Skip to main content

मोदी खरच पंतप्रधान बनतील का !

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 25/03/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष लक्षात येण्याजोगा आहे... मोदींहूनही मोदी भक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल

.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 38066
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

In reply to by आयुर्हित

मोदींनी "ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट" म्हणलेले नाही. त्यांचे वाक्य असे आहे: "There are three AKs in Pakistan who are being admired. AK 47, AK Antony and AK49. This third one, AK 49, has just launched a political party," अर्थात केजरीवालांच्या एकाच वेळेस खुळचटपणामुळे आणि लबाडीमुळे ते असे काही वागत आहेत जे पाकीस्तानच्या पथ्यावर पडत आहे आणि म्हणून पाकीस्तान त्यांचे कौतुक करत आहे... असे काय ते करत आहेत? खालची चित्र पहा... हे आप च्या संस्थळावरचे आहे. नकाशातले काश्मीर भारतात नाहीच! तेच अरूणाचल प्रदेशाचे पण... अर्थातच बोंबाबोंब झाल्यावर ते काढून टाकण्यात आले आहे. पण माहीतीतंत्रज्ञानाच्या जगात काही कायमस्वरूपी खोडणे अवघडच असते. तेच येथे पण झाले आहे: (इंडीया टूडे मधून घेतलेला आहे). AAP Map The embarrassing botch-up on the AAP website's donations page, a map of India which showed parts of Kashmir as a part of Pakistan, has now been removed from the website, yet it has already been circulated on Twitter.
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?
हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते. PakRadio त्या व्यतिरीक्त आपचे नेते प्रशांत भूषण काय म्हणाले ते माहीत असेलच. नक्षलवादासंदर्भात आत्ता चर्चा नको. तो मुद्दा पण येईलच लवकर... थोडक्यात मोदींच्या भाषणात एके हे एजंट आहेत असे म्हणलेले नसताना देखील, कस्सा माझा गरीबबिचार केजरू... ट्वीट करतो, "Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? " ... ह्याला खोटारडेपणा म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे?

In reply to by विकास

यावेळी मोदी त्यांना एजंट म्हणाले आहेत असे दिसते.ही बातमी बघा मोदी म्हणतातः "These agents of Pakistan and enemies of India are speaking the language of Pakistan" मग, आता त्यांना खोटारडे म्हणायचे नाही असे तुम्ही ठरवलेय का? ;)

In reply to by ऋषिकेश

यावेळी मोदी त्यांना एजंट म्हणाले आहेत असे दिसते.ही बातमी बघा दुव्याबद्दल धन्यवाद. केजरीवाल हे कसे खोटे नाहीत हे दाखवताना त्यांचे काश्मीर संदर्भातील नकाशा चुकीचा आहे, किमान चुकून आला असेल इतके पण म्हणावेसे वाटत नाही? मग, आता त्यांना खोटारडे म्हणायचे नाही असे तुम्ही ठरवलेय का? अहो त्या धर्मराजांचा रथ हा तीन हात आकाशातून जात होता एकेकाळी. पण आता तो नुसता जमिनीवरच नाही तर जमिनीखाली ६ हात (पक्षी: खड्ड्यात) गेला आहे. इतरत्र दिलेल्या प्रतिसादातील काही भाग चोप्य पस्ते करतो: केजरीवालांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या होत्या...
  1. राजकारणात येणार नाही.
  2. (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
  3. ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
  4. दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
  5. वगैरे वगैरे
पण ते असो. काय गंमत आहे ह्या प्रकरणात काश्मीर संदर्भात जे मुद्दे बोलले गेले त्याबाबत ना केजरीवाल केजरीवाल बोलत आहेत ना त्यांचे समर्थक. त्यामुळे मोदींचे विधान नुसतेच राजकीय सभेतले विधान नसून खरेच आहे असे वाटू लागले आहे. आणि हो नकाशात केवळ काश्मीरच नाही तर अरूणाचल प्रदेश देखील वादग्रस्त म्हणून दाखवला आहे. काश्मीरचा युएन ठराव नॉन बाइंडींग आहे हे वास्तव असताना देखील परत परत जो देश दहशतवादी भारतात आणि जगात निर्यात करतोय त्यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर का दाखवला जातो? जो नकाशा घटनेनुसार आणि कायद्यानुसार भारताचा आहे तो वापरला का जात नाही? अगदी तो इंटरनॅशनल नकाशा असला तरी गुगल देखील भारताच्या (.in) संस्थळावर संपूर्ण भारत दाखवते, कारण कायद्याने बंधनकारक आहे म्हणून. अर्थात अ‍ॅनार्किस्ट केजरीवालना हे कायदेच मान्य नसावेत.

In reply to by विकास

रथ चालण्याच्या संदर्भात दुरुस्ती म्हणजे धर्मराजांचा रथ तीन अंगुळे वर चालत असे तीन हात नाही. (मोदी म्हटल्यावर संदर्भ चुकलेच पाहिजेत असे अनेकदा होते बॉ)

In reply to by आजानुकर्ण

मुद्दा लक्षात आला ना? रथ तीन अंगु़ळे का तीन हात ह्याने कुणावर नकळत देखील चिखलफेक झाली नसती म्हणून कन्फर्म करत बसलो नाही. आणि तसे देखील आम्ही पोथीनिष्ठ नसल्याने रामायण-महाभारतातले मतितार्थ समजण्यावर भर देतो. :) पण मोदीद्वेष्टे हे मात्र तसे करताना कायम दिसतात. बाकी तुमचे देखील एकदा काश्मीरवरचे मत सांगून टाकाना कारण तो मुद्दा होता. का त्यावरील सोयिस्कर दुर्लक्ष हे पाकीस्तानच्या घशात काश्मीर आणि चीनच्या नरड्यात अरूणाचल घालण्यासाठीची सहमती समजायची?

In reply to by विकास

मोदी पंतप्रधान व्हावेत किंवा नाहीत या चर्चेसंदर्भात फार तर मोदींचे काश्मीरबाबतचे मत जाणून घेणे आवश्यक ठरावे. माझे काश्मीरबाबतचे मत समजल्याने मोदींच्या पात्रतेसंदर्भातील विश्लेषणास काही मदत होईल किंवा कसे हे जाणून घेण्यास अस्मादिक असमर्थ आहेत. सदर चर्चेत काश्मीरसंदर्भात मत देणे आवश्यक आहे किंवा प्रत्यक्ष मतदान करतानाही मिसळपाववरील मोदीसंदर्भातील चर्चेत काश्मीरसंदर्भात मत देणे आवश्यक आहे असा फतवा इलेक्शन आयोगाने काढला आहे काय? असो. काश्मीरसंदर्भात माझे काहीही विशेष मत नाही. फारच उत्सुकता असल्यास - काश्मीर भारतात असल्यामुळे किंवा नसल्यामुळे मराठी संकेतस्थळांवर चघळण्याचा एक विषय याउप्पर माझ्या दैनंदिन आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही. माझ्यापेक्षा काश्मीरमधील नागरिकांचे यासंदर्भातील मत आवश्यक आहे असे मला वाटते. एकंदर विस्तृत पटलामध्ये सदर प्रश्नाबाबतचे सर्व हक्क मी मतदान करुन लोकप्रतिनिधींकडे डेलिगेट केले आहेत. लोकसभा वा अन्य योग्य ठिकाणी यावर विस्ताराने चर्चा होऊन माझे लोकप्रतिनिधी त्यावर मतप्रदर्शन करतील.

In reply to by आजानुकर्ण

>>> एकंदर विस्तृत पटलामध्ये सदर प्रश्नाबाबतचे सर्व हक्क मी मतदान करुन लोकप्रतिनिधींकडे डेलिगेट केले आहेत. लोकसभा वा अन्य योग्य ठिकाणी यावर विस्ताराने चर्चा होऊन माझे लोकप्रतिनिधी त्यावर मतप्रदर्शन करतील. इथे बोलण्यासारखं काहीच्च राहत नाही का मग? चला तर मग, मतदान करुन येऊ या! कायको बोलबच्चन. त्या विकास अण्णाला नाही काम! तुम्ही करा. कशाला ह्या भानगडीत पडावं. नै का? :)

In reply to by आजानुकर्ण

मोदी पंतप्रधान व्हावेत किंवा नाहीत या चर्चेसंदर्भात... तसे म्हणायचे असेल तर धर्मराजाचा रथ किती उंचीवरून चालला होता हा देखील या चर्चेचा मुद्दा नव्हता आणि इतर असे अनेकदा असताना आपण आपल्या पिंका टाकताच की! मग आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?

In reply to by विकास

आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?
जर नकाशामध्ये सद्यस्थितीचा विपर्यास असेल (तुम्ही म्हणताय तसे श्रीनगर भारतात दाखवले नाहीये अशा प्रकारच्या चुका असतील) तर ते चुकच आहे. मात्र, निव्वळ वादग्रस्त भागाला वादग्रस्त दाखवण्यात किंवा वेगळे आरेखन करण्यात माझ्या मते काहि चुक नाही. फार तर ते अधिकृत भुमिकेचा विपर्यास म्हणून बेकायदेशीर असु शकते - ती ही खात्री नाही पण असु शकते, पण प्रत्येक बेकायदेशीर गोष्ट चुकीची मानलीच पाहिजे असे नाही - जसे मी समलैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर असले तरी चुकीचे मानत नाही. जर असे नकाशे प्रकाशित करणे बेकायदेशीर असेल तर त्यावर सरकारने योग्य ते गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ती कायदेशीर शिक्षा करावी. मात्र अश्या चुकांचा संबंध थेट अख्ख्या आआपच्या राष्ट्रवादाशी वगैरे जोडणे हास्यास्पद व टोकाचे वाटते. या विषयावर अतिशय तपशीलवार व सांगोपांग चर्चा खूप पूर्वी ऐसीवर झाली होती. ती अत्यंत वाचनीय ठरावी. त्यातील श्रावण मोडक यांच्या पुढिल मताशी सहमती आहे:
चुकीचे प्रायश्चित्त त्यांना द्यावे भारताच्या सरकारने. पण असे नकाशे प्रकाशित करण्याचे पराक्रम भारतात इतरांनीही केले आहेत. अगदी पुणे विद्यापीठानेही हा पराक्रम केल्याचे आठवते. हे असे नकाशे अंगभूत असणाऱ्या सॉफ्टवेअरवर भारताचे सरकार बंदी घालेल का, किमान आजवर अशी सॉफ्टवेअर विकल्याबद्दल फौजदारी गुन्हे नोंदवेल का? बड्या कंपन्यांना अंगावर घेण्याची हिंमत लागेल त्यासाठी. राष्ट्रवादासाठीची ती हिंमत मला आजवर तरी दिसलेली नाही.

In reply to by ऋषिकेश

काश्मीर बाबत अपेक्षित उत्तर मिळाले त्याबद्दल आश्चर्य वाटले नाही. :) निव्वळ वादग्रस्त भागाला वादग्रस्त दाखवण्यात किंवा वेगळे आरेखन करण्यात माझ्या मते काहि चुक नाही. आय होप महाराष्ट्र सरकार बेळगाव नकाशात वादग्रस्त म्हणून दाखवत नसावे. तेच हैद्राबाद आणि तेलंगणा राज्यनिर्मितीच्या आधी... वादग्रस्त भाग जर प्रत्येक नागरीक ठरवू लागला आणि त्याचे समर्थन करायचे असले तर देश कशाला म्हणायचे. अर्थात अनेकांना देश ही संकल्पनाच मान्य नसते तशी तुम्हाला देखील देश ही संकल्पना मान्य नसली तर गोष्ट वेगळी आहे. पण प्रत्येक बेकायदेशीर गोष्ट चुकीची मानलीच पाहिजे असे नाही - जसे मी समलैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर असले तरी चुकीचे मानत नाही. Apple-Orange... राष्ट्राच्या सीमा या केवळ कायद्याचा भाग नसतात. मात्र अश्या चुकांचा संबंध थेट अख्ख्या आआपच्या राष्ट्रवादाशी वगैरे जोडणे हास्यास्पद व टोकाचे वाटते. ट्रेंड काय आहे हे बघून राष्ट्रवादाशी संबंध जोडला जातो. नकाशा नंतर काढला पण बदलला नाही. हा मुद्दा आहे. त्या व्यतिरी़क्त प्रशांत भूषण यांचे स्टेटमेंट आणि घटनेवर हात ठेवून शपथ घेत नंतर स्वत:स सतत अ‍ॅनार्कीस्ट म्हणत गोंधळ घालणारी व्यक्ती लोकांशी लॉयल नाही हे सिद्धच झाले आहे पण देशाशी लॉयल खरेच असू शकेल का हा प्रश्न आहे...

In reply to by विकास

धर्मराजाचा रथ किती उंचीवरून चालला होता हा देखील या चर्चेचा मुद्दा नव्हता
हो पण भारताच्या सांस्कृतिक संदर्भात आम्हाला रस असल्याने व अशा चुका करणे ही 'आप'ची मक्तेदारी नसून, इतरांकडूनही अशा संदर्भाच्या चुका होऊ शकतात हे दाखवून द्यावेसे वाटल्याने तो मुद्दा पुढे आणला.
आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?
'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. 'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. 'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे. एकंदर या प्रकरणात पुढे काय झाले ह्यात पुरेसा रस नसल्याने व/वा केजरीवाल आणि मोदी या दोन्ही व्यक्तींमध्ये अधिक भंपक कोण यासंदर्भातच अद्याप विचार करत असल्याने पुढे काय झाले हे नक्की माहिती नाही. मात्र दोन शक्यता संभवतात. हा नकाशा चुकीचा असल्याने 'आप'ने तो काढून टाकला असावा किंवा हा 'चुकीचा नकाशाच बरोबर आहे' असा आपचा दावा असावा. हा नकाशा चुकीचा असल्याचे उघडकीस आल्यावर 'आप'ने चूक मान्य करुन बरोबर नकाशा दाखवला असल्यास (किंवा चुकीचा नकाशा काढून टाकला असल्यास) प्रकरण फारसे उगाळण्यात अर्थ नाही असे वाटते. मात्र निवडणुकीसंदर्भात हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. (चर्चा तर होणारच!) मात्र भारताचा चुकीचा नकाशा हाच बरोबर नकाशा आहे असा 'आप'चा दावा असल्यास 'आप'वर काही कारवाई करण्यासंदर्भात कोणी एसेमेस स्वरुपात माझे मत मागवले तर मी अशी कारवाई करण्यासंदर्भात होकार देईन.

In reply to by आजानुकर्ण

आधी पंतप्रधान,मग पक्षाध्यक्ष मग पंतप्रधान्पदाचे दावेदार किंवा पक्षाध्यक्षांचे चिरंजीव असा क्रम हवा ना ?

