✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुणे (अचानक) कट्टा

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Wed, 03/26/2014 - 17:34  ·  लेख
लेख
लोकहो......... समस्त मिपाकरहो....

दिनांक २८ मार्च २०१४

रोजी आपले प्रभाकर पेठकर काका पुण्यग्रामी येत आहेत होsssssssssssss! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif तरी,ज्या ज्या मिपाकरांस या अचानक डॉट कॉम कट्ट्यास येणेचे शक्य असेल त्यांनी या दवंडीस प्रतिसादी अनुमोदन द्यावे होsssssssssssss! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-jumping-smileys-378.gif कट्ट्याचे स्वरूपः- सकाळी दहा वाजता ,पुण्यनगरीतील मंडई नामक बहुश्रुत विभागातील तुलसीबाग नामे करुन असलेल्या प्राचीन स्त्री....( सॉरी :D ..) स्त्री प्राचीन... (हां...आता जम्लं! :D ...) अलंकार प्रीती विभागात.... अंतःपुरात जाणार्‍या वाटेवर ..राम देवालया समीप असलेल्या... श्रीकृष्ण मिसळ नामे खाद्यक्षुधावर्धन गृहात http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink020.gif जमावयाचे आहे होsssssssssssss! तद् नंतर पुढील पूर्ण दिनात् अत्र/तत्र हिंडोन* http://www.sherv.net/cm/emo/dancing/egyptian.gif सायंकाली चिंचवड ग्रामात ट्रान्स्पोर्ट नगरातील रामदेव-बाबा-ढाबा नामक महा-क्षुधा-शांति गृहात हादडौन दिनः-सांगता करण्याचे नक्की केले आहे होsssssssssssss! *---- (हे हिंडणे आपल्या सर्वांच्या [मिसळ भक्षून तट्ट जाहलेल्या पोटा'चे] हिंड-मान लक्षात घेवोन..आयत्यावेळी "कुठेही" करणेत येइल...! ) हे ढांम ढांम ढांम ढांम ... http://www.sherv.net/cm/emoticons/music-instruments/playing-drums-smiley-emoticon.gif धत्तड तत्तड तत्तड तत्तड.... http://www.sherv.net/cm/emoticons/party/party-hat-and-balloons-smiley-emoticon.gif
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
25142 वाचन

💬 प्रतिसाद (142)

प्रतिक्रिया

>>तुळशीबागेत यायचं हं..

सूड
Fri, 03/28/2014 - 14:11 नवीन
>>तुळशीबागेत यायचं हं.. हल्ली बागेत इनो विकतात? बा द वे हे तुळशीबाग का काय ते कुठे आलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

मंडई के पायर्‍यांपर जो पाणी

यशोधरा
Fri, 03/28/2014 - 14:31 नवीन
मंडई के पायर्‍यांपर जो पाणी पड्या है, उसमें पडके डूब मरो मेल्या! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काय छळवाद आहे!

भाते
Fri, 03/28/2014 - 13:49 नवीन
आम्ही इथे हापिसात बसुन काम करतोय आणि हे धाग्यावर कट्टयाचे धावते समालोचन देत आहेत दुष्ट लेकाचे! आता खादाडीचे फोटो आणि सविस्तर वृत्तांत टाकुन आणखी जळवतिल.
  • Log in or register to post comments

हेच म्हणायचे आहे ...

मि मिपाचा मित्रच
Fri, 03/28/2014 - 14:14 नवीन
आम्ही इथे हापिसात बसुन काम करतोय आणि हे धाग्यावर कट्टयाचे धावते समालोचन देत आहेत दुष्ट लेकाचे! आता खादाडीचे फोटो आणि सविस्तर वृत्तांत टाकुन आणखी जळवतिल
  • Log in or register to post comments

मी रात्री आहेच रामदेव

झकासराव
Fri, 03/28/2014 - 14:54 नवीन
मी रात्री आहेच रामदेव धाब्यावर. :) आत्मुरावांचा मोबाइल नंबर मिळाला आहे.
  • Log in or register to post comments

