Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ऋषिकेश on Mon, 04/21/2014 - 16:30
जर मोदी पंतप्रधान झाले तर प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा त्यांच्याकडून असतीलच. हा धागा त्या अपेक्षांचा अंदाज घेण्यासाठी काढतो आहे. मोदी असे करतील, तसे करतील वगैरे गप्पा आपण मारत असतो. तावातावाने त्यांच्या कार्याची स्तुती/निंदा चालु असते. पण हे सारे निवडणुकीपर्यंत. त्यानंतर काय? समजा बहुमताने मोदींना जनादेश दिला की त्यांचे सरकार स्थापन होईल. अशावेळी एक मतदार म्हणून त्यांनी काही गोष्टिंना प्राधान्यक्रम द्यावा असे तुम्हाला वाटत असेल. मी काही गोष्टींची यादी पुढे देतोयः (कोणत्याही खास (चढत्या/उतरत्या) भाजणीत ही यादी नाही) - भ्रष्टाचार निर्मुलन - महिला सुरक्षा - महागाईच्या दरावर नियंत्रण व घट - काळा पैसा परत आणणे - टॅक्स रिफॉर्म्स - खाणींची लायसन्स वाटप करणे - लोकपालाची अपाँटमेंट - शस्त्रास्त्र खरेदी - पाकिस्तानशी युद्ध -- पाकिस्तानशी संबंध सुधारणे - चीनशी युद्ध -- चीनशी संबंध सुधारणे - राम मंदीर निर्माण - निर्मल गंगा अभियान - पायाभुत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवणे - पोटा सारखा कायदा आणणे - नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणे - निवडणुक प्रक्रियेत सुधारणा करणे - बालकल्याण योजना राबवणे - शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रित करणे - आरोग्य धोरणावर लक्ष केंद्रीत करणे - क्रिडा धोरणावर लक्ष केंद्रीत करणे - पर्यावरणाकडे लक्ष देणे - आर&डी कडे लक्ष देणे - शेतकरी, कामगार, लघूद्योग, मासेमारी, पर्यटन आदी क्षेत्रांकडे लक्ष देणे - वन विंडो क्लिअरन्स सारख्या योजनांनी उद्योगधंदे व त्यायोगे रोजगारीला चालना देणे - इतर (स्पष्ट करा) आता तुम्हाला यापैकी कोणती पाच कामे मोदींनी सर्वात प्राधान्याने हाती घ्यावीशी करावीशी वाटतात? ती कामे त्यांनी कशी करावी? असे तुम्हाला वाटते तेही लिहा आणि त्या पाच कामांनाही प्राधान्यक्रमाने लावा. तुम्ही निवडलेल्या कामांव्यतिरिक्त इतर कामे महत्त्वाची नाहित असे नाही पण जेव्हा तुम्ही मोदी पंतप्रधान होतील असे म्हणता / समजता तेव्हा त्यांनी कशाला प्राधान्य द्यावे यावर विचार केला असेलच. चला तर येऊ द्या तुमचे प्राधान्य क्रम. लक्षात ठेवा हा क्रम फक्त मोदी पंतप्रधान झाले तर तुमच्या अपेक्षांव्वर आधारित आहे इतर नेत्यांसाठी तो क्रम वेगळा असण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
  • 44130 views

प्रतिक्रिया

Submitted by पैसा on Mon, 04/21/2014 - 17:52

Permalink

लई मागणं नाही!

मी मुख्यमंत्री झालो तर! असा निबंधाचा विषय आठवला. हे पण तसंच स्वप्नरंजन! कोणीही पंतप्रधान झाला तरी त्याच्याकडून माझ्या मिनिमम अपेक्षा याच राहतील. भ्रष्टाचार आणि महागाई कमी केली तरी आम जन्तेला बराच रिलीफ मिळेल. लोकांना सबसिड्या वाटण्यापेक्षा मागेल त्याला काम मिळालं पाहिजे. परराष्ट्रधोरणात मोठे बदल व्हावे असं वाटत नाही. मात्र हामेरिकेची दादागिरी कमी झालीच पायजे. पाकिस्तानबरोबर युद्ध नको पण नुसता सज्जड दम भरण्यापेक्षा दुसर्‍या काही मार्गाने त्याला 'त्राहि मामं' म्हणायला भाग पाडलं पाहिजे. तेच चीनच्या बाबतीत. उदारीकरणाच्या नावाखाली चांगले चालणारे सरकारी उद्योग खाजगी कंपन्यांना स्वस्तात विकणे बंद झाले पाहिजे. रस्ते सुधारणा आणि पिण्याचे पाणी सर्वांना उपलब्ध करणे इतर काही तू दिलेल्या गोष्टी तर व्हायला हव्या आहेतच - महिला सुरक्षा - काळा पैसा कमी करणे आणि देशाबाहेर गेलेला पैसा परत आणणे - टॅक्स रिफॉर्म्स - खाणींची लायसन्स वाटप करणे - शस्त्रास्त्र खरेदी - निर्मल गंगा अभियान - पायाभुत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवणे - नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणे - निवडणुक प्रक्रियेत सुधारणा करणे - बालकल्याण योजना राबवणे - शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रित करणे - आरोग्य धोरणावर लक्ष केंद्रीत करणे - क्रिडा धोरणावर लक्ष केंद्रीत करणे - पर्यावरणाकडे लक्ष देणे, वन्य जीवांना संरक्षण - आर&डी कडे लक्ष देणे विशेषतः स्पेस आणि आण्विक क्षेत्रात - शेतकरी, कामगार, लघूद्योग, मासेमारी, पर्यटन आदी क्षेत्रांकडे लक्ष देणे - वन विंडो क्लिअरन्स सारख्या योजनांनी उद्योगधंदे व त्यायोगे रोजगारीला चालना देणे याशिवाय कोणीही पंतप्रधान झाला (अगदी मोदी असले तरी) तरी तुझ्या यादीतल्या ३ गोष्टी होणे फार कठीण आहे. त्या म्हणजे पाकिस्तानशी युद्ध, चीनशी युद्ध आणि राममंदिर उभारणे. त्या अत्यावश्यक गोष्टी नाहीत. बाकी अभी दिल्ली बहुत दूर है!
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Mon, 04/21/2014 - 19:26

In reply to लई मागणं नाही! by पैसा

Permalink

१००% सहमत.

