माझ्या आवडीचा विषय चालू केल्याबद्द्ल धन्यवाद!
माझा स्वत:चा अनुभव काही नाही पण सगळ्यांचे अनुभव वाचायला आवडतील.
आणी तुम्ही मांत्रिक आहात? मला थोडी प्लॅचेट बद्द्ल माहीती सांगाल का ? म्हणजे आत्म्याशी आपण खरंच संवाद साधू शकतो का?
हम इच कुबड्या खविस हय ... हमको भुतो का क्या डर .. आणि मांत्रिक फिंत्रिक आपला काय बी वाकडा (किंवा सरळ) करू शकत नाय ...
बाकी " एक व्यावसायिक "घोस्टबस्टर"( मांत्रिक) " वाचुन करमणूक झाली ...
आपला यावर काय इश्वास नाय .. पण भुतकथा वाचायला हरकत नाय .. चालु द्या भो ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
तुम्हाला कधी अशा शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का?>>>
माझा राक्षस गण असल्याने भुत खेत आमच्या वाटेला जात नाहीत. (म्हणे)
माझा एक मावस भाउ मात्र मनुष्य गण असल्याने जरा अनोळखी,निर्जन, अंधार्या भागातन जावुन आला की तापान फणफणायचा.
मग त्याला गोळ्या औषधाबरोब्बरच एक उतारा सोडावा लागायचा असा आठवत.
बाकी कायबी अनुभव नाही.
तुम्ही तुमचेच अनुभव लिहा की इथेच. तेवढीच जीवाला करमणुक वो.
अवांतर :
ते भुता खेतांच मिपा वरच खात आंबोळ्याकडे आहे बघा.
त्योच तुमाला काय मदत करतो का ते बघा. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
भूताचा अनुभव अजून काही आला नाही. आणि आला असला तरी कार्य-कारणभावाचे भलतेच तर्क लढवून आम्ही भूतांच्या अस्तिवावर अन्यायही केला असू शकेल.
आपले आणि इतरांचे अनुभव वाचायला आवडतील.
--लिखाळ.
तो कसा असतो? म्हणजे आम्हाला त्रास बर्याच गोष्टींचा होतो आणि ज्या व्यक्ती तो त्रास देतात त्या जर भूत असतील तर पहिलं भुत म्हणजे माझा पीएम. :) दिवसभर येथेच्छ मेलामेली करून टिममेंबरना भंडावून सोडणं हा याचा छंद
दुसरे भूत, भयंकर वासाची तेले लाऊन ट्रेनमधे येणारे भय्ये! एकतर या भुताची उंची कमी असते आणि दिवसा ढवळ्या भयंकर वासाची तेले लाऊन ट्रेनमधे बरोबर आपल्या पुढ्यातच येऊन उभे..
अजून एक भूत हल्ली त्रास देते ते म्हणजे न्यूज चॅनलवाले.. भुत असल्याने कधीही कुठेही उपटतात आणि समोरच्याला प्रश्न विचारून भंडावून सोडतात. या भूताची खरी ओळख म्हणजे आगीत जळाणार्या, पाण्यात बुडणार्या अथवा नुकतेच गोल्ड जिंकलेल्या व्यक्तींना हे भूत एकच प्रश्न विचारते "आपको कैसा लग रहा है?"
जर तुम्हाला या भुतांवर इलाज माहित असेल तर सांङा.. अजूनहि काहि भुते आहेत पण त्याबद्दल वरील भुतांवर उपचार सांगितल्यानंतर विचारू
-(भुतभीत) ऋषिकेश
सर्व प्रथम हा विषय मांडल्या बद्द्ल येडा खवीस :SS यांचे धन्यवाद.
(नाव घेताना सुद्धा भिती वाटते).
