अजाणत्या वयात मी एका मुलीच्या प्रेमजालात फसलो. तिला हव्या त्या ऑडिओ कॅसेट आणून देणं, तिच्यासाठी लेडीज रूमाल, बिंदाया, टिकल्या, मेकअप बॉक्स खरेदी करण्यातच मी परमानंद अनुभवला. परंतु जेव्हा ती मी दिलेली फेअरनेस क्रिम लावून दुसऱ्याच महाभागाला भेटायला गेली तेव्हाच तिचा माझा संबंध (जो कधी नव्हताच) संपला.
*
किशोरवयात आलो होतो तेव्हाची गोष्ट. मी शिक्षक कॉलनीमध्ये राहायचो. सुट्टीच्या दिवशी दुपारी अख्ख्या कॉलनीत शांतता असायची. शेजारी राजश्री मॅडम एकट्याच राहत होत्या. त्या कधी कधी बोलवायच्या. त्यांना मराठी कादंबरी वाचावयाचा भरी शौक. एखादी कादंबरी माझ्या हाती देऊन वाच म्हणायच्या. माझ्यासाठी त्यांनी अगोदरच पान दुमडलेलं असायचं. ते वाचतांना अंगभर शिरशिरी येई. ठराविक पॅरेग्राफ वाचत असतांना त्या जवळ येत. अगदी चिकटून बसत, त्यांचे डोळे वेगळेच भासत. त्या माझ्या पँटवरून हात फिरवू लागल्या की मला कसंसच होई आणि मी विनाविलंब धूम ठोकीत असे. त्यांचे ते अधाशी स्पर्श, डोळ्यांतील आसक्तीयुक्त भाव घाबरवून टाकीत. काही दिवस मी त्यांना टाळायचो. पुन्हा एखाद्या सुट्टीच्या दिवशी असाच प्रसंग घडे. एकदा तर त्यांनी मला गच्च पकडून ठेवलं, मी ओरडू लागलो. एक फटका मारून त्यांनी मला हाकलून दिलं. त्यानंतर मी कधीच त्यांच्याकडे गेलो नाही.
*
त्यानंतरची काही वर्षे मी खूपच तटस्थपणे काढली. त्यानंतर जरा मोकळेपणा आल्याने मला अनेक मैत्रिणी लाभल्या.
बिंदू नावाच्या मैत्रिणीला मी रोज गुलाबाचे फूल(विकत आणून) द्यायचो. त्याची तिला काडीचिही किंमत वाटत नसे. ती म्हणायची, 'एंदान पुआ कोडतु?' म्हणजे नुसती फुलंच काय देतोस? याअर्थी. तिने मला मल्याळी बोली शिकवली खरी पण त्याबदल्यात मराठी शिकायचं नाव काढलं नाही. मलाच तिच्याशी तोडकं मोडकं मल्याळी बोलावं लागे. मग एखाद्या शब्दाच्या अलग उच्चारामुळे भलताच अर्थ निघायचा. त्यावेळी ती पोटभरून हसत रहायची, मी मात्र कसनुसं तोंड करायचो!
माझ्या बाईकवर मागे बसून मस्तपैकी रायडीँग करायला ती एका पायावर तयार असे. मग ती म्हणेल त्या हॉटेलात तिला खाऊ घालावं लागे. आम्ही पवना डॅम, लोणावळा वगैरे फिरलो... माझ्या खिशाला चाट बसली पण बिचारीनं मला गुंजभरही हात लावू दिला नाही! अखेर खिसाच फाटल्याचं ध्यानात आल्यावर (तिच्याही अन् माझ्याही!) आमचंही फाटलंच..
*
माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी मला गोड गोड बोलून कामाला लावायच्या. त्यांना प्रॅक्टीकल जर्नल मध्ये आकृत्या काढून देणं तर नित्याची बाब होती. नवा पिक्चर लागला की अॅडव्हान्स बुकिंगचं काम माझ्याकडेच येई. मग मध्यंतराच्या वेळात वडापाव-चहा आणून देणं अशी सेल्फ सर्व्हिस ओघाने करावीच लागे. इतर मित्र माझ्यावर जळायचे, मला गोपीकांचा कान्हा म्हणून चिडवायचे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, त्या गोपिका माझ्याभोवती फक्त फेर धरायच्या, दांडिया खेळायला त्यांचे त्यांचे कन्हैये मौजूद होते, हे त्या मित्रांना काय ठावूक? एकप्रकारे कपडे सांभाळायचं कामच माझ्याकडे आलं होतं. मैत्रिणीँच्या गराड्यात आख्खी कॉलेजलाईफ गेली परंतु त्यातील एकही पोट्टी माझी वाईफ बनायला तयार नव्हती. माझ्या स्त्रीदाक्षिण्याचा त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी फायदाच करून घेतला. इतकेच नाही तर त्यांच्यासाठी वरसंशोधनाच्या कामी माझे नाव त्यांच्या पिताश्रीँना सांगून मलाच नवरे शोधायला पिटाळलं! हे म्हणजे भलतंच अन् भयंकरही. माझ्यालेखी त्यांचं असं वागणं म्हणजे जखमेवर मिरचीचा ठेचा थापण्याचं काम असल्याने मी त्यांच्यापासून फटकून जगू लागलो. ही सल आजमितीला जेव्हा मी त्यांना सांगतो, तेव्हा त्या सगळ्याजणी म्हणतात, 'त्याचवेळी का नाही बोललास? मी लगेच तुला वरमाला घातली असती!' पुलाखालून पाणी वाहून गेल्यावर पूर पहायला जाण्यात काय अर्थय?
