Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नानासाहेब नेफळे on गुरुवार, 03/20/2014 - 15:17
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ह्यांचा सध्या दणक्यात प्रचार चालू आहे. मोदीँना विकासपुरुष या टॅगखाली प्रोजेक्ट केले जात आहे. ज्या प्रमाणे त्यांनी गुजरातचा विकास केला त्याप्रमाणे ते भारताचा विकास करणार आहेत अशी आश्वासनांची खैरात टीव्ही ,सोशल मिडीया, रेडीओवर सतत करण्यात येत आहे .परंतु या विकासपुरुषाच्या प्रचारामागे भाजपची जातीय गणिते चालू आहेत, ज्याचा लेखाजोखा माध्यमं जनतेपर्यंत पोचवत नाही आहेत. आज पर्यंत भाजपाचे जे राजकारण राहीले आहे ते शेटजी भटजी या संज्ञेने ओळखले जाते. भाजपचा पिता 'जनसंघाला सुरवातीला याचा फायदा झाला .आणिबाणी नंतरही जनसंघ सत्तेत आला याला कारण त्याचे सुखवस्तु लोकांचे राजकारण .. परंतु जसे जसे जातीय अस्मितेचे राजकारण सुरु झाले तसा जनसंघ/जनता पार्टी निप्रभ होत गेले व काँग्रेस आणखी प्रबळ झाली. भाजपचा जन्म झाल्यानंतर मात्र हा शेटजी भटजीचा शिक्का पुसण्यासाठी ओबिसींचे ध्रुवीकरण करण्याची सुरवात झालि. भाजपात असलेला ओबिसी नेत्यांचा भरणा याचेच द्योतक आहे. परंतु भाजपने कधिही ओबिसी नेत्यांना अतिमहत्वाची पदे दिलेली नाहीत. एनडीएच्या काळात वाजपेयी ,अडवाणी, प्रमोद महाजन ,मुरली मनोहर जोशी ,यशवंत सिन्हा ,जसवंत सिंग या गैर ओबिसींच्या हातात सुत्रे दिली गेली. ज्याचा परिणाम म्हणजे शायनिंग इंडीयाचा फुटलेला फुगा ..ओबिसींनी डावलले गेल्याच्या भावनेतुन काँग्रेसला व तत्सम पक्षांना मतदान केले .भाजपचा बेस असलेला ओबिसी समाज त्यांच्यापासुन दूर गेल्यानेच त्यांनी आता नरेंद्र मोदींच्या रुपाने ओबिसी कार्ड खेळले आहे. मोदी हे घंची /तेली या ओबिसी जातीचे आहेत. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करुन भाजपने दोन प्रकारे त्यांचा प्रचार चालू ठेवला आहे.. भारतभर तरुण वर्गात सोशल मिडीयाचा वापर करुन त्यांना विकास पुरुष म्हणुन पुढे करायचे... त्याच वेळी जिथे जातीय समिकरणे महत्वाची आहेत व दिडशे लोकसभा मतदार संघ आहेत अश्या युपी बिहार व हिंदी बेल्टमध्ये मोदींना ओबिसी म्हणुन प्रोजेक्ट केले जात आहे. याचे कारण ओबिसींची सर्वाधिक संख्या या पट्ट्यात आहे. नुकतेच नरेंद्र मोदींनी बिहारात "माझ्यासारख्या मागासवर्गीयाला भाजपने पंतप्रधानापदाचे उमेदवार केले आहे" त्यामुळे भाजपवरचा ब्राह्मणांचा पक्ष असल्याचा दावा खोटा असल्याचे म्हण्टले आहे. भाजपचे राजकारण नेहमीच संभ्रमाचे राहीले आहे, ऐकीकडे हिंदुत्वाच्या व्याख्येचा दाखला देऊन जातीय आरक्षणाला विरोध करायचा त्याचवेळी अनेक तुकड्यात विखुरलेल्या ओबिसी समाजाचा वापर करुण घ्यायचा ,परंतु वरवर असे करुन चालणार नाही याची चुणुक त्यांना २००४च्या निवडणुंकांमध्ये आली आहे. नरेंद्र मोदींनी भाजप खाऊन टाकला आहे वा त्यांना तसे करताना अंतर्गत विरोध झाला नाही याचे कारण त्यांच्या ओबिसी असण्यात आहे.
  • Log in or register to post comments
  • 12765 views

प्रतिक्रिया

Submitted by पैसा on Fri, 03/21/2014 - 22:01

In reply to पैसा पंतप्रधान ! by आयुर्हित

Permalink

मस्त आयड्या!