१००% सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Mon, 04/21/2014 - 22:29

In reply to लई मागणं नाही! by पैसा

Permalink

हामेरिकेची दादागिरी कमी झालीच पायजे!

मोदींना विसा न दिल्यामुळे अमेरिकेने मोदींची नाराजी नक्कीच ओढवून घेतली आहे. त्यामुळे मोदी अमेरिकेला जास्त भाव न देता चीन व इतर आशियाई देशात आपले मैत्री प्रस्ताव देतील व भारताचे इतर देशातील संबंध अत्यंत सलोख्याचे राहतील. पण अर्थात कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केल्यास त्याला चर्चेच्याच(यात वेळ पडल्यास सज्जड दम/धमकीही)माध्यमातून प्रश्न सोडवण्यास प्राधान्य असेल. दोन ते पाच वर्षांनी अमेरिकेला/अमेरिकन कंपन्यांना भारताच्या विसा साठी भिक मागावी लागेल हे नक्की व भारताला त्या प्रमाणात त्वरित विकसित करणे हेच प्राधान्य राहील.त्यामुळे भारतात अंतर्गत शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंडळी, राम मंदिर १०वर्षानंतर उभे केल्यास काही हरकत नसावी! ते नक्की होईलच आणि मुसलमान बंधूंचेही यात समर्थन असेल हि खात्री.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Wed, 04/23/2014 - 16:28

In reply to हामेरिकेची दादागिरी कमी झालीच पायजे! by आयुर्हित

Permalink

मोदींशी संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेत वाढता दबाव

दरवर्षीप्रमाणेच यंदाही सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क येथे भरणार्‍यां यूएनच्या जनरल असेब्लीचे निमित्त साधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण द्यावे यासाठी व्हाईट हाऊस आणि ओबामा प्रशासनावर दबाव वाढत चालला असल्याचे सांगितले जात आहे. भारतात नऊ फेजमध्ये होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अशा वेळी अमेरिकेतील अनेक तज्ञ नागरिक, सल्लागार, कायदेतज्ञांनी भारताकडे अमेरिकेने अधिक लक्ष पुरविले पाहिजे यासाठी आग्रह धरू लागले आहेत. निवडणुकांसंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या सर्वेक्षणांनुसार भाजप आघाडी यंदा सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. अशा वेळी मोदी पंतप्रधान बनलेच तर ओबामांनी भारताबरोबरचे संबंध वाढविण्यास पुढाकार घेतला पाहिजे असे तेथील जाणकार तज्ञांचे मत आहे. गेली कांही वर्षे अमेरिका भारत संबंध फारसे सुरळीत राहिलेले नाहीत आणि अमेरिकेनेही हे संबंध सुधारावेत यासाठी विशेष लक्ष दिलेले नाही. अशा वेळी ओबामांनी पुढाकार घेऊन यूएनच्या असेब्लीत मोदींना आमंत्रण करणे सूज्ञपणाचे असेल असे या तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधातील तणाव कमी होण्यास मदत होईलच पण मोदी व्हीसा प्रकरणी झालेला इश्यू निवळल्यासही त्यामुळे मदत मिळेल असे सांगितले जात आहे. वरीष्ठ विश्लेषक डॉ. स्टीफन कोहेन यांनी तर मोदींशी सार्वजनिक संपर्क साधायला ओबामा यांना अवघड वाटत असेल तर त्यांनी खासगी पातळीवर संपर्क साधावा असेही मत व्यक्त केले आहे. यूएस इंडिया पोलिटिकल अॅक्शन कमिटी संघटनेच्या प्रतिनिधींनीही मोदीना आमंत्रण देण्याचे महत्त्व ठळक करून सांगितले असून अमेरिकेच्या प्रांताप्रांतातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणांतूनही हेच निष्कर्ष निघाले असल्याचे समजते. मोदींशी संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेत वाढता दबाव
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 04/23/2014 - 17:05

In reply to मोदींशी संबंध सुधारण्यासाठी अमेरिकेत वाढता दबाव by आयुर्हित

Permalink

एवढं का कुरवाळताहेत ?

भारताचा कोणी का पंतप्रधान होत नाही त्याच्याशी चर्चा करण्याशिवाय आमेरीकेस पर्याय नाही हे आमेरीकन राज्यकर्त्यांना समजत असणार. गरज भारतालाही असेल पण पंतप्रधान झाल्यावर मोदींना बोलवतील का? मोदींना बोलवतील का? म्हणून भारताच्या पंतप्रधानपदाला लाचारीचे स्वरूप आणणे अयोग्य वाटते. भारताचा पंतप्रधान अबकड आहे, भारतीय जनतेचा राजकीय प्रतिनिधी आहे तो मग अबकड असो का हळक्षज्ञ त्याची किंमत आधी भारतीयांनी करावयास शिकले पाहिजे. या संदर्भाने मोदींची प्रतिक्रीया जबाबदार पणाची आहे. बिजेपीचे आणि भारताचे विरोधक हा मुद्दा चर्चेत ठेवत असतील तर हरकत नाही. बिजेपी खासकरून मोदी समर्थकांनी कखगघ देश कोणताही असो आमच्या पंतप्रधानाशी चर्चा करत नसेल तर गेला उडत अशी भूमीका ठेवली पाहिजे. बिजेपी खासकरून मोदी समर्थक या मुद्यावर डिफेन्सीव होऊन या बातम्यांना प्रसिद्धी देण्यास का हातभार लावतात? तसे तर तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा परराष्ट्रांशी चर्चा करताना भारताचा पंतप्रधान भारताचा पंतप्रधान आहे. आम्ही देवयानी खोब्रागडेंचा मान राखला जाण्या करता तडजोड नाकारतो पंतप्रधानाच्या बाबतीत का तडजोड करावी ? मला वाटते अशा बातम्यांना अधिक कुरवाळू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 04/23/2014 - 17:13

In reply to एवढं का कुरवाळताहेत ? by माहितगार

Permalink

परफेक्ट!

निवडणुका पक्ष लढवतात, पण निवडून आलेला पंतप्रधान आणि सरकार हे सबंध देशाचं असतं.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 04/23/2014 - 17:52

In reply to एवढं का कुरवाळताहेत ? by माहितगार

Permalink

असेच आहे...

