Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नानासाहेब नेफळे on गुरुवार, 03/20/2014 - 15:17
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ह्यांचा सध्या दणक्यात प्रचार चालू आहे. मोदीँना विकासपुरुष या टॅगखाली प्रोजेक्ट केले जात आहे. ज्या प्रमाणे त्यांनी गुजरातचा विकास केला त्याप्रमाणे ते भारताचा विकास करणार आहेत अशी आश्वासनांची खैरात टीव्ही ,सोशल मिडीया, रेडीओवर सतत करण्यात येत आहे .परंतु या विकासपुरुषाच्या प्रचारामागे भाजपची जातीय गणिते चालू आहेत, ज्याचा लेखाजोखा माध्यमं जनतेपर्यंत पोचवत नाही आहेत. आज पर्यंत भाजपाचे जे राजकारण राहीले आहे ते शेटजी भटजी या संज्ञेने ओळखले जाते. भाजपचा पिता 'जनसंघाला सुरवातीला याचा फायदा झाला .आणिबाणी नंतरही जनसंघ सत्तेत आला याला कारण त्याचे सुखवस्तु लोकांचे राजकारण .. परंतु जसे जसे जातीय अस्मितेचे राजकारण सुरु झाले तसा जनसंघ/जनता पार्टी निप्रभ होत गेले व काँग्रेस आणखी प्रबळ झाली. भाजपचा जन्म झाल्यानंतर मात्र हा शेटजी भटजीचा शिक्का पुसण्यासाठी ओबिसींचे ध्रुवीकरण करण्याची सुरवात झालि. भाजपात असलेला ओबिसी नेत्यांचा भरणा याचेच द्योतक आहे. परंतु भाजपने कधिही ओबिसी नेत्यांना अतिमहत्वाची पदे दिलेली नाहीत. एनडीएच्या काळात वाजपेयी ,अडवाणी, प्रमोद महाजन ,मुरली मनोहर जोशी ,यशवंत सिन्हा ,जसवंत सिंग या गैर ओबिसींच्या हातात सुत्रे दिली गेली. ज्याचा परिणाम म्हणजे शायनिंग इंडीयाचा फुटलेला फुगा ..ओबिसींनी डावलले गेल्याच्या भावनेतुन काँग्रेसला व तत्सम पक्षांना मतदान केले .भाजपचा बेस असलेला ओबिसी समाज त्यांच्यापासुन दूर गेल्यानेच त्यांनी आता नरेंद्र मोदींच्या रुपाने ओबिसी कार्ड खेळले आहे. मोदी हे घंची /तेली या ओबिसी जातीचे आहेत. त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करुन भाजपने दोन प्रकारे त्यांचा प्रचार चालू ठेवला आहे.. भारतभर तरुण वर्गात सोशल मिडीयाचा वापर करुन त्यांना विकास पुरुष म्हणुन पुढे करायचे... त्याच वेळी जिथे जातीय समिकरणे महत्वाची आहेत व दिडशे लोकसभा मतदार संघ आहेत अश्या युपी बिहार व हिंदी बेल्टमध्ये मोदींना ओबिसी म्हणुन प्रोजेक्ट केले जात आहे. याचे कारण ओबिसींची सर्वाधिक संख्या या पट्ट्यात आहे. नुकतेच नरेंद्र मोदींनी बिहारात "माझ्यासारख्या मागासवर्गीयाला भाजपने पंतप्रधानापदाचे उमेदवार केले आहे" त्यामुळे भाजपवरचा ब्राह्मणांचा पक्ष असल्याचा दावा खोटा असल्याचे म्हण्टले आहे. भाजपचे राजकारण नेहमीच संभ्रमाचे राहीले आहे, ऐकीकडे हिंदुत्वाच्या व्याख्येचा दाखला देऊन जातीय आरक्षणाला विरोध करायचा त्याचवेळी अनेक तुकड्यात विखुरलेल्या ओबिसी समाजाचा वापर करुण घ्यायचा ,परंतु वरवर असे करुन चालणार नाही याची चुणुक त्यांना २००४च्या निवडणुंकांमध्ये आली आहे. नरेंद्र मोदींनी भाजप खाऊन टाकला आहे वा त्यांना तसे करताना अंतर्गत विरोध झाला नाही याचे कारण त्यांच्या ओबिसी असण्यात आहे.
  • Log in or register to post comments
  • 12765 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 03/20/2014 - 15:23

Permalink

हरकत

तुमची नक्की हरकत कशाला आहे ? मोदींच्या ओबीसी असण्याला की भाजपाने ओबीसी नेतृत्व पुढे केले त्याला ?
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on गुरुवार, 03/20/2014 - 15:28