माझा मित्राला आलेला हा एक अनुभव. साधारणतः तीन वर्षांपूर्वी ही गोष्ट. आम्ही सगळे मित्र रात्री ११ वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो होतो. गप्पांचे विषय देखील रोजचेच होते. (यामधे भुतं-खेतं, ह्डळी यांचे विषय मुळीच नव्ह्ते. आजकालच्या जीवनपद्धतीमुळे म्हणा किंवा शहरातून हे विषय हद्दपारच झालेत.) दुस-या दिवशी प्रत्येकालाच ज्याच्या त्याच्या कामधंद्याला जायचं असल्यामुळे आम्ही ११-१५ पर्यंत घरी गेलो. हा पण त्याच्या घरी गेला. त्याचं घर मोठं असल्यामुळे तो त्याच्याच खोलीत झोपत असे. आणि तसाच तो त्या रात्रीही झोपला. रात्री १ ते २ च्या दरम्यान तो जागा झाला तोच मुळी घाबरलेल्या अवस्थेत. (त्याच्या म्हणण्याप्रमाणे). त्याला एकदम घाबरल्यासारखं वाटत होतं. कानात कोणीतरी अगम्य भाषेत काहीतरी ओरडत होतं. हातपाय कुणीतरी दाबून धरल्यासारखं वाटत होतं. तोंडाला कोरड पडली होती. पाण्याचा तांब्या समोर दिसत असूनही त्याला हालणं अशक्य झालं होतं. कुठ्ल्यातरी विचित्र गोष्टीचा आपल्याला विळखा पडलाय असं वाटत होतं. त्याच्या ताब्यात काहीही नव्हतं. फक्त विचार करायला डोकं शाबूत होतं. ही अवस्था साधारण ४-५ मिनिटं होती. ५ मिनिटांनंतर त्याला एकदम मोकळं झाल्यासारखं वाटलं. पण हातापायातलं त्राण नाहीसं झालेलं होत. हा तसाच विचार करत, घाबरलेल्या अवस्थेत पडून राहीला.
असाच अनुभव त्याला त्या घटनेनंतर २-३ वेळेला आला आहे. पण आता तो जास्त सांगत नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, भूत सिनेमामध्ये उर्मिला मातोंडकरला जेव्हा पहील्यांदा भूत दिसतं तेव्हा ती घाबरल्यावर जे काही भाव तिने अभिनयातून तिच्या चेहे-यावर साकारलेत, तशीच अवस्था याची झाली होती. फक्त याचा रिएलिटी शो चालला होता.
काय असू शकेल हा प्रकार?
ऋषिकेश चा प्रतिसाद वाचून हसून हसून खुर्चीवरून खाली पडायची वेळ आली.
दुसरे भूत, भयंकर वासाची तेले लाऊन ट्रेनमधे येणारे भय्ये!
हे खासच.
न्यूज चॅनलवाले.....आगीत जळाणार्या, पाण्यात बुडणार्या अथवा नुकतेच गोल्ड जिंकलेल्या व्यक्तींना हे भूत एकच प्रश्न विचारते "आपको कैसा लग रहा है?"
हे तर जबराट. :)
....बबलु
आपला ह्या भुता - खेता वर ईस्वास नाय बा. कुठल्या भुता ला बी आपुन घाबरत नाय. तरी पन असावं म्हुन गळ्यात तुळशीची (सास बी कबी भउ वाली तुलसी नाय बरं का) माळ घातली आन एका पीर बाबा चा ताबीज पन बांधला. भुता चा काय भरोसा राव बसलं कदी मानगुटीवर तर काय घ्या.
काल राती टी. वी. वर त्यो भुताचा पोग्राम पायला राव. जाम भ्यालो मी. रामाचा फुटु धरुनच झोपलो.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
भूत - खेत असतात म्हणे !!!
आपल्याला अनुभव ही नाय, आणी आम्हाला त्रास देणार भूत जन्माला यायचये !!
असो !!
ऋषिकेश चा प्रतिसाद जबरा आहे !!
आजच्या युगात त्याने वर्णीलेली भूते च खर तर जास्त त्रास देतात !!!
बाकी भूत कथा ,चित्रपट पहायला आबडतात !!!
आणी आमचा देखील राक्षस गण असल्यामुळे ,
कुठल भूत पंगा घेणार !!
बाकी चालू देत !!
इतरांचे अनुभव वाचायला आवडतील !!!