जे काही २००५ ला मोदींविरोधात झाले ते शक्य होते कारण (१) सुप्रिम कोर्टाचा निकाल लागला नव्हता पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे (२) ते केंद्रीय मंत्रीमंडळात नव्हते. अर्थात त्यांना आंतर्राष्ट्रीय स्तरावर राजनैतिक पासपोर्टची गरज नव्हती. जे काही झाले ते व्यक्तीगत व्हिसासंदर्भात झाले होते. उद्या ते पंतप्रधान झाल्यास हे समिकरण बदलते. जर त्यांना तरी देखील अधिकृतपणे नाकारण्यात आले तर त्याचा अर्थ भारत-अमेरीका राजनैतिक संबंध अधिकृतरीत्या संपले असा होतो. जे भारत सोडा अमेरीकेस देखील चालणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on गुरुवार, 04/24/2014 - 11:32

In reply to एवढं का कुरवाळताहेत ? by माहितगार

Permalink

बातमी परत एकदा नीट वाचा!

अमेरिकेतील अनेक तज्ञ नागरिक, सल्लागार, कायदेतज्ञांनी भारताकडे अमेरिकेने अधिक लक्ष पुरविले पाहिजे यासाठी आग्रह धरू लागले आहेत. निवडणुकांसंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या सर्वेक्षणांनुसार भाजप आघाडी यंदा सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. अशा वेळी मोदी पंतप्रधान बनलेच तर ओबामांनी भारताबरोबरचे संबंध वाढविण्यास पुढाकार घेतला पाहिजे असे तेथील जाणकार तज्ञांचे मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on गुरुवार, 04/24/2014 - 12:01

In reply to बातमी परत एकदा नीट वाचा! by आयुर्हित

Permalink

पोच

सध्या केवळ पोच देतो. धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Mon, 04/21/2014 - 18:08

Permalink

मला तर ब्वॉ राम मंदीर हवे.

मला तर ब्वॉ राम मंदीर हवे. आणि ते झालं तर क्रिडा धोरण
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Mon, 04/21/2014 - 18:22

Permalink

आता सिरियस प्रतिसाद

महत्वाच्या उतरत्या भाजणीत १. महागाईच्या दरावर नियंत्रण व घट २. महिला सुरक्षा (पण याबाबत केंद्र सरकार काय करू शकेल हे नाही माहीत. फक्त मोठ्या शिक्षेची तरतूद करून हा प्रश्न सुटेल असं नाही वाटत.) ३. शेतकरी, कामगार, लघूद्योग, मासेमारी, पर्यटन आदी क्षेत्रांकडे लक्ष देणे (खरं तर हा मुद्दा फार व्हेग आहे) ४. नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणे ५. आर&डी कडे लक्ष देणे
  • Log in or register to post comments

Submitted by दुश्यन्त on Mon, 04/21/2014 - 18:44

Permalink

कोणीही पंतप्रधान झाला तरी

कोणीही पंतप्रधान झाला तरी त्याच्याकडून माझ्या मिनिमम अपेक्षा याच राहतील. +१
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Mon, 04/21/2014 - 18:50

Permalink

तर...

एखाद्या स्पेसीफीक विषयावर मोदि काय काम करतील सांगता येत नाहि. पण पायाभूत सुवीधा, शेती व निगडीत उद्योग यामध्ये बरीच गुंतवणुक होईल. भ्रष्टाचार विरोधि एक-दोन कायदे होतील, पण प्राणपणाने भ्रष्टाचार निर्मुलन होणार नाहि. मोदि एकुणच सुस्तावलेल्या नोकरशाही व बाकि सरकारी यंत्रणेला झाडुन कामाला लावतील. त्यामुळे एकंदर कारभारात गतीशीलता येईल व काहि प्रमाणात भ्रष्टाचाराचा कचरा काठाला लागेल. मोदि सरकार बनल्यास 'मोदि फॉर्मुला' नावाचा त्रस्त प्रकार भाजपमधे आकाराला येईल व त्यावरुन युपी-बिहार वगैरे राज्यात स्टेट इलेक्शन लढले जाईल. मोदिंच्या कार्यक्रम पत्रिकेत अशा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बदल केले जातील. पायाभूत सुविधा, शेती, महिला सबलीकरण व सुरक्षा, थोडंफार अल्पसंख्यांक समाजाकरता, सैन्यदलाकरता आर्थीक तरतुदीत वाढ, शस्त्रास्त्र खरेदी, आयटी सेक्टर... इ. बाबतीत मोदि प्राधान्याने काम करतील असं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 04/21/2014 - 18:54

Permalink

चीन मैत्री करण्याच्या लायकीचा

चीन मैत्री करण्याच्या लायकीचा नाही अन युद्ध करणं आपल्याला भारी पडेल. चीनला आतूनच पोखरला पाहीजे. हे भेंडी चीनी जिकडेतिकडे माजलेत. असो. इति राजकारणविषयक लेखनसीमा :P पण जाणकारांची मते ऐकायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Mon, 04/21/2014 - 19:13

Permalink

पहिल्या ५ वर्षात खांग्रेसच्या तुलनेत....

२० ते ३० टक्के कामे होतील,बाकी दोन्ही पक्षांच्या जाहिरनाम्यात फारसे अंतर नाही.पाकिस्तान अथवा चिन दोघांशीही युद्ध्द कोठल्याही परिस्थीत नको आहे.फक्त त्यांना योग्य दहशत बसावी, बाकी चिन अमेरिकेलाही फारशी भिक घालत नाही,त्यामुळे चिनविरोधात भारत,अमेरिका व रशिया अशी संयुक्त आघाडी तयार करता आली तरच त्यांना रोखता येवु शकेल.बाकी शेतकर्‍यांची परिस्थिती थोडीफार सुधारली तरी देशावर उपकार होतील मोदींकडुन फक्त पाच वर्षात फारसे बदल अपेक्षित नाहीत्,फक्त भ्रष्टाचार्‍यांना थोडा लगाम घातला तरी बरेच साध्य होइल. मोदींना निदान १० वर्ष तरी मिळायला हवीत.नाहीतर ए.के.४९ आहेच पुढच्या पंचवार्षिकला.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Mon, 04/21/2014 - 20:11