In reply to by इरसाल

>>> आधी पंतप्रधान,मग पक्षाध्यक्ष मग पंतप्रधान्पदाचे दावेदार किंवा पक्षाध्यक्षांचे चिरंजीव असा क्रम हवा ना ? तसाच क्रम आहे. अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत ये तो मैने वाच्याच नै था !

In reply to by श्रीगुरुजी

अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत
मुस्लिमफोबियापासून श्रीगुरुजी लवकर बरे व्हावेत यासाठी साक्षात राजनाथसिंग यांनी काही मुस्लिम धर्मगुरुंची भेट घेतल्याचे कळते.

In reply to by आजानुकर्ण

तुमच्या मनात लगेच मुस्लीम कसे आले. नाही म्हणजे ज्यु लोकं पण अल्पसंखांक आहेत आणि ते पण उजवीकडून डावीकडे लिहितात...

In reply to by अनुप ढेरे

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती पाहा. http://minorities.in/profiles.php यातील उजवीकडून डावीकडे लिहिणारे कोण आहेत बरे? बहुदा पारशी आणि मुसलमान. आता यातील पारशी आणि मुसलमान यांच्यापैकी कोणाच्या लांगूलचालनाबाबत 'श्रीगुरुजी' या नावाने लिहिणाऱ्या आयडीला आक्षेप असेल असे तुम्हाला वाटते? श्रीगुरुजी या मूळ व्यक्तीबाबत अधिक माहिती येथे पाहा: http://en.wikipedia.org/wiki/Madhav_Sadashiv_Golwalkar

In reply to by विकास

>>> केजरीवालांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या होत्या... 1.राजकारणात येणार नाही. 2.(मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही. 3.ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन. 4.दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत. 5.वगैरे वगैरे अजून (६) सरकारी लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. (७) सुरक्षा घेणार नाही. (८) सरकारी निवासस्थान घेणार नाही. (९) घटनेशी प्रामाणिक राहीन (मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना) यातले काहीच पाळले नाही ते वेगळे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, त्याची उत्तरे केजरीवाल देतील हो.. परंतु तुम्ही इथुन पळ का काढलात ते सांगा.. या कमेंटवरुन http://www.misalpav.com/comment/reply/27411/566824 या धाग्यावर माझ्या प्रत्येक प्रतिसादाचा आपण विनाविलंब प्रतिवाद केला आहे ,हा मुद्दा सोइस्कररित्या विसरलात..जरा या मुद्द्याचाही प्रतिवाद करा.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी ... या इथे प्रतिवाद न करताच आपण पळ काढलात. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824 बोखिरीया व सोलंकीच्या प्रकरणांवर आपली मते ऐकायला आवडतील.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> श्रीगुरुजी ... या इथे प्रतिवाद न करताच आपण पळ काढलात. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824 बोखिरीया व सोलंकीच्या प्रकरणांवर आपली मते ऐकायला आवडतील. तुम्ही पूर्वी 'ग्रेटथिंकर' हा आयडी वापरून पिचकार्‍या टाकत होता. त्या आयडीपासून पळून जाऊन नंतर तुम्ही 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' असे नामांतर करून पिंका टाकायला सुरूवात केलीत. जुन्या आयडीपासून पळ काढून नवीन आयडी का घेतला ते आधी सांगा. त्यानंतर मी माझी मते सांगतो. काही आठवड्यांनंतर 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' या आयडीपासून पळून जाऊन तुम्ही 'नानासाहेब नेफळे' असे नामांतर करून बरळायला सुरूवात केलीत. 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' आयडीपासून पळ काढून नवीन आयडी का घेतला ते आधी सांगा. त्यानंतर मी माझी मते सांगतो. केजरीवाल संबंधात आपणच काही दिवसांपूर्वी काय लिहिलं होतं ते विसरलेले दिसतंय. तुमच्या आठवणीसाठी ते खाली देत आहे. (http://www.misalpav.com/node/26781). जरा विचारात सातत्यता तरी राखा. ________________________________________________________________________________ केजरीवाल हा खोटारडा आहे हे टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Sat, 18/01/2014 - 21:32 केजरीवाल हा खोटारडा आहे हे त्याच्याकडे बघितल्यावरच कळते ,आप हे 'खाप'च्याच औलादीचे वाटायला लागलेत,याचा बोलवता धनी वेगळाच असावा .... सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥ _______________________________________________________________________________ जो केजरीवाल आज तुम्हाला भारतवर्षाचा उद्धार करण्यासाठी युगायुगातुन अवतार घेणारा अवतारीत महापुरूष वाटतो आहे, तोच केजरीवाल जेमतेम २ महिन्यांपूर्वी तुम्हाला 'खोटारडा' वाटत होता. तुम्ही त्यांच्या बाबतीत एकदम १८० अंशाचे वळण का घेतले ते आधी सांगा. त्यानंतर मी माझी मते सांगतो. जो 'आप' पक्ष काही काळापूर्वी तुम्हाला 'खाप' पंचायत वाटत होता तोच पक्ष तुम्हाला अचानक भारताचा उद्धारक का वाटू लागला ते आधी सांगा. त्यानंतर मी माझी मते सांगतो. 'ग्रेटथिंकर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' आणि 'नानासाहेब नेफळे' या ३ आयडींव्यतिरिक्त अजून किती वेगवेगळ्या नावांनी तुम्ही इथे वावरत आहात त्याचीही माहिती द्या. त्यानंतर मी माझी मते सांगतो. तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांवर माझा प्रतिसाद तयार आहे. तो वाचल्यानंतर तुमच्या सर्व कुशंका व संभ्रम दूर होतील. पण त्याआधी तुमची विश्वासार्हता आणि पात्रता सिद्ध व्हायला हवी.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, तुम्ही प्रतिवाद करु शकत नाही हे सांगण्यासाठी एवढे लिहायची गरज नव्हती..

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी, आपण प्रत्येक धाग्यावर तत्परतेने प्रतिवाद करता, परंतु मी आपल्याला जिथे प्रतिवाद करायला सांगत आहे तिथे आपण सोईस्कर डोळेझाक करत आहात. आपण आपल्या आकडेवारीसहित माझ्या मुद्द्याचा प्रतिवाद करावा अशी मी आपल्याला मित्रत्वाची विनंती करतो.इथे हे बघा इथे. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824

In reply to by नानासाहेब नेफळे

आपण माझ्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे सोईस्कर डोळेझाक करत आहात. आपण माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन माझे शंकानिरसन करावे अशी मी आपल्याला मित्रत्वाची विनंती करतो. तुमच्या प्रश्नांसाठी माझा प्रतिसाद लिहून तयार आहे. तुम्ही माझ्या वरील प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन आपली विश्वासार्हता आणि पात्रता सिद्ध केली की लगेच प्रतिसाद पेस्ट करतो.

पण ते केजरी जम्मू-काश्मीरबद्दल काय मनले ते नाही का ऐकलस...

Modi has earned the place that he enjoys today and not usurped it, as his critics like to believe. Even today, he is the only one among PM hopefuls who has spelt out his plans to curb inflation or to improve the country's infrastructure. I think the Price Stabilization Fund that he is talking about is a great idea even though I am personally not convinced about the need for 100 new towns. I'd much rather have preferred initiatives to encourage reverse migration and so bring all cities at par in terms of existing infrastructure. While one may have individual differences over his approach, even a semi-honest adversary would admit that Modi means business; that he is consumed with a passion to change India for better, like few others have in them. And if one still thinks Modi is dangerous, let me reassure you Modi can't be as dangerous as Indira Gandhi who subverted democracy and imposed Emergency just to ensure she continued as PM. Modi can't be as dangerous as Manmohan Singh who prides himself as an erudite economist of integrity but has no qualms or regrets in letting his ministers loot the country at will. Modi can't be as dangerous as Sonia Gandhi who is counted among the richest women in the world today, without anybody questioning or probing her meteoric, unexplained financial rise. Modi can't be as dangerous as Kejriwal who employed his 49 day stint as CM of Delhi to befool people with unrealistic promises and quit when he couldn't prolong the game any further. Refer: The bankruptcy of compulsive Modi bashing

धागा जरा भरभर चालवा.नाहीतर उद्या गणपा पंतप्रधान होतील आणि मोदी बसतील ऊन्धियो बनवत. मोदी(५९ प्रतिसाद) आणि गणपा(१४५).

या संदर्भात, एक किंचीत अवांतरीत गोष्ट:

बुश आणि गोअर यांची निवडणूक खूप गाजली. रिकाउंट, फ्लोरीडा, पॉप्युलर व्होट, इलेक्टोरल कॉलेज व्होट मधील फरक आदीवरून अ‍ॅल गोअर सुप्रिम कोर्टापर्यंत लढले. पण ज्या दिवशी हे कळून चुकले की कुठल्याच पद्धतीने जिंकणे आता शक्य नाही, त्यावेळेस त्यांनी हार मान्य केली. अमेरीकन पद्धतीने, ज्याला कन्सेशन स्पीच म्हणतात ते राष्ट्राला उद्देशून टिव्हीवरून केले. तो ऐतिहासीक प्रसंग अजूनही आठवतो. गोअर यांच्या चेहर्‍यावरील दु:खद भावना अतिशय स्पष्ट होत्या. पण हार मान्य करून झाल्यावर ते म्हणाले:
Almost a century and a half ago, Senator Stephen Douglas (ph) told Abraham Lincoln, who had just defeated him for the presidency, ``Partisan feeling must yield to patriotism. I'm with you, Mr. President, and God bless you.'' Well, in that same spirit, I say to President-elect Bush that what remains of partisan rancor must now be put aside, and may God bless his stewardship of this country.
ते भाषणापुरतेच मर्यादीत नव्हते, तर नंतर ९/११ च्या वेळेस देखील गोअर आणि तसेच तमाम बुश विरोधक (आणि बुश हेटर्स) डेमोक्रॅट्स बुश यांच्या पाठीशी उभे राहीले. इराक युद्धाला भले विरोध केला असेल पण बाहेर लढताना एकत्रच राहीले... मला खात्री आहे की आज कितीही विरोध केला तरी मोदी आणि भाजपा उद्या जर केजरीवाल चुकून पंतप्रधान झाले तर त्यांना विरोध करायला म्हणून पाकीस्तान-चीन-अमेरीका-इतर कोणाच्या बाजूने गळे काढणार नाहीत. त्यांना पंतप्रधान म्हणून जे काही सहकार्य लागेल ते देतील. कारण देश पहील्यांदा व्यक्ती नंतर... पण जर उद्या मोदी पंतप्रधान झाले तर असे केजरीवाल आणि आप समर्थकांकडून होईल का याबाबत शंका आहे. कारण व्यक्ती आणि विशिष्ठ विचारसरणी पहील्यांदा मग देशाचे काही होवोत ही मानसिकता.., तीच मानसिकता ही जयचंदापासून ते व्हि पि सिंग यांच्यापर्यंत दिसून आली आहे. असो.

In reply to by विकास

मला खात्री आहे की आज कितीही विरोध केला तरी मोदी आणि भाजपा उद्या जर केजरीवाल चुकून पंतप्रधान झाले तर त्यांना विरोध करायला म्हणून पाकीस्तान-चीन-अमेरीका-इतर कोणाच्या बाजूने गळे काढणार नाहीत. त्यांना पंतप्रधान म्हणून जे काही सहकार्य लागेल ते देतील.
मला या बद्दल सिरीयस शंका आहे! किंबहुना उद्या मोदींव्यतिरिक्त भाजपाचेच कोणी पंतप्रधान झाले तरी मोदी किती सहकार्य करतील याबद्दल शंका आहे ;)

In reply to by ऋषिकेश

मुद्दा वेगळा आहे. माझे म्हणणे "तर त्यांना विरोध करायला म्हणून पाकीस्तान-चीन-अमेरीका-इतर कोणाच्या बाजूने गळे काढणार नाहीत." असा आहे. वयंपचांधिकंशतम चा आहे. चीन ने हल्ला केला असताना कम्युनिस्ट म्हणून त्यांच्याविरोधात न जाणारे योग्य का इंदीरा गांधींशी / काँग्रेसशी पटो-न पटो, पाकीस्तानशी (बांग्लामुक्ती) युद्ध सुरू असताना त्यांना दुर्गा म्हणत आपल्या लोकांना (फॉलेअर्सना) योग्य संदेश देत एकत्रीत उभे करणे योग्य? हा आहे. केजरीवाल-भूषण आणि कंपनी कडून मला चांगली अपेक्षा नाही... असो.

In reply to by विकास

मला मोदींबद्दल ठाऊक नाही पण भाजपचा ह्याबद्दलचा इतिहास अत्यंत वाईट आहे. जेव्हा देश प्रचंड आर्थिक संकटातून जात होता तेव्हा पाठींबा तर सोडाच पण सत्तेसाठी धर्माच्या नावावर दुही निर्माण करून भाजपने देशाला यादवीच्या तोंडावर नेले होते.

In reply to by संपत

खरंतर, त्यावेळी विरोधी पक्ष (नसलेल्या) मंदीराच्या मागेच पूर्णपणे मश्गुल असल्याने राव सरकारला कित्येक कठोर आर्थिक निर्णय घेता आले ;)

In reply to by ऋषिकेश

+१. नरसिन्हरावांच्या मुत्सद्देगिरीमुळे देश खरच फार मोठ्या संकटातून वाचला, पण दुर्दैवाने त्यांना त्याचे श्रेय कधीच मिळाले नाही.

In reply to by संपत

+१. नरसिन्हरावांच्या मुत्सद्देगिरीमुळे देश खरच फार मोठ्या संकटातून वाचला, पण दुर्दैवाने त्यांना त्याचे श्रेय कधीच मिळाले नाही. याच्याशी सहमत. किंबहूना ज्या काँग्रेसचे ते नेते होते त्या काँग्रेसींनी त्यांना शेवटचा मान देखील नीट न दिल्याचे त्यावेळेस वृत्तपत्रात वाचल्याचे आठवते. बाकी राव सरकारला फक्त मंदीराचा प्रश्न होता असे म्हणणे चुकीचे आहे... तर (मुंबईचे सिरीअल ब्ल्साटपासून चालू झालेला) दहशतवाद, १९८४च्या दंगलींनी आधीच्या आगीत तेल ओतून उफाळून आलेला शिख दहशतवाद आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे व्हि.पि. सिंग आणि चंद्रशेखर यांच्या काळात वाट लागलेली देशाची आर्थिक अस्थिरतेच ब्रेक लावून परत ती योग्य दिशेला नेणे...त्यातील पाकीस्तान स्पॉन्सर्ड दहशतवाद हे काही ते आणि नंतरची आत्ता पर्यंत आलेली कुठलीच सरकारे थांबवू शकली नाहीत हे दुर्दैव आहे. पण शिख दहशतवाद आणि अर्थव्यवस्था मात्र त्यांनी नक्कीच चांगले हाताळले - काहींना कठोरपणे वाटले असले तरी आणि ते हाताळताना त्यांच्या हातून चुका झाल्या असल्या तरी, त्याबाबत त्यांचे नाव इतिहासात मनमोहन सिंगांपेक्षा नक्कीच चांगले ओळखले जाईल.. उशिर लागला तरी.

भाजपा उद्या जर केजरीवाल चुकून पंतप्रधान झाले तर त्यांना विरोध करायला म्हणून पाकीस्तान-चीन-अमेरीका-इतर कोणाच्या बाजूने गळे काढणार नाहीत. त्यांना पंतप्रधान म्हणून जे काही सहकार्य लागेल ते देतील. कारण देश पहील्यांदा व्यक्ती नंतर बाबांनो भाजपाच्या इतके आहारी जाऊ नका रे... मत द्यायचे तर द्या पण उगा भलतेसलते सद्गुण चिकटवून भाजपेयींची पंचाईत करू नका...

In reply to by आशु जोग

बाबांनो भाजपाच्या इतके आहारी जाऊ नका रे... मत द्यायचे तर द्या पण उगा भलतेसलते सद्गुण चिकटवून भाजपेयींची पंचाईत करू नका... वाद मोदी-केजरीवाल चालला होता म्हणून त्या वाक्यात फक्त भाजपा आले. पण माझे हेच मत भाजपा व्यतिरीक्त काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मुलायमसिंग सारखे नेते यांच्याबाबत आहे. अगदी मला लल्लूची पण काळजी वाटणार नाही... आणि हो यातील भाजपा सहीत कोणालाही मी आदर्श समजत नाही अथवा भलत्यासलत्या अपेक्षा ठेवून नाही.

http://odiasamachar.wordpress.com/2014/03/27/indian-astrologer-correctl… हे आपल्यासाठी... मोदी येणारच २८६ संख्याबळासह अहो तसं भविष्य वर्तवलय ------------------ 1. BJP will get more than two hundred seats but less than 272. With other parties (mainly led by women) NDA will get 286 seats. 2. Congress will get only 63 seats. 3. Surprisingly two prominent leaders would lose elections. 4. After June 13, share market will zoom and touch 25000 points. 5. Commodity markets would lose heavily 6. No. 7 will play a very important role as it is Ketu Gankaraka; it would give India bright future. 7. Price rise would be checked; prices of agriculture items and real estate would come down making people happy. 8. If Modi Ji takes oath on 25/5/2014 at 11.41 AM or on 27/5/2014 at 10.34 AM, he will rule India for 10 years which is a golden period for India. Metal prices will come down; especially gold, silver and iron. Tax rates in income tax will come down. There would be a big change in education system; interest rates on loans for education will come down and students will be benefited. 9. AAP party my not be much successful in parliament elections; they will get only handful of seats. After December 2014, the party would lose its sheen. 10. After these elections, the divine powers would convey their messages to the mankind through electronic media, television channels and print media. A feature film will be made on the subject of next incarnation of GOD and emergence of golden period in India. Ashok Ghai

In reply to by सुहासदवन

अहो म्हणजे कुठलं तरी एक भविष्य खरं ठरणार ! असं आमचं भविष्य आहे

निवडणुकीच्या प्रचारात जसजसा रंग भरू लागला आहे, तसतसे या निवडणुकीत मोदी यांची केवळ लाटच नसून तो झंझावात आहे याची कल्पना सर्वांना येऊ लागल्याने, आपापला बचाव करण्यासाठी विरोधक वेगवेगळे आसरे शोधायला लागले असून अगदी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचाही तोल जायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसला कोणत्याच मतपेढीचा भरवसा न राहिल्याने खुद्द सोनिया गांधींनीच मैदानात उतरून इमाम बुखारी यांची भेट घेऊ न मुस्लीम मतांची याचना करण्याची वेळ आली आहे. इमाम बुखारी यांच्यासारख्या धार्मिक नेत्याकडे जायचे व सेक्युलॅरिझमच्या नावाखाली मुस्लीम मतांची भीक मागायची, यात काही विसंगती आहे याचीही सारासार बुध्दी केवळ काँगे्रसनेच नाही, तर प्रसारमाध्यमांनीही गमावली आहे. नाहीतर मुंबईतील रिबेरो यांच्यासह अनेक ख्रिश्चन नेत्यांनी एकत्र येऊ न काही अपवादात्मक मतदारसंघ वगळता, सेक्युलॅरिझमच्या नावे आम आदमी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले नसते. त्या आवाहनावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता प्रसारमाध्यमांनीही प्रसिध्दी दिली नसती. हिंदुत्ववादाची भाषा बोलली की तो जातीयवाद व मुस्लिमांनी किंवा ख्रिश्चनांनी आपल्या धर्माच्या नावे आवाहन केले की तो सेक्युलॅरिझम, अशीच आपल्याकडे व्याख्या बनल्याने तो शब्द हास्यास्पद बनला आहे. पण ख्रिश्चनांना आजवरचा काँग्रेसचा आसरा सोडून आपकडे जाणे भाग पडावे, यातच काँग्रेसची स्थिती किती केविलवाणी आहे हे लक्षात येते. त्यामुळे या झंझावातातून आपला बचाव करण्याकरिता काँग्रेसने नक्षलवाद्यांशी संधान साधल्याची जी बातमी आहे, ती तर अधिकच चिंताजनक आहे व आपल्या राजकीय स्वार्थाकरिता देशद्रोहाच्या कोणत्या टोकाला काँग्रेस जाऊ शकते, याची ती निदर्शक आहे. भाजपा व मोदी द्वेषाने पछाडलेले दिग्विजयसिंग यांच्या मध्यस्थीने, जर नक्षलवाद्यांनी काँग्रेसला मदत केली तर नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा सैनिकांची संख्या कमी केली जाईल असे आश्वासन दिले गेले आहे, असे वृत्त प्रकाशित झाले आहे. देशाच्या सुरक्षायंत्रणेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा हा प्रकार आहे. आपल्या अस्तित्वासाठी काँग्रेसला शाही इमामांसारख्या जातीयवादी धर्मगुरूचे पाय धरावे लागत असतील व नक्षलवाद्यांना पाठीशी घालावे लागत असेल, तर त्या पक्षाचे भविष्य काय असेल याची काँग्रेस नेत्यांनाच कल्पना आली असणार. त्यामुळेच जनार्दन द्विवेदींसारखे नेते राहुल गांधींना बाजूला करून प्रियांका गांधींना नेतेपदी आणता येईल का, यासाठी प्रयत्न करीत आहेत. युध्दाचे बिगुल वाजत असताना आपल्या सेनापतीच्या कुवतीबद्दलच जर सैनिकांच्या मनात विश्वास नसेल, तर ते लढाई काय करणार? महागाई, भ्रष्टाचार, प्रशासन आदी मुद्दयांवर मोदींच्या झंझावाताचा सामना करता येणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर या मुद्दयावरून लोकांचे लक्ष उडविण्यासाठी श्रीरामजन्मभूमीच्या मुद्दयाचा उपयोग करून लोकांना चिथविण्यासाठी कोब्रापोस्टद्वारा या आंदोलनावर चिखलफेक करणारा वृत्तान्त प्रकाशित केला गेला आहे. बाबरी ढाचा पाडण्याचा कट आधीच ठरलेला होता व या संघर्षात जेवढे हिंदू मरतील तेवढा प्रचाराला लाभ होईल असे मनसुबे रचले जात होते, अशी बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रकाशित करून देशात पुन्हा एकदा जातीय तणाव निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. सध्या तरुण तेजपाल अटकेत असल्याने तेहलकाऐवजी कोब्रापोस्टवर ही जबाबदारी आली असावी. अर्थात या आधीही मोदींचा व भाजपाचा द्वेष करणाऱ्या बातम्या कोब्रापोस्टने प्रसारमाध्यमांतून जाणीवपूर्वक पेरल्या आहेत. अर्थात धुरळा उडविण्यापलीकडे आजवर जसा या बातम्यांचा फारसा उपयोग झाला नाही, तीच गत याही बातमीची होणार आहे. पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही अशा मार्गाने यश येण्याऐवजी उलटा परिणाम होतो, हे काँग्रेसच्या लक्षात येऊ नये हे त्या पक्षनेतृत्वाची लायकी दाखविणारे लक्षण आहे. या झंझावातामुळे नेत्यांची मने किती भरकटली आहेत, याचा प्रत्यय महाराष्ट्रातही येतो आहे. या निवडणुकीनंतर काँग्रेसची सत्ता असणार नाही, याची शरद पवार यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मोदींचा हात धरून रालोआच्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. असे असले तरी निवडणुकीनंतर मोदींबरोबर जाण्याशिवाय गत्यंतर नाही, याची त्यांना कल्पना आहे. पण त्याआधी मोदी लाटेच्या विरोधाला तोंड देऊ न अधिक जागा जिंकल्या नाहीत, तर निवडणुकीनंतर पवारांना कोण विचारणार? त्यामुळे निवडणुकीनंतर मोदींबरोबर जायचे असल्याने त्यांच्याबद्दल दोन शब्द बरेही बोलले पाहिजेत व निवडणुकीत त्यांच्या विरोधात मते मिळवायची असल्याने मोदींवर टीकाही केली पाहिजे. या आपत्तीतून सुटका करून घेण्याकरिता त्यांनी मतदारांना दोनदा मतदान कसे करायचे या अनुभवाचे सल्ले द्यायला सुरुवात केली. तोही प्रयत्न त्यांच्या अंगाशी आला. आणि अखेर ठाकरे बंधूंबाबत. ही निवडणूक मोदींभोवती फिरते आहे व निदान महाराष्ट्रात तरी तसे व्हायला नको, असे त्यांना वाटत असावे. खरे पाहता या निवडणुकीत मनसेला स्वतंत्र अशी भूमिका नाही, कारण मोदींना तिचाही पाठिंबा आहे. मनसेने लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, तोच शहाणपणाचा व सर्वांच्या हिताचा होता. त्यावर तिला डिवचण्याचे कारण नव्हते. तसे डिवचले गेल्यानंतर, राष्ट्रीय महत्त्वाचे अन्य मुद्दे सोडून बटाटेवडे व चिकन सूप यात ही निवडणूक अडकली आहे. महाराष्ट्रात या निवडणुकीत अन्य मुद्दयांऐवजी ती ठाकरे बंधूंच्या भाऊबंदकीने गाजावी, असे पवारांना वाटत असल्याने तेही या भांडणात आपल्यापरीने तेल ओतीत आहेत. इतक्या वर्षांनंतरही आपण एकमेकाशी भांडलो नाही, तर आपल्या अस्तित्वाला अर्थ उरणार नाही या मानसिकतेतून बाहेर पडून एक परिपक्व राजकीय पक्ष या नात्याने व्यवहार करण्याची आवश्यकता आहे. लाट नव्हे, झंझावात

In reply to by आयुर्हित

>>मनसेने लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला अहो पण लढून अपशकून करताहेत ना.. कालच्या पुण्याच्या सभेने इतिहास घडवला... तो आला त्याने पाहीले त्याने जिंकले पकडून न आणताही एवढी गर्दी... उद्या काहीतरी घडणार आहे... हे नक्की

काल रजत शर्मा यांनी नमों यांची घेतलेली मुलाखत पाहिली. शांत संयत व्यक्तिमत्व प्रभावी वाटले. आश्वासक वाटले. त्यांना यश मिळेल असे वाटतेय.

In reply to by आयुर्हित

तो कार्यक्रम फुल फिक्स्ड होता! संपूर्ण देशाला अशा प्रकारे उल्लू बनवणारे मोदी पंतप्रधान होण्यासाठी कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. पैश्यासाठी रजत शर्मांनी आपली पत्रकारितेची सगळी कारकिर्द पाण्यात घालवली. लाजीरवाण्या हास्याच्या आडून मोदींना प्रचारात्मक भाषणबाजी करता येईल असे प्रश्न विचारले गेले. सगळा मॉब मॅनेज केलेला होता आणि मोदींच्या घोषणा देत होता त्यावर मोदी निर्लज्जपणे `ये जनता बोल रही है' म्हणत होते. आणि कमार नक्वींनी या प्रकरणात राजिनामा द्यावा लागला. पुन्हा एकदा तो इंटरव्यू पाहा म्हणजे सत्तालालसा किती खालच्या थराला जाते ते लक्षात येईल आणि इथले समर्थक किती भाबडे आहेत ते कळेल.

काल मी मराठी वाहिनीवर देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत होती. अतिशय मुद्देसुद बोलले ते. शांत चित्ताने विचारलेल्या प्रश्र्नांना उत्तरे दिली त्यांनी. मला ते भविष्यात नितिन गडकरी, मुंडे याच्या पेक्षाही पुढे जाणार असे दिसतंय.

In reply to by प्रमोद देर्देकर

सहमत आहे. देवेंद्र फडणवीस हा माणूस विचारी आणि सच्चा वाटतो. मुंडे हा माणूस हा १०० % राजकारणी आहे. आजच्या घडीला राजकीय स्वार्थाकरता भाजपामधे आहे खरा पण त्यामागे तत्त्वनिष्ठा वगैरे नसून संधीसाधूपणा आहे असे वारंवार जाणवते. घराणेशाही, वशिलेबाजी, खोटारडेपणा हे अस्सल राजकीय गुण मुंडेसाहेबांमधे वारंवार दिसून आलेले आहेत. त्यामुळे भविष्यात हा माणूस भाजपात पुढे न आलेलाच बरा. फडणवीसांसारखे लोक ह्या पक्षात पुढे यावेत आणि मोठ्या जबाबदार्‍या त्यांना मिळाव्यात असे मलाही वाटते. गडकरी हे तितके वाईट वाटत नाहीत. पण पवारांचेही आघाडीत स्वागत आहे ह्या प्रकारचे त्यांचे वक्तव्य चिंताजनक आहे हेही खरे.

काल-परवा मोदींची मुलाखत पाहिली (आप की अदालत). त्यांच्या बोलण्यातला, डोळ्यातला, आणि एकंदरीत व्यक्तिमत्वातला आत्मविश्वास प्रभावशाली आहे हे खरे. ठामपणे भूमिका घेऊन लोकांची मते प्रभावित करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. अटलबिहारींनंतर इतका निर्णायक नेता भाजपला बहुधा पहिल्यांदाच मिळाला आहे. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यातला कणखरपणा थोडा-बहुत शिकला तर नक्कीच फायदा होईल. दुर्दैवाने महाराष्ट्रातले सगळेच नेते कुचकामी, बुळबुळीत, आणि भ्रष्टाचार्य आहेत. मोदीलाट सध्या अगदी शिगेला पोहोचली आहे हे खरे. परंतु खालील काही मुद्दे भाजपसाठी अडचणीचे ठरतील असे वाटते: १. मोदींची प्रतिमा उद्योगधार्जिणी आहे. शेतीला हा माणूस उपकारक ठरणार नाही ही जनभावना अडचणीची ठरू शकते. शिवाय मुलाखतीत 'आम्ही जास्त भाव देऊन जमिनी हस्तगत केल्या' हे विधान ज्या पद्धतीने त्यांनी म्हटले त्यावरून 'ही व्यक्ती जमिनी बळकावून उद्योगांना देण्याखेरीज कुठलाच विकास करणार नाही' अशी प्रतिमा तयार होण्याची शक्यता आहे. आणि अशी प्रतिमा मोदींच्या पंतप्रधानपदाच्या स्वप्नासाठी घातक ठरू शकते. २. मोदींची प्रतिमा अजूनही कट्टर हिंदुत्ववादी अशी आहे. मुस्लीमांची मते मिळणे दुरापास्त होऊ शकते. त्याशिवाय इतर धर्मांची मते (बौद्ध, ख्रिश्चन) मिळणे कठीण होऊ शकते. मागासवर्गीयांना अजूनही जवळचे वाटत नाहीत. ३. भाजप हा अजूनही शहरी पक्ष म्हणून जास्त ओळखला जातो. खेडोपाडी मजबूत जाळे निर्माण करणे भाजपला अजूनही जमलेले नाही. मध्यमवर्गीयांचा, उच्चवर्गीयांचा पक्ष अशीच या पक्षाची ओळख आहे. हा पक्ष त्यांचेच भले करणार अशी धारणा बहुजनांमध्ये अजूनही बर्‍यापैकी आहे. त्यामुळे ही प्रतिमा मतांचा कसा फेरफार घडवून आणेल हे प्रत्यक्ष निकालानंतरच कळेल. ४. मोदींशिवाय दुसरा सशक्त पर्याय भाजपकडे नाही. अडवाणींचा बालिशपणा आधीच दिसला आहे. त्यात त्यांचे वय देखील झालेले आहे. ५. कित्येक ठिकाणी भाजप भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अडकला होता (येडीयुरप्पा, गडकरी, पैसे घेऊन प्रश्न विचारणे प्रकरण, महाजन, इत्यादी). त्यामुळे हा पक्ष काँग्रेसला एक चांगला पर्याय असू शकेल असे बर्‍याच मतदारांना वाटणे कठीण आहे. भाजप आले काय किंवा काँग्रेस आले काय, गल्लीतला भ्रष्टाचार संपवणे कठीणच असणार आहे या विचारसरणीचा भाजपला तोटा होऊ शकतो. त्यांच्याकडे दीर्घकाळ सत्ता असती तर भ्रष्टाचारात त्यांनीदेखील चुणूक दाखवली असती असे बर्‍याच लोकांना अजूनही वाटते. ६. मोदी नावाचा एकमेव करिष्मा भाजपला आणि देशाला किती काळ वाचवू शकेल हा प्रश्न जनतेला पडणार आहे. एकट्याच्या बळावर (पक्षांतर्गत विरोध असतांना) मोदी देशाची दिशा कितपत बदलू शकतील हा प्रश्न सामान्य जनतेला पडणे साहजिक आहे. ७. काँग्रेसने एकगट्ठा मतांचे राजकारण करून ठेवलेले आहे. रोहयो, स्वस्त धान्य, झोपडपट्टी संरक्षण, आरक्षण, विविध प्रकारचे भत्ते, काम न करता मजूरी, शेतीसाठी विविध योजना, इत्यादी योजनांचे लाभधारक भाजपला मते देतील अशी आशा करणे थोडे धाडसाचे ठरेल. आणि या लोकांची मते खूप जास्त आहेत. एका मतासाठी दोन-दोन हजार रुपये, चिकन, मटन, दारू अशी प्रलोभने देण्यात काँग्रेस, राष्ट्रावादी आघाडीवर आहेत. आणि जनतेला मिळणार्‍या या क्षुल्लक फायद्याच्या बळावर मते मिळवता येतात हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेले आहे. या उमेदवारांकडे कोट्यवधींची माया आहे. त्यामुळे एक-एक उमेदवार निवडणूकीवर सहज ५ ते ५० कोटी खर्च करेल असा सगळ्यांचा अंदाज आहे. मोदीलाट असली तरी पुढचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही असे वाटते. अशीच हवा 'इंडिया शायनिंग'च्या वेळेस होती हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यावेळेस (२००९) 'इंडिया शायनिंग' होते; यावेळेस 'मोदी' आहेत. गुजरातचा विकास हाच काय तो एक अधिकचा मुद्दा आहे. त्याबद्दलही भिन्न भिन्न मतप्रवाह आहेत. पण प्रस्थापित राजकीय गुंडशाहीला एक जबर धक्का बसून किमान त्यांना कायमचे हद्दपार करण्यासाठी तरी मोदी यावेत अशी साधारण सुशिक्षित लोकांची इच्छा आहे असे दिसते. महाराष्ट्रात तर ही राजकीय गुंडगिरी शिगेला पोहोचली आहे. जनतेचा कोट्यवधींचा खजिना लुटून लुबाडून सध्याचे जमिनदार नेते ५००-१०००-५००० कोटींचे मालक झाले आहेत. त्यांची ही मस्ती जिरवणे गरजेचे आहे. प्रफुल्ल पटेलांची श्रीमंती पाच वर्षात दुप्पट होते. १०० कोटींवरून ते ५ वर्षात २५० कोटींचे मालक बनतात; कुबेरालाही लाजवेल इतकी ही संपत्ती आली कुठून? एअर इंडियाला समुद्रात बुडवून? आणि ही फक्त दाखवण्याची संपत्ती! खरी किती असेल सांगता येत नाही. तशीच परिस्थिती भुजबळांची आणि तटकरेंची. हा एवढा अमाप पैसा आला कुठून? पुण्यातले कदम काही फार लांब नाहीत. हजारो कोटींची ही संपत्ती येते कशी? भाजपची गोष्ट काही फार वेगळी नाही. गडकरी, पूनम महाजन, मुंडे यांच्या संपत्तीमध्ये ५ वर्षात अगम्य अशी अचाट वाढ आहे. कशी काय? वाडवडिलांच्या जमिनी मिरवणार्‍या, इतरांच्या जमिनी बळकावणार्‍या आणि भ्रष्टाचाराच्या गंगेत अहोरात्र सचैल स्नान करणार्‍या या नेत्यांची कुवत (आणि लायकी) खरोखर एवढी संपत्ती कमवण्याची आहे का? राष्ट्रगीत देखील यांना नीट म्हणता येत नाही. दूरदृष्टी, जनतेच्या अडचणींची जाणीव, काहीतरी उत्तम करून दाखवण्याची जिद्द या सगळ्या गुणांची किमान ओळख तरी या नेत्यांना आहे का? की सगळी जनताच भ्रष्ट आहे म्हणून आपले नेतेही भ्रष्ट आहेत हेच खरे आहे? मग हे बदलणार तरी कधी? एनडीए किंवा युपीए - कुणीही आलं तरी हे बदलणं अशक्यच वाटतं. आणि हेच वास्तव आहे. आपण निवडणुकीचे हे तमाशे बघून टाळ्या पिटण्याखेरीज अजून काय करू शकतो? तेवढीच जरा करमणूक! :-(

In reply to by समीरसूर

मध्यमवर्गीयांचा, उच्चवर्गीयांचा पक्ष अशीच या पक्षाची ओळख आहे. हा पक्ष त्यांचेच भले करणार अशी धारणा बहुजनांमध्ये अजूनही बर्‍यापैकी आहे.
मला खरं तर गंमत वाटते. ज्या पक्षाला बहुजन मते देतात तो खरं तर उच्चवर्गीयांच्या लाभाचे निर्णय घेतो. पण उच्चवर्गीय (तत्वामुळे) त्यावर चिडून आहेत. उच्चवर्गीय ज्याला बहुजनांच्या जीवनात थोडा आशेचा किरण आणेल असं समजतात, त्याला बहुजन मतं देत नाहीत. उच्चवर्णीयांना तांदळाच्या भावात वाढ झाल्यानं खरंच फरक पडतो का? पण त्यांना काँग्रेसची घृणा वाटते. ज्यांना खरंच फरक पडतो ते काँग्रेस ला मतं देतात. हे थोडंसं "ज्याचं करावं भलं" सारखं झालं. बहुजनांना ब्राम्हणांनी ज्या पक्षाची सुरवात केली त्याला मतं देण्यापेक्षा मराठा आणि माळी आणि साळी आणि इत्यादी इत्यादी उमेदवार उभे करून जातीय वादी राजकारण करणार्‍या आणि ब्राम्हणांना शिव्या देणार्‍या पक्षांना मतं देण्यात जीवनाची इती कर्त्यव्यता वाटते. माझा प्रश्न हा आहे, की ब्राम्हणांना काय पडलंय? देईनात का हे लोक मतं काँग्रेस राष्ट्रवादीला? पुढं पाच वर्षं सोसतील. पुन्हा मतं देवून पुन्हा सोसतील! खरोखंर, काय नडलंय?

In reply to by काळा पहाड

ब्राम्हणांना काय पडलंय?
सहमत. ब्राम्हणांनी संपूर्ण देश चालवण्याची क्षमता आणि जबाबदारी फक्त आपल्याच खांद्यावर आहे अशा अविर्भावात वावरणे आता बंद करावे याच्याशी सहमत.

In reply to by आजानुकर्ण

काश्मिरी पंडित आहेत हे

In reply to by आजानुकर्ण

ब्राह्मणांना काय पडलंय? आणि इतरांनाही ब्राह्मणांचं काय पडलंय? करेनात का कितीही विचारमंथन आणि तत्त्वचर्चा. (खोट्या खोट्या का होईना,) लोकशाहीमध्ये स्थानिक गटांचे हितसंबंध जपण्याची ताकद असणार्‍यांनाच तिकीट मिळते आणि तेच निवडून येतात. सध्या भाजपची हवा आहे आणि मोदी पंतप्रधान होतीलही पण त्यांनाही हे स्थानिक, प्रादेशिक हितसंबंध सांभाळणे भाग आहे. जुने नेक्सस मोडून काढताना नवीन नेक्सस बनतेच. आणि ते जुन्या नेक्सससारखेच वागू लागते. राजकारणी फार धूर्त असतात. ते विचारवंतांना अलगद कोपर्‍यात बसवतात. बरं, हा अभिजनवर्ग मोर्चे-मिरवणुकांसाठी रस्त्यावर उतरणार नाही, प्रचाराच्या सभांना पैसे घेऊनही गर्दी करणार नाही, 'आपला' उमेदवार निवडून आला तर बेभान होऊन ढोल-ताशांच्या तालावर नाचणार नाही. मग हवीत कशाला यांची फुटकळ मतं आणि ओपिनिअन्स? काssही फरक पडत नाही. तसंही चालतंच आहे की गाडं.

In reply to by राही

हा अभिजनवर्ग.....पैसे घेणार नाही, घेतले तरी प्रचारसभांना गर्दी करणार नाही. असे हवे.

इंडिया शायनिंग २००९ ला नव्हते तर २००४ ला होते.२००४चे सर्वे एनडीए परत सत्तेत येईल असे म्हणत होते ते सपशेल चुकले. २००९ला कॉंग्रेसच परत सत्तेत येईल असा अंदाज होता मात्र २००+ जागा मिळतील असे वाटले नव्हते. जमिनी हडपण्यामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी पर्यायाने कॉंग्रेस आघाडी सर्वाधिक बदनाम आहे.रायगड, मावळ, पुणे परिसर वगैरे भागात राष्ट्रवादीने तर सिंधुदुर्गात राणे कंपनीने (कॉंग्रेस) दादागिरी करून लोकांच्या जमिनी बळकावल्या आहेत.हरयाणा, वेस्टर्न युपी मध्ये जमिनी हडपण्यामध्ये कॉंग्रेस किंवा साप/बसपा वाले सर्वात पुढे आहेत. भाजपला मोदींच्या रूपाने खरोखर एक हुकुमाचा एक्का सापडला आहे.विरोधक आणि मीडिया मोदीविरुद्ध इतर अश्या लढाईचे चित्र उभारत आहेत त्याचा फायदा भाजपलाच होईल.मोदींनाच पीएम बनवणे भाजपला अपरिहार्य बनत चालले आहे मात्र अगदीच वेळ पडली (भाजपच्या जागा १८०-१९० पर्यंत सीमित राहिल्या) तर आडवाणी, शिवराज, स्वराज, रमणसिंग आणि स्वतः राजनाथ हे पर्याय भाजपाकडे आहेत.

In reply to by दुश्यन्त

हो, अनावधानाने चूक झाली. 'इंडिया शायनिंग' २००४ लाच होते. २००९ ल कहीच नव्हते आणि म्हणून २००४ ते २००९ च्या (चांगल्या) कामगिरीच्या बळावर पुन्हा पंजासरकार आले होते. २००९ मध्ये भाजपने आपल्याच २००४ च्या चुकीचा धसका घेतला होता. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! --समीर

धर्मांसाठी नव्हे तर मी देशासाठी काम करेन निवडणुकीत पराभव स्वीकार करेन पण मतांसाठी धर्मांध किंवा जातीयवादी राजकारण करणं मंजूर नाही, असं भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'धर्मांध राजकारण करणार नाही'

गुजरात के दंगो के लिये मोदि को माफी मांगने कि जरुरत नही| मोदि सत्ता मे आये तो देश बटेगा नही, देश को कोई खतरा नहि| मोदी टोपी न पहनेपर कोई ऐतराज नही, बल्की उन लोगोसे ऐतराज है जो टोपी पहनकर मुसलमानोको टोपी लगाये! ये बयान है जमियात उलेमा ए हिंद के मुखिया मौलाना मेहमूद मदनीजी का...... Jamiat Ulema-I-Hind chief Maulana Mahmood Madani has said that BJP's PM candidate Narendra Modi doesn't have to apologize for the Gujarat riots No need for Modi to apologize: Maulana Madani

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील तीन टप्प्याचं मतदान अजून व्हायचंय. त्यात जवळपास १९६ जागांवर मतदान होणार आहे. असं असतानाही, देशातील एकंदर वातावरण पाहून, भाजपच्या-रालोआच्या सत्तेची चाहूल सा-यांनाच लागली आहे. काँग्रेसचा एकूण आविर्भाव पाहता, त्यांनीही आशा सोडल्याचं चित्र आहे. राहुल गांधींवर 'बेटिंग' बंद

In reply to by आयुर्हित

पण मतदानाची यंत्रे षडयंत्रासारखी वागत आहेत... विश्वासार्हता काय आहे