आत्मुदा, पेठकर काका आणि

प्रचेतस
Fri, 03/28/2014 - 15:21 नवीन
आत्मुदा, पेठकर काका आणि एक्काश्री ही मंडळी आता पवनानगर येथील बेडसे लेण्यांच्या भटकंतीला निघाली आहेत अशी आमच्या आतल्या गोटातून खबर आहे. =))
  • Log in or register to post comments

अगदी खरीय बातमी

यशोधरा
Fri, 03/28/2014 - 15:27 नवीन
अगदी खरीय बातमी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

>>> लेण्यांची भेट >>>

यसवायजी
Fri, 03/28/2014 - 16:18 नवीन
ही मंडळी ? मग तुम्ही (लेणी गाईड!) नाहीत त्यांत??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मी हापिसात कळफ़लक बडवत बसलोय.

प्रचेतस
Fri, 03/28/2014 - 16:44 नवीन
मी हापिसात कळफ़लक बडवत बसलोय. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

सांजच्याला भेटू.

यसवायजी
Fri, 03/28/2014 - 17:20 नवीन
सांजच्याला भेटू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वोक्के सर.

प्रचेतस
Fri, 03/28/2014 - 17:37 नवीन
वोक्के सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

आणखी जळजळ झाली...

मि मिपाचा मित्रच
Fri, 03/28/2014 - 16:32 नवीन
आणखी जळजळ झाली... आता countdown start kele ahe – off madhun nighayche & katta join karayche !!!
  • Log in or register to post comments

व्वा! मज्जा चाललीये मंडळी

किसन शिंदे
Fri, 03/28/2014 - 20:00 नवीन
व्वा! मज्जा चाललीये मंडळी :-)
  • Log in or register to post comments

पेठकर काका

निनाद मुक्काम …
Fri, 03/28/2014 - 21:52 नवीन
पेठकर काका २ तारखेला मुंबईत आहात ना मी तेव्हा मुंबईत असेल ता. क मी मुंबईत ० मार्च ते १४ एप्रिल आहे. मुंबईत महा कट्टा करता आला तर खूप बरे होईल , म्हणजे जास्तीसजास्त मिपाकरांना भेटता येईल. मिपाकरांना भेटण्यास उतावीळ व कट्टा आयोजकाच्या शोधत निनाद , मुक्काम पोस्ट मुंबई दोन आठवड्या पुरता
  • Log in or register to post comments

जर्मन कॅलेंडर?

पिवळा डांबिस
Fri, 03/28/2014 - 22:36 नवीन
मी मुंबईत ० मार्च ते १४ एप्रिल आहे.
० मार्च? हे काय जर्मन कॅलेंडर काय हो? :) (टायपो हाय तां कलतांव, पन पीजे करांचा मोह आवरंना!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

आँ?

उपास
Fri, 03/28/2014 - 23:37 नवीन
आँ पिंडाकाका, मला तर दिसतांव ३० मार्च, तुमका दिसत नाय, हॅप्पी अवर की काय तां? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

छ्या!

पिवळा डांबिस
Sat, 03/29/2014 - 01:12 नवीन
हॅप्पी अवर खंयचो इतक्या लवकर? मांका अजूनही ० मार्चच दिसतांसा, तुमी काय ३डी स्क्रीन वापरतसांत की माझो स्क्रीन १डी झालो तां काय कळना!!! मिपावर भुताटकी आसां ता म्हायती होतां पण इतको प्रत्यक्ष अनुभव पहिल्यांदाच!!! :) असो. ३० मार्च तर ३० मार्च...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

ब्राऊजर बदलून बघतलत?

उपास
Sat, 03/29/2014 - 01:15 नवीन
पिडांकाका, ब्राऊजर बदलून बघतलत का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

माका बी

पैसा
Sat, 03/29/2014 - 01:17 नवीन
० मार्च दिसतांहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

हाहा..

