Skip to main content

केजरीवाल ,राजकारणातील राखी सावंत

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी रविवार, 16/03/2014 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे. ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले. आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे. मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात. केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच..................... त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे. नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे. केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत. त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे. आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे. भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे. सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का हेच कळत नाही आहे ता.क आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का तुम्हाला काय वाटते

वाचने 57841
प्रतिक्रिया 258

प्रतिक्रिया

In reply to by संपत

थोडक्यात भाजपने ती आश्वासने दिली होती जी पाळण्याचा त्यांचा कधीही विचार नव्हता.
"योग्य" वेळ येताच भाजपा (काँग्रेस, जनता दल, आप... सर्वच पक्ष) हि आश्वासने पाळतील.)भाजप म्हणाल, तर ते एका पायावर आजही या गोष्टी करायला तत्पर असेल. इथे भ्याडपणा वा शुरपणाचा मुद्दाच नाहि. इट्स अबौट टाईम.

In reply to by संपत

आपाच्या यशाबद्दल अवास्तव अपेक्षा आआप समर्थांकापेक्षा मोदी भक्तांच्याच जास्त आहेत. आज मोदी/एनडीए जिंकले तर ते त्यांच्या भक्तांमुळे जिंकणार नसून समर्थकांमुळे जिंकणार आहेत. आपच्या नेत्यांनी, विशेष करून केजरीवाल यांनी स्वतःच दिल्लीत सरकारस्थापनेनंतर जो तमाशा केला, मर्कटलीला केल्या त्याची तिडीक मोदी समर्थकांना आहे. जर त्यांचे आज दिल्लीत सरकार राहीले असते आणि काही प्रमाणात सुशासन दाखवले असते तर अनेक मोदी समर्थक आज आप कडे वळले असते. किमान विचार केला असता. केजरीवाल यांनी ती संधी घालवली आहे. आआप केवढी, तिचा जीव केवढा.. आआपला ३० च्या वर जागा मिळाल्या तर तो चमत्कार ठरेल. बरोबर आहे, पण ही बेडकी बैलाएव्हढे फुगण्याचा प्रयत्न करत आहे हे वास्तव आहे आणि त्यात झाला तर काँग्रेसला फायदा होणार आहे... अर्थात तुम्हाला आजचे सरकार अजून पुढे चालू रहावे असे वाटत असेल तर गोष्ट वेगळी... सध्या मोदींना धोका त्यांच्या पक्षातर्गत विरोधकांचा आणि अमित शहासारख्या सल्लागारांचा आहे, आआपचा नाही. कुठलाही खरा नेता हा अनेकार्थाने एकाकी असतो. त्यात पक्षांतर्गत पूर्ण हुकूमशाही ठेवणार्‍या इंदिराजी देखील आल्या... आजच्या घडीस किमान पक्षांतर्गत भाजपामधे हुकूमशाही नाही असे वाटते. थोडक्यात मोदींना इतरांच्या महत्वाकांक्षांमुळे धोका असणे साहजिक आहे. पण तो अधिक असेल का कमी होईल हे निवडणूक निकालांवर अवलंबून राहील. तर बाजपेयी सरकारने निवडणुकीतील प्रमुख आश्वसानापैकी (राम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरचा विशेष दर्जा रद्द) एकही पाळले तर नाहीच पण फारसे प्रयत्नही केले नाहीत. हे म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाणे झाले. अर्थात ज्या पद्धतीने आपण आधी भाजपा-काँग्रेसमधे गुन्हेगारी खटले असलेल्यांना तिकीटे दिली दाखवली आणि नंतर आपचे रेकॉर्ड दाखवल्यावर हळूच, "आम्ही कधी म्हटले कि आम आदमी पार्टीत गुन्हेगार नाहीत म्हणून?" असे म्हणायचे अणि शक्य तितकी दिशाभूल करत रहायचे, त्यातला प्रकार आहे... असो. १९९९ ची निवडणूक ही भाजपाने जिंकलेली नव्हती तर एनडीएने जिंकली होती. त्यात कॉमन मिनिमम प्रोग्रँम जो त्यातील सर्व पक्षांना मान्य होता. त्यावर आधारीत एनडीएचा म्हणून 'An Agenda For a Proud, Prosperous India' असा निवडणुकीचा जाहीरनामा तयार केला गेला होता. थोडक्यात तो भाजपाचा जाहीरनामा नव्हता. या वेळेस देखील भाजपाचा जाहीरनामा नसेल तर एनडीएचाच जाहीरनामा असेल. प्री-इलेक्शन अलायन्स हा प्रकार त्यावेळेपासून म्हणजे १९९९ पासून अस्तित्वात आला असे वाटते. असो.

In reply to by विकास

"
नंतर आपचे रेकॉर्ड दाखवल्यावर हळूच, "आम्ही कधी म्हटले कि आम आदमी पार्टीत गुन्हेगार नाहीत म्हणून?" असे म्हणायचे अणि शक्य तितकी दिशाभूल करत रहायचे
धरणे, आंदोलन आणि खून, बलात्कार सारखेच? तुमच्यावर उपहास व्यर्थ आहे.

In reply to by संपत

मुद्दा सिंपल आहे... प्रत्येक पक्षांच्या काही टक्के उमेदवारांवर गुन्हेगारी खटले आहेत. खटले असणे अर्थात आरोप असणे आणि ते आरोप सिद्ध होऊन गुन्हेगार ठरणे यात फरक आहे. मोदींवर तर आरोप नसताना देखील गुन्हेगारासारखे वागवले गेले ते योग्य होते असे म्हणायचे आहे का?

In reply to by संपत

आआप पार्टी म्हणून जगली पाहिजे, वाढली पाहिजे आणि तिच्या धसक्याने इतर पक्षांनीही आपली राजकारण अधिक लोकाभिमुख, स्वच्छ केले पाहिजे इतकीच सध्याची अपेक्षा आहे. टाळ्या !! नेमकं आणि चपखल! आणि केवळ याच कारणाने भाजपा आणि काँग्रेस आआप ला इतका विरोध करताहेत- कारण आआपमुळे त्यांचे राजकारण स्वच्छ करावे लागेल त्यांना. तसे झाले तर संघ वगैरेंची दुकाने बंद होतील ना!