Permalink

वरील कुठलेही काम मोदीने नाही

वरील कुठलेही काम मोदीने नाही केले तरी चालेल, देशाची जनसंख्या प्रचंड वेगाने वाढते आहे त्या साठी आधारभूत व्यवस्था कायम करणे गरजेचे १. देशातील सर्व राजमार्ग ४-६ लेनचे करणे अत्यंत गरजेचे. स्वर्णिम चतुर्भुजचे कार्य जे २००७ मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होते अद्याप ही बाकी आहे पुढील २-३ वर्षात पूर्ण करणे. शिवाय मोठ्या शहरांना जोडणारे एक्सप्रेस highways. जेणे करून एका दिवसात ट्रक ८००-१००० किमी अंतर कापू शकेल अशी व्यवस्था ९ टन च्या जागी २४, ३२ टन चे ट्रक धावू शकतील. २. संपूर्ण देशात रेल्वे ट्रक दुप्पट करणे आणि स्वर्णिम चतुर्भुज प्रमाणे स्वर्णिम चातुर्भूत डी एफ सी. ३. श्रीलंका आणि भारत जोडणारा सेतू (JICA या प्रोजेक्ट वर सिद्धांतीक रित्या तैयार आहे - हेतू चीनचा प्रभाव कमी करणे) फायदा: परिवहन लागत कमी होईल. शेतकरी आणि उद्योगांना फायदा शिवाय ग्राहकांना ही हरीयाणातून ताजा भाज्या २४ तासांच्या आत मुंबई, बंगलोरला पोहचतील. महागाई आपोआप कमी होईल. उद्योग लहान शहरांकडे वळतील. रोजगार वाढेल. ३. पाणी: पाण्यावरून देशाचे तुकडे होऊ शकतात. नदी जोड परियोजना (कुणाच्या दबावामुळे कचर्याच्या टोपलीत टाकली काही कळणे अशक्य) तातडीने राबवावी लागेल. ४. वीज: मुफ्त आणि स्वत: वीज देणे बंद करावे लागेल. (आत्ताच UP दिल्लीहून फक्त ६० किमी दूर, दिवसातून ४-५ तास वीज उपलब्ध आहे. लोक ही बिल देत नाही. )लोक generator महिन्याचे २००० हून अधिक खर्च करतात ते ही फक्त रात्री चालवतात. सोलर, विंड, गोबर गस इत्यादीवर भर आणि तत्सम शोध कार्य ही करावे लागेल. वीज उत्पादन १० वर्षात दुप्पट केल्या शिवाय गरज भागणार नाही. हे चार कार्य केले तरी मिळवली. या सुविधा देशात सर्वत्र पोहचल्या कि बाकी लोक स्वत: आपल्या साठी रोजगार निर्मिती करून घेतील. सरकारला काही करायची गरज नाही. या सर्व प्रोजेक्ट साठी ३०-४० लक्ष कोटी लागतील. बाकी लोकपाल वैगरे रिकामटेकड्या लोकांच्या चर्चे साठी ठीक आहे. वास्तवात कारण तो पण एक मलाई खाणारच ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 04/22/2014 - 16:12

In reply to वरील कुठलेही काम मोदीने नाही by विवेकपटाईत

Permalink

प्रतिसाद पटला..

विवेकजी, प्रतिसादाशी सहमत..
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Mon, 04/21/2014 - 22:01

Permalink

मोदी पंतप्रधान झाले तर

मोदी पंतप्रधान झाले तर त्यांच्याकडून आणि 'एनडीए'कडून माझ्या पाच मुख्य अपेक्षा अशा आहेत: १. सामाजिक संतुलन साधत विकासाला चालना देणारे आर्थिक धोरण (भूसंपादन, धरणं, औद्योगिक विकास अशा गोष्टी करताना कुणाचेही शोषण होणार नाही, कुणावरही जबरदस्ती होणार नाही अशी अंमलबजावणी) २. धार्मिक/ साप्रदायिक / जातीय सलोखा आणि शांतता राखणारे वातावरण ३. पारदर्शी प्रशासन (ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास थोडी मदत होईल) ४. कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी आणि जलद न्यायप्रक्रिया ५. आंतररराष्ट्रीय संबंध सुधारणे (शेजारी देशांशी आपले संबंध सध्या अतिशय ताणले गेले आहेत) आणि आणखी एकः ६. अंतर्गत सुरक्षितता सर्वांसाठी आणि विशेषत: स्त्रियांसाठी
  • Log in or register to post comments

Submitted by चैतन्य ईन्या on Tue, 04/22/2014 - 16:34

In reply to मोदी पंतप्रधान झाले तर by आतिवास

Permalink

सामाजिक संतुलन

सामाजिक संतुलन साधत विकासाला चालना देणारे आर्थिक धोरण (भूसंपादन, धरणं, औद्योगिक विकास अशा गोष्टी करताना कुणाचेही शोषण होणार नाही, कुणावरही जबरदस्ती होणार नाही अशी अंमलबजावणी)>> हे जरा सविस्तर सांगू शकेल का कोणी? इथे मुद्दाम खुसपट काढणे हा हेतू नाहीये पण नक्की काय करायला पाहिजेल? सद्य परिस्थिती अशी आहे की विकास म्हणजे नक्की काय ह्याची नक्की कोणी व्याख्या करेल का? कारण एखादी गोष्ट करायची तर कोणाला तरी त्रास हां होणारच. सामाजिक संतुलन हे फारच संदिग्ध विधान किंवा संकल्पना आहे. नक्की कसे करायचे हे कोणी दाखवेल का? छोट्या प्रयोगात एखाद्या गावात काहीतरी होते पण प्रचंड लोकसंखेच्या साठी ते चालू शकेल का? मुळात सगळी ओईल इकॉनॉमी आहे पण पर्यायी इंधन सापडत नाही तोपर्यंत काय करायचे? तासही बऱ्याच लोकांना अंधारातच राहावे लागत आहे. त्यांना ते नको आहे मग काय करायचे? इतकी अफाट लोकसंख्या आहे. ती कमी करायला सांगणे आपल्याला जमत नाही. स्पष्ट भूमिका घेणे एकाही नेत्याला जमत नाही. लगेच धार्मिक भावना वगैरे दुखावल्या जातात. मग पर्याय काय आहे? इथे मार्ग कोणाला सापडला आहे का हे हवे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 01/12/2018 - 18:08

In reply to मोदी पंतप्रधान झाले तर by आतिवास

Permalink

२. धार्मिक/ साप्रदायिक /

२. धार्मिक/ साप्रदायिक / जातीय सलोखा आणि शांतता राखणारे वातावरण
अतिवास यांचा पॉईंट २ जरा अवघड दिसतंय एकंदरीत आज .
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 01/12/2018 - 19:20

