माझं कोकणातलं गांव :- भाग-४ (परतीचा प्रवास)
माझं कोकणातलं गांव :- भाग - ३
मागील भागात>>
घरी येता येईतो चांगलाच अंधार पडलेला असायचा. दिवे लागणी झाली कि मग पर्वचं वगैरे होवुन गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळणं असा सगळा वेळ जायचा.
तिथुन पुढे >>
कधी दुपारी मी आणि काका घराजवळच्या हौदात पन्हाळीला पिण्याचे पाणी येत नाही म्हणुन जिथुन पाणी येतं तिथपर्यंत पर्यात पाट साफ करत जायचो. हा पर्या गणपतीच्या देवळाकडे जाताना जो पर्या लागतो तोच पण त्याच्या थोडं वरती जावं लागतं. तिकडे जायला वेगळी एकेरी पाऊलवाट आहे. वाटेत भरपुर दगड धोंडे आहेत. जर एखादी पन्हळ गुरांच्या धक्क्याने जागेवरुन हलली असेल तर ती पुन्हा परत जोडुन, टेकु देवुन, माती लिंपुन डागडुजी करायला लागते की परत पाणी सुरळीत चालु व्हायचे. काही ठिकाणी हा पाट जिथं जमीनीवरुन जातो तिथे कधी कधी रात्रीचं एखादं रानडुक्कर पाटात मध्येच ठंडाव्याला लोळयला यायचं. कि तिथली माती पुन्हा सारखी करुन पाटात चर खणुन पाट वाहता करवा लागे. या पाटात जसं जसं वरती चढत जायचो तसं तसं वाट अधिक दुर्गम होत जाते. जिथुन पाणी झिरपत येते ती जागा तर एका मोठ्या शिळे खाली आहे. (खालील फोटो पहा)
काका आणि मी त्या शिळेत आंतमध्य जावुन आजुबाजुची जागा पालापाचोळा साफ करतो. पाणी जिथे पन्हळीत शिरते तिथे माती लिंपुन होणारी गळती थांबवतो. या शिळेत भरपुर कोळी, किटक, इतर वन्यजीव आहेत. या यंदा मला त्यात एक वटवाघुळही वस्तीला होते ते खुप जवळुन पहायला मिळाले.
आताशा येवुन सात ते आठ दिवस कसे भुरकन उडुन गेलेले असायचे. आता आम्हाला मामाच्या गावाला दापोलीला जायचे वेध लागलेले असायचे. कारण तिकडे कळव्यातील मामा मामी नि आमची भावंड आधीच येवुन काय काय मजा करत असतील असे वाटायचे. मग घरातील लहान मोठ्या मंडळीचा आम्ही मुक्काम वाढवा असा आग्रह होत असे. "एवढं लांब आला आहात तर रहा ना अजुन दोन एक दिवस, तर आजोबा "मी शनिवारी तुम्हाला जावु देणार नाही" (त्यांची अशी समज होती की शनिवारी कोणताही लांबचा प्रवास करु नये) असे बजावत असत.
यावेळ पावतो दोन दिवस आधी पुन्हा सामानाची बांधाबांध चालु व्हायची. आंब्यासाठी लाकडाच्या चौकोनी पेट्या, घरच्या माडापासुन काढलेल्या हिरकुटा पासुन बनवलेला खराटा, सुंभ, कोकम सरबताची बाटली, फणस, काजु, सुपारी, नारळ, लोणच्याची बरणी, फणसपोळी, आंबेवडी, साठं, काय घेवु नी काय नको असे होवुन जायचे.
आदल्या दिवशी काका खाली परत बंदरावर यायचा. कोळी लोकांकडे जावुन दुसर्या दिवसाची पहाटेची होडी /मचवा मिळेल काय हे ठरवायचा. लाँच आमच्या वेळेत नाही आली तर एवढं सामान घेवुन (आमच्या सोईनुसार) या होडीने खाडी पार करुन पलिकडे पैलतीरावरिल दापोली तालुक्यातील एका गावातील बंदरावर उरतायचं व तिथुन ए.स्टी पकडुन दापोलीला जायचे असा बेत असायचा.
निघायच्या आदल्या दिवसाची रात्र तर खुप जड जायची. सामना वर एकदा शेवटचा हात फिरवुन घ्यायचा की काही राहिलं तर नाही ना? "पुन्हा केव्हा येणार", "आता गणपतीला या एकदा" अशी आमंत्रणं व्हायची की आम्ही म्हणायचो "तुम्ही कधी येणार मुंबई बघायला." कारण आत्या, चुलत भावु यांनी कधीच मुंबई बघीतलेली नव्हती. माझी काकु तर अजुनही फक्त दोन तीन वेळाच मुंबईला येवुन गेलेली आहे. रात्री मग लहान मंडळी "आम्हलाही सकळी लवकर उठवा" म्हणजे निरोप घेता येईल असा हट्ट करत.
