आम्हाला सदर कार्यक्रमाच्या जाहिरातीचा मसुदा लिहिण्यास मदत करावी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ऐका हो ऐका, आमच्या गावी ओसाडवाडीच्या माळरानावर, हर ५ सालाबाद परमाने जत्रेमध्ये, यापावतो दस्तूर खुद्द जादुगार न. म. सरकार यांचे जादूचे शो १६ मे पासून, लागणार हाये हो, जादुगार हे मुळचे रा. मु. पो. ढेबेवाडीचे असून, त्यांचा टुरिंग शिनेमाचा ह. मु. ओसाडवाडीच्या नदीकाठ येथे आहे. ढेबेवाडी येथे पयीले तेंचे सापाचे शो लय गाजले, सुरवातीला पुंगी वाजवून खेळ केला असता, याकायक सापांनी, आजूबाजूच्या जनतेला डसले, तरी, जरी पुंगी आपल्या हाती होती तरी सापावर आपला काय बी इलाज चालला नाही असे त्यांनी गावाच्या चावडीवर बयान दर्ज केले, तरी झाल्या प्रकाराबद्दल तेनला अतीव दुख झाल्याचे सांगोन तेनी नंतर नजरबंदीचे खेळ चालू केले, तेन्च्यातल्या कलेचा फायदा ओसाडवाडीच्या जनतेच्या मनोरंजनासाठी व्हावा म्हणोन फक्त गावचे किराणामाल दुकानदार मुकेससेठ यांनी तेनला, गावच्या वरच्या अंगाच्या नदीपलीकडील हरिभाऊ कुंभार यांची छडी तेनला दिली, ती छडी हवेत फिरून न. म. सरकार आता अनेक जादू करून दाखीवनार हायेत. वानगीदाखल सांगायच तर गावाच्या उगवत्या दिशेला मोठ्ठ जंगल हाय, तेच्यातली चापट्या नाकाची वानरांनी, गावच्या बागेत धुमाकूळ घातलेला हाय, हवेत छडी फिरवण वानरे अद्रुश करणर हाये, तरी तेनला शो साठी कमीतकमी २७२ रु ची गरज हाये, जेवढे जास्त रु गोळा होणार तेचेवर कोणती आणि किती जादू दाखवायची हाये हे ठरणार हाये. तेंनी तर आताच पाटी पण रंगवायला घेतली आहे , ती अशी We can not create Change for You, Change has to be brought by You. अर्थात, कृपया सुट्टे पैसे आणावे.
तरी चू भू दे घे, आम्हाला सदर कार्यक्रमाच्या जाहिरातीचा मसुदा लिहिण्यास मदत करावी.
प्रतिक्रिया
मी पहिला
विचारु का नको ?
जे पी खाती बदलु नका हो!
माला तर वाटतया
फशीवल तर फशीवुदे
अर्थात सुट्टे पैसे आणावे!
विकांताचा मेनु पक्का
हीहीही!
मस्त!
लिहीलयं मात्र भारी!!
हवान तुमास्नी जदुगर
साबरमतीके संत तुने कर दिया कमाल !
धमाल