रेंड बिचारा, शेवटी त्यानेच रॅपर उचलून हातात घेतलं. तर कचरा जो टाकतो, त्याला खरी समज मिळायला हवी म्हणून तत्वाच्या प्रश्नावर भांडण सुरूच राहिलं. मी खरं तर तो सीन एंजॉय करत होतो, पण त्या हिरवीणच्या सख्याने माझ्याकडे अशा काही कारूण नजरेनं पाहिलं, की मला त्याची दया आली आणि मी मध्यस्थी करून प्रकरण मिटवलं.' 'एकूण तुझ्याच टाईपची गवसलीय तर...' 'माझ्याहून भारी!!' 'तू भारी नाहीयेस रे!!' मग मला काही थातूरमातूर टिपा देण्यात आल्या. मी काही मनावर घेतल्या, काहींकडे नेहमीप्रमाणे कानाडोळा केला. माझ्या प्रकरणाचं आख्यान आणि रूपाचं व्याख्यान संपल्यावर मंडळी आपापल्या घरी परतली. मी सुद्धा स्टेशनमधनं बाहेर पडून कानात बोंडं घालून रमतगमत घरी जात होतो. दुपार सरत आली होती, पण ऊन होतं. म्हणून मी सावलीच्या आतल्या रस्त्याने जात होतो. वर्दळ जराही नव्हती. इतक्यात बाजूच्या गल्लीतून मला एक ओम्नी आडवी आली, मधला दरवाजा सरकला, आणि मी आत खेचला गेलो. * 'अरे मला किड्नॅप करून तुम्हा लोकांना काय मिळणारेय? माझ्या वडलांकडे फारसे पैसे नाहीयेत, हे बघा ना माझा मोबाईल सुद्धा किती जुनाट आहे!!' 'अरे गप रे **ड्या!! किड्नॅप करत नाये आमी. आमचं छोटंसं काम आहे तुझ्याकडे. आमचं ते काम झालं ना, की सोडू तुला.' 'अरे मग मला नेताय कुठे ते तरी सांगा.' 'गप म्हटलं ना!! कि देऊ एक?' 'निदान मला नीट बसायला तरी द्या. उगाच कशाला माझा हात पिरगळवून ठेवलाय? मी काही पळून जात नाही.' 'हं. सोड त्याला.' ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला माणूस म्हणाला. 'थँक्यू. आता मला जरा सांगाल का हा काय प्रकार आहे ते?' 'कळेल कळेल.' 'अहो पण कधी?' 'आता गप बस... नाहीतर आधी तुला मारेन, आणि मग तुझी मारेन!!' मी निमुटपणे शांत बसून राहिलो. गाडीत खेचलं जाताना केलेल्या आरडाओरडेचा काहीही परिणाम झाला नव्हता. दोन काळ्या कुळकुळीत इसमांनी मला व्यवस्थित पकडून आणि जखडून ठेवलं होतं. तरी मी वळवळत होतो. तोंडावरून हात काढण्यापूर्वी 'आवाज केलास तर तोंडात बांबू ठोसून कायमचा आवाज बंद करून टाकेन' अशी धमकीसुद्धा दिली. मग काय, प्रतिकार बंद. शांत झालो. ते चौघेजण होते. ड्रायव्हर, एकजण ड्रायव्हरच्या बाजुला, आणि मध्ये माझ्याबरोबर दोघेजण. मी शांत बसल्यावर माझ्याकडे बघून त्यांची कमेंटरी सुरू झाली. एखादा काहीतरी पुचाट जोक मारायचा, त्यावर सगळे मोठमोठ्याने हसत सुटायचे. प्रत्येकजण वाक्यागणिक तीन-चार शिव्या हासडत होता. गाडीत रेडिओ लागला होता. रेडिओ वर 'पण-देशी पण-देशी जाणार नाही' असं