In reply to हरकत by प्रसाद गोडबोले

Permalink

एक निरीक्षण नोंदवले आहे. फक्त

एक निरीक्षण नोंदवले आहे. फक्त हरकत कशालाही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 03/20/2014 - 15:51

In reply to एक निरीक्षण नोंदवले आहे. फक्त by नानासाहेब नेफळे

Permalink

छान

अभिनंदन !
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 03/21/2014 - 15:15

In reply to छान by प्रसाद गोडबोले

Permalink

मोदी तेली आहेत? मला माहित

मोदी तेली आहेत? मला माहित नव्हते. थँक्स नाना.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on गुरुवार, 03/20/2014 - 15:23

Permalink

हे नेफळे म्हणजे ग्रेटथिन्कर

हे नेफळे म्हणजे ग्रेटथिन्कर का? डूआयडी काढण्याच्या पर्याय अवलंबलेला दिसतो. वेलकम बॅक ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 03/21/2014 - 00:46

In reply to हे नेफळे म्हणजे ग्रेटथिन्कर by मंदार दिलीप जोशी

Permalink

हे नेफळे म्हणजे ग्रेटथिन्कर का?

असेल...असेल....असे पण होवू शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on गुरुवार, 03/20/2014 - 15:33

Permalink

@ प्रशासक हे पहा

@ प्रशासक हे पहा http://aisiakshare.com/node/2698
  • Log in or register to post comments

Submitted by भुमन्यु on गुरुवार, 03/20/2014 - 17:21

In reply to @ प्रशासक हे पहा by मंदार दिलीप जोशी

Permalink

लोल

लोल... खुप दिवसांपासुन मिस करत होतो... आले परत..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 03/21/2014 - 00:58

In reply to @ प्रशासक हे पहा by मंदार दिलीप जोशी

Permalink

हैला !

ग्रेट डूआयडी पकड्याच की !!! पण ग्रेट थंंकिंग करताना अशी मिष्टेक??? जाणदो, बडे बडे लोग ऐसी छोटी छोटी मिस्टेका (बारबार) करते र्‍हयते है । +D
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 03/21/2014 - 01:00

In reply to हैला ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ग्रेट थंंकिंग करताना अशी मिष्टेक???

होता है... होता है....
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 03/21/2014 - 01:02

In reply to हैला ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

युजर पुराना होगा लेकीन आयडी...

नया है वह! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 03/21/2014 - 14:27

In reply to हैला ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

@ डूआयडी पकड्याच की !!! >>>

@ डूआयडी पकड्याच की !!! >>> +१ ;) ही घ्या भेट Image removed. द्या त्यांना सगळ्यांनी! =))
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 03/20/2014 - 15:54

Permalink

ग्रेटथिंकर आले .

ग्रेटथिंकर आले .
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 03/21/2014 - 00:50

In reply to ग्रेटथिंकर आले . by जेपी

Permalink

ग्रेटथिंकर आले...... .

आले तर आले.... परत परत नविन नावाने यावेसे वाटणे, ह्यातच मिपाचे यश आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on Fri, 03/21/2014 - 09:59

In reply to ग्रेटथिंकर आले...... . by मुक्त विहारि

Permalink

अहो ते बरोबर. पण दुसरा कुणी

अहो ते बरोबर. पण दुसरा कुणी परत आला की त्याला निर्लज्ज हेच म्हणतात. स्वतः आले की तुमच्या या मताकडे बोट दाखवतील. असो. तुमचे 'मिपाचे यश' हे मत पटले हे पुन्हा सांगतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 03/21/2014 - 22:50

In reply to अहो ते बरोबर. पण दुसरा कुणी by मंदार दिलीप जोशी

Permalink

मिपाचे यश तर आहेच पण शिवाय

नथुगुग्गूळ वटीचा पण हातभार असावा. खरे खोटे ग्रे.थि. जाणे.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on गुरुवार, 03/20/2014 - 16:15

Permalink

काय चाललं आहे? गारपीटीचा

काय चाललं आहे? गारपीटीचा इशारा ५ दिवस आधी दिला जाऊन ही शेतकर्‍यांपर्यंत तो पोचवण्यातच आला नाही. शिवजयंती नावाचा आत्तापर्यंत साधेपणाने साजरा होणारा सण धुमधडाक्यात साजरा केला गेला आणि कोट्यावधी रुपये उधळले गेले. तिकडे शेतकरी मरतो आहे. त्याला या मराठा आणि ओबीसींच्या तथाकथित नेत्यांनी कसलीही मदत केलेली नाही. लाज वाटते का? अशा वेळी असले मुद्दे उकरून काढायला, लाज वाटते?
  • Log in or register to post comments