सकाळी लवकर उठुन चहा नाश्ता झाला की निघताना सगळ्या मोठ्या मंडळींना वाकुन नमस्कार करायचा. देव्हार्यात सुपारी ठेवायची की आम्ही सगळे निघायच्या तयारीत. आमच्याकडे कामाला असलेला धोंडीबा आमच्या सामानाचे डाग घेवुन झपझप आधीच बंदराकडे निघुन गेलेला असायचा. "परत या", "तब्येतीची काळजी घ्या", "गेल्यावर पत्र पाठवा" असे दोन्हीकडुन आश्वासानांची देवाणघेवाण झाली की आम्ही घरातुन बाहेर पडत असु. घरातील इतर मंडळी कुंपणा पर्यंत निरोप द्यायला येत असत. मग होता होईल तो मागे वळुन त्यांना हात हलवीत टाटा केला जायचा. काका मात्र आमच्या बरोबर बंदरावर यायचे.
स़काळच्या वेळीस नुकतेच उजाडालेले असताना पक्षांच्या किलबिटात, वरुन दिसणारी शांत खाडी, पलिकडच्या तिरावरले डोंगर असं सगळं विहंगम दृष्य मनात साठवंत ती डाग (उतरण) उतरायची. पक्टीला आमचा होडी लागलेली असायची, धोंडीबाने आणलेले सामान आधीच त्यावर चढवलेले असायचं. मग उरलेल्या सामाना सकट आम्ही होडीत चढलो की इकडे बंदरावर पुन्हा काका आणि वडीलांची अखेरच्या निरोपाची देवाणघेवाणा व्हायची.
मग होडीने किनारा सोडला की लांबवर जात जाता काका आणि धोंडीबा हात हलवत असताना दिसत असे. मग मात्र ते दोघे वळुन वर डाग चढताना दिसत असत. आता डोंगर हळुहळु दुर दुर जाताना बंदरावरील माणसे झाडे लहान होत जातं. नंतर तर हिरव्या पिवळ्या डोंगरावर ते दोघे पांढुरके ठिपकेच वाटत असत. आता पर्यंत होडी मुख्य पात्रात आलेली असे, शांत आवाजात दोन्ही बाजुंनी उंच डोंगर, सकाळचा खाडीचा गार वारा आणि त्यात नावेच्या वल्हींचा चुबुक चुबुक आवाज करत चाललेली आमची होडी, कधी माशांच्या झुंडी , पाण्यावर उडणारे पक्षी, वातावरण एवढं मस्त वाटतं की हा प्रवास संपुच नये असे वाटत राहयचं.
मग दापोली तालुक्यातील डोंगर, समोरील पक्टी त्यावरील माणसे हळुहळु दृष्टीक्षेपात येत असत. बंदरावरच दापोली तालुक्याची लाल डब्याची ए.स्टी. येवुन लागलेलीच असे. एकदा होडी किनार्यावर लागली की त्यातले सामानाचे डाग काढुन ए.स्टी.त चढवायचे कि मग पुन्हा घाटातील चढ वळवळणाने चढत एक एक गावं घेत दापोलीला जाण्यासाठी ए.स्टी. आपला मार्ग चालु लागे.
मग प्रवासातील प्रत्येक वळणावर जिथ पर्यंत दिसत असेल त्या शेवटपर्यंत मागे पळणार्या झाडांमधुन दिसणार्या खाडीचे, त्या मधिल होडयांचे, पैलतीरावरिल डोंगरांचं विहंगम दृष्य नजरेत साठवण्यचा अट्टाहास असे. कारण आता इकडे येणं हे पुढिल मे महिन्या शिवाय होणार नाही तेव्हा पुढिल वर्षभर या आठवणींचा ठेवा जपण्याचा एक केविलवाणा प्रयत्न असे. पुढे या प्रवासात आम्ही मुलं सकळी लवकर उठलेली असल्याने पेंगुळलेली असायचो. मग साधारण तासा दिड तासाने गाडी दापोलीच्या स्टँडला पोहचत असे की आई हलवुन जागं करत असे स्टँडवर मोठा मामा आम्हाला न्यायला आलेला असे. मग गाडी बदलुन आजोळी जाण्यासाठी त्याच्याबरोबर पुढचा प्रवासाला आरंभ होत असे.....
शिळेच्या आंतमध्ये दोन दगडांच्या फटीत तुन झिरपणारे पाणी
काका आणि मी त्या शिळेत आंतमध्य जावुन आजुबाजुची जागा पालापाचोळा साफ करतो. पाणी जिथे पन्हळीत शिरते तिथे माती लिंपुन होणारी गळती थांबवतो. या शिळेत भरपुर कोळी, किटक, इतर वन्यजीव आहेत. या यंदा मला त्यात एक वटवाघुळही वस्तीला होते ते खुप जवळुन पहायला मिळाले.
वटवाघुळ

प्रतिक्रिया
आवडले .
मस्त लेखमाला...
अरे हो धन्यवाद मु.वि साहेब.
अतिशय सुरेख वर्णन. सकाळीच्या
मस्त पम्या !!!
मस्त!
मस्तच रंगत चाललीये मालिका,
@प्रमोद देर्देकर,
आता कळव्यात खारेगावच आपले गाव
सर्वांना धन्यवाद
@प्रमोद
नमस्कार
माझं गाव पन्हाळजे (ता.खेड).
कोकम सरबताचे कॅन नेहमी दगा द्यायचे एस.टीत!
आम्ही मुळचे मुंबईकर , बाबा