काहीतरी गाणं लागलं होतं. गाडी खाडीजवळ आली. तिथे एका कोप-यापाशी नेऊन थांबली. सगळे उतरले. मला उतरवलं. मी आतून भयंकर घाबरलो होतो. (तेव्हा दुनियादारी पाहिला नव्हता, पण त्यात स्वप्नील जोशीला भलताच माणूस समजून अंकुश चौधरी स्वतःचा इंगा दाखवतो तशीच काहीतरी गडबड माझ्या बाबतीत झाली असावी, असा माझा समज झाला होता.) पण चेहरा कमालीचा शांत ठेवण्यात मी कसा कोणास ठाऊक पण यशस्वी झालो होतो. खाली उतरल्यावर मला पुन्हा पकडलं. मघाशी ड्रायव्हरच्या बाजुला बसलेल्याने माझ्या एक कानफडात लगावून दिली. 'निदान अंगठी काढून तरी मार. ती जास्त लागत्येय मला.' त्याने मग जास्तच चवताळून माझ्या पोटात गुद्दा हाणला. तसा माझ्या अंगातलं सगळं बळच नाहीसं झाल्यासारखं वाटलं. दोघा काळ्यांनी मला सोडून दिलं. मी कळवळत पोट धरून खाली पडलो. बाजुला एक धोंडा होता. जमिनीत रुतला होता. त्यावर मला गुद्दा हाणणारा बसला. त्याने माझी कॉलर धरून मला उचलला. 'अरे मार खाण्याचं कारण तरी कळू दे की रे मला.' 'चष्मीश!!' 'चष्मीश??' 'चष्मीश पासून लांब राहायचं' 'अरे कोण चष्मीश?' 'जिच्याबरोबर आजकाल फिरत असतो ना, ती चष्मीश!' मग माझी ट्यूब पेटली. आणि 'चष्मीश' आत्तापर्यंत सिंगल का राहिली होती, हे मला उमगलं. 'का पण?' 'का म्हंजे? ती आपली आहे... माझ्याशिवाय दुसरा कोनी नुसता बघितला जरीणा तिच्याकडे तरी फिरते आपली. आनी तू चायला इतके दिवस गावभर फिरतोय तिच्याबरोबर.. भेंचो* हिम्मत कशी झाली तुझी?' 'आयला आता मला काय माहित की तिचे एवढे भाऊबंद आहेत म्हणून!!' 'ए भाव कोनाला म्हनतो रे भाड्या? भाव तू व्हायचं तिचा. राखी बांधून घ्यायची तिच्याकडनं... काय? आनि मग लांब -हायचं. नाहीतर आज नुसत्या चापट्या खाल्यास... उद्या चामडी लोल्वीण. जित्ता सोडणार नाही तुला परत तिच्या वाट्याला गेलास तर' माझ्या नसा ताड-ताड उडत होत्या. स्वाभिमान सुचवत होता की शरीरात उरलीसुरली सगळी शक्ती एकटवून या डुकराचा गळा दाबून जीव घ्यावा. पण भय मला थांबवत होतं. आणि बुद्धी एक वेगळीच हिम्मत करायला सांगत होती. मला चार दोन शिव्या हासडून आणि एकदोनदा माझ्यावर हात उगारून, माझ्या टपलीत मारून आणि पाचकळ विनोद करून त्यावर मला खदाखदा हसवून दाखवून मंडळी निघायच्या तयारीत होती. आणि मी स्वाभिमान सावरून, भयाला डावलून, बुद्धीची कास धरण्याचा एक धाडसी प्रयत्न केला. 'एक विचारू?' 'काय?' 'हे सगळं का?' 'अरे तुला एकदा सांगितलेलं डॉचक्यात शिरत न्हाई काय?? आयटम आहे ती आपली. तिच्याकडे तू नाही बघायचा.' 'ती तुझी आयटम आहे? कमाल आहे, तिने कधी सांगितलं नाही ते मला.' 