(वरीजनल भूत )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
बर्याच मेंबरांना मी "मांत्रिक" आहे याचं आश्चर्य वाटलेलं दिसतय्...पण इतर जसे व्यवसाय आहेत तसाच हा देखील माझा व्यवसायच आहे.. आणि मला त्या व्यवसायामधुन प्रचंड रिस्पेक्ट आणि बरा पैसा मिळतोय. ( पैसा घेतल्याशिवाय कामं करायची नाहीत हे धोरण अगदी सुरुवातीपासुन असल्याने)
थोडं गंभीर आणी खरं--- B)
पातंजलींचे योगशास्त्र आणि त्यातील साधनपाद, समाधीपादाचा अभ्यास व नंतर आद्यशंकराचार्य प्रणीत श्रीविद्येचा अभ्यास केल्यानंतर वातावरणातील अदुश्य गुढशक्तिंची स्पंदने कळू लागली व या मार्गाकडे वळलो...आयुष्यात खुप काहीतरी करुन लोकांना अशा समस्यांमधुन व्यवस्थितपणे बाहेर काढल्याचे समाधान आहे ते वेगळेच
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
पतंजली योगसुत्रामध्ये .... ध्यान, धारणा आणि समाधी यांच्या एकत्रिकरणातुन ( त्रयमेकत्र संयम:) संयम साधता येतो आणि पंचमहाभुताचे अवलोकन करता येते मी त्या भानगडीत न पडता संयमाचा आधार घेऊन पंचमहाभुतांपेक्षा नुसत्या "भुतां"च्या अभ्यासावर जोर दिला
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
पदभ्रमण, गिर्यारोहण या निमित्ताने, आत्तापर्यंत जवळपास खूपदा जंगले, दर्या-खोर्यातून हिंडलो आहे. रात्रीच्या समयी जंगलातून फिरण्याचा आनंद घेतला आहे. विशेष म्हणजे रतनगड, भीमाशंकर [शीडी घाटातुन] , सिद्धगड [मच्छिंद्रगडाच्या बाजुला] अश्या निर्जन परिसरातुन, तोरणा किल्ल्यावर २-३ च्या सुमारास पाणी शोधण्यासाठी भटकंती असे रात्रीच्या प्रवासाचे अनुभव आहेत. तरी सुद्धा भूता-खेताचे अनुभव ईल्ला!!!!!
नारायण धारप, रत्नाकर मतकरी यांच्या कादंबर्या, कथा नाईट शीफ्ट असताना वाचतो. नाईट शीफ्टला मी, एक सिक्युरीटी आणी अंधार एवढे क्रावूड आमच्या कंपनीत असते.
तरी झोप आवरत नाही.
खवीस यांच्या साठी : उतारा, लिंबु-मिरची, मंतरलेल्या अक्षता यांच्यात काही तथ्य असते का हो?
ह्या दोन घटना आत्मस्तुतीचा रोष पत्करुन देत आहे-
कसबा पेठेत रहात असताना आमच्या सदनिकेच्या दारात कुणीतरी लिंबु उभे कापुन त्यात गुलाल, बुक्का तत्सम गोष्टी भरून ठेवले होते. आमच्या मातोश्रींनी ते बघीतले आणी तारसप्तकात आवाज नेला. तेव्हा मी ते लिंबु उचलले, धुतले आणी ग्लासभर पाण्यात पिळुन ते पाणी पिवुन टाकले.
[नंतर आमच्या कानाखाली गणपती उमटला, ते सांगणे नकोच].
तरी मला काही फरक जाणवला नाही, अगदी एक चांगली गोष्ट घडली, आमच्या आयुष्यात एका प्रेम्-प्रकरणाचा समावेष झाला.
[कसबा पेठेत पवळे चौकातील अलोक नगरी येथे मी एफ बिल्डींग मध्ये रहात होतो. या जागेचे एक वैशिष्ट्य म्हणजे, आमच्या बिल्डींगच्या जागी कब्रस्तान होते, आणी ५ फूट खोदल्यावर मजूरांनी घमेली भर भरून कवट्या, हाडे फेकली होती. ]
नंतर शुक्रवार पेठेत रहात असताना, पोर्णिमेला एका बाईने उतारा काढुन सोसायटीच्या दारात ठेवला होता. मी तो लाथाडुन कणकेचा दीवा टाचेखाली चिरडुन फेकला.
तरी आत्तापर्यंत सर्व व्यवस्थित चालु आहे. मी असेच नाही, माझे अनेक मित्र ह्या गोष्टी सर्सास करतात. उतारा खाणारे काही माझ्या ओळखीचे आहेत. व्यवस्थित बसून उतारा खातात, लिंबु-मिरचीचे पोहयात वापर करून चवीने खातात. तथ्य असेल तर हे कसे?
