चहुकोर वेगवेगळे अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचाराच्या बातम्या आपण ऐकतो.बहुतांश लोकं म्हणत असतात की कधी एकदाचा हा कलीयुग संपतो आणी सत्ययुग येतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात पण कधीतरी हा विचार आलाच असणार.
आपण पृथ्वीच्या प्रलयाच्या बर्याचशा भविष्यवाण्या ऐकल्या. त्या पोकळ असल्याचा अनुभवही केला. या विषयाचे बरेचशे चित्रपट बघीतले.'२०१२' तर जणूकाही पढे आपल्याशी काय घडणार' ह्याची भीती दाखवणारंच चित्रपट होतं. तर कधी होतोय या पृथ्वीचा विनाश..! कधी येणार हा सत्ययुग...!
नोस्ट्राडमस ची भविष्यवाणी सन ३७९७ चं वर्ष पृथ्वीचा आयुष्याचं शेवटचं वर्ष असण्याचं दाखवत आहे. म्हणाकी नोस्ट्राडमसच्या भविष्यवाण्या अगदी काटेतोलपणे खर्या ठरल्या असंही नाही.
पण आपले भविष्य कथनकार आणी पुराणकार काय म्हणत आहेत या बाबतीत ?
पौराणीक खगोलीय गणितावर आधारीत आपलं वैदीक पंचांग ब्रह्मांडाला अनूलक्षून बनले आहे. मनुष्यनिर्मित्त केलेन्डर किंवा पंचांगाशी त्याचा काहीही संबंध नाही.हिन्दु पुराणकर्त्यांनी 'समय'याला विशाल फलकाच्या महायुगा पासून सीमीत फलकाच्या क्षणा पर्यंताच्या अनेकविध भागात वर्गीकृत केला.त्यानुसार एक महायुग ४३,२०,००० वर्षाचा असतो. त्यात १७,२८००० वर्ष सत्ययुग, १२,९६,००० वर्ष त्रेता,८,६४,००० वर्ष द्वापर आणी ४,३२,००० वर्ष कलीयुगाचे. अशे चार युग त्यात समाविष्ट आहेत.
हे सगळे मनुष्य वर्ष असून देवताइ म्हणजे दैवी वर्ष वेगळेच असतात. एक दैवी वर्ष ३६० मनुष्यवर्षाचं असतं.
त्या प्रमाणे प्रत्येक महायुग ४३,२०,००० भागीले ३६०=१२००० दैवी वर्षाचा असून सत्ययुग ४८००,त्रेता ३६००,द्वापर २४०० तर कलीयुग १२०० दैवी वर्षाचा होय.प्रत्येक युगाचे प्रारंभिक आणी अंतिम वर्ष अनुक्रमाने संध्या आणी संध्यांशाचे आहे. प्रत्येकाची संख्या बाकी रहाण्यार्या वर्षांच्या दहाव्या भागाची आहे. उदाहरणार्थ सत्ययुगाच्या ४८०० दैवी वर्षां पैकी ४०० वर्ष संध्या तर ४०० वर्ष संध्यांशाचे आहे. बाकी रहाणार्या ४००० वर्षांना माध्यिका म्हटलेले आहे.
युगाचं नाव संध्या माध्यिका संध्यांश दैवी वर्ष गुणांक एकूण मानववर्ष
सत्ययुग ४०० ४००० ४०० ४८०० ३६० १७,२८,०००
त्रेतायुग ३०० ३००० ३०० ३६०० ३६० १२,९६,०००
दापर युग २०० २००० २०० २४०० ३६० ८,६४,०००
कलीयुग १०० १००० १०० १२०० ३६० ४,३२,०००
चार युगांचा महायुग एकूण वर्ष ४३,२०,०००
महायुगाचा शेवटला युग कलीयुग असून अंती प्रलय.आणी त्याचा लयकाल संपलाकी नवा सत्ययुग सूरू होतो.वर लिहील्या प्रमाणे २ कलीयुग =१ दापर युग,३ कलिय़ूग =१ त्रेतायुग,आणी ४ कलीयुग=१ सत्ययुग होयं. उल्लेखनीय बाब ही आहेकी प्रत्येक युग सलग चालत नसून प्रत्येक युगात पण हे चारी युग त्यंच्या गुणोत्तरा प्रमाणे भ्रमण करतात.
उदाहरणार्थ सत्ययुगात ४,३२,००० वर्षाचा सत्ययुग, २,१६,००० वर्षाचा त्रेता,१,०८,००० वर्षाचा द्वापर तर ५४,००० वर्ष कलीयुगाचे आहे.
त्यानंतर त्रेतायुगात परत हेच परिवर्तन परिवर्तीत होत जातं.
या प्रकारचा आंतरीक कलीयुग सध्या चालु आहे. याच उतरत्या गाणितीक विभाजना अनुसार चालु असलेल्या कलीयुगाचे वय १९.२ दैवी वर्ष असून ६९१२ मानववर्ष आहे.
ब्रहमगुप्तानी लिहील्या प्रमाणे (आणी एन्साइक्लोपीडीया ब्रिटानीका च्या लेखनानुसार)वर्तमान कलीयुगाचा प्रारंभ इ.स.पूर्वी (बी.सी.)३१०२ला भगवानश्री क्रुष्णाच्या देहोत्सर्गा बरोबर लगेच झाला. म्हणजेच ३१०२+२०१४= ५११६ वर्षा पूर्वी.
कलीयुगाचं वय=६९१२- ५११६=१७९६ उरलेले वर्ष.
उरलेले वर्ष १७९६+ २०१४= ३८१०.
या प्रमाणे सन ३८१० ला प्रलय आणी नव्या सत्ययुगाचा आरंभ...
या प्रमाणे नास्त्रोडमसची भविष्यवाणी आणी आपली शास्त्रोक्त पुराणवाणी यांचात फक्त १३ वर्षाचा फरक आहे.
विषय हिन्दु कॉस्मोलॉजीचा असून त्यात दर्शवीलेल्या कालगणनेचा आहे.त्याला कॉस्मोलॉजीकल दृष्टिने पहावा. विज्ञानाचा याचाशी स्नाना-सूतकाचा ही संबंध नाही.
वाचने
19753
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय करायचे
+१
In reply to काय करायचे by चित्रगुप्त
खिक्क !
मी असेन बहुतेक ३८१० पर्यंत
ऐया कसं काय???? एखादी जडीबुटी
In reply to मी असेन बहुतेक ३८१० पर्यंत by अजया
अय्या हो आहे ना !
In reply to ऐया कसं काय???? एखादी जडीबुटी by बॅटमॅन
सांगा हां, वाट पाहतोय!
In reply to अय्या हो आहे ना ! by अजया
जडी बुटी नाय ब्याटम्यान भौ ..
In reply to ऐया कसं काय???? एखादी जडीबुटी by बॅटमॅन
नाव बघा काय आहे स्वतःचं..
In reply to जडी बुटी नाय ब्याटम्यान भौ .. by हाडक्या
हा हा हा .!!
In reply to नाव बघा काय आहे स्वतःचं.. by अजया
हम्म, शक्यता नाकारता येत नाही
In reply to जडी बुटी नाय ब्याटम्यान भौ .. by हाडक्या
पण या सत्ययुगातही जातिभेद
(बॅटू बर्वा, मधली आळी,
In reply to पण या सत्ययुगातही जातिभेद by बॅटमॅन
पण
In reply to पण या सत्ययुगातही जातिभेद by बॅटमॅन
अर्र
In reply to पण by विकास
x-(
आआप जिंकल्यास..
या प्रमाणे नास्त्रोडमसची
विज्ञानाचा याचाशी स्नाना
लेख मनाला स्पर्शुन गेला ...
टँजंट का पॅरलल ?
In reply to लेख मनाला स्पर्शुन गेला ... by प्रसाद गोडबोले
वाट बघा...सत्ययुगाची !
काय चु..कीची माहिती देताय राव?? आँ..
लेख छान लिहिला आहे.बराच सखोल
"कलियुग जायेगा"....सतयुग
In reply to "कलियुग जायेगा"....सतयुग आयेगा by आयुर्हित
सत्ययुग कधी येणार...?
सत्ययुग कधी येणार...?आमाला म्हाय्तीय पन तुमाला नाय सांगनार ! काय्च्याकाय, आम्च शिक्रेट हाय्ते !!हम्म
अमूक युगाची कारणे बीजरूपात
कलियुगाची कारणे
In reply to अमूक युगाची कारणे बीजरूपात by चित्रगुप्त
रामायणातील "मंथरा दासी" चा
In reply to कलियुगाची कारणे by आयुर्हित
बीजरूप
In reply to अमूक युगाची कारणे बीजरूपात by चित्रगुप्त
आग्गं बाबौ!!!
कळफलकाची ० ची की नक्की झिजली
सत्ययुग
कलियुगच बेस्ट आहे.
In reply to सत्ययुग by तिमा
लेखक
सत्ययुग कधी येणार ?>>>>>>>
१ एप्रिल २०१४ रोजी भारतीय
सत्ययुगाची सुरुवात ठाण्याहून
हो ना. त्यामुळे सरळ मिरजेहून
In reply to सत्ययुगाची सुरुवात ठाण्याहून by विजुभाऊ
बरं आता २ एप्रिल आलेय, कुठंवर
In reply to हो ना. त्यामुळे सरळ मिरजेहून by बॅटमॅन