*
माझ्या नावडत्या राणीला मी (मनात नसतांनाही) अंगभर सोनं केलं, तेव्हा आवडतीला सवतीमत्सराचा किडा चावला. 'तिला इतकं देतोस, मग मला का नाही?' असं ती प्रत्येक भेटवस्तू स्विकारतांना म्हणतेच. नावडतीच्या दिमतीला नोकर चाकर, स्वैपाक-धुणंभांड्याला बाई. काहीही कमी नसतांना तिनं माझ्यावरचं प्रेम कमी का करावं? हे न उलगडलेलं कोडं. म्हणून कदाचित ती नावडती ठरली.
तिच्याउलट आवडतीनं भरभरून (शारीर) प्रेम केलं, दिलंही. नो डाऊट, पण माझं 'क्षेम' मात्र कधी पुसलं नाही. का बरे? हाही एक अनुत्तरीत प्रश्न.
नावडतीच्या अपरोक्ष, लपवून, चुकवून मी कितीतरी अमूल्य वस्तू आवडतीला नेऊन दिल्या. परंतु त्याबदल्यात तिच्याकडून ना तेल मिळालं ना तूप! आजही माझं धुपाटणंच बनलं आहे. ब्रँडेड रिस्टवॉच, डायमंड रिंग, मोठ्या रिसॉर्टमध्ये तिच्या बड्डेचं सेलिब्रेशन इ. इ. खर्चिक गोष्टी आमलांत आणूनही तिचा हात उताणा तो उताणाच!
*
मग आता मला प्रश्न पडतो की, इतक्या स्त्रियांनी माझा गैरफायदाच घेतला नाही तर दुसरे काय?
("भिन्नावतरण" मधून..)
वाचने
149633
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वत:चं कौटू़क करण्याची
In reply to स्वत:चं कित्ती कौतुक गं बाई! by रेवती
एक खरी गोष्ट !
तुमच्या मागे असणार्याचं आणि
In reply to एक खरी गोष्ट ! by शाहरुख
हा हा हा ... बाई णक्कीच
In reply to एक खरी गोष्ट ! by शाहरुख
>>त्या बाईचा आवाज इतरांना न
In reply to हा हा हा ... बाई णक्कीच by टारझन
शाहरुकने काहीही केलं असतं तर
In reply to एक खरी गोष्ट ! by शाहरुख
लेखाच्या सुरवातीला मला ते रेड
केरळात मुलांपेक्षा मुलींचे
लेख
मिपावर असले महान साहित्य
In reply to लेख by प्रसाद गोडबोले
+१
In reply to मिपावर असले महान साहित्य by आदूबाळ
मिपावर असले महान साहित्य
In reply to लेख by प्रसाद गोडबोले
लेखकावस्था! >>>
चूक कि बरोबर ते सांगा .......
In reply to लेखकावस्था! >>> by अत्रुप्त आत्मा
आत्म्या.....
In reply to लेखकावस्था! >>> by अत्रुप्त आत्मा
... ...
In reply to आत्म्या..... by दिपक.कुवेत
चुकलात तुम्ही
मिपावर असले महान साहित्य
गुन्डा चित्र पटाचि आठ्वण
लेखापेक्षा प्रतिक्रिया धन्य
आयला...
सन्दर्भ सान्गु शकाल?
In reply to आयला... by ब़जरबट्टू
महत्वाचा प्रश्न
कदाचीत
In reply to महत्वाचा प्रश्न by एकुलता एक डॉन
"दैव देते आणि कर्म नेते" असला
राजश्री मॅडम सध्या कुठे आणि
In reply to "दैव देते आणि कर्म नेते" असला by शिद
मि थोबाड पुस्तका वर शोध घेतोय
हे असलं लिखाण इथून हाकलून
अनुमोदन
In reply to हे असलं लिखाण इथून हाकलून by आशु जोग
निषेध
In reply to अनुमोदन by प्रमोद देर्देकर
पुरुष मुक्ती (पण) झालिच
In reply to निषेध by प्रसाद गोडबोले
कुठुन मुक्ति
In reply to पुरुष मुक्ती (पण) झालिच by एकुलता एक डॉन
होय होय
In reply to हे असलं लिखाण इथून हाकलून by आशु जोग
असले म्हणजे? खरे?
वाचनिय
हो
In reply to वाचनिय by माईसाहेब कुरसूंदीकर
१००
स्त्रियांनी गैरफायदा घेतला
In reply to १०० by बॅटमॅन
आम्ही स्त्रीद्वेष्टे??? नै हो
In reply to स्त्रियांनी गैरफायदा घेतला by धर्मराजमुटके
तुम्हाला ..
In reply to आम्ही स्त्रीद्वेष्टे??? नै हो by बॅटमॅन
फायदा ओ
In reply to तुम्हाला .. by नाखु
एइला
In reply to फायदा ओ by बॅटमॅन
माझा आत्मा त्याच्यात आणि
In reply to एइला by इरसाल
ऑ
In reply to माझा आत्मा त्याच्यात आणि by बॅटमॅन
त्याचं दहावं कधी?>>
In reply to ऑ by इरसाल
आम्ही बिनडोकद्वेष्टे.
In reply to आम्ही स्त्रीद्वेष्टे??? नै हो by बॅटमॅन
ह्या धाग्याचा सुद्धा बर्याच
धाग्या एवढेच प्रतिसाद सुद्धा