आपलं शरीर हे मुख्यतः पाणी, सेंद्रीय पदार्थ तथा बारा निरींद्रीय क्षार युक्त असंख्य पिंडपेशींनी तयार झालेले आहे, निरींद्रीय क्षारांमुळे या पेशी तयार होत असतात, अन रक्ताभिसरणाने पोसल्या जातात, याशिवाय साखर, चरबी, पांडूर- Albumin, हे कर्बयुक्त सेंद्रीय पदार्थ असून चुना-Calcium, लोह-Iron, potashium, Natrum, Scical, हे ख-निज क्षार निरींद्रीय – कार्बन विरहित असतात.निरींद्रीय क्षारांचे प्रमाण अल्प असलं तरी अचेतन सेंद्रीय पदार्थापासून लक्षावधी विशिष्ठ पिंडपेशीसमुह निर्माण करत असतात. याचं कारणामुळे या बारा क्षारांना अनन्य साधारण महत्व आहे, त्याचाच अभ्यास करणें आहे. त्यात लक्षणं, त्रुटी, आणि रोग याचा धावता आलेख काढायचा आहे.
काली फोस्फोरीकम – Kali Phosphoricum K2 H PO4. सर्वात महत्वाचा क्षार,शरिराच्या सर्व घटकांचे, अवयवांचे, ऐच्छिक, अनैच्छिक संतुलन, संचलन, आणि अनुशासन करणा-या मेंदू, ज्ञानतंतू, कर्मतंतू या सर्वांशी याचा निकटचा संबंध आहे, आपल्याला भौतिक ज्ञान होतं ते शब्द,रस, रूप, स्पर्श, गंध, या संवेदना कां, जिव्हा-जीभ, डोळे, त्वचा, आणि कांन या पांच ज्ञानेंद्रीयामुळेच होते अन त्याचा घनिष्ट संबंध मेंदूशी आहे.सध्याचे गतिमान, बौधिक्तेची कास धरून चाललेलं स्पर्धात्मक विकृत सांस्कृतिक जीवन आणि असंतुलीत समाजव्यवस्था, आवाज, प्रदूषण,शांत- निवांत-पणा याचा अभाव या सर्वांमुळे मेंदूवर आणि शरीरावर प्रमाणाबाहेर ताण पडतो आहे. याचा संबंध मानसिकते शीही आहेच, बघा, असा दिवस आपल्या आयुष्यात कधीतरी उगवतो, जाग आल्यावर काहीं करू नये, स्वस्थ पडून राहवे, थकलाभागला शीण येतो, अनामिक वैताग आलेला असतो, मन उगाचंच प्रक्षुब्ध बेचैन असतं, कपाळा हात लावून जरा चेपलं तर बरं वाटत, मग ध्यानी येत अरे डोकंही जरा जड झालं आहे त्यात बारीकसा ठणका आहे, कालझोपेपर्यंत तर सगळं उत्तम होतं, मग!! कारण अज्ञात आहे. फ्रान्सिस बेकन यांनी तीनशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे जसं माणसाचे मन तसा तो माणूस, मनानी घेतले मी आजारी आहे की तो आजारी पडतोच, मी तब्बेतीत आहे तर तो तब्बेतीत असतो. माणसाचे माणूसपण त्यांच्या बुध्दिवैभावाचा ओज-प्रकाश पाडणा-या मेंदूत आहे त्यांचं रक्षण, पोषण करणारा हा काली फॉस क्षार महत्वाचा आहे. याचा आणि मेम्दुमध्ये, आणि भोवती असलेल्या करडया पदार्थाचा ( Grey matter ) यांचा फार घनिष्ट संबंध आहे.कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे केसांपेक्षा बारीक पण अत्यंत चिवट असं तंतूमय जाळं असते त्याला इग्रजीत Arachnoid असं नाव आहे. हा क्षार शरीर-घटक-धातू ( Tissues ) निर्माण करणारा आहे याचं संतुलन बिघडलं की शरीर घटकच तयार होणार नाहीत. स्नेहाचे घट्ट रूपांतरण होणे, प्राणवायुचा योग्य उपयोग अडून बसेल. बुद्धी काम करेनाशी होते, त्यांच्या वागण्यात सुसंगती राहत नाही, शरीर-मन खचतात, एक तर्हेची भीती ६ न्युनगंड उत्पन्न होतो, चारचौघात बुजतो त्याला एखादेवेळी समोरच्याचे नांवही आठवत नाही, कसलाही निर्णय घेऊ शकत नाही, भावनाविवश होतो, लहानसं कारण ही रागवा चिडायला पुरते तर्कट स्वभाव हेसर्व या क्षाराच्या अभावाने होतं त्यांच्या जोडीला आणखी एक क्षार नैट्रम मूर या सर्व क्षारांचे कोऑरडीनेशन आणि कोऑ- परेशन चांगलं असतं त्यामुळे एखाद्धया क्षाराच संतुलन बिघडलं की काहीना काही शारीरिक व्याधी सुरू होतेच. काली फॉस अल्ब्युमिन व प्राण वायूशी संमिलीत होऊन ग्रे मेटर निर्माण करतो.
