पुणे रनिंग
धावण्याचं एवढं वेड लागु शकतं हे मला पुणे रनिंगशी संबंध येईपर्यंत कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पुणे रनिंग (https://www.facebook.com/PuneRunning) हा एक धावण्याची आवड असलेल्या पुण्यातील लोकांचा ग्रुप आहे. धावपटू घडवून भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देणे वगैरे मोठी स्वप्न नाहीत, घटना नाही, पदाधिकारी नाहित, राजकीय पाठींबा नाही पण सामान्य लोकांना धावण्यासारखी आरोग्यदायी सवय लावणे हा साधा स्वच्छ हेतु. एकट्याने खूप वेळ धावणे बहुदा कंटाळवाणे होते म्हणून ग्रुपमधे धावले जाते. या एका पॅशनसाठी पुण्याच्या कानाकोपर्यात लोकं धावतात, नवीन लोकांना धावायला उद्युक्त करतात, मॅरॅथॉन इव्हेंट भरवतात. अप्पा जोगळेकरांच्या स्वाक्षरीप्रमाणे एकमेकांशी स्पर्धा नाही तर स्वतःची कामगिरी सुधारणे हे ध्येय. क्रॉस ट्रेनिंगच्या माध्यमातून पुण्याच्या सायकलिंग कम्युनिटीशी हातमिळवणी होते, सिंहगड, लावासाचे घाट सायकलवरुन, धावत सर केले जातात, ट्रेक्स केले जातात, ट्रायथलॉन (पोहोणे,सायकलिंग,धावणे) भरवल्या जातात. काही वीर द. आफ्रीकेतल्या ’कॉम्रेड्स मॅरॅथॉन (८९किमी)’, ब्राज़िलमधील अल्ट्रामॅरॅथॉन (२१७ किमी), आयर्नमॅन (४.५किमी पोहोणे, १८० किमी सायकलिंग, ४२.१९५ धावणे) अशा स्पर्धात यशस्वीपणे सहभागी होतात. फेसबुकवर मोटीवेशनल क्वोट्स, फोटोज तसेच आपले स्वतःचे, मित्रांचे, कुटुंबाचे धावतानाचे फोटो पहाणे अशी ही आवड वाढत जाते. मग GPS apps, Garmin watches वरुन धावण्याचे रेकॉर्ड ठेवणे, पहिली अर्धमॅरॅथॉन, पहिली मॅरॅथॉन, personal best, १०००़K, २०००K असे माइलस्टोन अशा फेसबुक स्टेटसमार्फत आपली पाठ थोपटुन घेणे असं हे धावण्याच वेड कधी लागतं ते समजत नाही.
आता धावणेच का? तर धावणे हा सर्वात सोपा आणि अत्यंत परीणामकारक व्यायामाचा प्रकार आहे. म्हणजे इतर प्रकार कमी महत्वाचे असे नव्हे. बर्याच जणांना जास्त वजन, गुडघेदुखी यामुळे धावणे दुरापास्त वाटते, त्यामुळे आम्ही चालतो असे म्हणतात. चालणे वाईट नव्हे पण चालण्याने होणार्या व्यायामाला मर्यादा पडतात.
धावणे हा कार्डीओ एक्सरसाइज आहे, म्हणजे हृदयाला व्यायाम म्हणू आपण. साधारणपणे माणसाच्या हृदयाच्या ठोक्यांची गती ही मिनिटाला ६५-७५ असते. म्हणजेच स्नायूंना लागणार्या प्राणवायूचा पुरवठा तेवढया शुद्ध रक्तात होतो. जेव्हा आपण धावतो तेव्हा धाप लागते, म्हणजे नक्की काय होतं तर स्नायूंना जास्त प्राणवायूची गरज असते म्हणजे जास्त शुद्ध रक्त हवे तेव्हा आपोआपच श्वासोच्छवासाची गती वाढते जास्त प्राणवायू फुप्फुसात येतो, हृदयाची गती वाढते आणि जास्त शुद्ध रक्त शरीरात पसरते आणि स्नायूंची गरज पुरवली जाते. हृदयाच्या ठोक्यांची गती किती वाढते तर ते धावण्याच्या हालचालीच्या इंटेन्सिटीवर अवलंबून असते. कधी न धावणार्या माणसाने १००मी स्प्रिंट धावल्यास हृदयाचे ठोके २०० च्यावर वाढू शकतात. एवढा अचानक पडणारा ताणही धोकादायक असतो. पण मर्यादीत वेगाने धावल्यास तो १४०-१८० असु शकतो. अशाप्रकारे वारंवार नियंत्रितपणे हृदयाची गती वाढवून हृदयाची कार्यक्षमता वाढवली जाते.
