Skip to main content

रोज गार्डन - चंदिगड

लेखक मिंटी यांनी सोमवार, 13/10/2008 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर २००७ ला चंदिगड बघण्याचा योग आला होता...चंदिगड म्हणजे अतिशय सुरेख आणि व्यवस्थित बांधण्यात आलेलं आहे वगैरे ऐकुन होते पण जे ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे चंदिगड....अतिशय व्यवस्थित बांधकाम, स्वच्छ रस्ते आणि शिस्त.. चंदिगड मधे बघण्यासारख्या खुप गोष्टी आहेत.त्यातलंच विशेष म्हणजे तिथलं रोज गार्डन.चंदिगडच्या रोज गार्डनमधे तब्बल १६०० प्रकारचे गुलाब बघायला मिळतात.अनेक रंगी गुलाबाची फुलं मनाला प्रसन्नता देतात.त्यातल्याच काही प्रकारांच्या फुलांचे फोटो इथे टाकत आहे.उर्वरीत गुलाबांचे आणि चंदिगडच्या प्रसिध्द रॉक गार्डनचे फोटो नंतर टाकेन... :) खाली टाकलेल्या गुलाबांची नावं माहित नसल्यानी दिलेली नाहीत..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9505
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

सही फोटोज !! १,२,३,४ ह्या क्रमाने आवडली गुलाबाची फुले !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मिंटी, गुलाबांचे फोटो पाहुन मन प्रसन्न झाले. :) पहिला आणि पाचवा गुलाब तर केवळ अप्रतिम दिसत आहे. :)

वाह खुप छान आलेत गं हे फोटो. २, ५ आणि ६ तर विशेष आवडले. नीलकांत

सर्व फोटो मस्त. पाहून मन प्रसन्न झाले. (प्रसन्न)बेसनलाडू

वाह! क्या बात है! अतिशय सुंदर फोटो आहेत. गेल्यवर्षी चंदिगडला गेले होते.पण त्यावेळेस सीझन नसल्यामुळे रोझ गार्डनमधिल गुलाब पाहण्याची संधी हुकली.पण तुम्ही दिलेले फोटो पाहून पुन्हा कधी एकदा तिथे जाते असे झाले आहे. रॉक गार्डन मी पाहिले आहे.तिथे सुध्दा खूप छान कलाकारी बघायला मिळाली.लवकर येऊ द्यात "रॉक गार्डन"चे फोटो.

मिन्टे.... खुप सुन्दर गं.... मन प्रफुल्लित झालं...... मला पिन्क रोझेस' जास्त आवडले..................... व्हेरी क्यूट.!!! :)

नं. १ आणी २ तर विशेष खास आहेत. रंगात अगदि विरघळुन गेल्यासारख झालं... असो..चंडिगढ मधे राजमा-राईस खाल्ला कि नाहि? त्याचीहि मजा काहि औरच आहे...

तो गुलाबी केशरी रंगछटा असलेला गुलाब तर निव्वळ अप्रतिमच... :) ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.