In reply to by श्रीगुरुजी

आपण २३ तारखेला निर्णय घेऊ असे २ दिवसांपूर्वी सांगून त्यांनी इतरांची उत्कंठा वाढविली आहे. कदाचीत आपच्या कार्यकर्त्यांना दगड गोळा करायचे असतील. मग ते केजरीवालांच्या सभेत लुटूपुटीची लढाई करतील आणि मोदी-भाजपा वर आरोप करायला मोकळे. तेव्हढे जमले नाहीतर गेला बाजार किमान गाडीची काच तरी नक्की फोडता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

कदाचित ते निवडून सुद्धा येतील कारण वाराणशी भाजपसाठी अवघड मतदारसंघ आहे आणि जर इतर सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला तर मोदी पडतील.
तांत्रिकदृष्ट्या जर इतर सर्व पक्षांनी पाठिंबा दिला तर मोदींना निवडणूक जड जाईल असे दिसते. तरीही त्यांचा पराभव होईल असे तरी मला वाटत नाही.तरी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे इतर सगळे पक्ष केजरीवालला पाठिंबा देतील का. तसे करणे इतर पक्षांना परवडेल का? काँग्रेसने केजरीवालला पाठिंबा देणे म्हणजे मोदींपुढे पक्षाने शरणागती पत्करली आहे असा त्याचा सरळसरळ अर्थ होईल.काँग्रेसकडे मोदींना लढत देऊ शकेल असा उमेदवार नाही म्हणून केजरीवालला समर्थन दिले असा त्याचा अर्थ होईल.हे काँग्रेसला देशातील इतर भागांमध्ये परवडेल का?त्यातूनही केजरीवालने चांगली लढत दिली (किंवा अगदी तो जिंकला) तर भाव कोण खाणार तर केजरीवाल. काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला नाही म्हणून त्याला फायदा झाला ही गोष्ट नजरेआडच होणार.मुळात काँग्रेसची स्थिती उत्तर प्रदेशात फार चांगली आहे असे नाही.आणि असे करून काँग्रेस आपण होऊन स्वतःची स्पेस आआपला मोकळी करून स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारायला तयार होईल का हा प्रश्नच आहे. तीच गोष्ट कमी-अधिक प्रमाणात बसपची. गेल्या निवडणुकीत बसपने मुरली मनोहर जोशींना बर्‍यापैकी चांगली लढत दिली होती.बसपला आपली हक्काची मते सोडून तिसर्‍या पक्षाला देणे कितपत परवडेल? सपची या मतदारसंघात तितकी ताकद नाही त्यामुळे त्या पक्षाला केजरीवालला पाठिंबा देणे परवडेल.पण काँग्रेस आणि बसपला ते परवडेलच का याविषयी मी साशंक आहे.

खुजलीवाल एक नं. चा बंडल व धुर्त मनुष्य आहे... ते नाटकीपणाचे खोकणे पाहुन तर डोक्यात तिडीक उठते. आता ह्या निवडणुकीत भाजपाची मते खाऊन काँग्रेसचे सरकार येण्यास मदत करण्यावाचून बाकी काही विधायक कामे दिसत नाही आहेत साहेबांची...पाहुया पुढे काय-काय होते ते.

अहो सध्या 1बिएचके फ्लॅट चे रिनोव्हेशन करायला मला दोन महिने लागले त्यात बाथरुम च्या प्लंबिग साठी 6/7 दिवस ...अन् याला सिस्टम चेंज करायचय, अभ्भी के अभ्भी

Watch the too indignantly righteous. Before long you will find them committing or condoning the very offence which they have so fiercely censured.” ― Śrī Aurobindo आक्रस्ताळ्या नीतीमूल्यसंरक्षकांकडे नीट लक्ष द्या. लवकरच तुमच्या लक्षात येईल की ज्या अपराधांविषयी मोठेच आकांडतांडव करत यांची निर्भत्सना चाललेली होती, नेमके तेच गुन्हे करताना किंवा त्यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना हीच मंडळी दिसतील. - योगी अरविंद

आपच्या दृष्टीने काँग्रेसचे उमेदवारांवर गुन्हेगारी खटले चालू नसावेत... खालील बॅनर हे त्यांच्या संस्थळावरील आहे. AAP Banner बॅनरखालच्या निबंधात देखील काँग्रेसचे नाव नाही! बिच्चारे राष्ट्रवादी! :(

In reply to by विकास

पहिली गोष्ट : हे आआपचे बॅनर नसून Association for Democratic Reforms ह्या संस्थेचे आहे जे आआपने त्यांच्या संस्थळावर दिले आहे. दुसरी गोष्ट : हि लिस्ट ६ मार्चची आहे. तोपर्यंत कॉंग्रेसची लिस्ट प्रसिद्ध झाली .नव्हती म्हणून काँग्रेस त्यात नाही.

In reply to by संपत

आपचे नाव देखील दिसत नाही! कदाचीत आपचा डेमोक्र्टीक रिफॉर्म वर भर नाही हे माहीत असल्याने त्यांचे विश्लेषण नसावे.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/No-funds-to-give-50-waive… केजरीवालांची स्वस्त वीज फार्सच? दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वीजबिल निम्म्यावर आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रत्यक्ष सत्तेत येताच तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने तसा निर्णय घेतला खरा; मात्र, प्रत्यक्षात सन २०१३-२०१४च्या अर्थसंकल्पात त्यासाठीची तरतूदच नसल्याने या निर्णयाची अंमलबजावणी अशक्य असल्याचे दिल्ली सरकारने दिल्ली हायकोर्टाला सांगितले आहे. त्यामुळे केजरीवाल यांची ही स्वस्त वीज फार्सच ठरण्याची चिन्हे आहेत. लोकांच्या रोजच्या आयुष्याशी निगडित प्रश्न हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांनी त्यावेळी भरमसाठी आश्वासने दिली होती. तत्पूर्वी दिल्लीतील वीज बिलांचा मुद्दा हाती घेत त्यांनी बिले न भरण्याचे आवाहन दिल्लीकरांना केले होते. सत्तेत आल्यानंतर, ऑक्टोबर २०१२ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत वीजबिले न भरलेल्या दिल्लीकरांचे बिल निम्म्यावर आणण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला होता. हे प्रकरण पुढे दिल्ली हायकोर्टात आले. मुख्य न्यायाधीश बी. डी. अहमद आणि न्या. एस. मृदुल यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी याप्रकरणी सुनावणी झाली. वीजबिल न भरलेल्यांना सवलत देण्यासाठी सहा हजार ८२१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात अर्थसंकल्पात त्याची तरतूदच झालेली नाही, असे प्रतिज्ञापत्र दिल्ली सरकारतर्फे सादर करण्यात आले. वीज महामंडळ, दिल्ली सरकारने १४ फेब्रुवारी २०१४च्या पत्रामध्ये यासाठी सहा हजार ८२१ कोटींची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात यासाठी अर्थसंकल्पात तरतूदच केली नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची अमलबजावणी करणे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. वकील विवेक शर्मा यांनी याप्रकरणी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २२ मे रोजी होणार असून तोपर्यंत मंत्रिमंडळ निर्णयाच्या अमलबजावणीवरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. १२ फेब्रुवारीला दिल्ली मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाला कोर्टाने प्रथम स्थगिती दिली होती. तसेच या निर्णयाबाबत सद्यास्थिती मांडण्यास सांगितले होते.

