मेट्रो ट्रेनचा अनुभव
अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली मुंबई ची मेट्रो रेल्वे रविवार दिनांक ८ जून २०१४ ला सुरु झाली. त्याचे श्रेय कोणाला याचा वाद सुरु राहील परंतु माझासारख्या असंख्य मुंबईकरांना हि अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक घटना आहे.
ज्यांना सेन्ट्रल ते वेस्टर्न प्रवास करायचा आहे, जास्तकरून जे रोज ठाणे, डोंबिवली , कल्याण आणि खाली ते अंधेरी, बोरीवली असा प्रवास करतात त्यांच्यासाठी नक्कीच वेळेची बचत करणारी आहे.
मेट्रो रेल्वे चालू झाल्याच्या दोन तीन दिवस मी जो प्रवासाचा अनुभव घेतला आहे तो आपल्यासमोर मांडत आहे.
सध्या मला इंटर्नशिप साठी चांदिवलीला जावे लागते. घाटकोपर स्टेशनला भयानक गर्दी होईल आणि आपल्याला उशीर होईल यामुळे पहिल्या दिवशी( म्हणजे उद्घाटनाच्या दुसर्या दिवशी)सकाळी जाणे टाळले. आणि संध्याकाळी आरामात घरी जाताना जाऊ असा विचार केला. त्याप्रमाणे चान्दिवालीला जवळ असलेले साकीनाका हे स्टेशन सुमारे साडेसहाच्या सुमारास गाठले. तिथे गेल्यावर बघितले तर तिकिटासाठी भीषण गर्दी. मोनोरेलचा प्रवास आधी केला असल्यामुळे टोकन घ्यायचे ते वापरायचे याबाबत माहिती होती. पहिले ३० दिवस कुठल्याही दोन स्टेशनांना जायला तिकिटाचा दर हा १० रुपये ठेवला आहे. नंतर तो वाढविणार आहेत.(कंपनीच्या वेबसाईट वर १०,२०,३०,४० असा सांगितला आहे, त्यावरून राजकारण चालू आहे, शेवटी काय ते आपल्याला नन्तर कळेलच.) त्याप्रमाणे १० रुपये देऊन टोकन घेतले. त्यातच माझी साधारण १५-२० मिनिटे गेली. मागे वळून पहिले तर आधी २ पदरी असलेली माझी रांग आता ४-५ पदरी झाली होती. त्यामुळे पहिल्या दिवशी टोकन घेऊन प्रवास केला आणि मग घाटकोपरला स्मार्ट कार्ड घेतले. अर्धे प्रवासी ऑफिसचे लोक दिसत असले तरी अर्धे लोक फिरायला आलेले होते.
पुढे जाऊन बघितले तर वर प्लात्फोर्म वर जाण्यासाठी आपल्याला दोन अडथळे पार करावे लागतात . एक म्हणजे AFC (automatic fair collection) गेट आणि दुसरी म्हणजे सुरक्षा व्यवस्था. हि सुरक्षा व्यवस्था निव्वळ औपचारिकता आहे. पहिले आपल्याला आपली bag conveyer belt वर ठेवावी लागते ती x ray machine मधून पास होण्यासाठी. अगदी विमानतळ असल्यासारखे नखरे आहेत. मग स्त्रियांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी अश्या चेकिंग साठी दोन रांगा आहेत. आपण मेटल डेतेक्टर मधून पुढे जातो. प्रत्येकाचे वेळी ते यंत्र वाजत असते. मग एक सुरक्षारक्षक उगीचच आपल्याला तपासायचे नाटक करतो. त्यातून त्याला काय कळते , कुणी काय बरोबर घेतले आहे ते त्याला कसे कळते ते मला अजूनही कळलेले नाही. इथपर्यंत साधारणपणे आपली ५-१० मिनिटे सहज मोडतात. गर्दीच्या वेळी तर नक्कीच कारण त्यालाही लाईन मोठी असते.