In reply to २. धार्मिक/ साप्रदायिक / by पगला गजोधर

Permalink

छिद्रान्वेष

छिद्रान्वेष
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Fri, 01/12/2018 - 21:55

In reply to छिद्रान्वेष by सुबोध खरे

Permalink

बाकीच्या मुद्द्यांवर पग

बाकीच्या मुद्द्यांवर पग समाधानी आहेत असा पण अर्थ निघतो त्यातून :) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 01/12/2018 - 23:22

In reply to २. धार्मिक/ साप्रदायिक / by पगला गजोधर

Permalink

+१

+१ जंगजंग पछाडूनसुद्धा जनता सातत्याने नाकारत असल्याने खांग्रेस, डावे, रिपब्लिकन इ. विरोध पक्शांनी आता हार्पिक पटेल, मेवाणी, उमर खलिद अशा जातीयवादी व देशद्रोह्यांच्या मदतीने जातीय आगी लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कोरेगाव-भीमा दंगल, टिपू जयंती, पटेल व मराठा राखीव जागा, जनेवितील देशद्रोही घोषणा, संघ कार्यकर्त्यांच्या वाढत्या हत्या, दलित वि. हिंदू, मराठा वि. दलित, दलित वि. ब्राह्मण, मराठा वि. ब्राह्मण अशी पेटवापेटवी, पाकिस्तानशी व चीनशी गुपचुप हातमिळवणी, गडकरींच्या पुतळ्याची नासधूस असे प्रकार अथक सुरू असल्याने देशात धार्मिक/ साप्रदायिक / जातीय सलोखा आणि शांतता राखणारे वातावरण राखणे अवघड झाले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 01/13/2018 - 06:51

In reply to +१ by श्रीगुरुजी

Permalink

>>पटेल व मराठा राखीव जागा

>>पटेल व मराठा राखीव जागा या मागण्या मोदी पंतप्रधान झाल्यावर आलेल्या नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 01/13/2018 - 07:31

In reply to >>पटेल व मराठा राखीव जागा by नितिन थत्ते

Permalink

या मुद्द्यांवरून पेटवापपेटवी

या मुद्द्यांवरून पेटवापपेटवी मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच सुरू झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 01/13/2018 - 13:06

In reply to >>पटेल व मराठा राखीव जागा by नितिन थत्ते

Permalink

या मागण्या मोदी पंतप्रधान

या मागण्या मोदी पंतप्रधान झाल्यावर आलेल्या नाहीत. इतर गोष्टी मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच सुरू झाल्या आहेत ना?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 04/21/2014 - 22:11

Permalink

(१) भ्रष्टाचारमुक्त (२)

(१) भ्रष्टाचारमुक्त (२) सुशासन देण्याचा (३) प्रामाणिक प्रयत्न बरेच काही मिळवून देईल... इतर सर्व गोष्टी त्यांच्याच बायप्रोडक्ट्स आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Mon, 04/21/2014 - 22:42

Permalink

वीज, पाणी, संवाद (कम्युनिकेशन

वीज, पाणी, संवाद (कम्युनिकेशन) आणि रस्ते हे प्रगतीचे चार खांब बळकट करणे. त्याच्या जोरावर मग पुढचा विकास करता येईल. म्हणजेच, - ग्रासरूट लेवल वरून भ्रष्टाचार कमी करणे,त्यासाठी जिथे जिथे शक्य आहे त्या त्या व्यवहारांत पारदर्शकता आणणे. - शिक्षणाच्या संधी सर्वांना समान देणे, - कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणे - गुन्हा दाखल करणार्‍यांना नव्हे तर गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटावी. - काश्मीर, अरुणाचल प्रदेश वगैरे 'डॉटेड लाईन्स' वाल्य सीमारेषांचा प्रश्नावर दीर्घकालीन अथवा कायमस्वरूपी उपाय. अजून चिक्कार ईच्छा आहेत पण हर ख्वाईशपे दम निकलें.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Tue, 04/22/2014 - 01:18

Permalink

एवढे सगळे मोदींनी करायचे?

वरची एवढी भली मोठ्ठी यादी बघून खरेच धन्य झालो! एवढे सगळे मोदींनी करायचे? काही हरकत नाही, हे सारे काही (किंबहुना याच्या पेक्षाही ३ पट जास्त)काम मोदींना करायला आवडेल. ते त्यांना करायला मिळेल, ह्याची फक्त १००% व्यवस्था झाली पाहिजे. थोडक्यात काय तर २७२+ जागा हव्यात पुढच्या १० वर्षासाठी, बस अजून काही नको. एकदा सर्वांना काम मिळाले ना तर पहा १०%पेक्षा जास्त GDP ग्रोथ राहील भारताची! भारत स्वतंत्र होऊन ६६ वर्षे झालीत. निदान ५०वर्ष तरी कॉंग्रेस चेच सरकार होते, मग त्यांनी काय केले इतकी वर्ष? आणि आपण का हे सर्व बघत बसलो? "गरिबी हटाव म्हणत गरीब या देशात गरीबच कसे राहतील?" हे पाहणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 04/22/2014 - 02:47

In reply to एवढे सगळे मोदींनी करायचे? by आयुर्हित

Permalink

मग त्यांनी काय केले इतकी वर्ष?

अगदी सुरुवातीपासुन सांगायचं तर यादी फार लांबेल. अगदी थोडक्यात सांगायचं तर आय.आय.टी सारख्या संस्था, अ‍ॅटोमीक रिसर्च सेंटर, इस्रो, विवीध इस्पीतळं, भाक्रानांगल सारखी धरणं (त्याचं काम स्वातंत्र्य मिळण्यापुर्वी सुरु झालं हे खरं असलं तरी), रेल्वे-विमानसेवांचं जाळं, हरित आणि धवल क्रांती, सैन्यदलाचा हस्तक्षेप नाकारणार्‍या निवडणुका राबवुन लोकशाहिची मजबुती, ग्लोबलाझेशन, दलित, अल्पसंख्यांक व इतर दुर्बल घटकांच्या हक्कांचं संरक्षण, शिक्षण आरोग्यादी जीवनावष्यक सेवाकेंद्रांचं गठन... यादि अनंत आहे... नकारात्मक बाबींची देखील.
आणि आपण का हे सर्व बघत बसलो?
मग पर्याय काय होता? कम्युनिस्ट? समाजवादी? हिंदुत्ववादी? मोदिंना मोठं करताना काँग्रेसची लाईन छोटी करण्यात काहि पॉइण्ट नाहि. मोदिंकडुन अगदी चमत्काराची देखील आशा करण्यात काहि पॉइण्ट नाहि. जनता आपलं भाग्य स्वतः निवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Tue, 04/22/2014 - 03:19

