राम-राम मंडळी.. लै दिवसांनी बोर्डावर येणं झालंय...
तर सांगायचं म्हणाल तर असं, की सध्या मी मेघालयात आहे, आणि मेघालय सरकारनी मला आमपाटी नावाच्या एका पहील्या नजरेत "अहाहा ! निसर्गरम्य.." आणि लवकरच पकायला लावणार्या सब-डिव्हीजनला आणून बसवलाय..
तर ऑफीसात बसून-बसून फायलींच्या संगतीत पकल्यावर आणि थोडाफार फिल्डमध्ये लोकांच्या तक्रारी, शिव्याशाप आणि इतर बरंच काही ऐकून झाल्यावर, एका विकांताला आम्ही जरा शिलाँग-चेरापुंजीला भटकून यायचे ठरवले.. (तसाही शिलाँगला माझा "मुंह दिखाई" चा कार्यक्रम व्हायचा होता..)
शिलाँगपासून चेरापुंजी ( लोकली "सोहरा") जवळपास दोन तासांच्या अंतरावर आहे. चेरा-मौसीनग्राम जगात सर्वाधिक पावसासाठी तर प्रसिद्ध आहेच, पण इथे इतरही बर्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या.. उदाहरणार्थ, सेव्हन सिस्टर फॉल्स, जिथे एकाच दरीत सात धबधबे कोसळतात (पण हे पहायला नशीबाची साथ हवी.. पावसाळ्यात बरेचदा दर्या अख्ख्या ढगात बुडालेल्या असतात किंवा पावसाळ्यानंतर धबधबेच आटतात..) चुनखडीच्या गुफापण एक नक्की बघेबल जागा आहे. भुगोलात शिकलेले स्टॅलेक्टाईट्स, स्टॅलेग्माईट्स इथे बघायला मिळतात. बाकी "बादलों में डुबी वादीयां" तर एनी टाईम..
आम्ही हे सगळं आधीच बघीतलेलं असल्यामुळे आम्ही ह्यावेळी थोड्या वेगळ्या जागेवर जायचं ठरवलं.. ही जागा म्हणजे "डबल डेकर लिव्हींग रुट्स ब्रिज" अर्थात जिवंत मुळांचा दुमजली पुल.. हे पुल म्हाणजे एक बायो-इंजिनीयरींग वंडर (मराठी शब्द?) आहे. "वार खासी" प्रजातीच्या लोकांनी ह्यांचा शोध लावला..
ह्यांत रबर प्रजातीतल्या (फायकस एलास्टिका) झाडांच्या मुळांना, सुपारीच्या झाडाच्या पोकळ खोडांच्या माध्यमाने नदीच्या किंवा ओढ्याच्या दुसर्या काठाकडे वळवून रोवल्या जाते. एकदा मुलांनी जमीन पकडली की मग बाकीच्या मुळांनाही ह्याच पद्धातीने एकमेकांमधे गुंतवून एक "जिवंत पुल" बनवल्या जातो.. हा पुल बनायला सुरुवात केल्यापासून पुर्ण व्हायला २५-३० वर्षे लागतात आणि एकदा पुर्णपणे विकसीत झाल्यावर असा पुल जवळपास ५०० वर्षेपर्यंत टिकू शकतो..
तर आम्ही "चेरा रिसॉर्ट" नावाच्या जागेहून सुरुवात केली. समोर दिसणार्या दर्या-ढगांमधे कुठेतरी जायचे होते..
इथून आम्ही जवळपास ४-५ किलोमीटर गाडीने गेलो. तिथून दरीत उतरणार्या पायर्यांना सुरुवात होत होती.. (जाण्या-येण्यात तुम्ही जवळपास सात-साडेसात हजार पायर्या चढता-उतरता. आणि हो, पायर्या म्हंजी चांगल्या स्टीप पायर्या, काही ठिकाणी जवळपास ७० डिग्री स्टीप..
तर उतरायला सुरुवात केल्या-केल्या ह्या साहेबांनी वेलकम केलं..
थोड्याच पुढं ह्यांचे भाऊसाहेब आम्हाला "अॅब्स" दाखवत लटकले होते..
आणखी खाली उतरल्यावर आम्हाला पहीला "लिव्हींग रुट ब्रिज" भेटला..
आणखी खाली उतरायचं होतं.. मी मारे माझे रुपकुंड वाले ट्रेक शुज घालून आलो होतो, की च्यायला "रुपकुंड" चढलाय ह्यांनी, ये क्या चीज है ? पण हे विसरलो होतो, की त्यांची बर्यापैकी झीज झाली आहे. त्यातच भरपुर पाऊस असल्याने भरपुर शेवाळपण होतंच.. पाय सटकत होते. तेव्हा आनेवालों, सावधान. चांगले शुज घालून या !!
हां तर आणखी खाली उतरल्यावर आम्ही एका छोट्या धबधब्याजवळ आलो, आणि "सुंदर, सुपर्ब, अहाहा" ला मागे टाकणारं दृष्य समोर होतं.. माझ्या आयुष्यात मी पाहीलेला निळंशार पाणी असलेला हा पहीला धबधबा..