हे झाले कि पुढचे दिव्य म्हणजे afc gates . या यंत्रणेशी मुंबईच्या लोकांना सवय करून घ्यावी लागेल. आपल्याकडे एकतर टोकन नाहीतर स्मार्ट कार्ड असे पर्याय आहेत. ते आपल्याला या गेटवर स्वाईप करावे लागतात. एकदा स्वाईप केले कि एकाच माणसाला जाता येते. परंतु मुंबईच्या लोकांना घाई असते आणि धीर तर अजिबात नसतो. लोकांना स्वाईप कसे करावे याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कारण तुमचे कार्ड स्वाईप होत नसेल किंवा वेळ लागत असेल तर मागे उभे असलेल्या शंभर लोकांच्या शिव्या खाव्या लागतात. गर्दी आणि गोंधळ वाढत जातो. बर एकाने केले कि त्यातून एकावेळी तीन चार लोक जायचा प्रयत्न करतात. मग कधी कधी ते गेट उघडत नसेल तर मग सुरक्षा रक्षक ते कंट्रोलला सांगून उघडतात आणि एकाच वेळी दहा दहा लोकांना आत सोडतात. गर्दीच्या वेळी तर पहिले एक दोन दिवस मला हाच अनुभव आलेला आहे आणि त्यातून फुकट्या लोकांचे चांगलेच फावले आहे.
एकदा तुम्ही हि दिव्य पार केलीत कि मग अखेरीस तुम्ही फलाटावर पोहोचता. तसे फलाटावर ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी रहायची वेळ येत नाही कारण गाड्यांची वारंवारता (frequency) चांगली आहे. मात्र चुकीच्या फलाटावर आलात तर लोकल सारखे रूळ ओलांडायचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण एक तर ते जमणार नाही आणि ते जीवघेणे देखील आहे. एवढेच काय फलाटावर उभे असलेले सुरक्षारक्षक तुम्हाला पिवळ्या रेषेच्या पलीकडे जाऊन देत नाहीत. साकीनाक्याला तर ते लोक दाराप्रमाणे लाईन सुद्धा लावतात . एकंदरीत हा टप्पा एकदम आरामशीर आहे. ट्रेनचे डबे ए सी असल्यामुळे प्रवास आरामशीर आहे. तसेच वेगवानही आहे. ट्रेनचे डबे मोकळे असले तरी बसायला जागा फार नाही. पण २० मिनिटांपेक्षा जास्त प्रवास नसल्याने त्याचे काही वाटत नाही. महिला, जेष्ठ नागरिक आणि अपंग यांच्यासाठी राखीव जागा आहेत. आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला मोटरमनशी देखील बोलता येण्याची सोय केली आहे. पुढचे स्थानक कुठले , फलाट कुठल्या बाजूला येणार याचीही घोषणा होत असते. बाहेर बघण्यासारखे मात्र काही नाही. झोपडपट्टीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
परत येताना पुन्हा तुम्हाला AFC गेट पार करण्याचे दिव्य करावे लागते. येथेही जर का प्रचंड गर्दी असेल तर ते लोक manually उघडून लोकांना बाहेर काढतात ते सुद्धा स्वाईप न करता. ज्यांच्याकडे टोकन आहे त्यांचे परत घेतात. खरेतर ते गेटच्या खाचेमध्ये आत टाकायचे असते आणि कार्ड असेल तर ते स्वाईप करायचे असते. कार्ड वाल्यांना नुसते कार्ड आहे ना बघून बाहेर काढतात. येथे मला आलेला अनुभव सांगतो. माझ्याकडे असलेले कार्ड मी साकीनाका स्टेशनला स्वाईप करून आत आलो. घाटकोपरला तौबा गर्दी असल्याने त्यांनी गेट बंद ठेवले आणि मी नुसतेच कार्ड दाखवून बाहेर आलो. त्यामुळे मी बाहेर पडल्याची नोंद झाली नाही पण माझे पैसेही गेले नाहीत. दुसर्यादिवशी मी जेव्हा घाटकोपरला आत जात होतो तेव्हा माझे कार्ड read/ स्वाईप होत नवते. तिथल्या कर्मचार्याने मला सांगितले कि काल येताना स्वाईप न केल्याने असे होत आहे, पुढे असलेल्या customer care ला सांगून कार्ड अपडेट करून घ्या. असे म्हणून मी तिथे गेलो तर माझ्यासारखीच २५-३० माणसे तिथे गर्दी करून होती. आणि एक एक कार्ड अपडेट करायला वेळ लागत होता. शेवटी उशीर होईल हे लक्षात आल्यावर लोकांनी थोडी आराडा ओरड केल्यावर त्यांनी बाजूच्या गेटवर काहीतरी सेटिंग करून पुन्हा कार्ड स्वाईप करून आम्हाला आत घेतले. या प्रकरणामध्ये माझे दहा रुपये वाचले पण नाहक मनस्ताप सहन करावा लागला,थोडा वेळी गेला. ते सुद्धा सकाळच्या गर्दीच्या वेळी.