'अरे... ती तुला कशाला सांगेल?? ते आमचं सिक्रेट आहे.' 'बघ... म्हंजे मी तिचा एवढा लहानपणीचा मित्र असूनही तिने सिक्रेट मला सांगितलं नाही. आणि तू मात्र माझ्याशी जराही ओळखपाळख नसताना मला तुमचं सिक्रेट सांगून टाकलंस? धोका दिलास तू तिला!' 'ऑ?? अं... (तो जरा गडबडला. पण लगेच त्याचा आवेश परत आला) ए भेन्चो* तू काय मला चु* समजतो काय आं? लहानपनचा मित्र... यायला!!' 'चु*?? अरे खरं तर तुझ्याएवढा महाचु* माणूस मी आयुष्यात पाहिला नसेल.' आता मात्र तो पुरता गोंधळला. मी हसत होतो. तो पुन्हा येऊन त्या धोंड्यावर बसला. मी सुद्धा त्या जमिनीवरच पद्धतशीरपणे मांडी ठोकून बसलो. त्याला माझं हसू पाहवेना. त्याने माझी बखोट धरली आणि मला जवळ खेचला. डोळ्यात एकाच वेळी आग आणि गोंधळ दिसत होता त्याच्या. 'मी का चु*? आपन तर तिला प्रोटेक्ट करतोय तुझ्यासारख्या गू-चाट्यांपास्नं. मग आपन चु* कसा?' मी हलकेच त्याच्या मुठीतून माझ्या कॉलरची सुटका करत सुरुवात केली - 'सगळेच मित्र गूचाटे नसतात रे. काय आहे, ती माझी लहानपणची मैत्रीण आहे. एकमेकांच्या घरी वाट्टेल त्या वेळी येणं जाणं होतं आमचं. भरपूर विश्वास आहे तिचा माझ्यावर. हा आता, कॉलेजच्या आयुष्यात बिझी झालो, म्हणून हल्ली इतकं बोलणं होत नाही आमचं. अलिकडे जरा वेळ मिळाला, म्हणून फिरत होतो एकत्र...' 'हा पन आता बास झाला हा. जायचं. पुन्ना आपल्या कॉलेजकडे जायचं. इथे फिरकायचं नाय तिच्याबरोबर.' 'अरे तुला अज्जूनही पॉईंट लक्षात आलेला दिसत नाहीये. मी नाही तिच्यापासून लांब जाऊ शकत. मी जर लांब गेलो ना, तर ती अस्वस्थ होईल आणि अजूनच जवळ यायचा प्रयत्न करेल माझ्या.' 'तो का म्हनून?? तुमचं चालू आहे काय?' 'आता मला खरं खरं सांग. ती तुला ओळखते तरी का?' 'तू आधी मी काय बोलतो ते सांग.' 'अरे येड*व्या, तुला टाळकं दिलंय की नाही आई-बापांनी? इथे मी तुला मदत करायला बघतोय तर तू काय मला नसत्या गोष्टी विचारत बसतोस?' माझ्या आवेशाने तो मावळला. शांत झाला. गरीब गायीसारखा त्याचं रडगाणं गायला लागला. 'मला खूप आवडते रे ती. शाळेत होती आपल्या. स्कॉलर होती. अन मी असा, नववीत तीन्दा फेल. मग तर शाळाच सुटली आपली. तेवापास्णं मी तिचा बॉडीगार्डगिरी करतोय. ब-याच लोकांपास्णं वाचवलंय मी तिला. तिला त्याची काय आयडीयापन नसेल. इतकी वर्षं ट्राय मारतोय तिच्याशी कधी बोलायला भेटंल, कधी बोलायला भेटंल. घरचा नंबर पण मिळवला मी. पण फोन तिने कदीच उचलला नाई. कधी आई, कधी बाप, ती कद्दीच फोनवर नाय आली. इतकी वर्ष तिच्या पाठी गांड मरवतोय पन काय झालं नाही. तू काय हेल्प करनार मला रे??' 