नमो आता गांधीनगर येथूनही उभे राहाणार आहेत.एक बातमी आमची काल्पनिक कथा-- नमो नी आता पर्यंत ५०० ठिकाणी अर्ज भरला होता. तरी केजरी चक्रम राजाने आपला हट्ट सोडला नाही. तो सोगा देवीच्या मुक्कामी गेला त्याला आणखी ४३ कोरे अर्ज देण्यात आले. नमू साठी भापा ला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. शेवटच्या दिवशी उरलेले ४३ अर्ज भरायचे त्यासाठी जरूर लागल्यास नमो साठी चार्टर्ड प्लेन मुअ व अ यानी द्यायचे कबूल केले होते पण शिन्ची आसं आड आली. मग भा च्या वर्गणीतून खर्च कारायचा की कसे हे ठरले बर ते पुन्हा आसं मधे बसेल की नाही . वकत मोठा कठीण होता.पण तेवड्यात र प्र यानी एक कुठली तरी कोपर्यातली प्रोव्हीजन दाखवली. उरलेले सर्व अर्ज दिल्लीतही भरता येतील म्हणे ! मग नमो चा प्रश्न सुटला. नमो हळूच सर्व ४३ अर्ज घेऊन दाखल झाला. अर्ज भरले गेले. अनुमोदने झाली. सारे बाहेर आले . बाहेर पांढर्‍या टोप्या व त्यावर काळी अक्षरे असणारी गॅंग उभी होती. सो गा बाईकडून आणलेले अर्ज हातात घेऊन केजरी चक्रम राजा उभा होता. भा मा की जै इनकिलाब जिंदाबाद च्या घोषणानी गॅगने परिसर व्यापून टाकला. ( होली का दुसरा दिन है ! नाराज नय होनेका )

In reply to by चौकटराजा

बातमी खरी असेल तर भाजप समर्थक देशभर नमो लाट आहे असे जे बोंबलत फिरत आहेत त्यावर खुद्द नमोंचा विश्वास नाही असं दिसतंय :)

In reply to by संपत

बातमी खरी असेल तर भाजप समर्थक देशभर नमो लाट आहे असे जे बोंबलत फिरत आहेत त्यावर खुद्द नमोंचा विश्वास नाही असं दिसतंय
कशावरून? तुम्हा केजरीवाल समर्थकांचे तार्किक निष्कर्ष नेहमी बुचकळ्यात पाडणारे असतात. हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता? मोदींनी गुजरातमधून निवडणुक लढविणे यात काही नवल नाही.जर गुजरातबाहेरून निवडणुक लढवली नाही तर म्हणायला मोकळे की मोदींचा करिश्मा गुजरातबाहेर चालणार नाही. बाहेरूनपण निवडणुक लढवली तर म्हणणार की मोदींची लाट आहे यावर मोदींचाच विश्वास नाही. वाराणसीतून निवडणुक लढविणार असे म्हटले की विचारायचे 'सेफ मतदारसंघ' कशाला हवा (वाराणसी हा कितपत सेफ मतदारसंघ आहे हा प्रश्न आहेच). सगळे मोठे नेते स्वतः (त्यांच्या मते) सेफ असलेल्या मतदारसंघातूनच लढत असतात. त्याचे कारण त्यांना स्वतःसाठी त्या मतदारसंघात वेळ घालवावा लागत नाही आणि ते देशभर पक्षाच्या इतर उमेदवारांचा प्रचार करत करू शकतात. शरद पवार १९६७ पासून निवडणुक लढवत आहेत.पण ते निवडणुक लढवायला बारामतीबाहेर पडले पहिल्यांदा २००९ मध्ये. सोनिया गांधी १९९९ मध्ये अमेठी (उत्तर प्रदेश) आणि बेल्लारी (कर्नाटक) मधून लढल्या. अमेठी मतदारसंघ त्यांनी का निवडला याचे कारण वेगळे सांगायलाच नको. १९५२ पासून १९९८ पर्यंत प्रत्येक निवडणुकीत बेल्लारीमधून काँग्रेसचा विजय होत होता. त्यामुळे १९९९ मध्ये बेल्लारी काँग्रेससाठी "सेफ सीट" होती. (त्या मानाने वाराणसी मोदींसाठी बरीच अनसेफ सीट आहे तरी ते तिथून लढत आहेत :) ) २००४ आणि २००९ मध्ये सोनिया गांधी घराण्याच्या परंपरागत रायबरेलीमधून तर राहुल गांधी अमेठीतून लढले. जगजीवनराम सासाराम (बिहार) बाहेरून कधी निवडणुक लढले नाहीत. बंगाराप्पा कधी शिमोगा सोडून लोकसभेची निवडणुक लढले नाहीत. (विधानसभेतही शिमोगा जिल्ह्यातीलच सागर आणि सोराब या जागा त्यांनी कधी सोडल्या नाहीत). अशी अनेक उदाहरणे देता येतील. दुसरे म्हणजे एकापेक्षा जास्त मतदारसंघातून मोठ्या नेत्याने निवडणुक लढवायचा एक फायदा असतो. दोन्ही मतदारसंघांच्या आजूबाजूच्या प्रदेशात पक्षाला फायदा होतो आणि जास्त जागा जिंकायला मदत होते. वाराणसी उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात आहे. या प्रदेशातून मोदींनी निवडणुक लढविल्याचा फायदा पक्षाला उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात आणि बिहारच्या पश्चिम भागात होईल असे कॅल्क्युलेशन पक्षाचे कशावरून नसेल? मोदींनी दोन ठिकाणी निवडणुक लढवली म्हणजे ते घाबरलेच आहेत हा निष्कर्ष कशावरून काढलात? आणि शेवटचे म्हणजे पुढील मोठ्या नेत्यांनी दोन मतदारसंघातून निवडणुक लढवली,दोन्ही ठिकाणी जिंकले आणि तरीही पक्षाला चांगले यश मिळाले (काही उदाहरणात पक्ष बहुमतात आला) अशी काही उदाहरणे: १. अटलबिहारी वाजपेयी: १९९१- लखनौ (उत्तर प्रदेश), विदिशा (मध्य प्रदेश)-- पक्षाला उत्तर प्रदेशात ८५ पैकी ५१ जागा मिळाल्या. मध्य प्रदेशात तेवढे यश मिळाले नाही (४० पैकी १२ च) २. लालकृष्ण अडवाणी: १९९१- नवी दिल्ली (दिल्ली), गांधीनगर (गुजरात)-- पक्षाला दिल्लीत ७ पैकी ५ तर गुजरातमध्ये २६ पैकी २२ जागा मिळाल्या ३. अटलबिहारी वाजपेयी: १९९६- लखनौ (उत्तर प्रदेश), गांधीनगर (गुजरात)-- पक्षाला उत्तर प्रदेशात ८५ पैकी ५१ तर गुजरातमध्ये २६ पैकी १६ जागा मिळाल्या. ४. इंदिरा गांधी: १९८०- रायबरेली (उत्तर प्रदेश), मेडक (आंध्र प्रदेश)-- पक्षाला दोन्ही राज्यांमध्ये चांगले यश मिळाले. मेडक हा इंदिरा गांधींसाठी 'सेफ' मतदारसंघ होता बरे का :) विधानसभा निवडणुका-- १. एन.टी.रामाराव- आंध्र प्रदेश (१९९४): हिंदूपूर आणि तेक्काळी. तेलुगु देसम आणि मित्रपक्षांनी २९४ पैकी २५० पेक्षा जास्त जागा जिंकून काँग्रेसला जोरदार चोप दिला. २. मुलायमसिंग यादव- उत्तर प्रदेश (१९९३): जसवंतनगर, निधौली कला, शिकोहाबाद. या निवडणुकांनंतर इतर पक्षांच्या पाठिंब्यावर मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले. ३. लालूप्रसाद यादव- बिहार (१९९५): दानापूर आणि राघोपूर. या निवडणुकांमध्ये लालूप्रसाद यादवांच्या जनता दलाने मित्रपक्षांसह ३२४ पैकी जवळपास २०० जागा जिंकल्या. ४. शिवराजसिंग चौहान- मध्य प्रदेश (२०१३): बुधनी आणि विदिशा. या निवडणुकांमध्ये भाजपने २३० पैकी १६५ जागा जिंकल्या. ५. कल्याणसिंग-उत्तर प्रदेश (१९९३): अतरौली आणि कासगंज. भाजप सगळ्यात मोठा पक्ष (१७७/४२५) ६. ओमप्रकाश चौटाला- हरियाणा (२०००): नरवाना आणि रोरी. आय.एन.एल.डी ९० पैकी ४७ जागा जिंकून चौटाला मुख्यमंत्री सध्या इतकीच उदाहरणे आठवत आहेत. अजून आठवल्यास लिहेनच. आता या सगळ्या उदाहरणांमध्ये संबंधित नेते घाबरले होते म्हणून दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवत होते का याचा निवाडा वाचकांवरच सोडतो :)