Submitted by नानासाहेब नेफळे on गुरुवार, 03/20/2014 - 16:34

Permalink

अहो शेतकर्यांचीही जात बघितली

अहो शेतकर्यांचीही जात बघितली जाते... विदर्भातला शेतकरी मरतो ,पण पश्चिम महाराष्ट्रातला नाही.. याची कारणं 'जातीय' सुद्धा आहेत. शेतकर्यांना कर्जमाफी दिली गेली तेव्हा राज्यातल्या एका धनदांडग्या जातीने ती कर्जमाफी घेतली व विदर्भात शेतकरी आत्महत्या करत राहीले...
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 03/20/2014 - 21:46

In reply to अहो शेतकर्यांचीही जात बघितली by नानासाहेब नेफळे

Permalink

अहो शेतकर्यांचीही जात बघितली

अहो शेतकर्यांचीही जात बघितली जाते... विदर्भातला शेतकरी मरतो ,पण पश्चिम महाराष्ट्रातला नाही.. याची कारणं 'जातीय' सुद्धा आहेत.
मग विदर्भातल्या नेत्यांच्या नावानी बोंब मारा ना बाहेरच्यांची जात काढायच्या आधी. मग त्या शेतकर्‍यांच्या "जातवाल्या" संघटना काय उपटतं बसल्यात का गारपिट झालेल्या शेतातली नासाडी झालेली पिकं? आरक्षणासाठी एकत्र येऊन बोंब मारता येते ना मग नुकसानभरपाईसाठी येउ देत की एकत्र. हल्ली काय नैसर्गिक संकटं पण जात बघुन यायला लागली का?
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on गुरुवार, 03/20/2014 - 16:54

Permalink

अहो शेतकर्यांचीही जात बघितली

अहो शेतकर्यांचीही जात बघितली जाते... विदर्भातला शेतकरी मरतो ,पण पश्चिम महाराष्ट्रातला नाही.. याची कारणं 'जातीय' सुद्धा आहेत. गारपीट पण जात बघून होते का? लवकर बरे व्हा. गेट वेल सून,
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on गुरुवार, 03/20/2014 - 22:46

Permalink

....अत्यन्त फालतू धागा.....???

....आता याला जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी जर केवळ मोदी आणि मोदीच दिसतोय यातच सारे काही आले, केवळ याचा नाविलाज म्हणुनच अशी आपली भडास काढतोय दुसरे काय.. काय रे नान्या ??? बरोबर ना ??? विनोद१८
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on Fri, 03/21/2014 - 14:12

Permalink

मिपाची काळजी नसती तर मोदींची

मिपाची काळजी नसती तर मोदींची जात काढल्याबद्दल अ‍ॅट्रॉसिटीच्या खाली या नेफळेसाहेबांना आत टाका अशी तक्रार केली असती पोलिसात. काय नेफळेसाहेब. जायचंय का आत?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 03/21/2014 - 14:39

In reply to मिपाची काळजी नसती तर मोदींची by मंदार दिलीप जोशी

Permalink

अ‍ॅट्रॉसिटीखाली कुठ कुठल्या

अ‍ॅट्रॉसिटीखाली कुठ कुठल्या जाती येतात?
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on Fri, 03/21/2014 - 14:42

In reply to अ‍ॅट्रॉसिटीखाली कुठ कुठल्या by प्यारे१

Permalink

सगळ्या मागास जाती येतात

सगळ्या मागास जाती येतात
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/21/2014 - 14:44

In reply to सगळ्या मागास जाती येतात by मंदार दिलीप जोशी

Permalink

आणि आक्षेपार्ह बोलल्यास

आणि आक्षेपार्ह बोलल्यास गुन्हा दाखल करणे हे त्या बोलणार्‍याच्या जातीवर अवलंबून असते काय? म्ह. एका मागासवर्गीयाने दुसर्‍या मागास जातीबद्दल काही आक्षेपार्ह बोलल्यास काय तरतूद आहे? की फक्त सवर्णांनी मागासवर्गीयांस बोलल्यासच शिक्षेची तरतूद आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by निरंजन on Fri, 03/21/2014 - 14:47

In reply to आणि आक्षेपार्ह बोलल्यास by बॅटमॅन

Permalink

जातीची उतरंड आहे. त्यात

जातीची उतरंड आहे. त्यात वरच्यानी खालच्यास बोलल तरच आक्षेपार्ह्य आहे. अन्यथा नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/21/2014 - 14:55

In reply to जातीची उतरंड आहे. त्यात by निरंजन

Permalink

रोचक आहे. धन्यवाद.

