मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सेव्हन कप केक

लव उ · · पाककृती
सेव्हन कप केक 7cup_cake मिपावर पाककृती द्यायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तस म्हणायला केक पण चविला मात्र बर्फीसारखी अस काहिस आहे. 7cup_cake साहित्य: बेसन १ कप साजुक तूप १ कप दुध १ कप ओल्या नारळाची चोय १ कप साखर ३ कप कृती:
  1. वरील सर्व साहित्य कढईत एकत्र करून घ्यावे.
  2. मंद आचेवर १५ मिनिटे सतत ढवळत रहावे.
  3. कडा सुटायला लागल्यावर गस बंद करवा.
  4. एका ताटाला थोडे तूप लावून घ्यावे.
  5. त्यात हे मिश्रण गरम असतानाच ओतून पसरावे.
  6. चौकोनी आकारात वड्या कापाव्यात.

वाचने 9600 वाचनखूण प्रतिक्रिया 31

पैसा गुरुवार, 06/12/2014 - 14:59
मस्त आहे पाकृ! केक म्हणा, नाहीतर वड्या म्हणा! चांगलंच लागत असणार!

इरसाल गुरुवार, 06/12/2014 - 16:08
पाकृ कशी का असेना आपल्याला तुमचं नाव जाम आवडलं बघा. पुपाशु.

In reply to by रेवती

सखी गुरुवार, 06/12/2014 - 17:24
मीही हेच म्हणणार होते, तेलगु मैत्रिणीने एकदा केलेल्या या वड्या - पण तिने (खाली अनन्न्या म्हणाली तसे) साखर कमी करुन बदाम+काजुची पुड १ कप घातली होती. फार सुरेख झाल्या होत्या त्या वड्या. फक्त इथे सगळे साहित्य आधीच एकत्र केले आहे तिने बेसन तुपावर परतुन घ्यायला सांगितले होते, ते बरोबर वाटते नाहीतर डाळीचे पीठ कच्चे लागेल असे वाटते.

अनन्न्या गुरुवार, 06/12/2014 - 16:36
यात तीन कप साखर घातल्यास जास्त गोड होतात, दोन कप घालून करून बघा. बेसनाऐवजी मूगपीठ वापरले तर आणखी पौष्टीक होतील. छान लागतात चवीला! माझा लेक याला पौष्टीक वड्याच म्हणतो, त्याला खूप आवडतात.

प्रभाकर पेठकर Fri, 06/13/2014 - 10:26
एक कप साजुक तुप आणि ३ कप साखर हे दोन भयावह जीन्नस सोडता अतिशय आकर्षक पाककृती वाटते आहे. करुन पाहीनच एकदा पण वड्या/केक मित्रमंडळीत वाटावा लागेल.