ह्या धबधब्याला क्रॉस करण्यासाठी एक लोखंडी झुलता पुल होता. येकदम झक्कास.. कसाबसा एक फूट रुंद असेल. बनवणार्याने "प्रहार" मधला "एक आदमी को चलने के लिए कितनी जगह लगती है?" हा नानाचा प्रश्न समोर ठेवून बनवला असावा. ;-) च्यायला, अशा पुलावरुन आदिवासी लोक पाठीवर ओझं घेवून चालतात म्हणजे कमाल आहे..
आता पुन्हा काही पायर्या चढायच्या होत्या.. (बादवे, सरकारला जिथं-तिथं शिव्या देतांनाच, अश्या कठीण जागेवर नरेगा-बिरेगा मधून पायर्या बांधून लोकांचं जीवन थोडंफार सुकर करतंय सरकार हे पण ध्यानात घ्यायला पाहीजे.) तर बर्यापैकी चालून झाल्यावर आम्ही त्या जगातील एकमेव अश्या "बायो-इंजिनीयरींग वंडर" जवळ पोहचलो..
हा पुल दुमजली तर आहेच, पण जबरदस्त मजबूतही आहे. मिळलेल्या माहीतीनुसार, ह्यावर एकावेळी ५०-६० जण उभे राहू शकतात. आणि आता आणकी एक "मजला" चढवायचा विचार सुरु आहे.. फोटोत एकदम टॉपला दिसत असलेल्या मुळांना रुजवून..
परततांना हे दोघे "काय-बाय" करत होते.. त्यांच्या प्रायवेट मोमेंट्स टिपल्यात म्हणून "सॉरी शक्तिमान"..
दुसर्या दिवशी "डेव्हीड स्कॉट ट्रेल" म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका ट्रेकला गेलो.. हा तसा सोपा रुट आहे. डेव्हीड स्कॉट नावाच्या एका ब्रिटीश रेसिडेंट कमिशनरने हा रस्ता घोड्यावरुन प्रवासला होता.. जवळपास संपुर्ण रस्ता पेव्ह्ड आहे.. हे त्याचे फोटोज..
पुन्हा भेटूया...
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
12578
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
फार सुंदर रे. कधीही न
धन्यवाद...
In reply to फार सुंदर रे. कधीही न by गवि
अर्र. हा प्रतिसाद पहायचाच
In reply to धन्यवाद... by चिगो
निळंशार पाणी असलेला हा पहीला
अगदी अगदी!
In reply to निळंशार पाणी असलेला हा पहीला by आत्मशून्य
बिस्लेरीचे पाणी झक मारेल
In reply to अगदी अगदी! by धमाल मुलगा
धन्स दोस्तांनो..
In reply to बिस्लेरीचे पाणी झक मारेल by मोहनराव
झक्कास सुंदर. मेघालय अजून
लैच भारी
सुंदर ! चिगोराव तुम्ही तर
जबरा आणि अजुन काय लिहिणार ओ,
अहो चिगो मस्त फोटो आहेत!! तो
व्वा व्वा... एकदा
खल्लास रे!
अगदी असेच म्हणतो.
In reply to खल्लास रे! by धमाल मुलगा
+१
In reply to खल्लास रे! by धमाल मुलगा
देखणा निसर्ग,चित्तवेधक फोटो
झाडांची मुळं
भारी फोटू!मुळांचा पूल ही
झकास!
चिगो,
थँक्स प्रास..
In reply to चिगो, by प्रास
अहाहा!
वॉव!!
क्लास्स्स्स. @पैसाताई, मनमोहन
अद्भूत..
१ नंबर
झक्कास चिगो.. स्वर्गाची सफर
भन्नाट
झक्कास! एक नंबर!! - ('ब्रिज'
सुरेख
मस्तच!!!!!!!
कधीही...
In reply to मस्तच!!!!!!! by विलासराव
धन्यवाद. आणखी कोणी यायला तयार
In reply to कधीही... by चिगो
लिव्हींग रुट्स ब्रीज.. हे
व्वा....
In reply to लिव्हींग रुट्स ब्रीज.. हे by मदनबाण
वॉव ! लै भारी !!
In reply to लिव्हींग रुट्स ब्रीज.. हे by मदनबाण
लय म्हणजे लय म्हनजे लय भारी
निशब्द : मुळांचा पुल जो ५००
पाऊस..
In reply to निशब्द : मुळांचा पुल जो ५०० by शिल्पा ब
धन्यवाद
छान
धन्यवाद सुनिलजी आम्हाला पण
मस्त !
मस्तच... बघावे ते नवलचं.
भुमिगत गुहा
एक मस्त लेख चिगो. फोटो तर
वॉव! वाचता..वाचता..फोटो बघता
चिगो, तुमचय मुले मन सहन्त झले
In reply to वॉव! वाचता..वाचता..फोटो बघता by अत्रुप्त आत्मा