In reply to मग त्यांनी काय केले इतकी वर्ष? by अर्धवटराव

Permalink

भारताला मोठे करायचे आहे

जे काय करून ठेवले ते आमचे सर्वांचे नशीबच म्हणायचे आणि काय! काँग्रेसचीच काय कोणाचीही लाईन छोटी करण्याची तर मुळीच गरज नाही.असो. काल कॉंग्रेस होती,आज मोदी आहेत, उद्या अजून कोणी येईल. भारताला मोठे करायचे आहे हेच सर्वांनी एकजुटीने मनावर घेतले पाहिजे. आणि हे vision फक्त मोदिंकडे आहे म्हणून मोदींना मोठे करायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 04/22/2014 - 03:49

In reply to भारताला मोठे करायचे आहे by आयुर्हित

Permalink

आणि हे vision फक्त मोदिंकडे आहे

मोदिंकडे व्हिजन आहे याच्याशी सहमत. फक्त मोदिंकडे व्हिजन आहे याच्याशी असहमत. गेल्या सहा दशकात ज्याकाहि चांगल्या गोष्टी झाल्या त्या केवळ नशिबाने म्हणुन नाहि. त्याकरता घाम आणि रक्त आटवलं पब्लिकने आणि राज्यकर्त्यांनी. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Tue, 04/22/2014 - 11:37

In reply to आणि हे vision फक्त मोदिंकडे आहे by अर्धवटराव

Permalink

सहमत. मोदींना मोठं करायचे

सहमत. मोदींना मोठं करायचे म्हणून काँग्रेसला छोटे करायची काहीच गरज नाही. फक्त आताच्या घडीला उपलब्ध असलेल्या पर्यायांमध्ये मोदी हाच सक्षम पर्याय आहे इतकेच.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 04/22/2014 - 01:25

Permalink

फार नाही... त्यांनी हवे ते करावे.

सुरुवात मात्र टिम अण्णांनी सादर केलेले जनलोकपाल मंजुर करुन करावी.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 04/22/2014 - 09:44

Permalink

आभार!

सगळ्यांचे आभार! सध्यातरी महागाईवर नियंत्रण महिला सुरक्षा भ्रष्टाचार निर्मुलन पायाभुत सुविधांमध्ये वाढ (रस्ते, वीज, पाणी वगैरे) आंतरराष्ट्रीय संबंधात सुधार/बदल या प्राथमिकता असाव्यात अशी आतापर्यंत प्रतिसाद दिलेल्या 'बहुमताची' अपेक्षा दिसतेय. गंमत अशी वाटली की निवडणुक प्रक्रियेत सुधारणा, पोटासारखे कायदे आणणे, टॅक्स रिफॉर्म्स, शस्त्रास्त्र खरेदी आणि काळापैसा या मुद्द्यांवरही भाजपा जोर देत असताना (व काँग्रेसच्या तुलनेत या मुद्द्यांवर भाजपाची वेगळी विचारधारा असताना) लोकांच्या अपेक्षा मात्र या मुद्द्यांना प्राधान्यावर घेत नाहियेत याचा सारांश बर्‍यापैकी काँग्रेसचाच कार्यक्रम राबवावा, फक्त तो राबवु शकेल असा नेता भाजपात असल्याचे पर्सेप्शन असल्याने भाजपाला मत दिले जात आहे असा घेता येईल का? थोडक्यात पक्षाला मत न देता मोदी या व्यक्तीला मत दिलं जातंय असा मिडीयात जो बोभाटा होतोय तो पूर्णपणे चुकीचा नाहीये का? बाकीच्या सदस्यांच्याही मताच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Tue, 04/22/2014 - 11:41

In reply to आभार! by ऋषिकेश

Permalink

थोडक्यात पक्षाला मत न देता

थोडक्यात पक्षाला मत न देता मोदी या व्यक्तीला मत दिलं जातंय असा मिडीयात जो बोभाटा होतोय तो पूर्णपणे चुकीचा नाहीये का?
अर्थातच नाही. मी व्यक्तीशः अडवाणी-गडकरींच्या भाजपाला मत देताना नक्कीच विचार केला असता. मोदींना मत देताना जो उत्स्फूर्तपणा आहे तो त्यवेळेस नक्कीच नसता, अर्थात शेवटी काँग्रेसपेक्षा हे बरे असाच विचार केला असता, पण नॉट फ्रॉम बॉटम ऑफ द हार्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 04/23/2014 - 22:13

In reply to आभार! by ऋषिकेश

Permalink

महागाईवर नियंत्रण

महागाईवर नियंत्रण महिला सुरक्षा भ्रष्टाचार निर्मुलन पायाभुत सुविधांमध्ये वाढ (रस्ते, वीज, पाणी वगैरे) आंतरराष्ट्रीय संबंधात सुधार/बदल
हे धोरण या गोष्टीचा भाग येतात का त्याबाबत साशंक आहे. या गोष्टी बेसीक गरजा आहेत. त्या कॉग्रेसचं धोरण या नावाखाली टाकणं हे बरोबर वाटत नाही. ३७० कलम, समान नागरी कायदा, नद्या जोड, महिला आरक्षण, मराठा आरक्षण या स्पेसिफिक गोष्टी धोरणात्मक निर्णय म्हणून वर्गिकृत करता येतील. त्यामुळे ऊपरीनिर्दिष्ट ३-४ कलमं कुठल्या एका राजकिय पक्षाच्या धोरणाचा भाग आहेत असं म्हणणं सयुक्तिक ठरणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 04/24/2014 - 09:19

In reply to महागाईवर नियंत्रण by अनुप ढेरे

Permalink

अब आया उंट....!

