✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

केजरीवालांचे वाराणशीतील भाषण

श
श्रीगुरुजी यांनी
Tue, 03/25/2014 - 20:49  ·  लेख
लेख
केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते. मोदी कसे वाईट आहेत, मोदी आणि राहुल अंबानी-अदानींच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतील, नरेंद्र मोदींनी केवळ बड्या उद्योगपतींचा विकास केला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल ६०,००० लघुउद्योग बंद झाले, मोदींनी शेतक-यांच्या जमिनी हिसकावून अदानी आणि अंबानी यांना दिल्या, मोदी प्रत्येकवेळी मतदारांना धमक्या देऊन निवडून येतात ... मोदीनिंदा, मोदीनिंदा आणि मोदीनिंदा ... या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणात काहीच नव्हते. आपला पक्ष महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इ. कशी कमी करणार आहे, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा आपण कशी करणार आहोत, आपल्या पक्षाचे परराष्ट्र धोरण काय आहे, शेतकर्‍यांसाठी आपण काय करणार आहोत, आपल्याकडे विकासाच्या कोणत्या कल्पना आहेत या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी चकार शब्दही काढला नाही. नेहमीच्या पद्धतीनुसार नाटकीपणा केलाच. सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. नंतर भाषण सुरू असताना मध्येच ३-४ मिनिटे थांबले. कारण हे होते की कुठूनतरी मशिदीतली बांग ऐकू येत होती. बांग संपेपर्यंत थांबून आणि सकाळी गंगेत डुबक्या मारून आपली दिखाऊ धर्मनिरपेक्षता व लांगूलचालन दाखवून दिले. आजूबाजूला बरीच मुस्लिम वस्ती असलेले मैदान निवडण्यातही काँग्रेससारखीच चतुराई दिसली. १९८७-८९ या काळात वि.प्र.सिंग जशी नाटके करत असत तसेच केजरीवालांनीही आज केले. त्यांनी अंबानी बंधूंचे स्विस बँकेत खाते असून यामध्ये कोटीच्या-कोटी काळा पैसा असल्याचा आरोप केला व अंबानी बंधूंच्या स्विस बँकेतील खाते क्रमांकही जाहीर केले- खाते क्रमांक- ५०९०१६०९८३ आणि ५०९०१६०९८४. वि.प्र.सिंग यांनीही बोफोर्स प्रकरण जोरात असताना राजीव गांधींच्या स्विस बॅंक खात्याचे क्रमांक असेच जाहीर केले होते. त्याच धर्तीवर केजरीवालांनी तोच नाटकीपणा केला. परंतु २०१४ मधील मतदार १९८८ च्या तुलनेत जास्त शिक्षित आहे याची त्यांना कल्पना नसावी. एकंदरीत एक अत्यंत नकारात्मक भाषण व कमालीचा नाटकीपणा केजरीवालांनी आज वाराणशीत केला. --------------------------------------------------------------------------- केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
65242 वाचन

💬 प्रतिसाद (228)

प्रतिक्रिया

गुर्जी......

वेताळ
Mon, 03/31/2014 - 12:52 नवीन
संजयजी हे खेचरवाल सर व आमिरखानचे शो पहातात. खेचरवाल हे स्वःता भारतिय घटना व न्यायालये ह्या पेक्षा उच्च आहेत्.त्यामुळे ते देतील ते पुरावे हे सत्यवचन असतात हे तुम्ही मान्य केलेच पाहिजे.आमिरखान त्याच्या प्रचंड कामाच्या व्यापातुन वेळ काढुन नाममात्र मानधनातुन भारतिय समाजाला सत्याचे होलसेल डोस पाजत असतात.त्यामुळे संजयजी जे दाखवतील ते सत्यवचन समजा.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद वाचून करमणूक झाली

बॅटमॅन
Mon, 03/31/2014 - 13:12 नवीन
प्रतिसाद वाचून करमणूक झाली आणि अंमळ खेदही वाटला. मॅगसेसेच्या वेबसायटीवरच्या बायोग्राफीला निकालात काढलेले पाहून आश्चर्य वाटले. केजरीवालच्या नावावर ९ गुन्हे दाखल असतील तर बाकीच्यांचं बघा की ओ. मशिदी फोडणे, दंगे करणे, भैया लोकांना पळवून लावणे, आझाद मैदानात दंगे करून अमर जवानच्या स्मारकास इजा पोचवणे, इ.इ. नी अराजक येत नै, मात्र चार निदर्शने काय केली तर मात्र अराजक येते. मज्जाच आहे सगळी! राहुल गांधीपेक्षा मोदी कधीही १०० पटीने बरे पण याचा अर्थ असा नव्हे की सगळे तिथे आलबेल आहे. असो.
  • Log in or register to post comments

बॅटमॅनराव..

चिगो
Mon, 03/31/2014 - 14:22 नवीन
राहुल गांधीपेक्षा मोदी कधीही १०० पटीने बरे
बॅटमॅनराव, आमच्या राहुलबाबांना मध्ये घ्यायची गरज नाही. वयस्कांच्या कोर्टात "जुव्हेनाईल"ला कशाला ओढताय? ;-) त्यांना वेगळे नियम लागू आहेत.. (कधी एकदा इलेक्शन संपते, असं झालेला) चिगो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अर्रर्रर्रर्र.....

बॅटमॅन
Mon, 03/31/2014 - 14:27 नवीन
ऊप्स...आयमाय स्वारी बरंका चिगो सर!
(कधी एकदा इलेक्शन संपते, असं झालेला)
(खच्चून सहमत असलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

चिगो सर, तुम्हाला आता 'आचार

हाडक्या
Mon, 03/31/2014 - 15:58 नवीन
चिगो सर, तुम्हाला आता 'आचार-संहिता लागू' असेल ना.. ? ;) (बादवे, निवडणूक काळातील तुमचे प्रशासकिय कामकाज, जबाबदार्‍या, प्रशासनाची भुमिका आणि त्यासंदर्भातले तुमचे अनुभव वाचायला आवडतील.!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

लगे रहो!

पैसा
Mon, 03/31/2014 - 14:34 नवीन
लै भारी चर्चा! एका हिब्रू आणि एका तामिळी माणसाचा संवाद बघतोय असं वाटलं!
  • Log in or register to post comments

२००

बॅटमॅन
Mon, 03/31/2014 - 14:38 नवीन
एका हिब्रू आणि एका तामिळी माणसाचा संवाद बघतोय असं वाटलं!
संवाद हिब्रू आणि तमिळ माणसाचा काय किंवा माकड व बोकडाचा काय, बघण्यात कै तादृश फरक नै. ऐकण्यात मात्र आहे ;) द्विशतकाबद्दल हबिणंदण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अवांतर पण महत्वाचे

वामन देशमुख
Tue, 04/01/2014 - 09:59 नवीन
एखाद्या धाग्यात १० नवीन प्रतिसाद असतील. प्रतिसादांच्या पहिल्या पानावर २ आणि पुढच्या पानावर उरलेले ८ असतील, तर हे दोन नवे प्रतिसाद कोणते ते कळतं, पण दुस-या पानावर गेल्यावर प्रतिक्रियांना लावलेलं 'नवीन' हे लेबल निघून जातं. मग नवीन प्रतिक्रिया नेमक्या कोणत्या ते शोधत बसावं लागतं. (चोप्य पस्ते केलेले) (इतर अनेक धाग्यांप्रमाणेच) या धाग्यावर हा त्रास फारच होतो आहे. 'मिसळपाव'ने हा दोष दूर करावा ही त्रागावजा विनंती/ हा विनंतीवजा त्रागा!
  • Log in or register to post comments

याला काही उपाय सध्या तरी नाही

पैसा
Tue, 04/01/2014 - 10:07 नवीन
दुसर्‍या पेजवर गेल्यावर Ctrl + F वापरा. आणि सर्च बॉक्समधे आजची तारीख टाका. म्हणजे आजच्या प्रतिक्रिया हायलाईट होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

धन्यवाद, पैसा.

वामन देशमुख
Tue, 04/01/2014 - 17:00 नवीन
धन्यवाद, पैसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एक लाख अब्ज खर्व परार्ध

नानासाहेब नेफळे
Tue, 04/01/2014 - 10:33 नवीन
एक लाख अब्ज खर्व परार्ध अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

नाने खेचरवाल दिनाच्या

वेताळ
Tue, 04/01/2014 - 13:42 नवीन
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा......
  • Log in or register to post comments

केजरीवाल - लालबहादूर शास्त्री की प्रभू श्रीराम?

श्रीगुरुजी
Tue, 04/01/2014 - 20:42 नवीन
माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी रेल्वे दुर्घटनेनंतर आपला राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे, लोकपाल विधेयक मंजूर होऊ न शकल्यानं मी मुख्यमंत्रीपद सोडलं, मी जबाबदारीपासून पळ काढलेला नाही, अशी भूमिका केजरींनी अलीकडेच एका व्हिडिओतून मांडली होती. त्यानंतर काल दिल्लीतील द्वारका इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी आपल्यावरचा पळपुटेपणाचा आरोप खोडून काढला. जनतेपुढे आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी थेट रामायणाचा आधार घेतला आणि स्वतःची तुलना श्रीरामाशीच केली. कैकयीनं सांगितलं म्हणून राम वनवासात गेला होता. पण त्याच्यावरही भाजपनं पळून गेल्याचीच टीका केली असती, असं उदाहरण त्यांनी दिलं. अर्थात, कुठल्या कैकयीमुळे त्यांना दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, हे काही त्यांनी स्पष्ट केलं नाही. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/arvind-kejriwal-rally-in-delhi/articleshow/33069164.cms http://maharashtratimes.indiatimes.com/nation/kejriwal-releases-audio-video-messages-to-clarify-why-he-resigned/articleshow/32954219.cms
  • Log in or register to post comments

अर्थात, कुठल्या कैकयीमुळे

शिद
Tue, 04/01/2014 - 20:47 नवीन
अर्थात, कुठल्या कैकयीमुळे त्यांना दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, हे काही त्यांनी स्पष्ट केलं नाही.
सोनिया गांधी अथवा गेलाबाजार शिला दिक्षित, कोणीही... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कैकेयी आणि मंथरा दोघींनी युती

नानासाहेब नेफळे
Tue, 04/01/2014 - 20:51 नवीन
कैकेयी आणि मंथरा दोघींनी युती केली व रामचंद्राला वनवासाला पाठवले.. आता विघ्नसंतोषी मंथरा कोण ते सांगायला पाहीजे का?
  • Log in or register to post comments

बरोबर नान्या. कैकेयी आणि

मंदार दिलीप जोशी
Wed, 04/02/2014 - 10:01 नवीन
बरोबर नान्या. कैकेयी आणि मंथरा म्हणजे म्हणजे सोनिया आणि शीला दिक्षित ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

...हा कसला रामचन्द्र...????

विनोद१८
Tue, 04/01/2014 - 22:51 नवीन
....आणि सांग नान्या तुला कसे कळलेरे 'कैकेयी आणि मंथरा' दोघींनी युती केली ते ??? तुझ्याकडे सल्लामसलत करायला येत होत्या वाटते ???
  • Log in or register to post comments

नान्याला आतल्या गोट्यातल्या

वेताळ
Wed, 04/02/2014 - 09:51 नवीन
सगळ्या बातम्या माहित असतात.
  • Log in or register to post comments

केजरी नी मोदिचे आव्हान

अविनाशकुलकर्णी
Wed, 04/02/2014 - 21:20 नवीन
केजरी नी मोदिचे आव्हान स्विकारु का नको या साठी सभा घेतली..एक घटना लक्षात राहिली.. कुठेतरी नमाज चालु होता तेंव्हा केजरी ने भाषण थांबवले.. एकशंका...नमाज चालु असताना भाषण करायचे नसते का?
  • Log in or register to post comments

अकु तुमच्या साठी हा स्वतंत्र

शिद
Wed, 04/02/2014 - 22:44 नवीन
अकु तुमच्या साठी हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.. बघा मनावर घ्या. अवांतर : जीवन भाऊ कुठे गायबले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

त्यांच्यासाठी ते राष्ट्रगीत

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 04/03/2014 - 10:54 नवीन
त्यांच्यासाठी ते राष्ट्रगीत असावे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

http://news.outlookindia.com

श्रीगुरुजी
Sat, 04/05/2014 - 13:08 नवीन
http://news.outlookindia.com/items.aspx?artid=835604 केजरीवालांना गर्दीत कोणीतरी गुद्दा मारला म्हणे. तो म्हणे भाजपचा सदस्य होता असे लगेच केजरीवाल म्हणाले. प्रत्यक्षात तो अब्दुल वाहीद नावाचा 'आप'चाच सदस्य होता. यावेळच्या निवडणुकीत केजरीवालांचे हे नवीनच प्रकार आहेत. आपल्याच पक्षाच्या सदस्यांना आपल्यावर शाई फेकण्यास सांगणे, आपल्याला चापट्या मारावयास सांगणे आणि हे सर्व भाजप करत आहे म्हणून गळा काढणे ही त्यांची नवीन नौटंकी आहे.
  • Log in or register to post comments

कोणी निंदा कोणी वंदा, मार खाऊन tv वर येणे हाच माझा धंदा!

आयुर्हित
Sat, 04/05/2014 - 14:00 नवीन
"गुढग्याला बाशिंग" व त्याचे माकडचाळे ला पाहून असे वाटते की कोणी निंदा कोणी वंदा, मार खाऊन tv वर येणे हाच माझा धंदा! असे अजून किमान ५ वेळेला तरी होणार आहे, असे मला "गुढग्याला बाशिंग"च्या पूर्वानुभवावरून नक्कीच वाटते. परंतु सहाव्या वेळी मात्र सर्वांसमोर चड्डी उतरल्याशिवाय हा गप्प बसणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गडकरींनी केजरीवालांविरूद्ध

श्रीगुरुजी
Tue, 05/27/2014 - 20:47 नवीन
गडकरींनी केजरीवालांविरूद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात अत्यंत बाणेदारपणे जामीनासाठी व्यक्तिगत बॉंड द्यायचे नाकारून तुरूंगवास पत्करणार्‍या २१ व्या शतकातील अवतारी महापुरूष केजरीवाल यांनी पुन्हा एकदा आपल्या पलायनवादी वृत्तीचा प्रत्यय दिला आहे. आज उच्च न्यायालयाने सुद्धा बाँडशिवाय जामीन द्यायचे नाकारल्यावर आपला बाणेदारपणा गुंडाळून ठेवून बाँड लिहून दिला व जामीन मिळवून तिहारमधून पलायन केले. यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून त्यांनी असेच पलायन केले होते. त्यांच्या या नौटंकीमुळे आणि "आप"मतलबी धोरणांमुळे वैतागून अनेकजण "आप" सोडत आहेत. काही दिवसांनी "आप"मध्ये "आप"ण एकटेच आहोत हे त्यांच्या लक्षात येईल.
  • Log in or register to post comments

श्रीगुरुजी सतत केजरीवालांना

नानासाहेब नेफळे
Tue, 05/27/2014 - 20:53 नवीन
श्रीगुरुजी सतत केजरीवालांना टारगेट करत आहेत, याचा अर्थ भविष्यात केजरीचे खासदार मोदीला घाम फोडणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सोडून द्या हो गुरुजी. तो

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 05/29/2014 - 14:08 नवीन
सोडून द्या हो गुरुजी. तो केजरी वायझेड आहे. लोकांनी आधीच त्याला लाथाडला आहे मतपेटीतून. सोडून द्या. असे बालीश चाळे तो करतच राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> श्रीगुरुजी सतत

श्रीगुरुजी
Tue, 05/27/2014 - 20:59 नवीन
>>> श्रीगुरुजी सतत केजरीवालांना टारगेट करत आहेत, याचा अर्थ भविष्यात केजरीचे खासदार मोदीला घाम फोडणार. तू असाच भ्रमात रहा रे माईसाहेब!
  • Log in or register to post comments

to grab media attention.

lakhu risbud
गुरुवार, 05/29/2014 - 23:30 नवीन
Kejriwal has few more options to grab media attention. 1.To participate in Zalak Dikhala ja. 2.To participate in Big Boss forecoming season.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा