Skip to main content

साजण / काही चोरोळ्या

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 03/05/2014 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन ' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्थिनुसार काही 'साजण' चोरोळ्या (कोडे स्वरूपातल्या) (१) लपत छपत तो बिछान्यात येतो गोड गोड गाणी कानात म्हणतो कधी चुंबितो कधी चावतो सारी रात्र मला तो छळतो का सखी साजण? ना सखी डास. (२) कधी काळी येतो गोड गोड बोलतो खोटी वचने देऊनी सर्वस्व लुबाडीतो का सखी साजण? ना सखी नेता. (३) कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2425
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

चारोळ्या आवडल्या. मात्र तिसर्‍या चारोळीतला साजण लेस्बीयन आहे का ? नाही "वीज" मराठीत स्त्रीलींगी असते म्हणून विचारले. :)

In reply to by धर्मराजमुटके

चारोळी पुन्हा वाचा, कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज मला वाटते उत्तर मिळाले असेल.

गमतीदार चारोळ्या !

>>कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज मराठीत मित्रमंडळी इतक्या विनम्रतेने प्रश्न विचारत नाहीत. ह्या कोड्याचं उत्तर 'झोप' आहे असं समजून एखादा मित्र उत्तर देईल: "कशी झोप यील, रातच्याला वषाट कमी खात जा भा*"

झकास चारोळ्या. सूड यांची कॉमेंटही आवडली. झकास !

मस्तच! 'चोरोळ्या' आवडल्या. (चारोळ्या हवं होतं का?)