Skip to main content

सेव्हन कप केक

लेखक लव उ यांनी गुरुवार, 12/06/2014 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
सेव्हन कप केक 7cup_cake मिपावर पाककृती द्यायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तस म्हणायला केक पण चविला मात्र बर्फीसारखी अस काहिस आहे. 7cup_cake साहित्य: बेसन १ कप साजुक तूप १ कप दुध १ कप ओल्या नारळाची चोय १ कप साखर ३ कप कृती:
  1. वरील सर्व साहित्य कढईत एकत्र करून घ्यावे.
  2. मंद आचेवर १५ मिनिटे सतत ढवळत रहावे.
  3. कडा सुटायला लागल्यावर गस बंद करवा.
  4. एका ताटाला थोडे तूप लावून घ्यावे.
  5. त्यात हे मिश्रण गरम असतानाच ओतून पसरावे.
  6. चौकोनी आकारात वड्या कापाव्यात.

वाचने 9630
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

In reply to by लव उ

फोटो फ्लिकरवर आहेत काय ? कारण जर तसं असेल तर मलाही आज इकडे फ्लिकरवरचे फोटो टाकण्यास जमले नाही.

In reply to by मदनबाण

हुश्श! बनवताना जेवढ दमायला झाल नव्ह्त तेव्हढ ह्या फोटोनी दमवलय. *smile*

In reply to by स न वि वि

पदार्थ सात कपात (कपांच्या मोजणिने) घेतले आहेत की वो :)

In reply to by स न वि वि

पदार्थ सात कपात (कपांच्या मोजणिने) घेतले आहेत की वो :)

In reply to by स न वि वि

सेव्हन कप केक म्हणजे ७ माप जिन्न्स. सहित्य निट मोजलत तर ते ७ कप भरेल म्हणुन सेव्हन कप केक

मस्त आहे पाकृ! केक म्हणा, नाहीतर वड्या म्हणा! चांगलंच लागत असणार!

In reply to by अत्रुप्त आत्मा

आमच्या वड्यांच्या यादीत, हा एक नविन पदार्थ पण अ‍ॅडवला आहे.. ...खूष?

तेलुगु लोक बनवतात ना हा पदार्थ? एका तेलुगु मुलीने मला सेव्हन कप्स स्वीट नावाने शिकवला व छानच लागतो.

In reply to by रेवती

मीही हेच म्हणणार होते, तेलगु मैत्रिणीने एकदा केलेल्या या वड्या - पण तिने (खाली अनन्न्या म्हणाली तसे) साखर कमी करुन बदाम+काजुची पुड १ कप घातली होती. फार सुरेख झाल्या होत्या त्या वड्या. फक्त इथे सगळे साहित्य आधीच एकत्र केले आहे तिने बेसन तुपावर परतुन घ्यायला सांगितले होते, ते बरोबर वाटते नाहीतर डाळीचे पीठ कच्चे लागेल असे वाटते.

यात तीन कप साखर घातल्यास जास्त गोड होतात, दोन कप घालून करून बघा. बेसनाऐवजी मूगपीठ वापरले तर आणखी पौष्टीक होतील. छान लागतात चवीला! माझा लेक याला पौष्टीक वड्याच म्हणतो, त्याला खूप आवडतात.

In reply to by कवितानागेश

सोप्या आहेत.
मलातर जाम अवघड वाटताहेत. बायकोला करायला सांगतो. :-)

त्या वड्या अथवा केक जे काय असेल ते चवीला भारी असणार. अवांतरः ते नाव बदला राव! लव 'उ'? कितीही प्रयत्न केला तरी 'हाव इज इट पासिबल'?

In reply to by प्यारे१

अवांतरः ते नाव बदला राव! लव 'उ'? कितीही प्रयत्न केला तरी 'हाव इज इट पासिबल'?
खिक् ;-)

एक कप साजुक तुप आणि ३ कप साखर हे दोन भयावह जीन्नस सोडता अतिशय आकर्षक पाककृती वाटते आहे. करुन पाहीनच एकदा पण वड्या/केक मित्रमंडळीत वाटावा लागेल.