हर्षदराव,
उतारा हा व्यक्तिमधील अशुभ्-अमानवी गोष्टींचे निराकरण करण्यासाठी काढला जातो...त्यात बराचसा भाग हा मानसिकतेचा आहे. उतारा काढताना संबंधित व्यक्तिला आपल्यामध्ये असलेली काहीतरी अशुभ शक्ति गेली आहे असे मानसिक पातळीवर वाटले तरी त्याचा आजार जर तो मनोशारिरीक असेल ( सायकोसोमेटीक) तर बरे वाटु लागते आणि उतारा काढणार्यालाही समाधान मिळते
मात्र जर व्यक्तिला खरोखरच बाधा झाली असेल तर तो आत्मा हा सुक्ष्म वासनादेहात असल्याने त्याच्या वासनेचा क्षय व्हावा म्हणुन काही अन्नपदार्थांचे उतारे काढले जातात
उ.दा.- दहिभात, नारळ, फरसाण, जिलबीसारखा गोड पदार्थ
लिंबु-मिरची-बिब्बा हे शनि पिडेसाठी वापरतात
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
हेच म्हणतो...
आपल्या अभ्यासाबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल. कधी लिहिताय. आणि आपल्या व्यवसाया निमित्त आपल्याला काही विशेष अनुभव आले असतिल ते पण लिहा.
बिपिन.
आपल्या अभ्यासाबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल. कधी लिहिताय. आणि आपल्या व्यवसाया निमित्त आपल्याला काही विशेष अनुभव आले असतिल ते पण लिहा.
+१
आणि तुमच्या गोष्टी वाचल्यावर तुम्ही गोष्टी वेल्हाळ आहात हे सां. न ल.
लिवा आमी वाचतो.
(हडळ) अदिती
साधारण मी टी.वाय्.बी.ए.(तत्वज्ञान) ला असताना असाच मुंबईत फोर्ट एरिआ मध्ये फिरत असताना "श्रीआद्यशंकराचार्यांचे"(श्रीविद्या तंत्र) हे एक दुर्मिळ पुस्तक फुटपाथवर सापडले...खुप जुनी आवृत्ती होती ...दिल्लीचे प्रकाशन होते. सहज विकत घेऊन घरी आल्यावर चाळले तेव्हा त्यात श्रीयंत्र-सिध्दी-साधना अशी प्रकरणे दिसली. ते पुस्तक मी नुसते वाचले नंतर काही काळाने माझे मित्र श्रीविश्वेश दांडेकर यांच्या सहवासात आल्यावर मला त्यांच्याकडुन श्रीविद्येची आणखीन माहीती मिळाली व माझ्यापरिने मी अभ्यास सुरु केला...श्रीविद्येचा मुलमंत्र( गुप्त असतो), श्रीयंत्र यांच्या आधाराने पंचमहाभुते, विश्व असा अभ्यास असतो. त्यात ऐहिक सौख्यासाठी श्रीसुक्ताचाही अभ्यास करावा लागतो पण "श्रीललितासहस्त्रनाम" हे मुख्य स्तोत्र....श्रीविद्येत हादी विद्या आणि कादिविद्या असे दोन प्रकार आहेत...त्यापैकी कादिविद्या ही शुभ कामासाठी आणि संकल्पपुर्तीसाठी वापरायची असते....समांतर पातळीवर माझा पातंजलयोगविद्येचाही अभ्यास मीच करत होतो...कोल्हटकर, नानासाहेब रेळे, ओशो अशा अनेक रेफरन्सेस वर माझा मीच अभ्यास करत गेलॉ..रोज सुरुवातीला २० ते २५ मिनीटे ध्यानावरुन रोज १ ते १.३० तास ध्यान वाढवत गेलो....रहस्य उमगत गेली...त्याचा उपयोग मी शेवटी माझ्या आवडीच्या अशा
"भुतभगाव" या विषयासाठी केला आणी मग पुढे पुढे सवयीने "वाताकर्षण"सारखे तंत्र अवगत करुन भुते काढणे व त्यांना इतरत्र नेऊन सोडणे, गती देणे असले प्रकार व्यावसायिक पातळीवर सुरु केले....लोकांना बाधानिवारण झाल्यावर फरक जाणवत गेले....मी अधिक तयार होत गेलो....
क्रमशः
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
जबरदस्त...
उत्सुकता वाढते आहे. तुम्ही लिहाच, मांत्रिक बुवा. आज पर्यंत स्वतः भूत बघितलेली (म्हणजे भूताचे अस्तित्व जाणवलेला) कोणी भेटला नव्हता. सगळे दुसर्यांचा / इतरांचा संदर्भ देऊन सांगायचे. एवढे आधिकारवाणीने बोलणारे तुम्हीच बघितले प्रथम. येऊ द्या.