१ ) काली फॉस-६- + कल्के फ्लुऑर-६ + सिलिका-६ तीन तीन गोळ्या एक / दोन वेळा ----- ------------------- वयत्परत्वे शरीराची झीज आणि थकवा झपाट्याने वाढत असतो, मानसिकता बिघडते, मन काळजी-ग्रस्त होतं, झोपेवर परिणाम होउन स्वभाव चिडचिडा होतो, मेंदू काम करीनासा होतो, विस्मरण होतं अशावेळी उप-रोक्त क्षार दिले तर आवश्यक ग्रे मेंटर मेंदू भोवती राहते, शिथील झालेल्या नसा नर्व्हज कल्के फ्लुओरने हव्या तेवढया लवचिक अथवा ताठ राहतात नि सिलिका सर्वाना आवर घालतो.
2 ) काळी फॉस ६, ३० -------------- खास विध्यार्थ्यासाठी हया क्षारासारखा दुजा हितचिंतक नाही, परीक्षार्थी परीक्षा अगदी जवळ आली की रात्रीचा दिवस करून अभ्यासानिमित्त वह्या-पुस्तकात बुडालेला, वाचन चालू असताना वाचनात एकाग्रता हवी, लक्षात राहयाला हवं, परिणामी पोट रिते वाटायला लागते, पोटात गोळा येतो, या क्षाराचे हे महत्वाचे लक्षणं आहे, काली फॉस मेंदुच्या पेशींची तैनात उत्तम राखतो. ग्रे मेटरवर पडणारा ताण वाढला की त्याचा पुरवठा तोकडा पडतो, त्यामुळे गंभीर व्यथा निर्माण होतात, त्यासाठी याक्शाराच्या गोळ्यांची बाटली जवळ बाळगून मधून-मधून घेत गेले की सारी थकावट गायब, एकाग्रता साधते, चांगला अभ्यास होतो जाग्रणे करावी लागत नाहीत, झोप शांत लागते, पोटात गोळा येत नाही, भूक चांगली लागते. वृद्धांसाठी तर हा क्षार जीवनामृत
४) काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने दिले यामुळे र्हुदय विकाराचा रुग्ण हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका परत पाठवण्या एवढा स्वस्थ झाला, त्या मुळे काली फोसला प्राण रक्षक म्हणूनही ओळखले जाते. -
४ ) काली फॉस हा अत्यंत महत्वाच्या क्षारा अभावी शरीराची किती दयनीय अवस्था होते ते त्याचं वर्णन त्याच महत्व ध्यानीनी आणून देईल, ही माहिती खूप पडताळे जमवून विचार करून जमविलेली आहे एखादे वेळी मनाला न पटणारीही असू शकेल, पण सत्य आहे, प्रयोग, अनुभव घेण्यास काय हरकत आहे. नुकसान तर अंशात्मकही नाही झालाच तर अमोघ फायदाच होईल काही गोष्टी अनकलनिय, अघटीत असतात त्यावर फक्त विश्वासच ठेवावा लागतो. ५ ) तंतू शूळ न्युरोल्जीया अत्यंत अस्वस्थ करणारी व्याधी, असह्य वेदना, खाणं-पिणं सुचत नाही, ६ ) रूग्णाचं वास्तव वर्णन ---१ )- चेह-याचा वर्ण फिक्कट पिवळा, तर कधी पांढराफटक रक्तक्षीणतेची जाणीव करू देणारा, डोळे दु:खी-कष्टी, ओढलेले, खोल गेलेले, भवती काळी वलयं असलेले, अकाली वृद्धत्व आल्या सारखा काळजी ग्रस्त सुरकुतलेला चेहरा, काहीवेळा चेहरा ओठ तांबूस काळपट निळे, शिरा ताणलेल्या, थकवा, अस्वस्थपणा, २ ) BRAINFAG किंवा CEREBRAL ASTHENOA -- मेंदूची अपरिमित थकान, व्यापारी, उच्चभ्रू लोक, कर्मेंद्रीयापेक्षा ज्ञानेंद्रीयांवर ज्यास्त ताण देणारे सुखवस्तू लोक. यांच्यासाठी या सारखे काली फॉस सारखे औषध नाही.