खाली मी एक गणित मांडत आहे, कि एखाद्या माणसाला ठाणे ते अंधेरी असा प्रवास करायचा असेल तर त्याला मेट्रो रेल वापरून आणि न वापरता किती वेळ लागेल. यामध्ये मी फक्त प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ गृहीत धरला आहे. जिने चढण्या-उतरण्याचा वेळ, गाडीची वाट बघण्याचा वेळ, तिकीट काढणे ,कार्ड स्वाईप करणे इ. वेळ गृहीत धरलेला नाही कारण तो गर्दीच्या वेळेनुसार कमी जास्त होऊ शकतो. सर्व वेळासाठी m-indicator या ऍपचा संदर्भ घेण्यात आला आहे. तर घाटकोपर ते अंधेरी या मेट्रोच्या प्रवासासाठी माझ्या आई-वडिलांना सुमारे १८ मिनिटे लागली त्यामुळे तसे गृहीत धरत आहे.
ठाणे ते अंधेरी प्रवास व्हाया दादर ( मेट्रो ट्रेन न वापरता केलेला पारंपारिक प्रवास)
ठाणे ते दादर (फास्ट ट्रेन) + दादर ते अंधेरी (फास्ट ट्रेन) = २८ मिनिटे + १५ मिनिटे = ४३ मिनिटे
ठाणे ते दादर (स्लो ट्रेन) + दादर ते अंधेरी (स्लो ट्रेन) = ४२ मिनिटे + २२ मिनिटे = ६४ मिनिटे
ठाणे ते दादर (फास्ट ट्रेन) + दादर ते अंधेरी (स्लो ट्रेन) = २८ मिनिटे + २२ मिनिटे = ५० मिनिटे
ठाणे ते दादर (स्लो ट्रेन) + दादर ते अंधेरी (फास्ट ट्रेन) = ४२ मिनिटे + १५ मिनिटे = ५७ मिनिटे
ठाणे ते अंधेरी व्हाया घाटकोपर (मेट्रो ट्रेन वापरून केलेला प्रवास )
ठाणे ते घाटकोपर (फास्ट ट्रेन) + घाटकोपर ते अंधेरी (मेट्रो ट्रेन) = १५ मिनिटे +१८ मिनिटे= ३३ मिनिटे
ठाणे ते घाटकोपर (स्लो ट्रेन) + घाटकोपर ते अंधेरी (मेट्रो ट्रेन) = २३ मिनिटे + १८ मिनिटे = ४१ मिनिटे
आता यामध्ये एक गोची आहे ती अशी कि घाटकोपर लोकल आणि मेट्रो स्टेशन हि जोडलेली आहेत, पण अंधेरी लोकल आणि मेट्रो स्टेशन हि लांब आहेत आणि त्यांना एका ब्रीजने जोडले आहे जो पार करायला ५-१० मिनिटे जातात. पण तुम्हाला जर का मरोळ , चाकाला , वर्सोवा या भागात जायचे असेल तर त्यासाठी मेट्रोची स्टेशनच आहे त्यामुळे अंधेरी वरून होणारा रिक्षाचा/बसचा खर्च आणि वेळ वाचतो.
जरी हा प्रवास वेळ वाचवणारा असला तरी तो खर्चिक आहे जर का त्यांनी १०,२०,३०,४० असे दर पत्रक ठेवले तर. त्या तिकिटांचे दर असलेला तक्ता खाली देत आहे.
V-VERSOVA, DN- DN NAGAR,AZ –AZAD NAGAR,WEH- WESTERN EXPRESS HIGHWAY, CHK- CHAKAL, APR- AIRPORT ROAD, MAR-MAROL NAKA, SKN-SAKI NAKA,ASA- ASALPHA,JN- JAGRUTI NAGAR, GHK- GHATKOPAR
आता ठाणे ते अंधेरी रिटर्न तिकीट ३० रुपये आहे आणि हे इथे घाटकोपर ते अंधेरी एका वेळचे तिकीट ३० रुपये लावत आहेत. त्यामुळे खर्चाचे गणित पुढीप्रमाणे:
ठाणे ते अंधेरी प्रवास व्हाया दादर ( मेट्रो ट्रेन न वापरता केलेला पारंपारिक प्रवास)
सिंगल = रु.१५
रिटर्न = रु. ३०
ठाणे ते अंधेरी व्हाया घाटकोपर (मेट्रो ट्रेन वापरून केलेला प्रवास )
सिंगल = रु. १० + रु. ३०= रु. ४०
रिटर्न = रु. २० + रु. ६० = रु. ८०
अजून मेट्रो ट्रेनच्या पासाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे तो पास आणि लोकलचा फर्स्ट आणि सेकंद क्लास चा पास यांची तुलना करता आली असती.