बिपिन.
स्वतःचे अनुभव सांगणारे विरळाच.. अनुभव ऐकायला उत्सुक आहोत..
तसेच वर विजूभाऊंनी विचारलेल्या `माणसाचे भूत होते तर प्राण्यांचे का नाही?' या प्रश्नाचे उत्तर सुद्धा जाणून घ्यायचे आहे.
--लिखाळ.
भुतेखेते-हडळी असतात.
यापुर्वी मी कैक भुतांना झपाटलं आहे.!!!!
पण शिंचे तावडीतुन सटकले आणि कुठल्याश्या खवीस नामक मांत्रिकानं सगळ्यांना वाचवलं...(ह घ्या)
तर सांगायचं म्हणजे भुतं असतात...
ती कुठं असतात?
ती असतात तुमच्या बॉसच्ता डॉक्यात्...तुमच्यावर वक्रड्र्ष्टी ठिवुन.
ती असतात २००३च्या वर्ल्ड कप अंतिम सामन्यात पाँटिंगच्या मनगटात्.......
आणि देतात आपली दाणदाण उडवुन....
ती असतात कॉलेजात...खडुस प्राढ्यापकाच्या रुपात...
ती असतात चौका चौकातल्या "मामा"च्या वेशात...
मनार आलं तर हवं तेव्हा तुम्हाला कापयला..
ते बघा ते एक भूत :- काथ्याकुट टाकणारं.
हे बघा ते एक भूत :- त्याला प्रतिसाद देणारं
ते बघा ते एक भूत :- तुमच्या मागे उभं राहुन पासवर्ड टिपणारं
ते बघा ते एक भूत :- तुमची मौल्यवान माहिती/विदागार नष्ट करुन "व्हायरस च्या नावनं मिरवणारं."
ते बघा ते एक भूत :- विविध आय डी बनवुन मिपाकरांना त्रस्त करणारं.
ते बघा ते एक भूत :- चांगलं भूत....
मिपकरांच्या सोयीसाठी त्या भो***चा बंदोबस्त करणारं.
ते बघा ते एक भूत :- व्यानि च्या नावनं डोकं संत्रस्त करणारं.
ती बघा ती हडळ :- खरडीच्या रुपात येउन भल्त्याच लिंक देउन तुमचं वाट्टोळं करणारी हडळ.
गमतीचा भाग अलहिदा, पण प्रत्यक्ष आयुष्यात माझे कधीच भूत्-खेत्-प्रेतात्मा अशा प्रकाराशी गाठ पडली नाही. तरीही अमाशेच्या रात्री अंधारात एकटं फिरताना माझी लै
टरकते.
त्यामुळं इथं चर्चा विषयात भर घालु शकणार नाही. पण इतरांचं वाचायला आवडेल.
आपलाच,
भुतांना झपाटणारा
मनोबा
मला भूताखेतांची पार्टी खराब करायची नाही ; पण या बाबतीत बोललेच पाहिजे.
एकविसाव्या शतकात , इन्टरनेटवरील एका फोरम मधे आपण भूतप्रेत घालवणारे व्यावसायिक मांत्रिक आहोत हे म्हणणे विनोदी वाटेल . तसे ते सर्वांच्या बुद्धीमत्तेचा अपमान करणारे आहेसुद्धा ; पण दुर्दैवाने ते सामाजिकदृष्ट्या काळोख वाढवणारे , नाडलेल्यांचे शोषण करणारे , आणि एकंदर समाजाला अज्ञान आणि अनाठायी भीतीच्या दहशतीमधे लोटणारे आहे. या दृष्टीने , 'येडा खवीस' यांसारखे लोक हे अल्पशिक्षित , गरीब , नाडलेल्या माणसांच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे , त्यांच्यातील अज्ञानाचा फायदा घेणारे ठरतात.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून तुम्हाला तुमचा व्यवसाय , त्यातील अनुभव वगैरे मांडण्याचा अधिकार आहेच. पण या व्यवसायाला एक गंभीर अशी नैतिक बाजू आहे हे इथे नमूद व्हायला हवे.
भयकथा, प्लँचेट , भूताखेतांबद्दलचे किस्से आणि चर्चा या गोष्टी रंजनाच्या आहेत. त्याबाबत कुतुहल वाटणे , त्याबद्दल काय वाटते ते सांगणे इ. इ. गोष्टी या सामान्य बाबी आहेत. पण "व्यावसायिक मांत्रिकी" सारख्या गोष्टींबद्दल मी माझा तात्विक विरोध व्यक्त करतो. जो व्यवसाय तुम्ही उपजीविका म्हणून निवडला आहे तो अज्ञानाची , अनाठायी भितीची कास धरणारा , लोकांना फसवणारा आहे असे मला वाटते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या समोर तुम्ही आपल्या व्यवसायातील तथ्य सिद्ध करावे असा सल्ला देतो.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे "भूत दाखावा, पाच लाख रूपये मिळवा" हा उपक्रम आजही कोणी मोडला नाही. माझ्या माहितीप्रमाणे सध्या ५ लाखाचा आकडा आता १० लाखाच्या घरात गेला आहे.
वर हर्षद आनंदी यांनी म्हण्टल्या प्रमाणे मी सुद्धा पदभ्रमण, गिर्यारोहण या निमित्ताने मनसोक्त भटकंती केली आहे. साधारण १९८० ते १९९८ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण महाराष्ट्र, हिमालय, सिक्किम्,नेपाळ, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे पदभ्रमण, गिर्यारोहण केले आहे. त्यानंतर युरोप, अमेरिका येथेही मनसोक्त भटकंती केली आहे. बर्याच वेळेस रात्री, अपरात्री मैलो-न-मैल चालावे लागायचे. भूताखेतांचे कित्येक किस्से ऐकले, पण शेवटी भूताला भेटायची इच्छा अजुनही अर्धवटच आहे.
एकदा "गोरखगड" ला मी व माझा मित्र दोघेच गेलो होतो, त्यात तो काही कारणामुळे पुढे गेला (एकटाच) आणि मी शेवटची एसटी पकडुन रात्री ९ वाजता गोरखगड चढायला सुरुवात केली. तेव्हा गावकर्यांनी भूताखेताच्या विविध कहाण्या सांगुन माझी मोठी करमणूक केली होती व मी बहुतेक जिवंत परत येणार नाही असे भाकितही केले होते. दुसर्या दिवशी त्याच गावकर्यांबरोबर सकळची न्याहारी केली तेव्हा कदाचित मीच भूत झालो असं त्यांना वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल रात्री गडावर गेलेला हाच तो इसम का? असं विचित्र भाव त्यांच्या तोंडावर दिसत होते.
असो, असे अनेक किस्से आहेत. भूत पाहिलेल्यांना मनःपूर्वक अभिनंदन, न पाहिलेल्यांना प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर.
बाकी पुरुषांना हडळ आणि स्त्रियांना मुंजा वगैरे भेटतात असा काही भूता-खेतांचा नियम आहे का?
नैसर्गिक नियम आहे तो :) कधी अपवाद असू शकतील ... पण त्यात गैर नाही .. हे व्यक्तिगत प्रश्न आहेत , हडळ व मुंजांचे ..
मुंजा खवीस
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
मुक्त सुनीत व तत्सम...
या जगात नैतिक-अनैतिक अशी बंधने असलेले व नसलेले अनेक व्यवसाय आहेत. नैतिकता हाच जर पोईंट असेल >:P तर आज तमा बीअर शोप्स, दारुचे गुत्ते आणि पब, जुगाराचे अड्डॅ बंद व्हायला हवे होते. विषय माझ्या प्रोफेशनल मांत्रिकईचा आहे न तर तो व्यवसाय कुठेही कागदपत्रि नोंद केलेला व्यवसाय नाही मी फक्त केलेल्या कामाचे पैसे घेतो आणि ते सुध्दा समोरच्या व्यक्तिला ( त्याला अपेक्षित असलेला) अनुभव आला तरच्....बरोबर्....अंनिस वगैरे लोकांना मी भुते दाखवुन सिध्द करायला मला वेळ नाही, आणि हौसही नाही ( त्यामुळे मला ढोंगी-पाखंडी म्हणले तरी त्याचा निर्लज्जपणे स्विकार करेन)
मी कोणता व्यवसाय करावा...त्यात काय करावे...किती नैतिक्-अनैतिकतेची बंधने पाळावी हे मला कोणाकडुनही शिक्ण्याची गरज नाही!!!
