गमभन.ऑर्ग - ऐकू आनंदे
नमस्कार!
लोकांना पैसे खर्च न करता युनिकोड मध्ये टाईप करता यायलाच हवे ह्या निकषावर मी गमभन चकटफु केले त्याला आता जवळपास नऊ वर्षं होत आली. आज हॅन्डहेल्ड डिव्हाइसेस आलेली असताना - गमभन चे तंत्र कालबाह्य होईल हे नक्की आहे. Physical किबोर्ड नसल्याने त्याला येणार्या मर्यादाच नाहीत त्यामुळे हे बदल स्वाभाविक आहेत. पण ह्या सर्वाचा विचार करता एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे मोबाईल किंवा तत्सम डिव्हाइसेसच्या लहान स्क्रीन आणि सारखे scroll करावे लागताना होणारा त्रास. ह्या नादात वाचनावरही (आणि बर्याच प्रमाणात लिखाणावरही) ह्या आकाराच्या मर्यादा पडतात असे वाटलिखाणावरही)च लेखन श्राव्य माध्यमातही नेण्याचे मनात आले आणि त्यासाठी गमभन.ऑर्ग हा प्रकल्य हाती घेतला.
त्याचा पहिला टप्पा म्हणून gamabhana.org इथे ऑनलाईन मराठी लेखकांचे/लेखिकांची निवडक लेख श्राव्य माध्यमात आणण्याचे प्रयत्न सुरू करतो आहोत. ह्यावेळी माझ्यासोबत माझा समविचारी मित्र प्रसन्न हाही आहे. ह्या प्रकल्पाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे
१) ब्लॉग, फेसबुक आणि विविध मराठी संस्थळांवर लेखन करणार्या सर्वांसाठी हे व्यासपीठ खुले आहे.
२) ज्यांना आपल्या लेखाचे Recording करावयाची इच्छा असेल त्यांनी submit @ gamabhana . org यावर इमेल पाठवून लेख, त्याचा संदर्भ/दुवा, पूर्वप्रसिद्धीचे संदर्भ/दुवे , संपर्क क्र. पाठवावे.
३) Recording not only includes vocal performance but also background scores and special sound effects supporting the content.
४) ज्यांना स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रण करायचे आहे त्यांनी साधारण ३० सेकंदांचे ध्वनिमुद्रण चाचणीकरता इमेल सोबत पाठवावे. पत्ता, वेळ त्यानंतर ठरवले जाईल.
५) लेखाचे स्वमित्त्व हक्क लेखक/लेखिकेचेच असतील. ध्वनिमुद्रणात तसा उल्लेख येईल. परंतु ध्वनिमुद्रितांचे अधिकार गमभन.ऑर्ग कडे राहतील. ( Terms of services would be revised and updated by end of May 2014)
६) हा सर्व प्रपंच चकटफु आहे!
*टीपः लेखक/लेखिकेस स्वतःच्या आवाजात मुद्रण करायचे असल्यास मुंबई/पुणे येथे येण्या जाण्याचा स्वतःचा खर्च आणि तीन माणसांकरता एकवेळ जेवणाचा डबा (स्वत: लेखक/लेखिका, मी आणि प्रसन्न) हा खर्च मात्र करावा लगेल Smile
का?
कारण १: श्राव्य माध्यमात आंतरजालावरचे मराठी साहित्य आले पाहिजे असे एक ठाम कारण आहे. आजघडीला मोबाईलवरून हे साहित्य वाचण्याऐवजी ऐकणे अधिक सोपे , जलद आहे. श्राव्य स्वरूपात वाचना पेक्षा अधिक प्रयोगशीलता आणि सर्जनतेला वाव आहे.
(कारण २: मला आणि माझ्या मित्राला हे करायची आवड, हौस आणि वेळ आहे. )
चकटफु?
गमभन लेखन सुविधा देतानाही लोकांनी हा प्रश्न विचारला होता - फुकट का आणि कसे? Studio Recording with background scores चा खर्च जमेस धरल्यास एखादा ५ मिनिटांचा लेख ध्वनिमुद्रित करणेही बरीच खर्चिक बाब ठरेल. मन असे असताना आम्ही हे चकटफु कसे देऊ शकतो हा प्रश्न पडणे सहाजिक आहे. कारण वरती नमूद केले आहेच. एखाद्या लेखकाला अथवा लेखिकेला हा खर्च करावा लागू नये म्हणून आम्ही ही सोय मोफत देत आहोत. मोफत कसे जमते - ह्याचे उत्तर सवडीने देऊ!
काय काय वगळले जाईलः
ज्या लेखक/लेखिकांचे प्रताधिकार प्रकाशक अथवा इतर कोणाकडे असतील त्यांचे साहित्य, स्वतःचे लेखन आहे असे सप्रमाण न दाखवता आलेले लेखन, सुमार साहित्य, २ मि. पेक्षा कमी अथवा ५ मि. पेक्षा जास्ती वेळ लागेल असे साहित्य, अ-मराठी सहित्य. प्रस्थापित लेखकांच्या साहित्याचे प्रताधिकार प्रकाशन संस्था अथवा त्यांच्या स्वत:कडे किंवा पुढच्या पीढीकडे असल्याने - हे लेखन ध्वनिमुद्रिक करून मोफत उपलब्ध करून देणे शक्य नाही.
प्रकल्पाविषयी:
हा प्रकल्प नुकताच सुरू झाला आहे. त्यामुळे स्थळ, काळ यांचा जम बसवतच Recording Sessions होतील. We do not work with deadlines, we enjoy doing it so we take our own time. सारी मुद्रणे gamabhana.org वर चकटफु उपलब्ध असतील. त्या त्या साहित्यिकाला ध्वनिमुद्रण प्रकाशित करण्यापूर्वी ऐकता येईल. MP3, OGG ध्वनिमुद्रिते डाऊनलोडकरता आणि/अथवा ऐकण्याकरता ठेवली जातील. आपल्या संदर्भासाठी दोन लेखांचे वाचन गमभन.ऑर्ग वर आपल्याला सद्ध्या ऐकता येईल.
अधिक माहितीसाठी info @ gamabhana . org वर संपर्क करावा.
प्रतिक्रिया
रोचक..!
प्रशंसनिय प्रकल्प ! हार्दीक
शुभेच्छा!!!
मस्त प्रकल्प....
प्रकल्पाला शुभेच्छा!
शुभेच्छा!
खुप छान . . .
शुभेच्छा!!!
छान उपक्रम.
इंटरेस्टींग आणि स्तुत्य ..
ध्वनिमुद्रितांचे अधिकार गमभन
होय आणि नाही
प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा.
मस्तच!
स्टुडिओ
ॐकार सेठ उपक्रमाला शुभेच्छा.
उत्तम
धन्यवाद आणि शुभेच्छा
तयार
'मनकर्णिका' या नावाने...
शुभेच्छा
(No subject)
छान उपक्रम.
एक सुचवू का?
शुभेच्छा
ह्या अलौकिक प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद अन शुभेच्छा!
आदुबाळ यांनि सुचवलेले