३ ) स्मृतिभ्रंश – यावर हा क्षार उत्तम कार्य करतोच पण त्याच्याच जोडीला मला आणखी नाव डोळ्यासमोर येतं ते अति गुणी औषध ANACARDIUM ( म्हणजे बिब्बा ) याची खास औषधी लक्षणे म्हणजे आयत्यावेळी आठवणीने दगा देणे, विध्यार्थ्यांच्या बाबतीत सातत्याने घडणारी गोष्ट प्रश्नपत्रिका लिहताना आयत्यावेळी काही आठवत नाही, बरं त्या-ने सडकून अभ्यास केलेला असतो, बुद्धीने तल्लख असतो, घरी आल्यावर सर्व उत्तरे धडाधड देता येतात, फक्त पेपर लिहताना आयत्यावेळी मात्र स्मृतीने दगा दिलेला असतो. या स्थितीला इग्रजीत Examination Funk असे म्हणतात. –
थोडे विषयांतर करून खास विध्यार्थ्यासाठी, Examination Funk, Loss of Concentration,आणि जबाबदारीचे ओझं त्यामुळे मेंदूवर पडणा-या मानसिक ताणामुळे स्मृतिभ्रंश, शारीरिक मानसिक निरुत्साह- Neuras Thenia, Brainfag, or Cerebral Astthenia, Tic Doulou Reux, Agorphobia, वृद्धत्वामुळे आलेले मानसिक कमीपण,किंवा जन्मजात बथ्थड अशांसाठी खास औषधी व उपचार यासाठी हा लेखाचा उपभाग लक्षणासह सादर करतो. लक्षणामुळे हे सदर वस्तृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विध्यार्थ्यांसाठी व्यवस्थित अभ्यास करूनही ऐन परीक्षेत मनाचा गोंधळ होउन प्रश्नपत्रिका नीट सोडवता आली नाही, असं का होतं एक मनावर दडपण, परीक्षा जवळ आली की विध्यार्थ्या चा Nervous पणा वाढू लागतो, मनाची घब-राहट होते, अभ्यास पुरेसा झाला असं वाटत नाही, रात्रंदिवस जागरणं करून, खेळ, गप्पाष्टक, भटकंती सगळं बंद, काहींच्या मनात वर्षभर अभ्यास न केल्याची खंतसुद्धा असते, खास कृउन १२वी च्या परीक्षेत घवघवीत यशाचा वडिलांकडून तगादा असतो कारण त्यांनी क्लाससाठी, इतर गोष्टींसाठी खूप खर्च केलेला असतो, पुढच्या भविष्याचा विचार सुप्तपणे टोकत असतो, या सगळ्याचा परिपाक मेंदूतील ग्रेमेटरवर व नसां शिथील होतात,अशावेळी अभ्यास चांगला झाला असूनही आत्मविश्वासाच्या अभावामुळे पेपर सोडवताना आठवणीनी, स्मृतीने दगा दिल्यामुळे उत्तरे नीट लिहता येत नाहीत, यालाच एक्झामिनिशन फंक म्हणतात,
औषधे calc. Fluorica fuorica -12 or 30 2) kali phos 30 & ३) silica 30 कल्के फ्लुओर शिथिल नसा-शिरांचा लवचीकपणा टिकवून योग्यतो ताठरपणा आणतो, २ ) काली फॉस आलेला नर्व्हसनेस घालवतो, ३) सिलिका विचा-रातील सैरभैरपणा नाहीसा करून, एकाग्रता वाढवितो,- ग्रहणशक्ती वाढते. उपरोक्त लिखाण हे गाईड लाईन आहे,त्यात अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. परस्पर औषध घेउ नये.