मला वाटेल ते मी करणार्....वाट्टेल ते लिहिणार्....ज्याला जमेल त्याने वाचावे, उत्तरे द्यावीत अन्यथा विषय सोडावा किंवा काय वाट्टेल ते करावे
बाय द वे!!! वरच्या पोस्ट वाचल्यावर लोकांना किती कुतुहल आहे ते लक्षात आले असेलच तुम्हाला....
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
>>वरच्या पोस्ट वाचल्यावर लोकांना किती कुतुहल आहे ते लक्षात आले असेलच तुम्हाला!
ये.ख. तुमच्या यशस्वी धंद्यामागचे कारण दिसले व तेच दु:ख. शेवटी झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीये तुन्ना तुन्ना. बरोबर ना?
तुमचे पोस्ट वाचले . माझे मत तुम्हाला झोंबलेले दिसते . असे असले तरी त्याचा प्रतिवाद तुम्ही केला आहे असे वाटत नाही. तुमच्या व्यवसायाबद्दल नेमके काय आक्षेपार्ह आहे हे मी लिहिले आहे. आता (तुमच्याच भाषेत सांगायचे तर ) कशाचाही निर्लज्जपणे स्वीकार करायचाच म्हण्टले तर मग कसला आलाय वाद नि कसला आलाय प्रतिवाद म्हणा :-)
तुम्हाला वाटेल तेच तुम्ही करणार आणि वाटेल ते लिहीणार यात काही नवे नाही . येथील प्रत्येक जण त्याला वाटेल तेच लिहीत असतो/असते :-) प्रश्न इतकाच आहे , की जे लिहीले जाते ते आक्षेपार्ह आहे का ? तर तुमच्या बाबतीत आहे. त्याबद्दलचा माझा निषेध मी व्यक्त केला आहे. तो काही बदलत नाही.
राहता राहिले "वरच्या पोस्ट वाचल्यावर लोकांना किती कुतुहल आहे " या बाबत. मी याआधीच लिहील्याप्रमाणे भूतप्रेतादि गोष्टींबद्दलचे कुतूहल , त्याबद्दलच्या चर्चा , कथा-कहाण्या या सामान्य बाबी आहेत. परंतु या गोष्टींचा बाजार करून वर त्याबद्दल "मला वाटेल ते मी करणार्....वाट्टेल ते लिहिणार्...." वगैरे मुक्ताफळे यातून तुम्ही आपली यासंदर्भातली तार्किक भूमिका (किंवा कुठल्याही तार्किक भूमिकेचा अभाव ) दाखवता. असो.
बाकी "अन्यथा विषय सोडावा " वगैरे भाषा आपण आपल्या खाजगी हद्दीत करणे बरे . :-) सार्वजनिक ठिकाणी अशी वृत्ती तुमच्या धंद्याला काही पोषक नाही. कसे म्हणता ?
मुक्तसुनीत राव .. तुमचे विचार मुक्तपणेच लिहा ... बरोबर गोष्टींच्या आम्ही नेहमीच सहमतात आहोत ... इथे करमणूक म्हणून लिहीले असते तर ठिक ... पण इथे धंद्याची जाहिरात करणे चुक ... कुठे तरी प्रभु (जय हो प्रभुदेवा) लिहिलं होतं आज काल दुनिये मधे भिती दाखवून काहीही खपवता येतं. उदा. मृत्युची भिती दाखवा, विमे विका, अजुन कसली भिती दाखवा गोळ्या विका , ई.ई.
येड्या खविसाचा हा एक येडा प्रयत्न वाटतो .. सुरूवातीला मी प्रतिक्रिया दिली तेंव्हा इथे उघड उघड व्यवसायिकतेच्या गोष्टी सुरू होतील असं वाटलं नव्हतं .. तिकडे कोणी तरी पैसे घेउन नाड्या विकतोय !! अरे चाल्लय काय ? आम्हाला काय शेंबुड चाळे समजता काय ? मागे तात्यांना कोणी तरी व्यनी करून लेख प्रसिद्ध करण्यासाठी पैसे मागितल्याचं आठवतय ... आता तो "अबक कोण?" या बाबतीत आमची पाल चुकचुकते आहे ... असो ...
.ज्याला जमेल त्याने वाचावे, उत्तरे द्यावीत अन्यथा विषय सोडावा किंवा काय वाट्टेल ते करावे .
