साजण / काही चोरोळ्या
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन ' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्थिनुसार काही 'साजण' चोरोळ्या (कोडे स्वरूपातल्या)
(१)
लपत छपत तो बिछान्यात येतो
गोड गोड गाणी कानात म्हणतो
कधी चुंबितो कधी चावतो
सारी रात्र मला तो छळतो
का सखी साजण?
ना सखी डास.
(२)
कधी काळी येतो
गोड गोड बोलतो
खोटी वचने देऊनी
सर्वस्व लुबाडीतो
का सखी साजण?
ना सखी नेता.
(३)
कधी येते, कधी जाते
सारी रात्र मला ती छळते.
तिच्या विना न चैन मिळे
तिच्या साठी आसुसले डोळे.
का सखा साजणी ?
ना सखा वीज
प्रतिक्रिया
हाहा!
चारोळ्या आवडल्या.
चारोळी पुन्हा वाचा,
ओके
हा हा !
झकास
मस्त!
>>कधी येते, कधी जाते
झकास.
मस्तच!