शुक्रवारची रम्य संध्याकाळ! हवेत बेताची थंडी!! पुढे आख्खा वीकांत मोकळा पडलेला.....
कामावरची अखेरची पाटी टाकून मी घरी येतो....
घरच्या वाटेवर ड्रायव्हिंग करत असतांनाही मस्त मराठी गाणी गुणगुणतो, "संथ वाह्ते, कृष्णामाई..." क्या बात है!!
नाहीतर एरवी मला कट करणार्या इतर ड्रायव्हर्सवर भकाराने सुरू होणार्या सशक्त मराठी शब्दांची बौछार चालू असते. (खरं सांगायला लाज कसली, तिच्यायला!!)
घरी येऊन झकास आंघोळ करून ताजातवाना झालो.....
किचनमधून मस्त वास येतोय, जरा तिथे डोकावलो....
"काय चाललंय?"
"पॅटिस करतेय खिम्याचे!" माझी पहिली बायको सांगते....
तिला तिच्या कार्यात सुयश चिंतून मी माझ्या अभ्यासिकेत आलो. मिनी-फ्रीज उघडला....
"किण्ण, किण्ण!" काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे पडले. त्यावर बेताची शिवास रीगल...
माझ्या त्या दुसर्या बायकोचे चुंबन घेत मी कालच लायब्ररीतून आणलेली कादंबरी उघडली.....
असा किती वेळ गेला कोण जाणे...
मी कादंबरीच्या कथानकात पूर्ण बुडालेला!!! दुसर्या बायकोच्या चुंबनांचाही दुसरा अध्याय चाललेला!!!
घरात दूर कुठेतरी फोन वाजला....
मी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं. कोण बाजीराव असेल तर ठेवेल मेसेज.....
ही एक जाणिवपूर्वक लावून घेतलेली सवय!
माझ्या मुलगा रांगण्याच्या वयाचा असतानाची!!
इथे तो डायपरमध्ये शीशी करून घरभर रांगतोय! ह्याला आता लगेच स्वच्छ केला नाही तर हा पांढरं कारपेट पिवळ्या रंगाने रंगवणार या काळजीत आम्ही!! धावपळ करून नवीन डायपर व इतर साहित्य गोळा करून मी त्याच्यामागे लागलोय!! त्याला आता डॅडी पकडापकडीचा खेळच खेळतोय असं वाटून तो माझ्या हातात लागायला तयार नाही!!! अशा आणीबाणीच्या प्रसंगी मी गुंतलेला असतांना फोन वाजायचा!! उचलला की पलीकडून कोणतरी मला काहीतरी विकायच्या प्रयत्नात!! असा राग यायचा (पुन्हा ते सशक्त मराठी शब्द!!!). शेवटी निर्णय घेतला की फोन उचलायचाच नाही, लोकांना मेसेज ठेवू देत, आपण नंतर त्यांना उलट कॉल करू!!! माझ्या सगळ्या परिचितांना हे सांगून ठेवलंय!! आता जरी माझ्या भावाने फोन केला तरी "दादा, जरा परत फोन कर" एव्हढंच बोलून तो बिचारा फोन ठेवतो!!
असो!! तर दूरवर फोन वाजला, मी दुर्लक्ष केलं....
काही मिनिटातच बायको (पहिली हो, दुसरी शेजारीच नाहिये का बसलेली!!) खोलीत आली....
तिने गरमागरम पॅटिस आणले असतील म्हणून मी तिच्याकडे आशेनं (आणि सस्मित चेहेर्यानं!!) पाहिलं.....
पण कर्म! पॅटिस नव्हते, हातात फोन होता....
माझ्या कपाळावरच्या आठ्या पाहूनच तिने तिच्या या अपराधाबद्दल स्पष्टिकरण दिलं...
"कोणीतरी अनोळखी पण इंडियन माणूस आहे. आवाजावरून वयस्कर वाटतोय, म्हणून कॉल घेतला..."
त्या माणसाच्या वयामुळे त्याला क्षमा करत पण काहिश्या नाराजीनेच मी फोन कानाला लावला....
"हॅलो?"
(क्रमशः)
वाचने
9231
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुपच छान सुरवात....
सुरुवात तर
वा वा
(सशक्त मराठी शब्द)
कोन
In reply to (सशक्त मराठी शब्द) by टारझन
बस,
झालं.. ! नको
क्रमशः :(
मस्तच हो काका,
भाग
सहमत
In reply to भाग by रेवती
होऊन जाऊ द्या काका ....
ह्म्म्..दोन
क्रमशः.......
नोम तोम
सहमत
In reply to नोम तोम by मुक्तसुनीत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो.
In reply to सहमत by नंदन
नोमतोम
In reply to नोम तोम by मुक्तसुनीत
त्याला आता
डांबिसा, वा
मस्त!
>>(क्रमशः)>> भ
झकास...
सुरुवात
अडकले का चुंबनात?
छान
क्या बात है|
छोटा नव्हे,, छोटा पिवळा
In reply to क्या बात है| by धमाल मुलगा
हे लय भारी!
In reply to छोटा नव्हे,, छोटा पिवळा by धनंजय
पिंडाकाका