उपास
Sat, 03/29/2014 - 01:19 नवीन
ज्योताय, पुण्यवान माणसास ३० दिसतां.. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाय मेल्या, ३० मार्च तारीख तर

पिवळा डांबिस
Sat, 03/29/2014 - 01:27 नवीन
नाय मेल्या, ३० मार्च तारीख तर सगळ्यांकाच दिसतां.. जेंका ० मार्च दिसता ते खरे भाग्यवान!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

+१ हनुमोदन

आनन्दिता
Sat, 03/29/2014 - 08:58 नवीन
+१ हनुमोदन -- पुण्यवान आनंदिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हुम्म्म

इरसाल
Sat, 03/29/2014 - 14:01 नवीन
माका ० मार्च दिसताहां. माझो ० डी दिसता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मंग मी पुण्यवान, मी पुण्यवान.

चिगो
Tue, 04/01/2014 - 12:10 नवीन
मंग मी पुण्यवान, मी पुण्यवान.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

माकां पण ० मार्चच दिसतां मरें

सूड
Sat, 03/29/2014 - 01:19 नवीन
माकां पण ० मार्चच दिसतां मरें!! ब्राऊजर बदललो जाल्यार ३० दिसतलां कांय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

नो

पिवळा डांबिस
Sat, 03/29/2014 - 01:30 नवीन
एकबाणी रामासारखो हो पिडांकाका सुद्धा 'एकब्राउजरी' आसां!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

>>मिपावर भुताटकी आसां ता

सूड
Sat, 03/29/2014 - 01:22 नवीन
>>मिपावर भुताटकी आसां ता म्हायती होतां पण इतको प्रत्यक्ष अनुभव पहिल्यांदाच!!! साक्षात पिवळो डांबिस हंयसर असताना वेगळी भुताटकी कित्यां होयी महो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

तां तर झालांच...

पिवळा डांबिस
Sat, 03/29/2014 - 01:33 नवीन
पण म्हंटलां अत्रूप्त आत्म्याचो धागो म्हंटल्याकारणान काय सांगूक येतां? :) असो. धाग्याचा इतक्या जम्मू पुरे, उगीच पार श्रीनगर नुको करूयांत!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आता पहिले

निनाद मुक्काम …
Sat, 03/29/2014 - 03:12 नवीन
आता पहिले मला सुद्धा ० मार्च दिसत आहेत. तीस तारखेला असेच म्हणायचे होते. मुंबईत राहणार आहे त्यामुळे डोंबिवली ते मुंबई व तिची उपनगरे कुठेही कट्टे करण्यास उत्सुक रविवार वगळता सकाळ चा कट्टा करण्यास पुण्य नगरीला सुद्धा धावती भेट देऊ शकतो. ता . क आताच मूवी ह्यांचा व्यनि आल्याने जीव भांड्यात पडला आहे. पुण्याच्या कट्याला शुभेच्छा
  • Log in or register to post comments

डोंबोली म्हट्ले की लग्गेच

यशोधरा
Sat, 03/29/2014 - 09:21 नवीन
डोंबोली म्हट्ले की लग्गेच मुविकाकांचा व्य नि आला काय? बरी नव्हे हो पार्श्यालिटी! :P बाकी मलाही ० मार्च दिसत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

हा हा..

उपास
Sun, 03/30/2014 - 05:49 नवीन
मलाही शून्यच दिसतेय पण ३० चा अंदाज लावला, पिडांकाका मोकळेच होते म्हटलं टाकावा गुगली.. बर्‍याच विकेट्स मिळाल्या पण ;) गंमत हां!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आम्हांला माहिताय पण कशाक्ला

यशोधरा
Sun, 03/30/2014 - 05:55 नवीन
आम्हांला माहिताय पण कशाला तुमचा पचका करा, असं ठरवलंन! :D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

बरी नव्हे हो पार्श्यालिटी!

मुक्त विहारि
Sun, 03/30/2014 - 21:53 नवीन
ओके जून मध्ये पुण्याला येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

कालची रबडी सर्वांची भेट

झकासराव
Sat, 03/29/2014 - 08:51 नवीन
कालची रबडी सर्वांची भेट झाल्याने अधिकच गोड लागली. :Happy:
  • Log in or register to post comments

आणी बबडी??

यसवायजी
Sat, 03/29/2014 - 09:57 नवीन
आणी बबडी?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

पुणे कट्टा द्विसत्रात.

