बापू सदावर्ते (अशोक सराफ) एक निवृत्त विधुर. एका मोठ्या बंगल्यात तो आपल्या रंगा (अनिकेत विश्वासराव) नावाच्या तरूण अविवाहीत मुलाबरोबर राहतो. बापू स्वतः अत्यंत काटकसरी व प्रचंड भांडकुदळ. भांडणात कोणालाही हार जात नाही.
शांती चिटणीस (वंदना गुप्ते) आपल्या वयात आलेल्या पण अत्यंत पोरकट असलेल्या राधिका (मृण्मयी देशपांडे) नावाच्या
मुलीबरोबर एकटीच राहणारी विधवा. ती सुद्धा प्रचंड भांडकुदळ. राधिका जराशी पोरकट, काहीशी अर्धवट.
तिच्या शेजारी दुष्यंत मारणे (आनंद इंगळे) हा अविवाहीत वकील आहे. त्याचा शांतीवर क्रश आहे. शांतीला पटविण्यासाठी तो तिला वेळोवेळी स्वतःच रचलेल्या कविता पाठवितो आणि राधिकाला सारखे मिठाईचे बॉक्स पाठवत राहतो. शांतीने फाडफाड बोलून त्याचा अपमान करून त्याला हाकलून सुद्धा तो तिचा नाद सोडत नाही.
रंगा एक टिपीकल नवयुवक आहे. बापाच्या पैशावर मनसोक्त उधळपट्टी करणारा. फोटो स्टुडिओ चालविणारा त्याचा वसंता (हेमंत ढोमे) नामक मित्र त्याच्यासारखाच. रंगाने वेळोवेळी गोरक्ष (हृषिकेश जोशी) नावाच्या टपोरी गुंडाकडून उसने पैसे घेतलेले असतात. गोरक्ष वडगाव, धायरी भागातल्या अंगावर भरपूर सोने बाळगणारा टिपीकल टपोरी गुंड राजकारणी. गोरक्षची बहीण (प्रिया बापट) हिला मॉडेलिंगचे वेड आहे. घरातल्या घरात वेगवेगळे रोल करून पाहणे हा तिचा छंद.
पैशासाठी गोरक्ष रंगाला तगादा लावतो व एक कल्पना सुचवितो. बापाचा बंगला गहाण टाकून आपले १३ लाख रूपये फेडावेत अशी कल्पना तो रंगाला सुचवितो. पण आपला बाप गहाण टाकण्याच्या कागदावर कधीही सही देणार नाही याची रंगाला कल्पना असते. पण बापाला वेडा ठरविला तर त्याच्याऐवजी रंगाची सही चालेल असे मारणे वकील सुचवितो.
बापाला वेडा ठरविण्यासाठी त्याला कोणीतरी भांडणात हरविणे आवश्यक आहे असे रंगाला वाटते. भांडणात हरल्यामुळे त्याला वैफल्य येऊन तो वेडा होईल अशी त्याची कल्पना. त्यासाठी तो आणि वसंता शांती चिटणीसला थाप मारतो की आपला बाप वेडा आहे व त्याच्याशी कोणतरी भांडले तरच तो पुर्ववत होईल आणि म्हणून शांतीने त्याच्या घरी जाऊन बापूशी जोरदार भांडण करावे असे तो शांतीला सुचवितो. इकडे रंगा आणि वसंता बापूला तीच थाप शांतीविषयी मारतात. शांती वेडी असून तिच्याबरोबर कोणीतरी भांडण केले तरच ती पूर्ववत होईल असे सांगून तिच्याशी भांडायला तो बापूला राजी करतो.
शांती बापूशी भांडायला येते आणि हळूहळू परिस्थितीला कलाटणी मिळते. ती कशी ते प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. इकडे रंगा गोरक्षच्या बहीणीच्या प्रेमात पडतो तर अर्धवट राधिका वसंताच्या प्रेमात पडते. शांतीला पटविण्याचे मारणे वकीलाचे प्रयत्न सुरूच असतात. बापू आणि शांती दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. शेवट अपेक्षेप्रमाणेच गोड आहे.
चित्रपट एकंदरीत धमाल करमणूक आहे. चित्रपटात एकूण ३ गाणी आहेत व सर्व गाणी चित्रपटाच्या कथेला साजेशी आहेत. श्रीकांत मोघेही एका छोट्याश्या भूमिकेत चमकून जातो. मेंदू घरी ठेवून जास्त विचार न करता हा चित्रपट पाहिला तर पैसे नक्कीच वसूल होतील.
वाचने
9052
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्की बघणार...
अतिशय दिव्य प्रतिसाद
In reply to नक्की बघणार... by मुक्त विहारि
स्टोरीबद्दल धन्यवाद
रिव्ह्यूज कसेही असले तरी मला
In reply to स्टोरीबद्दल धन्यवाद by संजय क्षीरसागर
उद्या जाणार आहे आं.को.ला
लोकसत्तामध्ये आलेले हे
ज्याना आपले पैसे फुकट जावू
सिनेमा पाहावासा वाटतोय खरा.
खट्टा मिठा
In reply to सिनेमा पाहावासा वाटतोय खरा. by इनिगोय
विनोद
In reply to खट्टा मिठा by llपुण्याचे पेशवेll
गोष्ट आवडली
अशोक सराफ ह्या माणसाच्या
अभ्यास वाढवा
In reply to अशोक सराफ ह्या माणसाच्या by प्रसाद१९७१
+१०००००
In reply to अभ्यास वाढवा by टवाळ कार्टा
अशोक सराफ यांच्या उत्तम
In reply to अभ्यास वाढवा by टवाळ कार्टा
एक डाव भूताचा, धुमधडाका, अशी
In reply to अशोक सराफ यांच्या उत्तम by इनिगोय
अशोक सराफ यांचे वजीर मधले काम
In reply to एक डाव भूताचा, धुमधडाका, अशी by सखी
वजीर
In reply to अशोक सराफ यांचे वजीर मधले काम by llपुण्याचे पेशवेll
अशोकमामा
In reply to वजीर by सखी
वजीरमध्ये "वेरी बीजी, वेरी
In reply to अशोक सराफ यांचे वजीर मधले काम by llपुण्याचे पेशवेll
होय होय तोच तो...
In reply to वजीरमध्ये "वेरी बीजी, वेरी by आदूबाळ
तीन फुल्या तीन बदाम
In reply to वजीरमध्ये "वेरी बीजी, वेरी by आदूबाळ
टाईमिंग
In reply to एक डाव भूताचा, धुमधडाका, अशी by सखी
सादरीकरण
In reply to टाईमिंग by चैतन्य ईन्या
अशोक सराफ.
In reply to सादरीकरण by सखी
काका, रमेश पवार हे नाव
In reply to अशोक सराफ. by प्रभाकर पेठकर
रमेश पवार.
In reply to काका, रमेश पवार हे नाव by धन्या
टाईमिंग नक्की कशाला म्हणायचे
In reply to टाईमिंग by चैतन्य ईन्या
विनोदाचा दर्जा खालावला आहे ,
अशोक सराफ हा चांगला अभिनेता
अशोक सराफविषयी या
In reply to अशोक सराफ हा चांगला अभिनेता by श्रीगुरुजी
प्रतिसाद आवडले
In reply to अशोक सराफविषयी या by गवि
प्रतिसाद आवडला. पण अशोक
In reply to अशोक सराफविषयी या by गवि
पेठकर काकांना अनुमोदन
लक्ष्या ने सचिनच्या चार
In reply to पेठकर काकांना अनुमोदन by निनाद मुक्काम …