मिसळपाव देणारे एटीएम! क्या आयडिया है सरजी!
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Fri, 03/21/2014 - 21:31

In reply to अ‍ॅट्रॉसिटी by पैसा

Permalink

ह्म्म

म्हणजे सध्यातरी माणुस गाढवाच्या वरच्या जातीचा आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by निरंजन on Fri, 03/21/2014 - 14:43

In reply to मिपाची काळजी नसती तर मोदींची by मंदार दिलीप जोशी

Permalink

अशी तक्रार नाही करता येणार.

अशी तक्रार नाही करता येणार.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on Fri, 03/21/2014 - 14:51

In reply to अशी तक्रार नाही करता येणार. by निरंजन

Permalink

अरेरे

अरेरे :(
  • Log in or register to post comments

Submitted by बारक्या_पहीलवान on Wed, 05/21/2014 - 18:51

In reply to मिपाची काळजी नसती तर मोदींची by मंदार दिलीप जोशी

Permalink

अ‍ॅट्रॉसिटीच्या खाली या नेफळेसाहेबांना आत टाका ...

नेफळेला मराठा समाजाचि पन Allergy आहे. (मोदींच्या विजयाचे परीक्षण)
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on Wed, 05/21/2014 - 20:44

In reply to अ‍ॅट्रॉसिटीच्या खाली या नेफळेसाहेबांना आत टाका ... by बारक्या_पहीलवान

Permalink

उलट सांगताय... राज्यात २५

उलट सांगताय... राज्यात २५ टक्के असलेल्या मराठ्यांना इतर समाजाची allergy येते, मनोहर जोशी व नंतरच्या काळात सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर यांचा जीव कासावीस झाला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Fri, 03/21/2014 - 14:46

Permalink

भाजपाचे राजकारण ?

नानासाहेब नेफळे (मिपा) = ग्रेट थिम्कर (ऐ अ) = पालथाघोरस (मा बो) मोदीची जाहीरात अशीच करत रहा ! उभा भारत आपला आभारीच राहील !!
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on Fri, 03/21/2014 - 15:13

Permalink

राजकीय लेख लिहताना सनदशीर

राजकीय लेख लिहताना सनदशीर मार्गाने एखाद्याचे जातीविशेष सांगणे यात गैर काही नाही.फ्रीडम ऑफ स्पीच एण्ड एक्स्प्रेशनचे घटनेतले कलम याचा अधिकार देते. अट्रोसीटीची तक्रार फक्त SC/ST व्यक्तीच इतरांवर दाखल करु शकतात.त्या इतरांमध्ये 'ओबिसीही' आले. एखाद्या ब्राह्मणाने मराठ्यांची ,मराठ्यांनी माळी माणसाच्या जातींचे उल्लेख अपमानजनक पद्धतीने केल्यास एट्रोसिटी कलम लागू होत नाही ,परंतु उपरोक्त तिघांपैकी कुणीहि SC/ST समाजातील व्यक्तीच्या जातीचा अपमानजनक उल्लेख केला तर त्यांना जातीवाचक शिवागाळीचा कायदा लागू होतो.ऐट्रोसिटी कायद्याबद्दल बरेच गैरसमज आहेत हे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on Fri, 03/21/2014 - 15:19

In reply to राजकीय लेख लिहताना सनदशीर by नानासाहेब नेफळे

Permalink

धन्यवाद नेफळे उर्फ

धन्यवाद नेफळे उर्फ ग्रेटथिन्कर उर्फ बरेच काही
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Fri, 03/21/2014 - 16:15

Permalink

सारख्या ह्याच्या-त्याच्या

सारख्या ह्याच्या-त्याच्या जातीपातीच्या शिळ्या कढीला ढवळून लोकांना काय आनंद मिळतो कोणास ठावूक... तोच तोच पणाचा कंटाळा यायला लागला आहे आता.
  • Log in or register to post comments