रोचक आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 03/21/2014 - 15:01

In reply to रोचक आहे. धन्यवाद. by बॅटमॅन

Permalink

मग

कोकणस्थाने देशस्थाला "ए देब्रा" असे म्हणल्यास आणि देशस्थाने कोकणस्थाला "ए कोब्र्या " असे म्हणल्यास नकी कोणाला कोणावर केस करता येईल ? :D
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 03/21/2014 - 15:10

In reply to मग by प्रसाद गोडबोले

Permalink

>>>"ए देब्रा"

>>>"ए देब्रा" आँ???? असं पण अस्तं?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 03/21/2014 - 15:19

In reply to >>>"ए देब्रा" by प्यारे१

Permalink

हेच काय

आँ???? असं पण अस्तं?
हेच काय अजुन खुप असतं ... कोब्रांना वाटतं ते टॉपला तर देब्रांना वाटतं ये ग्रेट ... कर्‍हाडे असतात त्यांचे वेगळेच मत ... सीकेपींची अजुन वेगळी तर्‍हा ! अहो इतकंच काय तर ऋग्वेदी आणि यजुर्वेदी मधेही यजुर्वेदी ग्रेट असं आमचं स्पष्टं मत आहे त्यातही कृष्णयजुर्वेदी हे शुक्ल पेक्षा ग्रेटर ....:D D नोट : हलकं घ्या ! चेष्टेतच लिहिलय !!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 03/21/2014 - 16:23

In reply to हेच काय by प्रसाद गोडबोले

Permalink

फक्त सी के पी च सी के पी ना

फक्त सी के पी च सी के पी ना ब्राम्हण मानतात. इतर कोब्रा देब्रा यजुर्वेदी ऋग्वेदी कर्‍हाडे सारस्वत यांच्या लेखी ते वेगळेच आहेत. असो. भाजपचे राजकारण नेहमीच संभ्रमाचे राहीले आहे, हे एक वाक्य बरोबर आहे. भाजप म्हणजे भ्रम जोपासणारा पक्ष असेच आहे. मोदींबद्दल अजूनतरी भाजपने स्पष्टपणे जात हा मुद्दा समोर आणलेला नाही. पण भाजपची भूमीका कल्याणसिंग / बंगारुलक्ष्मणांबद्दल वेगळी आणि गडकरींबद्दल वेगळे अशीच राहिलेली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/21/2014 - 16:24

In reply to फक्त सी के पी च सी के पी ना by विजुभाऊ

Permalink

फक्त सी के पी च सी के पी ना

फक्त सी के पी च सी के पी ना ब्राम्हण मानतात.
जीएसबी अन सीकेपी यांत गल्लत होतेय का?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 03/21/2014 - 16:32

In reply to फक्त सी के पी च सी के पी ना by बॅटमॅन

Permalink

ब्याट्या गौड सारस्वतात

ब्याट्या गौड सारस्वतात म्हणजे ( गावस्कर /वेंगसरकर / शेणॉय ) आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ( प्रधान , राजे, अधिकारी , तेंडुलकर , गुप्ते , तवकर , ठाकरे ) यांच्यात गल्लत केली तर ठाणे + वांद्रे आणि दादर अशी दोन्हीकडची लोकं येतील ना ब्याटी अन तलवारी घेवून
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/21/2014 - 17:06

In reply to ब्याट्या गौड सारस्वतात by विजुभाऊ

Permalink

हा हा हा, अगदी अगदी

हा हा हा, अगदी अगदी ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 03/21/2014 - 17:50

In reply to ब्याट्या गौड सारस्वतात by विजुभाऊ

Permalink

एक चुकलात

तेंडुलकर जी एस बी हो!
  • Log in or register to post comments

Submitted by निरंजन on Fri, 03/21/2014 - 18:52

In reply to ब्याट्या गौड सारस्वतात by विजुभाऊ

Permalink

तेंडुलकर सीकेपी नाहीत हो.

तेंडुलकर सीकेपी नाहीत हो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Fri, 03/21/2014 - 20:24

In reply to तेंडुलकर सीकेपी नाहीत हो. by निरंजन

Permalink

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ( प्रधान , राजे, अधिकारी , तेंडुलकर , गुप्ते , तवकर , ठाकरे )
या यादीत "चित्रे" राहीले.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 03/21/2014 - 18:39

In reply to हेच काय by प्रसाद गोडबोले

Permalink

ऋग्वेदी च

हलके घ्या म्हणायला काय किडमिडीत कोब्रा भटं आहे काय ?? ऋग्वेदी च भारी ..आकार वजन आनि इतर सर्व ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 03/21/2014 - 19:00

In reply to हेच काय by प्रसाद गोडबोले

Permalink

अहो, प्रतिसाद वेगळा होता...