प्रभाकर पेठकर
Sat, 03/29/2014 - 10:04 नवीन
'अतृप्त' आयोजकाने श्रीकृष्णमध्ये मिसळपाव सदस्यांना मिसळपावच खाऊ घालून अगदी तृप्त केले. सूड, इस्पिकचा एक्का, पिंगू, यशोधरा आणि दस्तुरखुद्द अतृप्त आत्मा ह्यांच्या समवेत सकाळचा कट्टा संपन्न झाला. ह्या कट्ट्याला माझ्या लेकानेही उपस्थिती लावली. नंतर सूड, पिंगू आणि यशोधरा ह्यांना कामे असल्याने (म्हणजे आम्ही रिकामटेकडे होतो असे नाही) त्यांनी उपस्थितांचा दु:खी अंतःकरणाने निरोप घेतला. तिथून पुढे, अम्मळ शतपावली करीत आणि पुण्याचे 'सृष्टीसौंदर्य' पेन्शनर्सच्या नजरेने पाहात पाहात, बाकीचे आम्ही (इस्पिकचा एक्का, आत्मा आणि मी) अतृप्ताम्याच्या वाहनाकडे निघालो. वाटेत, अतृप्त आत्मा ह्यांच्या शिफारशीनुसार एका अस्सल पुणेरी दुकानातून अस्सल अत्तराची खरेदी झाली. पुढील पाडाव कोथरुडात माझ्या घरी होता. तिथे चहापाना दरम्यान इस्पिकचा एक्का ह्यांनी मस्कतच्या जुन्या आठवणी जागवल्या. गप्पा छान रंगल्या होत्या परंतू पुढे बेडसे लेणी पाहायला जायचे होते. गुरुजींनी, लेण्यादर्शनार्थ अगदी जुजबी पायर्‍या चढाव्या लागतील आणि त्या घारापुरी पेक्षा अगदी सहज आहेत असे आश्वासन दिले होते. त्या नंतर तिथे पोहोचल्यावर डोंगराच्या पायथ्याशी उभे असताना, मला वाटले पायर्‍यांच्या पहिल्या वळणानंतर लेणी सुरु होतील. परंतु, माझ्या ह्या भाबड्या विचारांना अतृप्त आत्म्याने, ' ते चाफ्याचे झाड दिसते आहे नं, तिथे आहेत ती लेणी' असे म्हणून भूसुरुंग लावला. मी पाहिले तर ते चाफ्याचे झाड, मी उभा होतो तिथून तुळशी वृंदावनातल्या तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसत होते. एका सत्शील दिसणार्‍या गुरुजींनी एवढ्या लांब आणून आपला 'कात्रज' केला आहे हे तत्क्षणी मला जाणवले. दर आठ-दहा पायर्‍यांवर विसावत उरलेल्या मार्गाचा आढावा घेत मार्गक्रमणा सुरु झाली. 'गुरुजी' जमातीवरून माझा विश्वास उडाला. गुरुजी आणि तरुण इस्पिकचा एक्का टणाटण उड्या मारत पायर्‍या चढत होते, त्यांचा उत्साह बापुडवाण्या चेहर्‍याने पाहात, मी (माझेच) पाय ओढत, माझा देह चाफ्याच्या झाडाच्या दिशेने निकराने ढकलत होतो. सोबत काकू होत्याच त्यांना आता हा माणूस वर (म्हणजे लेण्यांपर्यंत) कसा पोहोचणार आणि सदेह कसा परतणार ह्या चिंतेने ग्रासलं होतं. बर्‍याच खडतर प्रयत्नांनंतर चाफ्याच्या झाडापाशी पोहोचलो आणि हुश्श (सर्वांनीच) केलं. तळावरून तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसणारे ते झाड चांगलेच १५ बाय १५ फुट असे डेरेदार होते. लेणी पाहताना आत्तापर्यंतच्या सर्व श्रमांचा विसर पडला. दगडात कोरलेली नक्षी, आणि भावदर्शी शिल्पं पाहून मन मोहून जाते. आम्हा उरलेल्या ३ 'व्यक्तीं'साठी आज अतृप्त आत्मा हेच 