Submitted by चैतन्य ईन्या on Fri, 03/21/2014 - 18:18

In reply to सारख्या ह्याच्या-त्याच्या by शिद

Permalink

कंटाळा तुम्हाला

कंटाळा तुम्हाला हो कारण तुम्ही बामन ना. ह्या तुम्हाला काय कळणार ५००० वर्ष तुमच्या बाप जाद्यांनी काय काय अत्याचार केले. ह्या काय काळातच नाय तुम्हाला हो. तुम्ही जेंव्हा त्यांच्या घरी राबाल तेंव्हाच खरी जातपात नष्ट होईल. काय बरोबर ना हो नेफळे
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Fri, 03/21/2014 - 18:46

In reply to कंटाळा तुम्हाला by चैतन्य ईन्या

Permalink

चैतन्य ईन्या साहेब,

चैतन्य ईन्या साहेब, तुम्हाला माझी जात कशी काय कळली हो... की उगाच आपले ब्राह्मण्द्वेशाने भारुन सगळ्यांनाच ब्राह्मण ठरवताहेत. असो... मला येथे माझी जात उघड करण्याची काही गरज व सक्ती भासत नाही त्यामुळे तुमचे चालु द्या... आणि जमलेच तर मोठे व्हा.
  • Log in or register to post comments

Submitted by चैतन्य ईन्या on Fri, 03/21/2014 - 19:02

In reply to चैतन्य ईन्या साहेब, by शिद

Permalink

तुम्हाला अजून पण कळलेच नाही छ्या

तुम्हाला अजून पण कळलेच नाही छ्या,
  • Log in or register to post comments

Submitted by राजो on Fri, 03/21/2014 - 18:23

In reply to सारख्या ह्याच्या-त्याच्या by शिद

Permalink

जौद्या हो..

जौद्या हो.. "उंगली" करायची सवय नाही जाणार यांची.. :D
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 03/21/2014 - 18:54

Permalink

काही माहिती...

वास्तवीक जातीच्या चष्म्यातून राजकारण आणि एकंदरीतच बघणे मला मान्य नाही. मात्र या धागाप्रस्तावात बराच बाष्कळ पणा दिसल्याने त्यातील संदर्भित मुद्यांवर लिहीत आहे. आज पर्यंत भाजपाचे जे राजकारण राहीले आहे ते शेटजी भटजी या संज्ञेने ओळखले जाते. ते सुरवातीच्या काळात डाव्या विचारवंतांच्या (अप)प्रचारामुळे आणि नंतरच्या काळात डाव्यांनीच भरलेल्या प्रसिद्धीमाध्यमांमुळे होत राहीले. जर इंटरनेटमुळे माध्यमे मुक्त झाली नसती तर अजूनही भाजपाचा आवाज ऐकायला आला नसता... भाजपा/जनसंघ आणि त्यांची पितृसंस्था संघ यांच्यात जातीवरून काही घडत नाही. भाजपचा पिता 'जनसंघाला सुरवातीला याचा फायदा झाला .आणिबाणी नंतरही जनसंघ सत्तेत आला याला कारण त्याचे सुखवस्तु लोकांचे राजकारण .. जनसंघाला फायदा काय झाला? आणिबाणीनंतर जनसंघ सत्तेत कधी आला? आणिबाणीनंतर जनता पार्टीच्या बॅनर वर निवडणुका जिंकल्या गेल्या आणि नंतर सरकार कोसळल्यावर भारतीय जनता पक्ष अस्तित्वात आला. परंतु जसे जसे जातीय अस्मितेचे राजकारण सुरु झाले तसा जनसंघ/जनता पार्टी निप्रभ होत गेले व काँग्रेस आणखी प्रबळ झाली. कारण काँग्रेसने जातीय अस्मितेचे राजकारण केले. त्याच बरोबर व्हिपि सिंग आणि इतर समाजवाद्यांनी देखील या सामाजीक दुहीच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. एनडीएच्या काळात वाजपेयी ,अडवाणी, प्रमोद महाजन ,मुरली मनोहर जोशी ,यशवंत सिन्हा ,जसवंत सिंग या गैर ओबिसींच्या हातात सुत्रे दिली गेली. एनडीएच्या आधी देखील कल्याणसिंग हे ओबिसी समाजातले मुख्यमंत्री होते. बंगारू लक्ष्मण हे मागासवर्गीय समाजातले नेते आणि मुळचे संघकार्यकर्ते भाजपाचे एनडीएच्या काळातले अध्यक्ष होते. पण तेहलकामुळे त्यांना ते पद सोडायला लागले. बाकी, सध्याच्या काळात निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा काही जागांचा त्या अर्थाने विचार करत असेल तर details माहीत नाहीत, पण आश्चर्य वाटणार नाही. असो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Fri, 03/21/2014 - 19:05

Permalink

कोणी निड फॉर स्पीड बघितला आहे काय ?