In reply to by क्लिंटन

क्लिंटन साहेब, तुम्ही काही उलट सुलट बोला... पण वास्तव एकच आहे: फक्त केजरीवाल बंदेमेच (चहात ला "च") दम है! बाकी इंदीरा गांधी, वाजपेयी, अडवाणी, वगैरे त्यांच्यासमोर फारच चिल्लर आहेत. मग मोदींचे काय घेऊन बसलात? एकेंपुढे ते किस चाय की पत्ती! ;)

In reply to by क्लिंटन

ह्यातल्या कुणाचाही त्यांची 'लाट' आहे म्हणून प्रसार झाला नव्हता. इंदिरा गांधींचा जेव्हा झाला होता त्यावेळी त्या एकाच ठिकाणाहून लढल्या. ८० च्या आधीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता म्हणून त्यांनी दोन ठिकाणाहून लढण्याची दक्षता घेतली. दोन ठिकाणाहून लढणे हे अत्माविशासाला कुठेतरी तडा गेल्याचे दर्शवते.

In reply to by संपत

रामारावांनी चार पंच्मांश बहुमत मिळवले, शिवराज आणि लालूंनी ६०%-७०% जागा जिंकल्या तरी त्यांची लाट नव्हती? आणि वर म्हटले तसे कॅल्क्युलेशन भाजपाचे कशावरून नसेल याला काय उत्तर आहे? अर्थात आत्मविश्वासाची कमी वगैरे गृहितच धरायचे असेल तर मात्र काही लिहिण्यात अर्थ नाही. अशी कमी कोणात असेल तर त्या केजरीवालमध्येच- महत्वाचे निर्णय स्वतः न घेता लोकांकडून एस.एम.एस मागवायचे. आताही हा मनुष्य तेच करत अहे. म्हणे तो वाराणसीतून लढणार की नाही ते जनता ठरविणार.आअरे रताळ्या जनता मतदानातून जे काही सांगायचे ते सांगेल. हा मानभावीपणा कशाकरता?

In reply to by क्लिंटन

रामरावाचा पक्ष आधीच्या निवडणुकीत सत्तेतून बाहेर गेला होता. तरीही त्यांची लाट होती? अहो ज्यांनी कधीही पराभव चाखला नाही अशा रामरावांचा आत्मविश्वास आदल्या निवडणुकीत पक्ष हरल्यावर किती कायम राहणार होता? २ ठिकाणी निवडणूक - आत्मविश्वासाचा अभाव

In reply to by संपत

बरं बाबा तुम्हीच खरे.आहे मोदींमध्ये आत्मविश्वासाचा अभाव. खूष? बाकी वर विचारलेला प्रश्न परत एकदा--वाराणसीत मोदींनी निवडणुक लढवल्यास जवळपासच्या मतदारसंघांमध्ये फायदा होईल या कॅल्क्युलेशनने मोदी वाराणसीतून कशावरून उभे राहत नसतील? की अडचणीचे प्रश्न विचारल्यानंतर केजरीवाल-प्रशांत भूषण सोयीस्करपणे खोकतात त्याप्रमाणे तुम्ही प्रश्नाला बगल देणार? अर्थात आआप समर्थक आआप नेत्यांपेक्षा फार वेगळे काही करतील अशी अपेक्षा नाही. बाकी चालू द्या

In reply to by क्लिंटन

लढू द्या कि त्यांना वाराणशीत.. त्यामुळे भाजपला फायदा होईल असे कॅल्क्युलेशन असेलही. पण त्यांना वाराणशीतील विजयाची खात्री आहे तर वडोदऱ्यात कशाला लढवतात ते? म्हणजेच मोदी लाटेवर खुद्द मोदींचा एवढा विश्वास दिसत नाही अस दिसतंय.

In reply to by संपत

जर मोदी लाट नसेल तर मोदी विरोधक आणि त्यातले अग्रगण्य (अगदी दिग्गीराजांपेक्षाही) केजरीवाल यांना उगाच घसेफोड करून अजून खोकायची काहीच गरज नाही. राहता राहीला मोदींचा मोदी लाटेवर विश्वास आहे का नाही हा... स्वतः मोदी असे कधीच म्हणताना आढळलेले नाहीत की माझी लाट आहे म्हणून. त्यांना लोकांनी गुन्हा नसताना गुन्हेगार म्हणून झाले आहे, धर्मांध ठरवून झाले आहे, कम्युनिस्टांनी तर भांडवलशाही अमेरीकेच्या नाकदुर्‍या ओढत तत्कालीन बुश सरकारकडून त्यांना वाळीत टाकून झाले आहे... आता तुम्ही म्हणा त्यांना आत्मविश्वास नाही अथवा ते भित्रे आहेत म्हणून...

In reply to by विकास

बाकी नेहमीचच आहे पण हे वाक्य गोंधळात टाकणारे आहे. थोडा खुलासा कराल तर बरे..
कम्युनिस्टांनी तर भांडवलशाही अमेरीकेच्या नाकदुर्‍या ओढत तत्कालीन बुश सरकारकडून त्यांना वाळीत टाकून झाले आहे.

In reply to by संपत

कम्युनिस्टांनी तर भांडवलशाही अमेरीकेच्या नाकदुर्‍या ओढत तत्कालीन बुश सरकारकडून त्यांना वाळीत टाकून झाले आहे. यातील कम्युनिस्ट म्हणजे तुम्हाला कदाचीत कम्युनिस्ट पक्ष वाटला असेल तर तसे म्हणायचे नव्हते.. कम्युनिस्ट/डावी विचारधारा ठेवून हिंदू हा (एक त्या नावाचे वर्तमानपत्र सोडल्यास) द्वेष करणार्‍या अमेरीकेतील भारतीय विचारवंतांबद्दल बोलत आहे... त्यात अंगना चॅटर्जी सारख्या व्यक्ती येतात.

In reply to by विकास

जर मोदी लाट नसेल तर मोदी विरोधक आणि त्यातले अग्रगण्य (अगदी दिग्गीराजांपेक्षाही) केजरीवाल यांना उगाच घसेफोड करून अजून खोकायची काहीच गरज नाही.
अगदी अगदी. तो केजरीवाल म्हणतो की देशात मोदींची लाट नाही. पण मग भाषणात वारंवार मोदींचा उल्लेख का येतो? त्याला नेमके गुजरातमध्ये जाऊनच तमाशा करावासा का वाटला? गेल्या वर्षभरापासून एक गोष्ट वारंवार बघायला मिळालेली आहे. भाजपवाल्यांनी काय करावे याची चिंता इतरांनाच जास्त. पहिल्यांदा भाजपवाल्यांनी आपला नेता म्हणून कोणाला निवडावे यावर दळण सुरू होते.शिवराजसिंग चौहान का नाहीत? अडवाणी का नाहीत? उत्तर प्रदेश ८० खासदार निवडून देतो मग उत्तर प्रदेशातील कोणी नेता का नाही असले प्रश्न विचारले जात होते. मोदींना निवडल्यानंतर पुढचे प्रश्न सुरू झाले-समजा आघाडीच्या राजकारणासाठी मोदी सोडून इतर कोणाला पंतप्रधान म्हणून स्विकारावे लागले तर मोदी समर्थकांची अवस्था कशी होईल? असल्या ढोंगी लोकांना सांगायची एकच गोष्ट--आमचे जे काही व्हायचे ते होईल.त्याची चिंता तुम्ही करायची काहीही गरज नाही.ते होते न होते तोच मोदींनी कुठून लढावे किती ठिकाणहून लढावे हे पण हेच बाहेरचे लोक सांगणार.काय करणार. शेवटी स्वभावाला औषध नाही हे खरेच.तेव्हा याउपर अशांकडे दुर्लक्ष करण्याशिवाय फारसे माझ्यातरी हातात राहिलेले नाही. आणि असे झाल्यानंतर मला वादविवादांमध्ये कोणीच हरवू शकलेले नाही असे म्हणूनही कॉलर ताठ केली जाईलच. :) )

In reply to by क्लिंटन

--वाराणसीत मोदींनी निवडणुक लढवल्यास जवळपासच्या मतदारसंघांमध्ये फायदा होईल या कॅल्क्युलेशनने मोदी वाराणसीतून कशावरून उभे राहत नसतील?
सहमत. वाराणसीतून उभे राहिल्यास आजूबाजूच्या २५-३० मतदारसंघांमध्ये हर हर मोदी करत हिंदू मतांचे पोलरायझेशन करण्याची युक्ती असावी असे वाटते. अर्थात जोपर्यंत दंगली वगैरे पेटवल्या जात नाहीत तोपर्यंत त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. फक्त स्ट्रॅटेजी काय असावी याचा हा अंदाज आहे.

In reply to by आजानुकर्ण

बरोबर. आणखीन एक कारण मी ऐकले आहे. मोदींच्या विकास पुरुष प्रतिमेवर इतका भर दिला गेला कि त्यांची हिंदुत्ववादी भूमिका मागे पडली. तिची अप्रत्यक्ष आठवण करून देण्यासाठी त्यांना वाराणशीत उभे केले गेले असे म्हणतात (निनादने देखील वर हेच सांगितले आहे.). अयोध्येनंतर मथुरा आणि काशीचा नंबर आहे असे विहिपने मागेच सांगितले होते त्यामुळे वाराणशी हिंदुत्ववादी अजेन्द्याशी जोडली गेली आहे. वाराणशी बाबतीत एक मुद्दा मात्र ह्या चर्चेत आला नाही जो मी टीवीवर ऐकला. वाराणशीत २ लाख मुसलमान मतदार आहेत ज्यांचे एक गठ्ठा मतदान झाले तर निवडणुकीचा निकाल बदलू शकतो.

In reply to by आजानुकर्ण

जर एनडीटिव्हीमधील विश्लेषण संदर्भ म्हणून वापरले तर: असे दिसते आहे की मोदींना तिथल्या मुस्लीम जनतेकडून पण काही अंशी मते मिळतील. त्यांच्या विरोधात जर मुस्लीमांनी मते दिली तर ती गैर काँग्रेस/सपा/बसपा मुस्लीम उमेदवार असल्यास मिळण्याची शक्यता जास्त. काही प्रमाणात केजरीवालांना पण मिळतील कारण एकूणच तिथली मुस्लीम जनता देखील स्युडोसेक्यूलॅरिझमला आणि सतत व्होटबँकचे प्यादे होण्याने त्रासलेली आहे... तत्कालीन सरसंघचालक कै. सुदर्शनजींच्या इच्छेनुसार २०००च्या पहील्या काही वर्षात मुस्लिम राष्ट्रीय मंच स्थापन केला गेला होता. त्याचा परीणाम म्हणून मुस्लीम समाजचा संघाशी सुसंवाद झाला आहे. त्याचा देखील वाराणसीतील कारागिर मुस्लीमांवर झालेला असला तर नवल नाही... खालील फोटो आत्ता चेपूवर मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या पानावर मिळाला तो वाराणसीतील मुस्लीम महीलांचा आहे... MRM बाकी मोदींनी वाराणसी का निवडले याला तुम्ही दोघांनी दिलेल्या निवडणूकीच्या दृष्टीने स्ट्रॅटेजिक कारणांशी सहमतच.