आमच्या प्रतिसादा नंतर आमच्या नावानेही सेम खरड निघेल .. पण उत्तर आधिच .. पण सुनित ष्टाईल नव्हे .. कुबड्या खविस ष्टाईल ...
असल्या बाता "तिर्थरुप रोड" वर जाउन कराव्यात .. इथे नाहीत . इथं जे लिहाल ते सार्वजनिक आहे .. आणि सगळ्यांना बोलायचा तितकाच हक्क जितका लिहिणार्याला ...
बाकी सुनित रावांच्या मुद्द्यांवर जो प्रतिवाद केला आहे .. त्यावरून पळकुटे पणा दिसला .. इथे पोस्ट आणि लेख टाकायला रिक्कामटेकडे पणा आहे .. पण अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांकडे आपला खरेपणा सिद्ध करायला वेळ नाही ? व्यावसायिक बाजु लक्षात घेतली तर अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांचं सर्टिफिकेट लाउन आमची तोंड बंद करा आणि मग हवा तेवढा धंदा करा (मिपा वर नाही)
फुकटचा सल्ला : पुड्या सोडू नयेत ..
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
तुम्हाला वाटेल तेच तुम्ही करणार आणि वाटेल ते लिहीणार यात काही नवे नाही . येथील प्रत्येक जण त्याला वाटेल तेच लिहीत असतो/असते प्रश्न इतकाच आहे , की जे लिहीले जाते ते आक्षेपार्ह आहे का ? तर तुमच्या बाबतीत आहे. त्याबद्दलचा माझा निषेध मी व्यक्त केला आहे. तो काही बदलत नाही.
मुक्तरावांशी सहमत आहे...
मिपावरील सर्व सभासदांना अगदी भरपूर लेखनस्वातंत्र्य दिले आहे तरीही त्याचा अर्थ 'वाटेल ते..!' असा होत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी...
तात्या.
भूताखेतांबद्दल कुतुहल म्हणण्यापेक्षा श्रीसूक्त, श्रीललितासहस्त्रनाम स्तोत्र , श्रीयंत्र, योगशास्त्र इत्यादींचा नामोल्लेख आल्याने कुतुहल वाटले.
मुक्तसुनीत यांचे म्हणणे बरोबर वाटले. मी असेच करणार वगैरे भाषा करण्यापेक्षा, जर तथ्य असेल तर समजावून देण्यात काही तोटा नाहीच. भूत पळवले असे लोकांना वाटण्याचा संबंध लोकांच्या मानसिकतेशी असू शकेल का?? म्हणजे तुम्ही जे काही मंत, तंत्र इत्यादी त्यांच्यासमोर करत असाल, ते पाहून तशी एक मनोभूमिका तयार होत असावी...
माझ्या बोलण्याने जर काही दुखापत झाली असेल तर मनःपुर्वक क्षमा!!!
अहो काय आहे!! विषय जरा नाजुक आहे, त्यामुळे टेक्निकली सिध्द वगैरे करणे कसे शक्य आहे....मी काम करत रहाणार, लोकांची सेवा करणार आणि लिहीत रहाणार्...याला पर्याय नाही
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
प्रतिक्रिया
त्रास मला?
मग बाटलीत
मग बाटलीत
हडळ
हडळ
दुपारच्याला मुंजासंगे एक
धन्यवाद!
अपने को क्या डर
ते भुता
उत्तरे
.
तुम्हाला
हा हा हा
एक अनुभव
ऋषिकेश चा...
या बाबतीत
भूत जर
मिपावर संचार करणारी भुते बघितलीत
@ अनिरुध्द
आपला ह्या
अनुभव
भूत - खेत
असतील शिते तर नाचतील भूते.
बर्याच
पतंजली
मनोरंजक विषय - अत्यंत आवडीचा - अनुभव वाचायला आवडेल.
उतारा....तथ्य
हा
हेच
+१ आपल्या व्यवसायाबद्दल
आपल्या
साधारण मी
जबरदस्त... उ
बरोबर
प्राण्यांची भूते...
हो....
हे एकदम
हॅलोविन
फॉर द रेकॉर्ड
सहमत
नाही हो..
खरं आहे
नैसर्गिक नियम आहे तो
मुक्त
बरोबर
प्रतिक्रिया
सहमत ...
तुम्हाला
भूताखेतां
ओह क्षमस्व!!!