>> नाहीतर आम्हाला टॅक्सी भाड्याने (टारू वाला भाड्या नाही Smile ) ...
:-d
>> ... आम्ही तिघंही तो प्रश्न आमच्या मेंदूंपर्यंत पोचायच्या आधी 'यस्स्स' म्हणून बसलो.
नकार देणे - एक कला! :-)
मस्त अनुभव आणि झकास वर्णन!
अवांतरः ते व्हिडीओत दिसणारे तुम्हीच कशावरून?
(शंकेखोर) अदिती
साहेब, त्या खोबार चा आणि या भागाचा काही संबंध नाहिये... त्या आगाऊ कार्ट्या चा लेख आहे ना 'माझा अनुभव' म्हणून त्याच्या वरनं हे आठवलं म्हणून लिवलं... खोबार येतंय मागनं
उत्तम अनुभव वर्णन
मी हिरव्या डोळ्यांचे जनावर कधी नाही पाहीले जवळुन पण असे अथांग गहिरे डोळे असलेले माणसे भरपुर पाहीली आहेत. जनावरे खुप बरे अशा माणसांपेक्षा हे नक्की
माझ्या एका कोकणस्थ मैत्रीणीचे डोळे होते हिरवेकच्च.
ती कोणाकडे पाहुन बोलायला लागली की बहुतेकवेळा लोक आज्ञाधारक बंडु व्हायचे.
हिरवे डोळे असलेले लोक त्या डोळ्याच्या तसल्या रंगामुळे एकदम खानदाने श्रीमन्त वाटतात.
(उदा: वर्षा उसगावकर कधीच गरीब मुलगी वाटली नाही . कायम श्रीमन्तच)
. एखादे हिंस्त्र जनावर साधारण एखाद फूटावरून तुमच्या डोळ्यात डोळे मिसळून बघतं... आहाहाहा, काय फिलींग असतं, भिती तर वाटतेच पण आपण काहितरी जबरदस्त करतो आहे असेही एक थ्रिल जाणवत होतं
हो मालाही असंच वाटलं होतं .. आमच्या बँकेतली माझ्यावर फुल्टू लट्टू झालेली ६फुट ३इंच निळ्या+काळ्या डोळ्यांची मरिना .... ज्यावेळी मी तिच्यापासून एक सेंटीमिटर वर होतो ... तेंव्हा असलंच फिलींग आलेलं .. आणि भारतात दिवाळी-दसर्याला आंडू पांडू शरिराच्या मित्रांना आलिंगण करताना अफजल खानाचं फिलींग यायचं . पण इथे आलिंगन देताना (हे मुलींना आलिंगन मला नविनचं होतो .. प्रचंड काटे उमटले होते ) मलाच अफजल भेटली .. आणि मी शिवाजी .. खी खी खी ...
असो .. आता अवांतर :
बिप्पीन भौ ... इकडल्या अभयारण्यात गेलेलो .. इथे ही सेम खंदक खाणलेले मोकळे प्राणी होते .. सिंहाला शिवायचा चानस होता .. मी पटक्न त्याच्या शेपटाला शिवून पळून गेलो .. त्याने झटक्यात मागे पाहिलं आणि माझं अँड्रिनलिन अचानक लै लै वाढलं ... त्याचे विटकरी डोळे जणू शरिराला मॅचिंग कॉंटॅक्ट लेन्स लावल्या सारखे होते .. त्याचे बायसेप्स माझ्यापेक्षा मोठे होते ... बाकी चित्ता म्हणजे छडमाड हो .. फारच शामळू आणि गरिब प्राणी .. खरं थ्रिल अनुभवायचं असेल तर ढाण्या वाघ किंवा मेगा जायंट अफ्रिकन सिंह यांच्या जवळ जा ... अँड्रिनलीन वाढण्याची गॅरेंटी ...
मरिना चा ड्रिमबॉय
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
आता कोण कोणाजवळ पोचलं हे सांगायला हवं का ?
काही झालं की निसती खेटाखेटी ( मानभावी पणा न करत मलाही खेटावंच लागतं हो) ..पण हल्ली मी सुरक्षित अंतर ठेवतो ... :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
आहो क्रिप्टिक नाही गेला .... मी प्रतिसाद 'मन' मारुन लिहीला आहे ....
बाकी उंचीचा फायदा होतो :) -- क्रिप्टिक
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
वा बिपिनभौ....
बोले तो एकदम रापचिक ... फन्डू ....
तुम्ही तर माझ्या एक पाऊल पुढे गेलात....
वर्णन तर एकदम झकास...
आणि व्हिडियो.....
माझ्याकडे शब्दच नाहीत.
लगे रहो!!!!!!
बिपीनभौ!! जबरी.
लहानपणी दुरदर्शनवर "प्रोजेक्ट टायगर" नावाची सिरीयल असायची तेव्हापासुन वाघाला हात लावायची /मिठी मारायची इच्छा आहे. बघु कधी पुरी होईल. :-)
अफ्रिकन सफारी "टु डू" लिस्ट मधे आहे.
बिपिनदा,
नशिबवान आहेस... चक्क चित्त्याच्या ( स्वारी, चित्तिणीच्या :D ) डोक्यावरून हात फिरवला तू...
लेखही छान जमला आहे !!!
(स्वगत : बिपिनदाने तो व्हिडीओ एडिट वगैरे तर केला नसेल ना... च्यायला चक्क चित्तिणीला गोंजारतोय पठठ्या... आपली तर साला कुत्रं बाजुने गेलं तरी फाटते... :S )
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
व्वा ,,,जबरदस्त अनुभव..
चित्तीणीच्या डोक्यावरुन हात फिरवण्याचा थ्रिलिंग अनुभव...
पुढच्या भागाची वाट पाहतोय..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
काका... त्या चित्तीणीची 'कवळी' काढून ठेवली होती का?
अहो त्या चित्तीणीला दोन लहान पिल्लं होती हो... अश्या तरूण वयात कवळी नसावी तिला. कवळी बहुतेक वेळा म्हातारपणी लागते ... :)
बिपिन.
(अवांतर - आता ती आज्जी मला विचारेल, कशावरुन ती पिल्लं त्या चित्तीणीचीच होती? भयंकर उठाठेवी या आज्जीला) ;)
आयला..लय भारी की राव...
आपलं एकदा असच झालेलं ..काय झाल की ग्रेडेन कुत्र्याने आमच्या अंगावर एका गाफील क्षणी (आमच्या) त्याचे पुढचे २ पाय ठेवायचा प्रयत्न केलेला आणि आम्ही चारी मुंड्या चित झालो..नुसती पिवळी...बाकी तुम्ही आफ्रिकन मंडळी काय काय कराल काही भरोसा नाही...वाघ काय, शिंव्ह काय...
मस्त ,थरारक अनुभव आणि व्हिडीओ तर खासच !
बिपिन तुझ्या अनुभवामुळे माझीही आठवण ताजी झाली.खूप वर्षं झाली त्याला..पुण्याच्या सर्पोद्यानात राजा नावाचा चित्ता ठेवला होता. राजा मांजरीच्या पिलाएवढा असताना त्याला बाटलीने दूध पाजून माझ्या एका चुलतभावाने त्याला घरात वाढवला.(ते पिलू असहाय्य स्थितीत असताना त्याला एका ट्रेकमध्ये सापडले आणि त्याने ते घरी आणले.)राजा मोठा झाल्यावर घरात ठेवणे इष्ट नव्हते म्हणून मग त्याला सर्पोद्यानात नेला. एकदा आम्ही त्यांच्याकडे गेलो असता राजाला भेटायला जायची टूम निघाली. आम्ही तिथे पोहोचलो. राजा पिंजर्यात होता. प्रशांतला,माझ्या चुलतभावाला पाहून त्याने शेपटी हलवून आनंद व्यक्त करायला सुरूवात केली. त्याने राजाला मोकळे केले आणि आमच्याकडे घेऊन आला.आता राजा ते गोजिरं मांजर राहिल नव्हता तर पूर्ण वाढ झालेला चित्ता होता.त्याला हात तर लावायचा होता,गोंजारायचंही होतं,प्रशांत तिथे असतानाही मनात भीती होतीच. शेवटी एका हाताने प्रशांतला धरलं आणि दुसर्या हाताने राजाला गोंजारल.. ते संमोहन करणारे हिरवे डोळे माझ्याकडे पाहत होते.क्षण दोन क्षणातच प्रशांतचा हात मी कधी सोडून दिला ते कळलं नाही आणि मग मी दोन्ही हातानी राजाला गोंजारु लागले. त्याच्याबरोबर मग आम्ही बराच वेळ होतो. अर्थात प्रशांतला मात्र तिथून क्षणभरही बाजूला होऊ दिलं नाही..
आता पुढच्या भारत भेटीत राजाला भेटायला हवं, आता तो कुठे आहे कुणास ठाउक?प्रशांतला मेल करायला हवी..
स्वाती
बिपीन,
लेख उत्तम. अनुभव खरेच थरारक आहे. स्वातीताईच्या अनुभवाबद्दल सुद्धा वाचायला आवडेल.
पेशवेपार्कात एका वाघाला पिंजर्याच्या बाहेरुन हात लावायची संधी तेथल्या एका प्राण्यांच्या डॉक्टरांमुळे मिळाली होती त्याची आठवण झाली.
--लिखाळ.
पुण्याच्या सर्पोद्यानात राजा नावाचा चित्ता ठेवला होता.
एक शंका माझ्या माहिती प्रमाणे भारतात शेवटचा चित्ता १९५४ साली मध्यप्रदेशात मारला गेला
आता भारतात चित्तेच अस्तित्वात नाहीत तर मग तुमच्या भावाला चित्ता कसा सापडला ट्रेक मधे तो बिबट्या असावा
राग मानु नका
ह्याला म्हणतात वाघाची छाती !!
मस्त च रे बिपीन भो !!!
(आम्ही कुत्रा - मांजर , बैल, गाढव , घोडा इ .इ. प्राण्यांना हात लावुनच स्वत: ला सरदार समजुन घेतो ....)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
हिंस्त्र श्वापदांचा १०० टक्के भरवसा देता येत नाही.
सर्कशीतील जनावरांना सांभाळणार्या एका पालक कर्मचार्याचे आयुष्यभरातल्या अनुभवाचे बोल असे आहेत की, 'कितीही माणसाळवला तरी हिंस्त्र प्राणी कधीही हल्ला करू शकतो.'
कित्येक हत्ती आपल्या वर्षानुवर्षाच्या माहुताला आपल्या पायाखाली मारून टाकतात असेही एक निरिक्षण आहे.
कृपया काळजी घ्यावी.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
लै भारी अनुभव आहे ...
.... मस्तच
....
स्वगत : तात्या बरोबर मामलेदाराची मिसळ खाणारा इसम आणि या चित्रफितीमध्ये चित्तीणीचे चित्त हरण करू पाहणारा इसम यांच्या बांधा, चेहरेपट्टी यात पुष्कळ साम्य असून हे दोन्ही इसम एकच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
स्वगत : तात्या बरोबर मामलेदाराची मिसळ खाणारा इसम आणि या चित्रफितीमध्ये चित्तीणीचे चित्त हरण करू पाहणारा इसम यांच्या बांधा, चेहरेपट्टी यात पुष्कळ साम्य असून हे दोन्ही इसम एकच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.....
फोटोशॉप विसरलात की काय मास्तर? ;-)
झालंच तर सगळे हिंदी पिक्चर ज्यात बॅडी लोकं मुखवटे चढवून हिरो असल्याचं भासवतात ....
जब्राट अनुभव!!!
सही लिहिल आहेस.
आणि व्हिडीओ पण लै भारी...
(पण तो व्हिडीओतला तुच आहेस कश्यावरुन??? :? )
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
प्रतिक्रिया