In reply to by क्लिंटन

वाराणसीत मोदींनी निवडणुक लढवल्यास जवळपासच्या मतदारसंघांमध्ये फायदा होईल या कॅल्क्युलेशनने मोदी वाराणसीतून कशावरून उभे राहत नसतील? किंबहुना, म्हणूनच ते तिथून उभे राहतायत असाच माझा अंदाज आहे आणि नेमका मोदींना तो लोकेशन चा फायदा होउ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध वाराणशीतून उभे राहून मोदींना तिथे अडकवून टाकायचा केजरीवालचा इरादा स्पष्ट दिसतो आहे. मोदींनी उ,प्र.मधून निवडणूक लढवणे आणि त्यायोगे उप्र मधल्या जागा वाढवायचा प्रयत्न करणे ही चांगली सामरिक खेळी आहे यात वादच नाही. कारण २७३ चा जादुई आकडा गाठण्यासाठी उप्र आणि बिहार हीच दोन आशास्थाने भाजपासाठी आहेत. त्यामुळे, आआप ने ह्या दोन राज्यांतून जास्तीत जास्त उमेद्वार उभे करुन भाजपाची ही खेळी निष्फळ ठरवायचा प्रयत्न नाही केला तरच नवल. मला वाटतं- भाजपा, कॉग्रेस आणि आआप ह्या तीन पक्षांमध्ये गमविण्यासारखे काहीच नसल्यामुळे आआप एक डार्क हॉर्स ठरून काही अपसेट नक्कीच देऊ शकतात.

In reply to by क्लिंटन

वाराणसीत मोदींनी निवडणुक लढवल्यास जवळपासच्या मतदारसंघांमध्ये फायदा होईल या कॅल्क्युलेशनने मोदी वाराणसीतून कशावरून उभे राहत नसतील? किंबहुना, म्हणूनच ते तिथून उभे राहतायत असाच माझा अंदाज आहे आणि नेमका मोदींना तो लोकेशन चा फायदा होउ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध वाराणशीतून उभे राहून मोदींना तिथे अडकवून टाकायचा केजरीवालचा इरादा स्पष्ट दिसतो आहे. मोदींनी उ,प्र.मधून निवडणूक लढवणे आणि त्यायोगे उप्र मधल्या जागा वाढवायचा प्रयत्न करणे ही चांगली सामरिक खेळी आहे यात वादच नाही. कारण २७३ चा जादुई आकडा गाठण्यासाठी उप्र आणि बिहार हीच दोन आशास्थाने भाजपासाठी आहेत. त्यामुळे, आआप ने ह्या दोन राज्यांतून जास्तीत जास्त उमेद्वार उभे करुन भाजपाची ही खेळी निष्फळ ठरवायचा प्रयत्न नाही केला तरच नवल. मला वाटतं- भाजपा, कॉग्रेस आणि आआप ह्या तीन पक्षांमध्ये गमविण्यासारखे काहीच नसल्यामुळे आआप एक डार्क हॉर्स ठरून काही अपसेट नक्कीच देऊ शकतात.

In reply to by संपत

मी जरी आआप चा समर्थक असलो तरी मला मोदींनी दोन ठिकाणी उभे राहाणे हा आत्मविश्वासाचा अभाव वाटत नाही, उलट ही एक चांगली खेळी आहे. कारण मोदी फक्त वाराणशीमधूनच उभे राहिले तर तिथे अडकून पडतील- जो की केजरीवालांचा उद्देश असावा- त्यामुळे ते गुजरातमधूनही उभे राहिले असावेत. मोदींनी केजरीवालना कमी घ्यावे यातच केजरीवालांचा फायदा आहे कारण त्यामुळे मोदी गाफिल राहण्याची शक्यता आहे. कुठलाही हुशार नेता शत्रूला कमी लेखण्याची चूक करु शकत नाही. आणि केजरीवालनी ज्या तर्‍हेने गेल्या वर्षभरात आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे ते पाहाता त्यांना कमी लेखण्याची चूक मोदींसारखा धूर्त नेता तरी करणार नाही.

In reply to by बाळकराम

राजकीय नेत्यांनी दोनदोन ठिकाणावरुन उभे राहून नंतर एका ठिकाणचा राजीनामा देण्यावर कायद्याने बंदी आणली पाहिजे. निवडून आल्यावर हे नेते त्या ठिकाणांना भेट देत असतील असे वाटत नाही.

In reply to by आजानुकर्ण

पण ही एक धोरणात्मक चाल आहे हे नक्की. मला प्रश्न पडला आहे की- समजा वाराणसीमधून मोदी वा केजरीवाल निवडून आले आणि त्यांनी राजीनामा दिला. तर रिकाम्या जागेवर पुन्हा जो पराभूत झालेला उमेदवार होता तो परत उभा राहिल का? मला नाही वाटत मोदी/केजरीवाल असं करतील. केजरीवालसाठी निवडणुकीचा निकाल फारसा महत्त्वाचा नाही- जरी वाराणसी भाजपासाठी सुरक्षित मतदारसंघ नसला तरी. मोदींविरुद्ध उभे राहून केजरीवाल ला एक मेसेज द्यायचा होता त्यामुळे निकालाची पर्वा इल्ले.

In reply to by बाळकराम

मोदी मुळात वाराणशीमधून निवडणूक लढवण्यास फार उत्सुक होते असे वाटत नाही. त्यांना तिथून लढण्यात धोका आहे हे ठाऊक आहे. केजरीवालशिवाय देखील अनेक घटक त्यांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी वडोदरामधून देखील निवडणूक लढवणे त्यांच्या दृष्टीने ठीक आहे. दोन ठिकाणाहून निवडणूक लढवण्यात काहीच वावगे नाही. तो घटनेने दिलेला हक्क आहे. पण ह्यावरून हे सिद्ध होते कि मोदींना भारतभर पाठींबा आहे असे जे म्हटले जाते त्यावर खुद्द मोदींचा विश्वास नाही. इंदिरा गांधी, रामाराव, राजीव गांधी ह्यांच्या जेव्हा लाटा होत्या असा प्रचार झाला तेव्हा ते एकाच ठिकाणाहून उभे राहिले. लक्षात घ्या कि ह्यावेळी प्रचार भाजप लाट आहे असा होत नसून मोदी लाट आहे असा होत आहे. तरीही ते दोन ठिकाणाहून उभे आहेत ह्याचा अर्थ त्यांना समजलेले जे वास्तव आहे ते भाजपच्या प्रचारापेक्षा वेगळे आहे. कदाचित खरेच मोदी लाट असेलही पण मोदींचा त्यावर पुरेसा विश्वास नाही ह्याबद्दल माझी खात्री आहे.

