Skip to main content

एक कविता

लेखक रामदास यांनी शनिवार, 11/10/2008 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
येणार आज म्हणूनी, डंका पिटून गेले ते मेघ पावसाळी चोरून अंग गेले. चकवे दहा दिशांचे उसने हसून गेले वेळूत रानवारे फुंकून दंभ गेले. दिनरात वंचनेचे पेले भरून प्याले हिरवे पडाव त्यांचे करपून खाक झाले. कमळात सावल्यांच्या अडकून भृंग झाले कित्येक रामदासी कुळवंत रंक झाले.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4522
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

समर्थ रामदास! ! !

वा! चारही शेर भावले! सुरेख! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

येणार आज म्हणूनी, डंका पिटून गेले ते मेघ पावसाळी चोरून अंग गेले. - हि पहिली ओळ तर फारच सुं द र

सु रे ख !!!

कविता .. चकवे दहा दिशांचे उसने हसून गेले वेळूत रानवारे फुंकून दंभ गेले. -----हे खासच

कविता आवडली . पहिल्या दोन ओळी तर अप्रतिम !!! सहमत. मीनल.

व्वा. सुरेख... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

व्वा. सुरेख... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

येणार आज म्हणूनी, डंका पिटून गेले ते मेघ पावसाळी चोरून अंग गेले. ह्या ओळी तर क्लासच आहेत....! तात्या.