Skip to main content

यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 14/03/2014 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
"यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?" प्रिय मिपाकरांनो, सध्या मी भारतात आहे. गेले काही दिवस मी जॉबच्या शोधात होतो. तो मिळाला. मी जॉइन करत असलेली कं. कॅनेडीयन असून, सध्या त्यांचे काम यांबू,सौदी अरेबिया, इथे सुरु आहे. पुढील ३/४ महिने मला यांबूलाच रहावे लागणार आहे. माझा मुळचा पिंड कट्टा करणे, हाच असल्याने, तिथे पण एखादा मस्त कट्टा करावा, असा बेत आहे. मागच्या वर्षी मी दुबईला पण कट्टा केला होता. ह्यावर्षी भारतात पण बरेच कट्टे केले. आता एक मस्त यांबू-कट्टा पण होवू देत. कळावे, लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती, मुवि
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14217
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

स्वागत आहे तुमचे सौदि अरबियाला. जुबैलला या, भरपुर मराठी बान्धव आहेत.

मुवि, आता आपण सौ. अरबकर होणार हे वाचून आपल्याला तर हिमालय उशीला लागतो. आता त्याची सोय कशी काय करणार असे वाटून आमची झोप उडाली! सोबत ४ उंट, ४ घोड़े २ वजीर, असा पटावरील फौज फाटा बाळगणाऱ्या आपणास फावल्या वेळी मिपावरील संगतीत भेटतील काही अनाहूत सल्लागार...

In reply to by शशिकांत ओक

मनापासून धन्यवाद. घारापुरी लेणी कट्ट्याला आपल्याबरोबर जास्त बोलता आले नाही. जून्च्या २७/२८ ता,ला पुण्याला येत आहे.त्या सुमारास भेटूच आणि मनसोक्त गप्पा मारू.

तिकडच्या वादींमधल्या चुळकाभर पाण्यात संताजी धनाजी दिसू लागल्यामुळे जून २५ पर्यँत सही बदलण्यात आलेली आहे . तशी कोणाला नानू सरंजाम्याच्या उशीची गरज पडल्यास चार धाम यात्रा त्वरित करावी अथवा अमरनाथ यात्रेसाठी नाव नोंदवावे .