अब आया उंट....! ;) खास भाजपाच्या अशा धोरणांसाठी मोदींना मत देणारे कमी आहेत. वरील गोष्टी करणार नाही असे कोणीच म्हणत नाही. मात्र एकदा त्याना मत दिलं की मात्र ते कोणतेही धोरण राबवु शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 04/24/2014 - 09:41

In reply to अब आया उंट....! by ऋषिकेश

Permalink

ही भीती कधीही कुठल्याही

ही भीती कधीही कुठल्याही निवडणुकीत वाटू शकते. ही पर्टिक्युलर निवडणूक किंवा एक पर्टिक्युलर पक्ष वेगळा काढू शकत नाही आपण. आणि जर माझ्या पसंतीचं धोरण त्यांनी नाही राबवलं तर फुड्ल्या निवडणूका आहेतच खाली पाडायला त्यांना. आता ते हुकुमशहा झाले तर काय आणि त्यांनी लोकशाही व्यवस्था बंद केली तर काय अश्या भीतीचं कोणीच काही करू शकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 04/24/2014 - 10:27

In reply to ही भीती कधीही कुठल्याही by अनुप ढेरे

Permalink

काही धोरणात्मक बदल हे

काही धोरणात्मक बदल हे इर्रिव्हर्सिबल असतात काही देशाची आर्थिक धोरणे कायमची बदलणारे असतात. मोदींच्या रुपात देश ठाम भांडवलशाहीकडे कूस बदललेल मात्र असा बदल होण्यासाठी आवश्यक असे विविध मुल्यांची जपणूक करणार्‍या कायद्याचे फ्रेमवर्क भारतात नसल्याने होणारे शोषण भयावह असेल अशी भिती असेल तर?
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 04/22/2014 - 09:59

Permalink

एक पैज लावून सांगतो....

एक पैजेवर सांगतो महागाई नियंत्रण होणार नाही. करायचे असेल तर आय टी वाल्याना ५१ टक्के आयकर लावावा लागेल. धोनी ई ना ८५ टक्के आयकर लावावा लागेल. मोठ्या शेतकर्‍याना आयकर चालू करावा लागेल. शेतकर्‍याना दिली जाणारी किमान किंमत कमी करावी लागेल. बारशा पासून बाराव्या पर्यंतच्व्या सर्व जेवणावळीवर परवाना लागू करावा लागेल. मुख्य म्हणजे मुक्त आयात निर्यात बंद करावी लागेल. त्यापेक्षा आहे हे ठीक आहे असेच मोदी म्हणतील. कारण भाजपा हा काँग्रेसचा आर्थेक व राजकीय धोरणातील चेला आहे. ते ३७०, राममदीर वगैरे सब बकवास !
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Tue, 04/22/2014 - 12:21

In reply to एक पैज लावून सांगतो.... by चौकटराजा

Permalink

महागाई नियंत्रण

महागाई नियंत्रण या विषयावर आपले विचार हे conventional आहेत. परंतु आज यासाठी out of box thinking ची गरज आहे, जी फक्त मोदींकडे आहे. १)tax rate वाढवण्यापेक्षा tax collection वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी mauritius route व अमेरिकेबरोबरची double tax avoidance treaty बंद करावी लागेल. २)जास्त उत्पादन करून नवीन sources तयार करून, शेतकऱ्यांच्या/कारखान्यांच्या/कारखानदारांच्या समस्या कमी कराव्या लागतील. ज्यात शेतापर्यंत पोचणारे रस्ते किंवा शेतमालाचे योग्य व्यवस्थापन, अति उत्पादनामुळे वाहतूक न झाल्याने होणारे नुकसान टाळणे, शेतमालाची योग्य साठवणूक, शेतमालावर प्रक्रिया करणे, व्याज दर कमी करणे, वीज पुरवठा २४ तास करणे, सुशिक्षित मनुष्यबळ, मार्केटिंग व गुणवत्तेला प्रोत्साहन, भारताची brand value वाढविणे हे प्रमुख आहेत. ३)Petroleum product आणि Edible Oil चे Import कमी करावे लागेल.त्यासाठी solar power and renewable and clean energy वर जोर द्यावा लागेल. ४)Export वाढविण्यासाठी भारतीय SME,कामगारांचे व शेतकऱ्यांचे उचित मार्गदर्शन व शिक्षण हाती घ्यावे लागेल. ५)Indian Railway, Shipping Docks यात आमुलाग्र बदल करून मालवाहतूक वेग दुप्पट आणि क्षमता ५ पट वाढवणे. ६)Planning commission मधील Toilet, CWG,२G, Coal block मधील घोटाळे परत न होऊ देणे. भाजपा हा काँग्रेसचा आर्थेक व राजकीय धोरणातील चेला आहे हे मान्य नाही. पण पुढच्यास ठेसलागल्यामुळे मागचा शहाणा होणारच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Tue, 04/22/2014 - 15:27

In reply to महागाई नियंत्रण by आयुर्हित

Permalink

double tax avoidance treaty

double tax avoidance treaty
यावर तज्ज्ञांच्या मतांच्या प्रतीक्षेत. मला तर double tax avoidance ही एक गरज वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Tue, 04/22/2014 - 10:00

Permalink

वरिल सगळी कामे ही कोणीही

वरिल सगळी कामे ही कोणीही पंतप्रधान झाला की करतोच. त्यात काही विषेश नाही . मुळात हे प्रश्न का निर्माण होतात त्याच्या मुळाशी जायला पाहिजे. अन्नधान्याच्या, बाबतीत पवारांच्या मते आपण विक्रमी उत्पादन (उदा.साखर,दुध उत्पादन अग्रेसर) करुन सुध्दा महागाई आहेच. कारण जनसंख्या वाढीवर नियंत्रण नाहीये. ते जर कमी झाले. तर अर्धे जग जिंकले. मग महागाई भ्रष्टाचार आपोआप कमी होतील.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 04/22/2014 - 10:12

In reply to वरिल सगळी कामे ही कोणीही by प्रमोद देर्देकर

Permalink

अन्नधान्याच्या, बाबतीत

अन्नधान्याच्या, बाबतीत पवारांच्या मते आपण विक्रमी उत्पादन (उदा.साखर,दुध उत्पादन अग्रेसर) करुन सुध्दा महागाई आहेच. कारण जनसंख्या वाढीवर नियंत्रण नाहीये
तसे नसावे. लोकसंख्या वाढ हा प्रश्न आहे की नव्या काळातले अ‍ॅसेट हे ठरायचेय. विक्रमी उत्पादन होऊनही महागाई आहे याचे कारण वितरण व्यवस्थेतील तृती आहे. नुसते अन्न निर्माण करून पुरत नाही तर ते योग्य प्रमाणात वितरीत व्हावे लागते, साठवणुकीच्या सुविधा चांगल्या असाव्या लागतात शिवाय हेच पवारसाहेब अर्ध्यागोष्टींच्या निर्यातीला परवानगी देतात मग या गोष्टी इथे उत्पादित होतात नी बाहेर जातात. अर्थात डिमांड-सप्लायचे गणित कोलमडते, त्यात लोकांकडे वाढलेल्या लिक्विडीटीमुळे त्यांनाही परवडते - डिमांड वाढते. मग महागई वाढते
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 04/22/2014 - 12:04