अहो, प्रतिसाद वेगळा होता... 'ए दे ब्रा' असं वाचलेलं मी! :) असो, बदलीन. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/21/2014 - 15:10

In reply to मग by प्रसाद गोडबोले

Permalink

तो सर्वच टकला अर्थात केसलेस

तो सर्वच टकला अर्थात केसलेस मामला आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 03/21/2014 - 15:11

In reply to तो सर्वच टकला अर्थात केसलेस by बॅटमॅन

Permalink

आय मीन 'गॉन केस'

आय मीन 'गॉन केस' ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 03/21/2014 - 15:13

In reply to मग by प्रसाद गोडबोले

Permalink

हे वाचल्यावर एका सापाचं आणि

हे वाचल्यावर एका सापाचं आणि नागाचं भांडण आठवलं. एकदा एक नाग चिडून एका सापाला म्हणतो, "ए नालायक सापड्या". त्यावर नाग तसेच प्रत्त्युत्तर देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Fri, 03/21/2014 - 16:47

In reply to अ‍ॅट्रॉसिटीखाली कुठ कुठल्या by प्यारे१

Permalink

माझा एक प्रश्न आहे

कोकणात रहात असलेल्या गावी सर्रास "ये म्हा**च्या, ये कुं**च्या, ये आ**च्या असे बोलले जायचे आणी वक्ता व श्रोता यांना त्याचे वाईटही वाटत नसे. तर..... कोणाला "ये गाढवीच्या" म्हटले तर ते अ‍ॅट्रासिटीच्या कायद्यान्वये आक्षेपार्ह्/दंडकारक असेल काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 03/21/2014 - 17:52

In reply to माझा एक प्रश्न आहे by इरसाल

Permalink

अ‍ॅट्रॉसिटी

कुणा माणसाला असं म्हटलं तर गाढवाच्या बाबतीत अ‍ॅट्रॉसिटी होईल. पण ते केस दाखल करू शकणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 03/21/2014 - 18:01

In reply to अ‍ॅट्रॉसिटी by पैसा

Permalink

लोल

लोल
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 03/21/2014 - 18:01

In reply to अ‍ॅट्रॉसिटी by पैसा

Permalink

णीशेढ !

प्राण्यांना अश्या सावत्रभावाने वागवणार्‍या कायद्याचा णीशेढ ! (PETA ला पत्र लिहिण्यासाठी मजकूर शोधण्यात व्यस्त) इए
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 03/21/2014 - 18:12

In reply to णीशेढ ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

करून टाकू!

आपलं सर्कार आलं की नवीन कायदा करून टाकू! हाकानाका! मात्र मला पंतप्रधान आणि अर्थखात्याची मंत्री केलं पाहिजे. मग मी तुम्हाला वन आणि वन्यजीव, पेट्रिलियम, कोळसा, खाण, दूरसंचार, रेल्वे वगैरे सगळी चराऊ खाती देऊन टाकीन!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 03/21/2014 - 18:34

In reply to करून टाकू! by पैसा

Permalink

वास्तव

मात्र मला पंतप्रधान आणि अर्थखात्याची मंत्री केलं पाहिजे. मग मी तुम्हाला वन आणि वन्यजीव, पेट्रिलियम, कोळसा, खाण, दूरसंचार, रेल्वे वगैरे सगळी चराऊ खाती देऊन टाकीन! राजकारणात आणि सत्ताकारणात पैसा असणे महत्वाचे आहे याचा आज वेगळाच अर्थ मला समजला! :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 03/21/2014 - 18:38

In reply to करून टाकू! by पैसा

Permalink

एवढ्या "खाती" वाचूनच पोट

एवढ्या "खाती" वाचूनच पोट बिघडलं :) (स्कॅमवाल्या नेतागणांच्या तब्येतीची कल्जी करणारा) इए
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Fri, 03/21/2014 - 21:22

In reply to करून टाकू! by पैसा

Permalink

पैसा पंतप्रधान !

चालेल हो आपल्याया पंतप्रधान आणि अर्थखात्याची मंत्री करू, पण त्या बदल्यात मिपाला एक बँक काढायची ची परवानगी दिली पाहिजे.म्हणजे आम्हाला मिसळपाव देणारे ATM सर्वीकडे टाकता येतील. उद्यापासूनच भरती चालू करू या कि मिसळपाव बँकेची!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com