विकांताला बघावा म्हणतो. माझा फार आवडता व्हिडिओगेम आहे तो. आता त्यावर चित्रपट आला हे उत्तम झाले पण रिव्हू हवा होता. जाण्कारान्नि उजेड टाकावा
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 03/21/2014 - 19:27

In reply to कोणी निड फॉर स्पीड बघितला आहे काय ? by आत्मशून्य

Permalink

काय पण आवड तुझी!

माझ्या मुलाला आवडतो तो गेम. मला मात्र एज ऑफ एम्पायर आवडतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Fri, 03/21/2014 - 19:33

In reply to काय पण आवड तुझी! by पैसा

Permalink

+१

पण एज ऑफ एम्पायर पेक्षा त्याचं थोडं फुडलं व्हर्जन एज ऑफ काँकरर्स जास्तं भारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 03/21/2014 - 19:34

In reply to काय पण आवड तुझी! by पैसा

Permalink

कॉण्सण्ट्रेट कॉण्सण्ट्रेट...

कॉण्सण्ट्रेट कॉण्सण्ट्रेट... धाग्याचे कश्मीर करु न का
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 03/21/2014 - 19:41

In reply to कॉण्सण्ट्रेट कॉण्सण्ट्रेट... by प्यारे१

Permalink

मला वाटले

हा धागा आहे? मला वाटलं खरडफळा! आयम्म स्वॉरी!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 03/21/2014 - 19:45

In reply to कॉण्सण्ट्रेट कॉण्सण्ट्रेट... by प्यारे१

Permalink

काश्मिर कुठे?

आम्ही तर खेळाच्या आणि खिलाडूवृत्तीच्या गोष्टी बोलतोय!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 03/21/2014 - 22:24

In reply to काश्मिर कुठे? by पैसा

Permalink

झाले बहू होतील बहू.....

आम्हाला अद्याप "प्रिन्स ऑफ पर्शिया" आवडतो.... मस्त आपल्या-आपल्या उड्या माराव्यात आणि जमलेच तर थोडी तलवारबाजी करावी...
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sat, 03/22/2014 - 01:28

In reply to काय पण आवड तुझी! by पैसा

Permalink

आहो एज ऑफ़ एम्पायरही आवडतो (तेच कोंकरर्स)

त्यात हार्डेस्त लेवल दोन एनिमी घेउनही जिंकतो. आता मोफत ओन्लाइनहि उपलब्ध आहे या एकदा मैदानात आपले सैन्य घेउन हौदे एक मैत्री पूर्ण सामना :) रच्याकने Nfs आजच बघितला पुरता नोस्टेल्जिक झालो. चित्रपट आवडला. फास्ट फ्युरिअस सारखा भपका अथवा तंग कपड्यातिल एकहि ललना चित्रपटात नाही पण गाड्यांचे सिंन्स तूफ़ान आहेत. गेम मधील ट्रेक्स जशे च्या तसे पण खरे शूट केलेत. काही प्रसंगात पडद्या वरील गाडी कंट्रोल करायला प्रत्यक्ष बोटे सुधा शिवशिव्तात... अजुन एकदा नक्कीच बघेन.0
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 03/22/2014 - 10:45

In reply to आहो एज ऑफ़ एम्पायरही आवडतो (तेच कोंकरर्स) by आत्मशून्य

Permalink

अबब!

तुझ्याबरोबर खेळायचं म्हणजे हरण्यासाठीच! त्यापेक्षा तो मंद्या पण विचारतो आहे, तू त्याच्याबरोबर खेळ ना! नीड फॉर स्पीड सिनेमा नक्कीच बघितला पाहिजे!
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on Fri, 03/28/2014 - 12:04

In reply to काय पण आवड तुझी! by पैसा

Permalink

आयला..

एज ऑफ एम्पायर साठी रात्र रात्र जागवली आहे.. ते शत्रुचे हत्ती मंत्र मारुन आपले करणे सर्वात आवडता भाग. =)) बजरु..
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com