२ ) काली फॉस आणि सिलिका -- वकील, डॉक्टर, मोठेले एक्झीक्यूटिव्ह ऑफिसर्स यांच्यात जबरदस्त आत्मवि-श्वास असतो, एक अत्युच्च वैचारिक पातळी असते, पण कारणवशात एखाद्या कामात नको तेवढया घेतलेल्या बौद्धिक मेहनतीचा परिणाम मेंदू आणि नसा याना थकान येते, शैथ्य येते, मनात येतं एवढी मेहनत घेतली आहे, काय होईल हाविचार मनात येणं हेच मेंदूच्या थकावटीचे लक्षणं आहे, उपरोक्त औषधांनी थकान दूर होउन अशा प्रकांड पंडिताना सहज दिलासा मिळतो.
३ ) लाय्कोपोडियम खास करून अतिशय तल्लख बुद्धीचा, उत्कृष्ट वक्तृत्व, अमोघ वाणी असलेला शरीराने कृश, कुठल्याही विषयात पारंगत, सखोल, पण एकलांडा, त्याच्यावर प्रेम- आदर करणा-यांत बसेल,उठेल, त्याचं बोलणं एकणा-याला ज्ञानाची मेजवानी वाटेल, इतक्या सहजपणे तो अवघड विषयावर बोलेल, त्याच्या विद्वत्तेबध्दल आदर असेल अशाच लोकांच्यात तो रममाण होतो, त्याचा एक समज-गैरसमज आपल्याला समजून घेणारी, आपल्या वि-षयाची गोडी असणारी तर राहोच पण सांगोपांग अभ्यास करू इच्छिणारी व्यासंगी माणसंच नाहीत, अशा लोकांसमोर एखाद्या विषयावर बोलणंच नको, वकील, न्यायाधीश, राजकारणपटू, प्रथितयश अभ्यासक,उद्योजक,डॉक्टर, अशा लोकां-साठीच हे औषध नैराश्य कमी करून मानसिकबल- आत्मविश्वास वाढविणारं चांगल्या वक्त्यासाठींच.
वाचने
27432
प्रतिक्रिया
123
मिसळपाव
प्रतिक्रिया
औषधांचे नेमके परिणाम
होमिओपॅथी एक धादांत खोटा
काय ?????
In reply to होमिओपॅथी एक धादांत खोटा by नानासाहेब नेफळे
डॉ.फाटक तुम्ही तुमचे विचार मांडा....
In reply to होमिओपॅथी एक धादांत खोटा by नानासाहेब नेफळे
चक्क सहमत
In reply to होमिओपॅथी एक धादांत खोटा by नानासाहेब नेफळे
अहो, चुकताय आपण.
In reply to चक्क सहमत by प्रसाद गोडबोले
आपल्या मेहुणीला असं म्हणालात?
In reply to चक्क सहमत by प्रसाद गोडबोले
वा ! वा ! काय डेरिंग !
In reply to होमिओपॅथी एक धादांत खोटा by नानासाहेब नेफळे
होमिओपॅथी विषयी
आपले स्वागत असो!
होमिओपथी हे स्यूडोविज्ञान आहे
काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम
म्हणजे पोटात खरोखर काली फॉस
In reply to काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम by गवि
होमिओपॅथी म्हटल्यावर मिपाकर
होमिओपॅथी
(No subject)
In reply to होमिओपॅथी by आदिजोशी
होमिओपॅथी औषधांचा मला स्वतःला
In reply to होमिओपॅथी by आदिजोशी
+१११११११
In reply to होमिओपॅथी by आदिजोशी
एक तर अॅलोपाथी असे काहीही
In reply to होमिओपॅथी by आदिजोशी
होमियोपाथी बद्दलचा अनुभव
ती भयंकर परिस्थिती आणि मोठं संकट कोणतं होतं
In reply to होमियोपाथी बद्दलचा अनुभव by चित्रगुप्त
बिना औषधाचे औषध
अमीबॉयसिस' वर कोणत्या औषधाचा उपयोग झाला
In reply to बिना औषधाचे औषध by चित्रगुप्त
पॅथी सिद्ध होणे वा न होणे,
In reply to अमीबॉयसिस' वर कोणत्या औषधाचा उपयोग झाला by संजय क्षीरसागर
वैद्य भट
In reply to पॅथी सिद्ध होणे वा न होणे, by चित्रगुप्त
नाडीपरीक्षेबद्दल माझाही अनुभव
In reply to पॅथी सिद्ध होणे वा न होणे, by चित्रगुप्त
होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन
+१००%
In reply to होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन by प्रसाद१९७१
>>> होमिओपाथी ला बुवाबाजी
In reply to होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन by प्रसाद१९७१
अंधश्रद्धा ???
होमियोपाथीने कधीच, कुणालाच
अॅलोपाथी
मग कोणता शब्द वपरावा म्हणता?
In reply to अॅलोपाथी by चित्रगुप्त
असेच म्हणतो ....
In reply to अॅलोपाथी by चित्रगुप्त
शंका
श्रीयुत आदि जोशी!
In reply to शंका by आदिजोशी
शंका
In reply to श्रीयुत आदि जोशी! by संजय क्षीरसागर
ते तीन नियम पूर्वीपासून वैज्ञानिक सत्याचे जगन्मान्य निकष आहेत
In reply to शंका by प्रसाद गोडबोले
अॅलोपथीचा कैवार घेणार्यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती
In reply to शंका by आदिजोशी
काही आयुर्वेदिय औषधांवर यात
In reply to अॅलोपथीचा कैवार घेणार्यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती by सुबोध खरे
वनस्पती कुठल्या आहेत हे लिहुन
In reply to काही आयुर्वेदिय औषधांवर यात by अनुप ढेरे
ते मिश्रण गरम केल्यावर,
In reply to वनस्पती कुठल्या आहेत हे लिहुन by प्रसाद१९७१
ढेरे साहेब,
In reply to ते मिश्रण गरम केल्यावर, by अनुप ढेरे
+१ डॉक..!
In reply to ढेरे साहेब, by सुबोध खरे
आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण
In reply to ढेरे साहेब, by सुबोध खरे
आदि जोशी बहुदा डोळे झाकून औषधं घेत असावेत!
In reply to अॅलोपथीचा कैवार घेणार्यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती by सुबोध खरे
औषधाचं नाव तर होमिओपॅथीच्या
In reply to आदि जोशी बहुदा डोळे झाकून औषधं घेत असावेत! by संजय क्षीरसागर
आज फुल्ल विनोदी लिहीण्याचा इरादा दिसतोयं!
In reply to औषधाचं नाव तर होमिओपॅथीच्या by आदिजोशी
काका काका शांत व्हा
In reply to आज फुल्ल विनोदी लिहीण्याचा इरादा दिसतोयं! by संजय क्षीरसागर
तुम्हाला सावरतांना पंचाईत होतेयं!
In reply to काका काका शांत व्हा by आदिजोशी
मला शंका नाही तर खात्री आहे की होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे
विनोदी प्रतिसाद
In reply to मला शंका नाही तर खात्री आहे की होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे by प्रसाद१९७१
शास्त्रीय आधार
In reply to मला शंका नाही तर खात्री आहे की होमिओपाथी म्हणजे भंपकपणा आहे by प्रसाद१९७१
अहो होमिओपाथी भंपकपणा नाहीये
In reply to शास्त्रीय आधार by आदिजोशी
शास्त्रिय कसोट्या घेउन
In reply to अहो होमिओपाथी भंपकपणा नाहीये by प्रसाद१९७१
मुद्दा तुमचाच आहे
In reply to अहो होमिओपाथी भंपकपणा नाहीये by प्रसाद१९७१
काय सांगता
In reply to मुद्दा तुमचाच आहे by आदिजोशी
अं हं
In reply to शास्त्रीय आधार by आदिजोशी
राजे
In reply to अं हं by प्रसाद गोडबोले
अभ्यास
In reply to राजे by आदिजोशी
कन्फर्म आहे ओ प्रसादराव. नल
In reply to अभ्यास by प्रसाद गोडबोले
http://www.ncbi.nlm.nih.gov
In reply to राजे by आदिजोशी
लॅन्सेटपर्यंत कशाला जायचे..
In reply to http://www.ncbi.nlm.nih.gov by सुबोध खरे
गुगल केल्यावर होमिओपॅथीला
In reply to http://www.ncbi.nlm.nih.gov by सुबोध खरे
सुबोध खरे यांचे प्रतिसाद
धागाकर्ते कुठायत?
इतकी धुव्वांधार चर्चा वाचल्यावर ते
In reply to धागाकर्ते कुठायत? by आदूबाळ
काहीही नांवे ठेवा.
काविळीची औषध
In reply to काहीही नांवे ठेवा. by प्रभाकर पेठकर
होमिओपथी थोतांड आहे की नाही