आता कार्यक्षमता वाढली हे कसे समजायचे तर सामान्य परीस्थितीतील हृदयाची गती (रेस्टींग हार्ट रेट) हळू हळू खाली येते. म्हणजेच आधी शरीराला प्राणवायू पुरवण्यासाठी एका मिनिटात ६५-७५ वेळा रक्त पंप करावे लागत असल्यास तेवढेच शुद्ध रक्त आता मिनिटात ५५-६० वेळा पंप करुन मिळते.
एलिट ॲथलीट्सचा रेस्टींग हार्ट रेट मिनिटाला ४० पर्यंत असतो. तर पूर्ण मॅरॅथॉन धावूनही तो १२०-१३० पर्यंत मर्यादीत राहु शकतो. माझा स्वतःचा रेस्टींग हार्ट रेट २+ वर्षाच्या धावण्याच्या सवयीने ५५-५८ च्या मध्ये आलाय.
चालूनही दमायला होते पण हृदयाची गती खूप वाढत नसल्याने होणारा फायदा नक्कीच खूप कमी असतो. म्हणून नवीन धावणार्यांना वॉक्/रन असा सल्ला दिला जातो. म्हणजे २ मिनिट धावणे मग अर्धे मिनिट चालणे. असे ३-४ किमी पासुन सुरुवात करता येते. मग हळूहळू धावण्याचा वेळ वाढवणे व चालण्याचा वेळ कमी करत जायचे.
आणि कुठल्याही कामात लागतो तसाच मानसिक निग्रह इथेही खूप महत्वाचा. पुणे रनिंगमध्ये असेही लोक घडलेत की ज्यांचे कुठल्याहीप्रकारचे खेळाचे बॅगराउंड नसताना वयाच्या ५५-६०व्या वर्षी धावायला सुरुवात करुन ६ महीन्यांच्या प्रयत्नांत मॅरॅथॉन धावण्यात यशस्वी झालेत.
हे झालं हृदयाचं, पण शेवटी प्रत्येक स्नायूचीदेखिल आपापली क्षमता असते. ती न पहाताच आवेगात जोरात धावल्यास स्नायू, सांधे संप पुकारतात. अति ताणामुळे स्नायूंच्या हालचाली मंदावतात. प्राणवायू मिळत असला तरी शरीरातील कर्बोदके वापरल्यानंतर प्रथिने विघटीत होउ लागतात.. त्यांचे आम्लात रुपांतर होउ लागते. अशा वेळी एक पाउल पुढे टाकणेही अवघड होउन बसते. पण योग्य आणि नियमित प्रशिक्षणाने यासर्व अडथळ्यांवर मात करता येते. साधारणपणे ३-६ महिन्यात अर्धमॅरॅथॉनचा पल्ला गाठता येतो तर वर्षभरात पूर्ण मॅरॅथॉनचा पल्ला गाठता येउ शकतो.
अर्धमॅरॅथॉन म्हणजे २१.१ किमी, म्हणजे साधारण शिवाजीनगर ते सिंहगड पायथा कींवा मुंबईकरांसाठी चर्चगेट ते अंधेरी..
तर मॅरॅथॉन म्हणजे ४२.१९५ किमी, म्हणजे जवळजवळ शिवाजीनगर ते पानशेत कींवा मुंबईकरांसाठी चर्चगेट ते मीरा रॊड/ भायंदर!!! एवढं अंतर धावल्याचे समाधान इतकं असतं की सर्व थकवा,वेदना विसरायला होतं. अशा वेळी या प्रसिद्ध वाक्याची प्रचिती येते . "If you want to win something, run 100 meters. If you want to experience something, run a marathon."
भारतात गेल्या दशकापासून या धावण्याच्या क्रीडाप्रकाराला खूप प्रतिसाद लाभतोय. पुणे रनिंगसारखे अनेक ग्रुप बर्याच शहरात अस्तित्वात येतायत. जवळपास प्रत्येक शहरात आपली एक मॅरॅथॉन आहे. मुंबई मॅरॅथॉनमध्येतर दरवरर्षी विक्रमी स्पर्धक सहभागी होतायत. यावर्षीतर जवळजवळ ४०००० स्पर्धक होते. मॅरॅथॉनमधे ५-६ वर्षाच्या लहान मुलांपासून सत्तरीतले ज्येष्ठ सहभागी होताना दिसले की मनातले सर्व निराशेचे मळभ दूर होते आणि जगण्याला एक नवीन उर्जा मिळते.
वाचने
11160
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त माहिती. हा ग्रूप कुठे
बल स्प्रे, तुम्हे ग्रेत अहत.
In reply to मस्त माहिती. हा ग्रूप कुठे by यशोधरा
ट्रांसलेशन
In reply to बल स्प्रे, तुम्हे ग्रेत अहत. by बालगंधर्व
अपरना तई, खरच खुओप अबहरि अहे.
In reply to ट्रांसलेशन by स्पंदना
ट्रांसलेशन
In reply to अपरना तई, खरच खुओप अबहरि अहे. by बालगंधर्व
बालगंधर्व तुमि पण ग्रेट आहात
In reply to बल स्प्रे, तुम्हे ग्रेत अहत. by बालगंधर्व
+१११११११११११११११११११
In reply to बालगंधर्व तुमि पण ग्रेट आहात by वैभव जाधव
बल स्प्रे,
In reply to बल स्प्रे, तुम्हे ग्रेत अहत. by बालगंधर्व
नैतर कय. बल स्प्रे म्हन्जे बल
In reply to बल स्प्रे, by चिगो
माहितीपूर्ण लेख. या गटात
ग्रेट छान सुंदर उपयुक्त जिओ !!
छान महिती
छानच माहिती...
खुपच सुंदर माहिती
अप्पा जोगळेकरांच्या
महिन्यातल्या एका रविवारी
दर रविवारी सकाळी ६:३० ला पुणे
बाळ सप्रे
पुणे रनिंग'
सर्वच टिप्स अतिशय मार्मिक
In reply to पुणे रनिंग' by सुबोध खरे
मस्त माहिती
शेवटचा आणि तिसरा पॅरा एक नंबर
अरे वा
धावण्याने वजन/ पोट कमी होते..
In reply to अरे वा by दिपक.कुवेत
पुणे रनिंग' पुढे
मस्त!
खुप छान माहिती आणि नेहमी
लेख अन प्रतिसाद दोन्ही आवडले.
+१
In reply to लेख अन प्रतिसाद दोन्ही आवडले. by बॅटमॅन
भेंडी १६ मजली इमारत रोज चढता?
In reply to +१ by शुचि
कोलेस्ट्रॉल करवतय सगळं
In reply to भेंडी १६ मजली इमारत रोज चढता? by बॅटमॅन
हम्म...
In reply to कोलेस्ट्रॉल करवतय सगळं by शुचि
@बॅटमॅन
येस्सार. ठीकठाक सैकलिंग (१५
In reply to @बॅटमॅन by सुबोध खरे
मस्त लेख. डॉक्टरांच्या
एप्रिलच्या शेवटच्या रविवारची
चला ठाण्यामध्ये या ग्रुपची
कुठेतरी ऐकलंय....