In reply to अन्नधान्याच्या, बाबतीत by ऋषिकेश

Permalink

स्तुत्य परंपरा :)

लोकसंख्या वाढ हा प्रश्न आहे की नव्या काळातले अ‍ॅसेट हे ठरायचेय.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Tue, 04/22/2014 - 15:28

In reply to स्तुत्य परंपरा :) by माहितगार

Permalink

साहेब खरं आहे हो पण हे.

साहेब खरं आहे हो पण हे.
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on गुरुवार, 04/24/2014 - 00:09

In reply to वरिल सगळी कामे ही कोणीही by प्रमोद देर्देकर

Permalink

रुपया मजबूत करा

प्रमोद देर्देकरजी, पवारांच्या मते आपण विक्रमी उत्पादन (उदा.साखर,दुध उत्पादन अग्रेसर)करुन सुध्दा महागाई आहेच इच्यामारी, पवार तुम्हाला टोपी लावतात आणि तुम्ही घालतात देखील. साखरेचे उत्पादन जास्त असते तर पाकिस्थानातून कशाला आयात करावी लागली असती साखर? पेप्सी/कोक सारख्या कंपन्या त्यांच्यासाठी स्पेशल साखर ५ पट भावाने आयात करतात. आपल्या साखरेला कोणी विचारत नाही म्हणून आजवर PDS च्या माध्यमातून खपवली जाते. दुध उत्पादन जास्त असते तर प्रत्येक तालुक्याला दुधाचे पदार्थ/पावडर बनवायचे कारखाने राहिले असते. फक्त आपण गहू उत्पादनात अग्रेसर आहोत, परंतु २०% गहू निव्वळ उघड्यावर साठविल्याने नष्ट होतो. पण गहू आणि ऊस यांच्यामुळे डाळ,तेलबिया,खाद्यतेले दुप्पट भावाने आयात करावी लागतात त्याचे काय? महागाईचे मुख्य कारण आहे वाढलेला डॉलर, जो साधारण ४० रुपये पाहिजे. तो आता ६१ ते ६८ असा आहे, त्यामुळे सर्व इम्पोर्टचे दर वाढतात.ज्यात मोठ्ठा वाटा पेट्रोलियम पदार्थांचा (क्रूड ओईलचा)असतो. त्यामुळे ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढते. व सगळे भाव दीडपट व डबल होतात. ज्यावेळेला आपल्या देशातून भरघोस माल निर्यात होईल व परकीय चलन मिळेल(जसे आज IT/ITES मधून मिळते आहे) हे वाढवावे लागेल व त्याने रुपया मजबूत होईल. परकीय प्रवासी आणूनही त्यांच्या कडून आपल्याला परकीय चलन मिळेल. त्यासाठी तर मोडी उद्या वाराणसी तून उभे राहत आहेत, जेणे करून एक नवीन tourist destination तयार होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by कलंत्री on Tue, 04/22/2014 - 10:31

Permalink

मोदी जर विरोधी पक्ष नेते झाले तरीही.....

मोदी प्रंतप्रधान झाले तर ही या यादीवर ते नक्कीच काम करु शकतील यात संशय नाही. लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्षही अपेक्षित असतोच असतो. मोदींनी कोणत्याही भूमिकेत प्रभावी काम करावे हीच अपेक्षा. हीच अपेक्षा राहुलनेही पूरी करावी. विरोधी पक्ष नेता असतांनाही सत्ताधारींवर वचक ठेवता येतो. आपला आणि आपल्या पदाचा मान जपता येतो. हेही पूढच्या ५ वर्षात दिसावे.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 04/22/2014 - 12:28

Permalink

मला सगळ्याच वरील पैकी सगळंच

मला सगळ्याच वरील पैकी सगळंच करावं अशी अपेक्षा आहे! पण.. खालील गोष्टी नक्की कराव्यात.. १. दारिद्र्य रेषेखालील लोकांना जे फुकट अन्न धान्य वाटत आहेत ते बंद करावं. "अन्नसुरक्षे" पेक्षा "रोजगार सुरक्षा" द्यावी. सगळ्यांना काम मिळेल असं पाहिलं तर मग असं फुकट धान्य वाटायची गरज रहाणार नाही. कारण ते धान्य आमची कामवाली (आमचीच असं नाही.. बर्‍याच कामवाल्या..) बाहेर परत विकतात. ह्या योजनेत मिळणारा तांदुळ डोसे /इडली करायला चांगला असतो म्हणुन तो विकल्या जातो. त्यांना तो २-३/ किलो मिळत असावा (नक्की माहित नाही.. पण अत्यल्प किंमतीत मिळतो हे नक्की) सध्या कामवाल्यांकडे तो २०/- किलो विकत मिळतो. मला फुकट अन्न देऊन एखाद्याची काम करण्याची गरजच मारुन टाकणं फार फार चुकीचं वाटतं. अशानी प्रश्न सुटणार नाहीत, वाढतील.. २. ज्या लोकांनी आरक्षणाचा फायदा घेऊन शिक्षण घेतलं आहे, नोकरी मिळवली आहे आणि स्वतःची परिस्थिती सुधारली आहे अशांच्या पुढच्या पिढीला आरक्षण न देण्याचा निर्णय घेणे. अतिशय श्रीमंत असुनही (घरात स्कॉर्पिओ, नोकर चाकर, महागड्या बाईक्स..) आरक्षणचा फायदा घेऊन इंजिनिरिंगच्या फी मध्ये भरघोस सवलत घेतलेले पाहिले आहेत. या पेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं (अर्थात ह्या भारतदेशात आपण गरीब आहोत हे कागदोपत्री दाखवणं काहीही अवघड नाही..). आणि ते ही एका पिढी पुरतेच.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com