'वल्ली' होते. त्यांनी त्यांच्या परीने ती भूमिका सुंदर वठवली. लेण्यांची माहिती देत अविस्मरणिय अशी सहल घडवली. एवढ्या उंचावर पाषाणात कोरलेली शिल्पं,गोड पाण्याची टांकं, बौद्ध भिख्खूंची चर्चा कक्ष, विश्रांती कक्ष, स्नानगृह आणि ध्यानगृह पाहून मन खरंच विस्मयचकित होतं. मी आणि काकू फक्त श्रवणभक्ती करीत होतो. पण गुरुजी आणि इस्पिकचा एक्का ह्या ज्ञानी जनांमध्ये ही शिल्पं , आपला धर्म आणि मुसलमान धर्मातील फोलपणा ह्यावर व्यासंगी चर्चा झाली. दांभिकपणा बाबत सर्व धर्मात एक वाक्यता आहे, धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून, स्वार्थ साधण्यासाठी भोळ्या भाबड्या (म्हणजेच मूर्ख) जनतेस वेठीस धरतात ह्यावर एकमत झालं. परतीचा प्रवास (माझ्यासाठी) सुकर होता. निगडीकडे मार्गस्थ झाल्यावर वाटेत एका क्षुधाशांती उपहारगृहात पुनःश्च एकवार मिसळपाव आणि चहानामक पेयावर ताव मारून झाला जड अंतःकरणाने (आणि देहाने) बेडसे लेण्यांचा निरोप घेतला. काकूंना तिच्या बहिणीकडे 'मनमोकळ्या' गप्पासत्रासाठी सोडून मी 'श्री रामदेव बाबा ढाब्याकडे' संध्याकाळच्या कट्ट्यासाठी प्रयाण केलं. 'श्री रामदेव बाबा ढाब्यावर' अतृप्त आत्मा, इस्पिकचा एक्का ह्यांच्या समवेत चौकटराजा, श्री आणि चिरंजिव नादखुळा, मी मिपाचा मित्र (मी आधी 'नीताचा' ऐकलं. त्यामुळे ही 'नीता' कोण ह्या विचारात कांही सेकंद गेले), झकासराव, वल्ली, यसवायजी, देवांग आदी जमले होते. थोड्या उशीराने श्री. बाबा पाटील ह्यांनी उपस्थिती नोंदविली. 'श्री रामदेव बाबा ढाबा' ह्या नांवामुळे आपल्या पुढे काय 'वाढून' ठेवले असेल धाकधुक मनांत होती. पण डाल बट्टी ह्या राजस्थानी पारंपारिक पदार्था समवेत, व्हेज कडाई, मटर-मेथी-मलाई,भाकरी, दहिखिचडी वगैरे पदार्थ छान होते. गोड खाणार्‍यानी रबडी हादडली. भरपूर साधकबाधक चर्चा झाली. मराठी चर्चेला चिं. नादखुळा ह्या मिपाच्या भावी क्रिकेटप्रेमी सदस्याने कानडी तडका दिला. जेवूनखाऊन तृप्त मनाने शेजारच्याच पानाच्या टपरीची विक्रि वाढविली तिथे उर्वरीत चर्चा (वल्ली आणि अतृप्त आत्मा ह्यांची लटकी खणाखणी) रंगली. अचानक किसन शिंदेंनी हजेरी लावून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. पुढे त्यांच्या आणि मिपाच्या वादग्रस्त सदस्याच्या जवळिकीवरून हास्यविनोदाला उधाण आले. निरोप घेता घेता चर्चा रंगत राहिल्या. निघता पाय पुन्हा पुन्हा मागे घेतला जात होता शेवटी 'उद्या ऑफिस आहे' ह्या व्यावहारिक विचाराने मिपाची सुंदर संध्याकाळ आवरती घेतली. सर्वांनाच मजा आली. यशस्वी कट्टा आयोजनाबद्दल अतृप्त आत्मा ह्यांचे विशेष आभार. कोणीतरी कट्टुयाची छायाचित्रे टाकेलच.(मी सुद्धा वाट पाहात आहे).
  • Log in or register to post comments