'नाही, हे सगळं ऐकल्यावर मी हेल्प तर नक्कीच करणार नाही(आधी मारे करणार होतो). कारण मला माझ्या मैत्रीणीची काळजी वाटते. पण एवढं मात्र खरं, की तू जर मला किंवा तिला काही त्रास दिलास, तर मी तुझी अजून जास्त मारू शकतो.' 'भेन्चो* धमकी देतो काय मला तू?? इथेच गेम करून टाकेन तुझा कोनाला कळनार पन नाय!' त्याचा आवेश पुन्हा जोर धरायला लागला होता. 'तेच तर... असं करून तू स्वत:ची जास्त मारतोयस. साधा विचार कर, तिला मी एवढा जवळचा आहे, की जो मला त्रास देईल, तो तिला कधीच आवडणार नाही. त्यात जर मी तिला हे जाऊन सांगितलं की तू मला कशा कशा धमक्या दिल्यास, तर तर ती कधी तोंडही पाहणार नाही तुझं. मग कधी आणि कशी होणार ती तुझी आयटम??' 'आयला हो रे!! ए पन तू तिला असं काही सांगायचंच कशाला? तू गपगुमान तिच्या लाईफ मधून वटकायचं, कळ्ळं काय? जास्त शानपट्टी दाखवायची नाही.' 'अरे पुन्हा तेच! तिला जर उद्या कळलं की तिचे आत्तापर्यंत जे जे मित्र होते किंवा होऊ शकले असते, ते ते तुझ्या धाकामुळे दुरावले, तर ती तुला भाव का देईल? पोलीस कम्प्लेंट करेल ती.' 'आयला भेंडी तो माझा प्रॉब्लेम आहे तो मी बघून घेईल, तू मला शानपना शिकवू नको. तू आमच्या मध्ये यायचं नाहीस. समजला??' तो वैतागून उठला. 'अरे पण-' त्याने मला एक जोरदार लाथ घातली. भरमसाठ शिव्या दिल्या. 'फायनल सांगतोय. नीट ऐक. चष्मीश माझी आहे, माझीच राहनार. तिच्या वाट्याला जायचं नाही. कितीही चांगला फ्रेंड असला तिचा तरीही. वटकायचं. नाहीतर आज नुसता बडवलाय, पुढच्या वेळी खालून कोयता घालेन आणि वरून बाहेर काढेन, समजलं ना!!' त्याला गुंडाळायचे माझे प्रयत्न निष्फळ गेले. फुकटचा जास्तीचा मार तेवढा नशीबी आला. तो गाडीत जाऊन बसला. उरलेले तिघे माझ्याकडे रानडुकरासारखे बघत होते. त्यांनी एकमेकांकडे बघितलं, आणि अचानक माझ्या अंगावर धावून आले. मला बडव बडव बडवला. त्यांच्या लाथाबुक्के खाऊन तृप्त झालेलं माझं शरीर त्या संध्याकाळच्या मावळत्या उन्हात बराच वेळ निपचित पडून होतं. मी रडत होतो. गाडी केव्हाच मला तिथे एकटा सोडून निघून गेली होती. थोडा सावरल्यावर मी कसाबसा माझ्या खिशात हात घातला. मित्राला फोन घुमवला, आणि तिथे बोलावलं. (क्रमशः)
प्रतिक्रिया
अर्रर्र.. आता?
मस्त सुरु आहे ष्टुरी. कथाभाग
+१
उत्तर.. अवांतर.
(No subject)
आयला आता ?
मस्त
लास्ट पार्ट स्वप्न नसला म्हणजे मिळवली!
नो वरीज. नक्किच मिळवली आहे.
खाल्ला मार? चला फुटला नारळ
छान चालली आहे कथा!!! पुढील
छान
मस्त आहे.