Skip to main content

केजरीवालांचे वाराणशीतील भाषण

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 25/03/2014 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते. मोदी कसे वाईट आहेत, मोदी आणि राहुल अंबानी-अदानींच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतील, नरेंद्र मोदींनी केवळ बड्या उद्योगपतींचा विकास केला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल ६०,००० लघुउद्योग बंद झाले, मोदींनी शेतक-यांच्या जमिनी हिसकावून अदानी आणि अंबानी यांना दिल्या, मोदी प्रत्येकवेळी मतदारांना धमक्या देऊन निवडून येतात ... मोदीनिंदा, मोदीनिंदा आणि मोदीनिंदा ... या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणात काहीच नव्हते. आपला पक्ष महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इ. कशी कमी करणार आहे, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा आपण कशी करणार आहोत, आपल्या पक्षाचे परराष्ट्र धोरण काय आहे, शेतकर्‍यांसाठी आपण काय करणार आहोत, आपल्याकडे विकासाच्या कोणत्या कल्पना आहेत या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी चकार शब्दही काढला नाही. नेहमीच्या पद्धतीनुसार नाटकीपणा केलाच. सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. नंतर भाषण सुरू असताना मध्येच ३-४ मिनिटे थांबले. कारण हे होते की कुठूनतरी मशिदीतली बांग ऐकू येत होती. बांग संपेपर्यंत थांबून आणि सकाळी गंगेत डुबक्या मारून आपली दिखाऊ धर्मनिरपेक्षता व लांगूलचालन दाखवून दिले. आजूबाजूला बरीच मुस्लिम वस्ती असलेले मैदान निवडण्यातही काँग्रेससारखीच चतुराई दिसली. १९८७-८९ या काळात वि.प्र.सिंग जशी नाटके करत असत तसेच केजरीवालांनीही आज केले. त्यांनी अंबानी बंधूंचे स्विस बँकेत खाते असून यामध्ये कोटीच्या-कोटी काळा पैसा असल्याचा आरोप केला व अंबानी बंधूंच्या स्विस बँकेतील खाते क्रमांकही जाहीर केले- खाते क्रमांक- ५०९०१६०९८३ आणि ५०९०१६०९८४. वि.प्र.सिंग यांनीही बोफोर्स प्रकरण जोरात असताना राजीव गांधींच्या स्विस बॅंक खात्याचे क्रमांक असेच जाहीर केले होते. त्याच धर्तीवर केजरीवालांनी तोच नाटकीपणा केला. परंतु २०१४ मधील मतदार १९८८ च्या तुलनेत जास्त शिक्षित आहे याची त्यांना कल्पना नसावी. एकंदरीत एक अत्यंत नकारात्मक भाषण व कमालीचा नाटकीपणा केजरीवालांनी आज वाराणशीत केला. --------------------------------------------------------------------------- केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.

वाचने 65460
प्रतिक्रिया 228

प्रतिक्रिया

माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी रेल्वे दुर्घटनेनंतर आपला राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे, लोकपाल विधेयक मंजूर होऊ न शकल्यानं मी मुख्यमंत्रीपद सोडलं, मी जबाबदारीपासून पळ काढलेला नाही, अशी भूमिका केजरींनी अलीकडेच एका व्हिडिओतून मांडली होती. त्यानंतर काल दिल्लीतील द्वारका इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी आपल्यावरचा पळपुटेपणाचा आरोप खोडून काढला. जनतेपुढे आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी थेट रामायणाचा आधार घेतला आणि स्वतःची तुलना श्रीरामाशीच केली. कैकयीनं सांगितलं म्हणून राम वनवासात गेला होता. पण त्याच्यावरही भाजपनं पळून गेल्याचीच टीका केली असती, असं उदाहरण त्यांनी दिलं. अर्थात, कुठल्या कैकयीमुळे त्यांना दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, हे काही त्यांनी स्पष्ट केलं नाही. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/arvind-kejriwal-rally-in-… http://maharashtratimes.indiatimes.com/nation/kejriwal-releases-audio-v…

In reply to by श्रीगुरुजी

अर्थात, कुठल्या कैकयीमुळे त्यांना दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, हे काही त्यांनी स्पष्ट केलं नाही.
सोनिया गांधी अथवा गेलाबाजार शिला दिक्षित, कोणीही... ;)

कैकेयी आणि मंथरा दोघींनी युती केली व रामचंद्राला वनवासाला पाठवले.. आता विघ्नसंतोषी मंथरा कोण ते सांगायला पाहीजे का?

In reply to by नानासाहेब नेफळे

बरोबर नान्या. कैकेयी आणि मंथरा म्हणजे म्हणजे सोनिया आणि शीला दिक्षित ;)

....आणि सांग नान्या तुला कसे कळलेरे 'कैकेयी आणि मंथरा' दोघींनी युती केली ते ??? तुझ्याकडे सल्लामसलत करायला येत होत्या वाटते ???

केजरी नी मोदिचे आव्हान स्विकारु का नको या साठी सभा घेतली..एक घटना लक्षात राहिली.. कुठेतरी नमाज चालु होता तेंव्हा केजरी ने भाषण थांबवले.. एकशंका...नमाज चालु असताना भाषण करायचे नसते का?

In reply to by अविनाशकुलकर्णी

अकु तुमच्या साठी हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.. बघा मनावर घ्या. अवांतर : जीवन भाऊ कुठे गायबले?

In reply to by अविनाशकुलकर्णी

त्यांच्यासाठी ते राष्ट्रगीत असावे. ;)

http://news.outlookindia.com/items.aspx?artid=835604 केजरीवालांना गर्दीत कोणीतरी गुद्दा मारला म्हणे. तो म्हणे भाजपचा सदस्य होता असे लगेच केजरीवाल म्हणाले. प्रत्यक्षात तो अब्दुल वाहीद नावाचा 'आप'चाच सदस्य होता. यावेळच्या निवडणुकीत केजरीवालांचे हे नवीनच प्रकार आहेत. आपल्याच पक्षाच्या सदस्यांना आपल्यावर शाई फेकण्यास सांगणे, आपल्याला चापट्या मारावयास सांगणे आणि हे सर्व भाजप करत आहे म्हणून गळा काढणे ही त्यांची नवीन नौटंकी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

"गुढग्याला बाशिंग" व त्याचे माकडचाळे ला पाहून असे वाटते की कोणी निंदा कोणी वंदा, मार खाऊन tv वर येणे हाच माझा धंदा! असे अजून किमान ५ वेळेला तरी होणार आहे, असे मला "गुढग्याला बाशिंग"च्या पूर्वानुभवावरून नक्कीच वाटते. परंतु सहाव्या वेळी मात्र सर्वांसमोर चड्डी उतरल्याशिवाय हा गप्प बसणार नाही.

गडकरींनी केजरीवालांविरूद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात अत्यंत बाणेदारपणे जामीनासाठी व्यक्तिगत बॉंड द्यायचे नाकारून तुरूंगवास पत्करणार्‍या २१ व्या शतकातील अवतारी महापुरूष केजरीवाल यांनी पुन्हा एकदा आपल्या पलायनवादी वृत्तीचा प्रत्यय दिला आहे. आज उच्च न्यायालयाने सुद्धा बाँडशिवाय जामीन द्यायचे नाकारल्यावर आपला बाणेदारपणा गुंडाळून ठेवून बाँड लिहून दिला व जामीन मिळवून तिहारमधून पलायन केले. यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून त्यांनी असेच पलायन केले होते. त्यांच्या या नौटंकीमुळे आणि "आप"मतलबी धोरणांमुळे वैतागून अनेकजण "आप" सोडत आहेत. काही दिवसांनी "आप"मध्ये "आप"ण एकटेच आहोत हे त्यांच्या लक्षात येईल.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी सतत केजरीवालांना टारगेट करत आहेत, याचा अर्थ भविष्यात केजरीचे खासदार मोदीला घाम फोडणार.

In reply to by श्रीगुरुजी

सोडून द्या हो गुरुजी. तो केजरी वायझेड आहे. लोकांनी आधीच त्याला लाथाडला आहे मतपेटीतून. सोडून द्या. असे बालीश चाळे तो करतच राहणार.

>>> श्रीगुरुजी सतत केजरीवालांना टारगेट करत आहेत, याचा अर्थ भविष्यात केजरीचे खासदार मोदीला घाम फोडणार. तू असाच भ्रमात रहा रे माईसाहेब!