अचानक किसन शिंदेंनी हजेरी

धन्या
Sat, 03/29/2014 - 10:30 नवीन
अचानक किसन शिंदेंनी हजेरी लावून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
किसन शिंदे नाही काका. मी मी धन्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सपशेल बिनशर्त माफी.

प्रभाकर पेठकर
Sat, 03/29/2014 - 11:53 नवीन
छ्या:! झाला नं गोंधळ. माफी असावी धनाजी राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

माफी कसली हो काका. मी फक्त

धन्या
Sun, 03/30/2014 - 00:11 नवीन
माफी कसली हो काका. मी फक्त तुमच्या लक्षात आणून दिलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

माताय असा वास्तवातिल डु आयडी

आत्मशून्य
Sat, 03/29/2014 - 12:15 नवीन
माताय असा वास्तवातिल डु आयडी प्रकार पहिल्यांदाच पाहिला ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

>>किसन शिंदे नाही काका. मी मी

सूड
Mon, 03/31/2014 - 14:52 नवीन
>>किसन शिंदे नाही काका. मी मी धन्या. बाकी किसन शिंदे म्हटलं तरी नवल नाही. ते असा आश्चर्याचा धक्का देऊ शकतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पेठकरांचा नेटका पण सविस्तर वृत्तांत

संजय क्षीरसागर
Sat, 03/29/2014 - 11:33 नवीन
आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

माझा पहिला दिवसभराच मिपाकट्टा

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 03/29/2014 - 16:40 नवीन
माझा पहिला दिवसभराच मिपाकट्टा... खान-पान-चर्चा... लै मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

@तिथे चहापाना दरम्यान

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/29/2014 - 18:20 नवीन
@तिथे चहापाना दरम्यान इस्पिकचा एक्का ह्यांनी मस्कतच्या जुन्या आठवणी जागवल्या.>>> समस्त मिपाकरहो...या गप्पा म्हणजे जे काहि होते...ती एक्काकाकांची एक जबरदस्त लाइव्ह लेखमाला होती! धर्मव्यवस्था कोणतीही असो.जर का त्यात उदारमतवादी सहृदययी पण करारी व्यक्ती सत्तास्थानी आली तर समाजाचा आश्चर्यकारक काया-पालट घडवू शकते. हेच पदोपदी पटवून देत होती. (एक्काकाका,पुन्हा एकदा विनंती आहे हो..लिहा..लिहा..आणि लिहाच!) मी पुढे बेडश्याला जाताना लेखमालेचा उत्तरार्ध प्रश्नोत्तरांसह अनुभवला आहे.आणि तो जबरदस्त परिणाम घडवून गेलाय. @गुरुजींनी, लेण्यादर्शनार्थ अगदी जुजबी पायर्‍या चढाव्या लागतील आणि त्या घारापुरी पेक्षा अगदी सहज आहेत असे आश्वासन दिले होते. त्या नंतर तिथे पोहोचल्यावर डोंगराच्या पायथ्याशी उभे असताना, मला वाटले पायर्‍यांच्या पहिल्या वळणानंतर लेणी सुरु होतील.>>> Image removed. @परंतु, माझ्या ह्या भाबड्या विचारांना अतृप्त आत्म्याने, ' ते चाफ्याचे झाड दिसते आहे नं, तिथे आहेत ती लेणी' असे म्हणून भूसुरुंग लावला.>>> Image removed. @मी पाहिले तर ते चाफ्याचे झाड, मी उभा होतो तिथून तुळशी वृंदावनातल्या तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसत होते. एका सत्शील दिसणार्‍या गुरुजींनी एवढ्या लांब आणून आपला 'कात्रज' केला आहे हे तत्क्षणी मला जाणवले.>>> Image removed. @दर आठ-दहा पायर्‍यांवर विसावत उरलेल्या मार्गाचा आढावा घेत मार्गक्रमणा सुरु झाली. 'गुरुजी' जमातीवरून माझा विश्वास उडाला. गुरुजी आणि तरुण इस्पिकचा एक्का टणाटण उड्या मारत पायर्‍या चढत होते, त्यांचा उत्साह बापुडवाण्या चेहर्‍याने पाहात, मी (माझेच) पाय ओढत, माझा देह चाफ्याच्या झाडाच्या दिशेने निकराने ढकलत होतो. सोबत काकू होत्याच त्यांना आता हा माणूस वर (म्हणजे लेण्यांपर्यंत) Image removed. कसा पोहोचणार आणि सदेह =)) कसा परतणार ह्या चिंतेने ग्रासलं होतं. बर्‍याच खडतर प्रयत्नांनंतर चाफ्याच्या झाडापाशी पोहोचलो आणि हुश्श (सर्वांनीच) केलं. तळावरून तुळशीच्या अशक्त रोपट्याएवढे दिसणारे ते झाड चांगलेच १५ बाय १५ फुट असे डेरेदार होते.>>> Image removed. भ...र >>> झाड-जवळ आल्यानंतर काकांनी "इथे येणार्‍या लोकांना येथपर्यंत एक १२३ पौंड(बरोबर ना? :D ) वजनाचा माणूस येऊ शकतो,याची खूण पहायला मिळणार आहे" आंम्ही-"कशी?" काका- "तिथे १ कबर बांधली जाणार आहे." =)) बेडश्याच्या तळापासून ते वरच्या गाळ्यापर्यंत काका त्या डोंगरा इतक्याच उंचिचे षटकार मारत होते! =)) या वेळी मी मुद्दामच "इथेच जवळ आहे..हाकेच्या अंतरावर" या खेडवळ लोकांच्या स्टॅमिना वाढवणार्‍या औषधाचा परिणामकारक वापर काकांना चाफ्याचे-झाड दाखवून केला.. Image removed. पण लोकहो,उद्देश हाच की वरती त्या अद्भुताचा साक्षात्कार घडावा. मी माझ्याकडे बाहेरगावहून येणार्‍या मित्रमंडळी-पाहुण्यांना देखिल पुणे-दाखविण्या ऐवजी "बेडसे" दाखवतो! कारण,भारतीयत्वाची सांस्कृतीक मूल्य वाढवून रुजवणारी अशी ती एक जागा आहे,याची माझ्या मनाला खात्री आहे. छोटेसे सुंदर लेणे,पण मानवी प्रयत्नांचा अद्भुत चमत्कार आहे तो! :) @कोणीतरी कट्टुयाची छायाचित्रे टाकेलच.(मी सुद्धा वाट पाहात आहे). >>> लगेच टाकतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पेठकार काकानू