In reply to by संपत

>>> इंदिरा गांधी, रामाराव, राजीव गांधी ह्यांच्या जेव्हा लाटा होत्या असा प्रचार झाला तेव्हा ते एकाच ठिकाणाहून उभे राहिले. १९८३ साली एन टी ड्रामाराव प्रथमच मुख्यमंत्री झाले होते. १९८४ मध्ये त्यांनी विधानसभा बरखास्त करून लोकसभेबरोबरच परत विधानसभेची निवडणुक घेतली. त्यावेळी ते एकूण ३ वेगवेगळ्या मतदारसंघातून उभे होते व तीनही ठिकाणाहून निवडून आले होते. त्यांची १९८३ साली लाट होती व १९८४ साली पण त्यांची लाट होती. तरीसुद्धा ते ३ ठिकाणाहून उभे राहिले होते. रायलसीमा, तेलंगण व उर्वरीत आंध्र अशा आंध्रच्या तीनही भागात मला पाठिंबा आहे हे दाखविण्यासाठी ते उभे होते. >>> लक्षात घ्या कि ह्यावेळी प्रचार भाजप लाट आहे असा होत नसून मोदी लाट आहे असा होत आहे. तरीही ते दोन ठिकाणाहून उभे आहेत ह्याचा अर्थ त्यांना समजलेले जे वास्तव आहे ते भाजपच्या प्रचारापेक्षा वेगळे आहे. मोदी लाट आहे किंवा अमुकतमुक नेत्याची लाट आहे असे प्रचारात सांगणे हा अभिनिवेश असतो. प्रत्यक्षात मोदी असोत वा वाजपेयी, तामिळनाडू + केरळ + आंध्र + प. बंगाल या चार राज्यातील एकूण १४४ जागांपैकी १४ जागासुद्धा भाजपला मिळत नव्हत्या व मिळणार नाहीत हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. परंतु उत्तर व पश्चिम भारतात मोदींच्या उमेदवारीमुळे निश्चितच फरक पडलेला आहे असे दिसून येते. जून २०१३ पर्यंत झालेल्या मतदान चाचणीमध्ये रालोआची संभाव्य संख्या १८० पर्यंत दिसत होती. मोदी जर पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तर भाजपाला किमान ४० जागांचा फायदा होईल असे चाचणीकर्त्यांचे मत होते. सप्टेंबर २०१३ मध्ये मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यावर हीच संभाव्य संख्या २३० पर्यंत पोचलेली आहे. हा मोदी इफेक्टच आहे. >>> कदाचित खरेच मोदी लाट असेलही पण मोदींचा त्यावर पुरेसा विश्वास नाही ह्याबद्दल माझी खात्री आहे. काहीवेळा अज्ञानात सुख असतं. मोदींच्या बाबतीत तसेच असेल.

In reply to by श्रीगुरुजी

१९८३ साली एन टी ड्रामाराव प्रथमच मुख्यमंत्री झाले होते
ड्रामाराव :) माझा मुद्दा लाट होती कि नाही हा नसून नेत्याला तसे वाटत होते का हा आहे. १९८४ साली निवडणुकी आधी रामाराव ह्यांच्याविरुद्ध बंडाळी झाली होती आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. (ते पुन्हा मुख्यमंत्री झाले हे वेगळे. )

In reply to by चौकटराजा

नमो आता गांधीनगर येथूनही उभे राहाणार आहेत.एक बातमी तुम्ही कुठे वाचलीत ते माहीत नाही. पण एनडीटिव्हीवरील बातमीत उलटेच सांगितले गेले आहे... BJP leaders request LK Advani to run again from Gandhinagar: sources

In reply to by विकास

मोदी गांधीनगर मधून नाही तर वडोदरामधून पण लढणार आहेत. आता केजरीवाल, "मी पण, मी पण " म्हणत तेथे पण येतात का ते बघूयात! ;) तेथे म्हणल्याप्रमाणे: Similarly, the BJP's decision to have Mr Modi run for the Lok Sabha from Varanasi is designed to enthuse voters in India's largest state to support the party.

केजरिवालाचे सर्व चाळे हेतुपूर्ण आहेत. त्यांचा मुख्य उद्देश सर्व न्यूज चानेल वर असणे एवढाच वाटतो. सुचारू आणि संयमी शासन करण्याची कुवत नसल्याने ते पायउतार होण्यासाठी निमित्त शोधत होते. त्यांच्या या वागण्या वरून एक मराठी वचन आणि एक संस्कृत सुभाषिताची आठवण होते. आधी होता वाघ्या (NGO ) त्याचा झाला पाघ्या ( घोड दलातील सैनिक ) येथे अर्थ मूख्य मंत्री त्याचा येळकोट राहिना त्याचा मूळ स्वभाव जाईना Ghatam bhindyat, :Patam chhindyat, Kuryat Rasabh Arohanam, Yen Ken Prakaren Prasiddho Purusho Bhavet घागर फोडा, ( अथवा) अंगावरचे कपडे फाडा, (किंवा ) गाढवा वर बसा (असे करून) या किंवा त्या प्रकारांनी प्रसिद्धीत रहा.

ते पुर्ण पॉवर्ने सत्तेत येऊन मगच आश्वासन पुर्ण करायचं हे कळालं.. (पटलं नाही फारसं..) पण सोनिया गांधी आणि रागां बद्दल का बोलत नाहीत केजरीवाल? (की बोलले आहेत पण मला माहित नाही..)

In reply to by पिलीयन रायडर

अहो सोनियाचे जावई आणि प्रियांकाचे पती रोबर्ट वाध्रांबद्दल बोलले आहेत कि ते खास पत्रकार परिषद घेऊन .. ही घ्या लिंक. शिवाय अण्णांच्या आंदोलनात आणि दिल्ली निवडणुकीत त्यांनी सोनिया आणि राहुल दोघांवरही टीका केली. इतकी कि काँग्रेस त्यांना भाजपची बी टीम म्हणाली होती :)

In reply to by संपत

चांगलय बरं का हे.. मला माहिती मिळत आहे तसं माझं मत सुद्धा थोडं निवळलं आहे.. म्हणजे केजरीवाल फार भारी माणुस आहे असं मला कधीच वाटलं नाही.. वाटणारही नाही.. पण किमान चुकीची गुहीतकं तरी नाहीत आता.. पण का कोण जाणे पण मला तो माणुस नाटकी वाटतोच.. त्याची परवा गुजरात दौर्‍यानंतर मुलाखत ऐकली होती.. ठिकच होती.. (तसं मला मोदींचं भाषण सुद्धा ठिक्च वाटलं होतं..)

In reply to by संपत

तुम्हाला माहीत नसावे, ;) पण त्यांनी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्या भ्रष्टाचारावर ३००+ पानांचा अहवाल तयार केला होता. नंतर काय झाले कोणास ठाऊक! एके मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना दिक्षितबाईंवर आरोपपत्र कधी ठेवणार म्हणून विचारले तर म्हणाले की भाजपाच्या हर्ष वर्धनना पुरावे आणूंदेत मग २ तासात आरोप पत्र ठेवेन! :(

In reply to by संपत

प्रियांका व तिचा नवरा हे राजकारणात नाहीत,त्यांच्यावर आरोप करून केजू ने काय साध्य केले. आरोप करून कार्यभाग संपला का तुम्ही तुमचे पुरावे घेऊन कोर्टात गेलात का आणि केंद्रातील भ्रष्टाचार व त्यात गुंतलेले मंत्री व ह्याबद्दल न्यायायालाने सुद्धा ताशेरे ओढले आहेत अनेक मंत्र्यांना तुरुंगवास झाला होता , आता जामिनावर सुटून आलेल्या ह्या महाबली नेत्याच्या विरुद्ध आप कधी बोलणार

केजरीवाल जर राजकारणातील राखी सावंत असेल तर दिग्गीराजा सनी लिओन आहे =))

In reply to by मृगजळाचे बांधकाम

दिग्गीराजा सनी लिओन आहे पण ते राजकारणातले निनाद कुलकर्णी आहेत ना? ;) की निनाद आणि सनी लिओनी दोन्ही आहेत?

In reply to by बाळकराम

बालका दोष तुझा नाही आहे. तुम्ही आप समर्थक केजू कसा स्वतः राज्य न करता दुसरे सलग ३ टर्म प्रशासन चालवत आहेत. तेथे जाऊन अभ्यास दौरा कम नौटंकी करतो. तुम्ही सुद्धा स्वतः लिखाण मते ,मुद्दे मिपावर न मांडता केवळ इतर लिहितात त्यांच्या लिखाणाच्या शैली वर अभ्यासपूर्ण मते देतात. अवांतर अभ्यास दौर्यात केजू केमेरे पाहून मुझे अंदर करो अशी पोलिसांना गळ घालतो ,काही वर्षांनी झलक दिख ला जा मध्ये तो असाच जनेतेला एस एम एस चा जोगवा मागेल.

इंडीया टूडे मधील बातमी प्रमाणे केजरीवाल यांनी अर्थसंकल्पात पैशाची तरतूद न करताच आप समर्थकांना (आणि एकूण 24,036 वीजग्राहकांना) ५०% वीजबिल माफी असल्याचे सांगत होते. एकीकडे असले चुकीचे निर्णय जाहीर करून अनिष्ठ पायंडा पाडत होते तर दुसरीकडे स्वत:च्या समर्थकांशीच खोटे बोलत होते... Kejriwal's power sop tripped by fund shock

आज राजीव बजाज यांनी आआप ला बजाज पल्सर या मोटरबाईकची उपमा दिली. माझ्या मते आआपसाठी याहून समर्पक उपमा मिळणे कठीण आहे. ज्याप्रमाणे बजाज पल्सरने दुचाकीचालनाच्या संस्कॄतीतील उद्दामपणाला नवे परिमाण मिळवून दिले तसेच आआप भारतीय राजकारणात करीत आहे.

In reply to by संपत

"पल्सर"बाबतीत(च) जर नकळत भावना दुखावल्या असल्या तर क्षमस्व. :) पण गैरसमज नसावा, स्वतःचा उद्योग सोडून कोण कुठले मॉडेल आहे हे जर "आप-का बजाज" सांगत बसणार असेल तर पल्सरची (आपची नाही) काळजी वाटते असे म्हणणे आहे.

In reply to by विकास

बजाज ग्रुप ची तुम्हाला "काळजी" वगैरे वाटते ते बघून मौज वाटली ;) मला वाटते त्यांच्या ग्रुप ची काळजी घ्यायला त्यांनी पगारावर हजारो लोक ठेवले आहेत आणि तुम्ही त्यांची "काळजी" करत आहात!- नाही म्हणजे परत तेच- मनपा- उंदीर मारणे विभाग इ.इ. असो. (आप विरोधकांचा आंधळा विरोध आता विरोधाभक्तिमध्ये रुपांतरित होउ लागलाय की काय असे वाटते ;)

In reply to by बाळकराम

आप विरोधक हे अरविंद केजरीवाल यांच्या आणि त्यांच्या गणंगांच्या आचरटपणास कंटाळून फक्त त्यांच्यावरच ताशेरे मारताना दिसताहेत. पण आप समर्थक मात्र मोदी-भाजपा बरोबरच जे कोणि मिपासभासद आप विरोधक असतील त्यांच्यावर देखील सातत्याने टिका करताना दिसत आहेत. मग कधी "उंदीर मारणार्‍यांचा विभाग" हा तोच तोच गेले ३०-४० वर्षे चालणारा विनोद काय, दिव्य बुद्धी काय, वगैरे... चालूंदेत. कदाचीत हा आपसमर्थक आणि आपचे तात्विक विरोधक यांच्यातला सांस्कृतिक फरक असावा, झालं! या वरून आजच पाहीलेले खालचे एक कार्टून आठवले... Cartoon

In reply to by विकास

महाप्रतापी नेत्याच्या आणि त्यांच्या त्यागी, सुसंस्कृत तसेच प्रखर देशभक्तीची शिकवण देणार्‍या संघटनेचे खंदे समर्थक असलेल्यांना एवढे हळवे होऊन चालणार नाही ;) असे जर तुम्ही हताश झालात तर मग आप सारख्यांना तुम्ही कसा धडा शिकवणार? आता मला तुमची काळजी वाटायला लागली आहे ;) (नाही म्हणजे चालेल ना केली तर- तुम्ही करताय तर मीही थोडी करुन घेतो ;) ) ह.घ्या. तुमच्या मतांबद्दल मतभेद असले तरी आदरच आहे हे मनापासून सांगतो.