पण एक आहे ते म्हणजे मुंबईत कितीही जरी पाउस पडला तरी मेट्रो ट्रेन चालूच राहील! एकूण पाहता मेट्रो ट्रेन तुमचा वेळ नक्की वाचवते जर तुम्ही वर सांगितल्या प्रमाणे ठाणे, डोंबिवली , कल्याण आणि खाली ते अंधेरी, बोरीवली असा प्रवास करत असाल. एकदा का मुंबैकारांना या यंत्रणेची सवय झाली कि हा प्रवास सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. कारण अनुभव असा आहे कि प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ कमी असला तरी आत आणि बाहेर जाण्यातच सुमारे २०-२५ मिनिटे वेळ गर्दीच्या वेळी विशेषतः संध्याकाळी जातो. त्यामुळे सध्यातरी मेट्रो ट्रेनने प्रवास करायचा असेल तर एकतर भरपूर वेळ असेल तर करा नाहीतर पूर्ण तयारीशी वेळ बघून करा. मुंबईच्या चाकरमान्यांना हि ट्रेन खुप आवडलेली आहे. एकदा का मुंबईकरांनी या यंत्रणेशी जुळवून घेतले कि प्रवास सुखाचा होईल, होणारा गोंधळ कमी होईल अशी आशा करूया. नव्याचे नौ दिवस संपले कि फिरायला येणार्यांची गर्दी कमी होईल. लोकांकडून सुद्धा थोडी शिस्त, संयम आणि सहकार्याची अपेक्षा आहे. तिकिटाचे दर सामन्याच्या खिशाला परवडतील असे ठेवावे अशीही अपेक्षा आहे. येथील स्टेशन वरचे फूड स्टँाल चे अन्न अगदी मॉलसारखे महागडे आहे ते जरा स्वस्त केले पाहिजे. पण बर्याच लोकांना विविध मार्गांवर ट्र्फिकला टाळून जाता येत आहे, बेस्ट बसेसची गर्दी टाळता येत आहे, रिक्षाचा खर्च वाचत आहे. काही का होईना पण रोज जीवघेणा प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या मुंबईकराला एक नवीन जीवनदायिनी मिळाल्यामुळे “अच्छे दिन” आल्यासारखे वाटत आहे.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
मेट्रोचा व्हिडीओ पाहील्यावर
+१
अच्छा? कुठे आहे म्हणे तुमच्या
अहो नाहीये
येतिये म्हणे
पुण्याची भावी मेट्रो
मस्त माहीती . नवीन माणसाला हा
चांगली माहिती. सुरक्षा
-
माहितीपूर्ण लेख.
उत्तम माहितीपूर्ण लेख
स्मार्ट कार्ड
लेख आणि त्यातली माहिती आवडली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}लेख आवडला
छान माहितिपुर्ण लेख
जरूर प्रवास करा, दुपारी गर्दी
फोटोवरून मेट्रो ही लोकलसारखीच
कोलकाता मेट्रो देशातली पयली
ट्रेनला ओवारहेड वायरच आहे.
चणेवाले भैया लोक आणि टपावर
मेट्रो चालु झाल्यामुळे
दादरची गर्दी
झोपडपट्टीवासियांची गैरसोय
>>महिला व पुरुषांना वेगवेगळे
महिला व पुरुषांना वेगवेगळे डबे
झोपडपट्टीवासियांची गैरसोय !
उपयुक्त माहिती...
विहंगम म्हणजे आकाशातून
आणखी एक टीप
मस्त माहिती रे, नवीन इन्फो
फक्त ३ दिवस
मेट्रो सोडा हो तुमच्या पून्यात बीआर्टीयस सुरु झाली तरी खुप झालं
पुण्यात ब्यार्टी
पुणे मुंबई वाद इथे कशाला?
छान माहिती आणि शेवटी केलेली
थोडक्यात काय तर स्मार्टकार्ड
उगाच मुंबई- पुणे वाद कशाला
अगदी! बीआर्टीचा थांबा माझ्या