चौकटराजा
Sat, 03/29/2014 - 10:32 नवीन
तो नंतर आलेला किस्ना नव्हे धन्या ! ( अर्थात किस्ना घाट ओलांडून का आला नाही ? बौधा त्याची सानची पाळी असेल ! )
  • Log in or register to post comments

गोंधळ.

प्रभाकर पेठकर
Sat, 03/29/2014 - 11:55 नवीन
हो.. झाला खरा गोंधळ. वयपरत्वे नांवे आणि चेहरे लक्षात राहात नाहीत. वारंवार कट्ट्यांना हजेरी लावल्यावर कदाचित लक्षात राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

पेठकर काका आपल्या

भिकापाटील
Sat, 03/29/2014 - 11:42 नवीन
पेठकर काका आपल्या एन्टीक्युटीचा काय झालं :)
  • Log in or register to post comments

अँटीक्वेरी.

प्रभाकर पेठकर
Sat, 03/29/2014 - 11:51 नवीन
अ‍ॅन्टीक्यूटी नाही (ती भारतिय, मला वाटतं, स्कॉचचे नांव अँटीक्वेरी आहे). ती शोधली पण मिळाली नाही. ब्लॅक लेबल आहे. सांगा कधी (मुंबईत) बसायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिकापाटील

तेच म्हणतो! आचारसंहितेमुळे....

संजय क्षीरसागर
Sat, 03/29/2014 - 11:52 नवीन
संध्याकाळ नंतरच्या कट्ट्याचा वृत्तांत दडवलेला दिसतोयं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिकापाटील

भारी रे तुला चवकश्या जनोबा!!

सूड
Mon, 03/31/2014 - 14:42 नवीन
भारी रे तुला चवकश्या जनोबा!! गप रांव, वशाड मेलो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा