💬 प्रतिसाद
(52)
प
प्राजु
Fri, 12/14/2007 - 19:30
नवीन
मनातल्या त्या क्षणाला
शब्दरूप येईल का?
शब्दामध्ये बांधला तर
त्याला अर्थ येईल का?
- प्राजु.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 12/14/2007 - 19:35
नवीन
शब्द जितके वेगळे
तितकेच ते वेंधळे
मनातला सारा अर्थ
शब्दातच मावेल का
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 12/14/2007 - 19:35
नवीन
चारोळीला चारोळीतून
प्रतिसाद येईल का?
प्रतिसादाला प्रतिसाद
पण चारोळित राहील का?
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 12/14/2007 - 19:36
नवीन
चारोळीला चारोळीतूनच
प्रतिसाद येतो आहे
साद चारोळीतून घातल्यावर
दुसरी का अपेक्षा आहे?
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 12/14/2007 - 19:37
नवीन
आम्हाला काव्यातली एक ओळही लिहिता येत नाही याचा खेद वाटतो नाहीतर आम्हालाही आमच्या परिने हा गोफ विणता आला असता! :)
असो, खेळ चालू द्या. आम्ही येथील चारोळ्या वाचू आणि आम्हाला उत्तम वाटलेल्या चारोळीला सव्वा अकरा रुपये बक्षिस देऊ! :)
तात्या.
- Log in or register to post comments
द
देवदत्त
Fri, 12/14/2007 - 19:41
नवीन
काय तात्या ,
फक्त सव्वा अकराच?
बघा जरा बक्षिस वाढवता येते का? ... मी ही प्रयत्न करतो मग ;)
(कवितेतील ’वि’ न कळणारा पण बक्षिस लोभी) देवदत्त
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/14/2007 - 19:39
नवीन
चहा आणि भजी
सोबत खाल्ली मिरची
टपरीवर बसायला
वापरली होती खुर्ची
(कशी आहे?)
(सव्वा अकरा रुपये क्याश ओन्ली)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 12/14/2007 - 19:40
नवीन
(कशी आहे?)
उत्तम आहे!
(सव्वा अकरा रुपये क्याश ओन्ली)
Done! :)
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 12/14/2007 - 19:39
नवीन
चारोळीला चारोळीतून
प्रतिसाद आला आहे..
एका वीणीतून दुसरी वीण..
गोफ छान विणला आहे...
- प्राजु.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/14/2007 - 19:42
नवीन
खुर्चीचा खिळा
नको तिथं रुतला
माझा जीव मात्र
भजीमध्ये गुंतला
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 12/14/2007 - 19:43
नवीन
मी तिला साद दिली
आणि भलतीच ओ आली
तिच्या ऐवजी बाप येता
पळता भुई थोडी झाली
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/14/2007 - 19:44
नवीन
तिच्या बापाला पाहता
सुरू होतात जुलाब
ती मात्र डोक्यामध्ये
माळते लाल गुलाब
(ही चारोळी उडवू नका प्लीज. ही आमची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे.)
- Log in or register to post comments
म
मनोज
Fri, 12/14/2007 - 19:45
नवीन
मन आणि क्षण
यमक छान जुललय
मलाही अता चारोळीच
गमक कळलयं
आपलाच,
(यमक्या) मन्या
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 12/14/2007 - 19:45
नवीन
प्रत्येक सादेला हवा तो प्रतिसाद..
यासाठी पूर्वपुण्याईच हवी
नाहितर आपण म्हणत बसतो श्लोक...
आणि समोरून ऐकु येते शिवी
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 12/14/2007 - 19:45
नवीन
गोफ विणता विणता
धागे मनाचे जुळतिल का?
मिसळ चाखता चाखता
वाद्-विवाद संपतिल का?
प्राजु (निखळ अस्वादासाठी आलेली)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 12/14/2007 - 19:50
नवीन
गोफ विणता विणता
धागे मनाचे जुळतिल का?
मिसळ चाखता चाखता
वाद्-विवाद संपतिल का?
नक्की संपतील, मात्र पुन्हा सुरूही होऊ शकतील बरं! मात्र मनाचे धागे तसेच जुळलेले राहतील याची खात्री आहे!:)
तात्या.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Fri, 12/14/2007 - 19:46
नवीन
शिवी म्हणजेच ओवी असते
असाच इथला बाज आहे
आपल्या ओवीभांडाराचा
असा अनेकांना माज आहे
(शिवराळ)बेसनलाडू
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/14/2007 - 19:47
नवीन
ऐकू येता शिवी
आम्हीही मूठ वळतो
कानाखाली बसल्यावर
खरा अर्थ कळतो
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 12/14/2007 - 19:48
नवीन
शिवी आणी ओवी
दोहोंत जरा फरक आहे
ओवी असेल तर स्वर्ग
शिवी असेल तर नरक आहे..
- प्राजु.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 12/14/2007 - 19:49
नवीन
गोफ आनि मिसळप्रेमींचे
नाते आगळेच आहे
भरपूर भांडूनही सार्याची
वीण एकमेकांतच गुंतली आहे
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/14/2007 - 19:49
नवीन
चारोळी म्हणजे चार ओळी
एकाखाली एक
मी घेतो क्याच बरोबर
तू फक्त फेक
ही मस्त झाली ना.
- Log in or register to post comments
म
मनोज
Fri, 12/14/2007 - 19:50
नवीन
माला आहे माज
मूळी नाही लाज
सोडुन काम काज
चारोळ्याइची खाज
आपलाच,
मन्या
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 12/14/2007 - 19:50
नवीन
आमची शिवी शिवी
आणि त्यांच्या शिव्या श्लोक आहेत
नाव बदलून लिहणारे
इथे बरेच (बाराचे नव्हे!) लोक आहेत
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 12/14/2007 - 19:51
नवीन
नको करू माज..
चारोळ्या लिही खास..
मिसळ खाऊन झाल्यावर..
मनापासून हास....
- प्राजु.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Fri, 12/14/2007 - 19:51
नवीन
मुठी वळवणे, कान तापणे
सज्जनतेचे लक्षण काय?
विडंबनांची विष्ठा म्हणते
रात्री केले भक्षण काय?
()बेसनलाडू
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 12/14/2007 - 20:07
नवीन
विडंबनांची विष्ठा म्हणते
रात्री केले भक्षण काय?
छानच! आम्हाला विडंबनाइतकीच ही चारोळीही आवडली! :)
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/14/2007 - 19:52
नवीन
कांदा, कोथिंबीर, रस्सा, फरसाण युक्त अशी
सगळ्यांनाच आवडते इथे पावाबरोबर मिसळ
दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं
स्वतःच्या डोळ्यातलं शोधावं लागतं मुसळ
जमली नाही बॉ
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 12/14/2007 - 19:53
नवीन
तात्याला आता
तुरुंगात पाठवा,
त्याच्या अपंग आईला
घरबसल्या रडवा!
असो..
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 12/14/2007 - 19:54
नवीन
चोरोळ्यांची बरसात..
अशी काही बरसावी..
भांडणे सारी संपून..
मिसळपूरी'त रमावी..
(इथे मिसळ आणि पूरी असा अर्थ नव्हे.. कोल्हापूर सारखे मिसळपूर..)
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/14/2007 - 19:56
नवीन
हा समर्पक शब्द आहे.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 12/14/2007 - 20:01
नवीन
शब्द आवडला! :)
(मिसळपुरीकर) तात्या.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 12/14/2007 - 19:58
नवीन
नको वळू मुठी अन
नको तापवू कान
मनासारखे न घडे सगळे
हेची असुदे भान...
प्राजु.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/14/2007 - 20:00
नवीन
एक
दोन
आला
फोन
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 12/14/2007 - 20:01
नवीन
सतत मुठी वळवणे
अन ते कान तापवणे
दुसरं तिसरं काहि नसून
मिसळीची चव बिघडवणे
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/14/2007 - 20:04
नवीन
तिचं माझं लग्न म्हणजे
फक्त संसार थाटणे
मी पळतो पुढे अन
तिच्या हातात लाटणे
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 12/14/2007 - 20:05
नवीन
आपण सारे मिसळवासी..
नको ते छोले भटुरे..
कशाला खावे नको ते
जे पोटात गुरगुरे....
- प्राजु.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 12/14/2007 - 20:08
नवीन
तिचं माझं लग्न म्हणजे
मिळून मिसळून वागणे
तिने मस्तपणे खाणे अन
मी भांडी विसळून झोपणे :))
- Log in or register to post comments
द
देवदत्त
Fri, 12/14/2007 - 20:30
नवीन
मस्त आहे.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 12/14/2007 - 20:08
नवीन
लाटणे, भांडी, रवी, पळ्या
फेका फेकी ची मजा यात..
कधी होते नवरा बायकोत
कधी तात्याच्या हाटेलात..
- प्राजु.
- Log in or register to post comments
द
देवदत्त
Fri, 12/14/2007 - 20:31
नवीन
मजा येतेय वाचायला.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 12/14/2007 - 20:13
नवीन
तात्याचा पाय,
नेहमीच गोत्यात
भरा त्याला पोत्यात
अन दळा त्याला जात्यात!
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 12/14/2007 - 20:15
नवीन
तात्या.. सह्हि..
धागा धागा विणूनी असे
दृढ होत जावे नाते..
नव्या चारोळी सह भेटेन उद्या
सध्या आपला निरोप घेते...
- प्राजु.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 12/14/2007 - 20:17
नवीन
नव्या चारोळी सह भेटेन उद्या
सध्या आपला निरोप घेते...
बाय बाय, टाटा!
उद्या तुला नवी भांडणे वाचायला मिळोत हीच शुभकामना! :))
तात्या.
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Fri, 12/14/2007 - 20:33
नवीन
निरोप कसला माझा घेता
जेथे राघव तेथी सीता
देता देता एके दिवशी
दे हाता शरणांगता
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 12/14/2007 - 20:53
नवीन
निरोप देणे... निरोप घेणे
किती बरे हे जीवघेणे
सतत जवळ असणार्याला
दूर दूर जाताना पाहणे
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Fri, 12/14/2007 - 22:51
नवीन
येणे जाणे देणे घेणे
नवे सूर अन नवे तराणे
आता पुरे तुझे हे बहाणे
आता कैसे येणे आता खुंटले येणे :-)
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 12/14/2007 - 23:03
नवीन
सूर नवे अन नवे तराणे
भंकसही इथली चवीने घेणे
जूने सारे मिटवूनी आता
पुन्हा नव्याने मिसळ चापणे
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Fri, 12/14/2007 - 23:11
नवीन
नवे नाव अन नवे बहाणे
नवेनवेसेच सोंग घेणे
मिटवामिटवी कशाकशाची?
कशाकशाची लाज वाटणे?
(निर्लज्ज)बेसनलाडू
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Fri, 12/14/2007 - 23:08
नवीन
जरा चुकीचे जरा बरोबर
फितुर जाहले तुजला अंबर
श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर
विरु बसंती जय नि गब्बर !
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 12/14/2007 - 23:12
नवीन
श्रीपाद, वल्लभ, दत्त, दिगंबर
विरु, बसंती, जय नि गब्बर !
आपण आठ मिळूनी टाकू
मेंढिकोटचा डाव जब्बर! ;)))
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »