मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तीन शहाणे

विवेकपटाईत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तीन शहाणे अतिशहाणे हातवारे करीत होते उगवत्या दिवसाला रात्र ठरवीत होते. ऊन तेजस्वी सहन न झाले बंद खोलीत ते जाऊनी बैसले. अंधारात बत्ती तयांची पेटली युरेका युरेका तिघे ओरडले. ज्या अर्थी अंधार इथे दिवस नाही रात्र असे. आपले तर्क ठरले खरे आनंदी शहाणे नाचले.
टीप : कॉकटेल लाउंज मध्ये, मिसळपाव सोबत, सोमरस प्रश्न केल्याने डोक्याची बत्ती जळेल, कवितेचा उलगडा होईल.

वाचने 2289 वाचनखूण प्रतिक्रिया 11

मुक्त विहारि गुरुवार, 05/22/2014 - 09:59
आजकाल नाना प्रकारचे गहनविचार करणे सोडून दिले आहे. त्यामुळे किंचीत विचार करायला, एक छोटासा, पक्षी-प्राणी-मासे आणि तीर्थ कट्टा करू या.

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/22/2014 - 11:10
प्रेषक, विडंबन सराईत, Thu, 22/05/2014 - 11:40 तीन काव्यकिडे अतिशहाणे कविता करीत होते बोलत्या संस्थळाला पेढे भरवीत होते. प्रतिसाद तेजस्वी सह न झाले आपुल्याच-खोलीत ते जाऊनी बैसले. वि'जनात बत्ती तयांची पेटली सुरेखा सुरेखा तिघे ओरडले. ज्या अर्थी जिलबी मिळते मठ्ठ्यास'ही, पात्र असे. आपण आपल्यात असलेले बरे आनंदी अतिशहाणे नाचले. टीप : कॉकटेल लाउन----मधे,उसळपाव सोबत,आत्मगंडरस प्राशन केल्याने डोक्याची बत्ती (असलीच तर..)जळेल,आणि ताकाचा मठ्ठा-होइल! :p काव्यरस: बोट का लाविता? ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड गुरुवार, 05/22/2014 - 15:14
'पाटंच्या पारामंदी, माझा कोंबडा घाली साद' या जात्यावरच्या ओवीच्या चालीवर परफेक्ट बसलंय. *mosking*