थोडं समजून घ्या ना...!!! (भाग २)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
थोडं समजून घ्या ना...!!!
घरी गेलो. जेवण कसंबसं एकदाचं आटोपलं. ते आटोपल्यावर पलंगावर नुसताच पाय जवळ घेऊन बराच वेळ बसून राहिलो होतो. आई आली, दोनदा 'दिवे मालव' असं म्हणून गेली. तरीही मी तसाच. शेवटी तिनेच येऊन दिवे मालवले. तरीही मी पाच दहा मिंटं तसाच बसून होतो. ती पुन्हा भेटली तर... पुन्हा पुन्हा भेटतच राहिली तर... अरे? जर-तर काय? भेटायलाच हवी पुन्हा!! कसंही करून काहीही करून तिचा नंबर मिळवायलाच हवा. काय करावं?? आधी ब वर्गात असलेली पण नंतर सेमी मध्ये आलेली एक मुलगी होती ओळखीची.. पण तिच्याशी फारसं बोलणं होत नसे. विचारायचं का तिला? सव्वा अकरा वाजल्येत. ट्राय करूया... तसा मी तिला मेसेज केला आणि नंबर मागितला... पण डिलिव्हरी रिपोर्ट येईना. एक रूपया फुकट जातो का काय? पंधरा मिंटांनी रिपोर्ट आला. आणि थोड्या वेळात लग्गेच रिप्लाय!! 'अरे चक्क तू मेसेज केलायस???? डिड द सन राईज्ड ऑन द वेस्टर्न लाईन टूडे???? :P'
अरेरेरेरे... मराठी नेत्यांना इंग्रजी न्यूजचॅनलवर बोलताना मराठी म्हणी-वाक्प्रचारांचं स्वैर भाषांतर करून वापरताना मी ब-याचदा पाहिल्याचं मला आठवलं. बरं, केलंस भाषांतर तर निदान नीट तरी कर. तिला सुधारत बसण्यात आणि 'नो इट रोज ऑन द सेंट्रल लाईन' असा खवचट रिप्लाय करण्यात एक रूपया अजून खर्च होईल म्हणून मी स्वतःला आवर घातला, आणि मुद्यावर आलो.
'pls mala no de ticha. And i cnt chat mala ek rupaya padtoy per msg'
'ओ मिस्टर देअर्स अ थिंग कॉल्ड मेसेज स्कीम. जी घेतली की एसएमएस फ्री मध्ये सेंड करता येतात. बादवे तुला तिचा नं का हवाय रे?'
'काम आहे माझं. दे ना. का माझे पैसे फुकट घालवत्येस?
'आय अॅम सॉरी... आय डोंट हॅव हर नंबर (अरे मग हे आधी नाही का सांगता आलं?) आणि असता तरी दिला नसता'
'का??? असता तर का दिला नसतास? मी काय गुंड आहे? माझं काम आहे म्हणून मागतोय ना मी'
'अरे तसं नाही, बट गर्ल्स डसंट लाईक इफ यु गेट हर नं फ्रॉम एल्सव्हेअर.. बॅड इम्प्रेशन फॉल्स... यु वाँट हर नंबर, देन आस्क हर ओनली. बी अ मॅन. आणि तुझं असं काय काम आहे रे तिच्याकडे :P'
मी रिप्लाय दिला नाही. तिने माझा अहंकार डिवचला होता. तो सुद्धा व्याकरणाच्या चुका करत. मला राग आला होता. चरफडत मी आडवा झालो. अंधारात चाचपडायला लागलो. उशीखाली हेडफोन्स सापडले. अंधारातच त्यांचा गुंता सोडवत बसलो. तो काही सहज सुटेना. मी जास्तच चवताळलो. पण हेडफोन्सवर राग काढण्यात अर्थ नव्हता. मग शिवणकाम करतात तसं तो गुंता हळूहळू सोडवत बसलो. एकदाचा तो सुटला. मग रेडिओ लागला. ९७.६ एफएम. हिमेश रेशमियाचं कुठलंतरी गाणं लागलं होतं. संपत आलं होतं, म्हणून मी स्टेशन बदललं नाही. गाणं संपलं, आणि आफ्ताब बोलायला लागला.
'तेरा तेरा तेरा सुरूर... दोस्तो ये गाना सुनने के बाद मै कुछ सोच मे पडा हूं, काश ये गाना ऐसा होता... तेरा तेरा तेरा गुरूर... क्या है की आज सुबह ही मेरी एक दोस्त मुझे मिली... जिसका नाम ही मिली था. उसने मुझे बताया की उसका एक दोस्त उसे पसंद है और उस दोस्त को भी मिली पसंद है. लेकिन बात आगे नही बढ रही. मैने पुंछा क्यू तो उसने कहा, "क्योकी वो लडका मुझे प्रपोजही नही कर रहा यार... " मैने कहा तो तू प्रपोज करले उसमे क्या है... तो केहने लगी, "मै थोडी करूंगी मै तो लडकी हू... ही शूड प्रपोज ही इज अ गाय" अब दोस्तो आप ही बताइये ये क्या बात हुई. अगर सामने खडा अपना यार है, और हमे उससे प्यार है.. तो ये इगो-शिगो बीच मे क्यू लाती है ये लडकिया. अगर आपको भी लडकीयों के इस गुरूर का कभी शिकार होना पडा हो और आपका एक्सपिरिअन्स आप मुझसे शेअर करना चाहते हो... या फिर किसी लडकी की इगो प्रॉब्लेमकी वजह से खडी हुई प्रॉब्लेम पे सोल्युशन ढुंढना चाहते हो, तो जरूर कॉल किजीये मेरा नं है ५६५४५६५४. इस अगले गाने को प्ले करने के साथ साथ हमारी फोन लाईन शुरु हो रही है. मै लौट आता हु कुछ ऐसे परेशान लोगो के साथ जो लडकीयों की हरकतो से तंग आ चुके है, और अपने अनुभव के बोल वो हमसे बाटना चाहते है... तब तक आप सुनते रहीये ये हसीन गाना... सिर्फ ९७.६एफएम धमाका पर!!'
*
'दोस्तो मै हू आफ्ताब और आप सुन रहे है ९७.६ एफएम धमाका. दोस्तो मुझे ढेर सारे कॉल्स आ रहे है और किसकिस की बात सुनू किसकी ना सुनू ऐसा मुझे लग रहा है. अभी हमारे साथ है हमारे तिसरे कॉलर जो की मुंबई से है और कुछ शर्मिले से लग रहे है क्योकि वो अपना नाम नही बताना चाहते. कोइ बात नही वी विल कॉल हिम मिस्टर एक्स. सो हॅलो मिस्टर एक्स!!'
'हॅल्लो आफ्ताब...'
'मिस्टर एक्स आप थोडा जोर से बात करेंगे प्लीज मुझे आपकी आवाज बहौत कम सुनाई दे रही है'
'सॉरी मै इससे लाऊडली नही बोल सकता... मेरे पेरेंट्स सो रहे है, वह जाग जायेंगे तो ओरडेंगे!!'
'अच्छा तो आपकी प्रॉब्लेम ये है की आपकी जो मम्मीजी है वो आपको रात को जागकर मेरा शो सुनने नही देती है'
'नही यार वो प्रॉब्लेम नहीये. मै तुम्हारा शो रोज सुनता हू.'
'तो प्रॉब्लेम क्या है?'
'लडकी!! तुमनेही तो कहा ना... लडकियों की इगो प्रॉब्लेम!!'
'हेहे!! ओक्के मिस्टर एक्स, वो कौन लडकी है जो आपको परेशान कर रही है?? नाम क्या है उसका?'
'अम्म्म...'
'अरे सॉरी मै भूल गया की आप बडे शर्मिले टाइप के हो. चलो वी विल कॉल हर मिस वाय.'
'हा ओके! मिस... अं... वाय मेरी एक स्कूल की पुरानी दोस्त है जो मुझे कल रास्ते मे अचानक मिली... बहौत सालो बाद!!'
'और उसने आपको पहचाना नही, राईट?'
'अरे पहले सुनलो यार...'
'ओक्के कंटिन्यू'
'तो वो मुझे मिली बहौत सालो बाद और हमारी थोडी बातचीत हुई... फिर मै उससे नंबर मांगने वाला था इतने मे उसका भाई आ गया पिछे से!!'
'ओह शिट तो उसने तेरी पिटाई की??'
'अरे नही नही... तो उसके सामने मुझे नंबर नही मांगने को आया!! तो मैने क्या किया हमारे एक म्युचुअल फ्रेंडसे नंबर मांगा उसका, तो वो फ्रेंड केहने लगी की ऐसे दुसरों से नंबर नही मागते, खुद पुछ लो उसे!! बी अ मॅन!!'
'तो उसमे गलत क्या है? मांग लो ना!'
'अरे लेकिन वो मुझे मिली तो मांगुंगा ना!! वो मेरे बहौत करीब रहती है फिर भी इतने सालो बाद मुझे दिखी. अब फिरसे दिखी तोही मांग सकूंगा!! इसिलिये मै अपनी फ्रेंड से नंबर मांग रहा था तो वो केहती है की लडकियों को अपना नंबर किसी दुसरे से लेना पसंद नही आता...'
'शी इज राईट ब्रो!'
'अरे क्या राईट? अगर कोई अच्छी लडकी मेरे किसी दोस्त से नंबर मांगे और वो दे दे... तो मुझे कोई तकलीफ नही होगी. ये इन लडकियों की इगो प्रॉब्लेम नही तो और क्या है?'
'डूड तुम्हे एक बात बता दू, अगर मेरा नंबर कोई मेरे पर्मिशन के बिना किसीको भी दे दे तो मुझे भी पसंद नही आयेगा... और ना ही मै अपने किसी दोस्त का नंबर उसके पर्मिशन के बिना शेअर करूंगा. स्पेशली अगर वो एक लडकी हो. इसमे इगो प्रॉब्लेम नही है, ये एक सेफटी मेजर है!! क्या है आजकल किसीका भरोसा नही दे सकते.'
'अरे लेकिन मै बुरा लडका थोडी हू?'
'अगर बुरे नही हो, तो खुद उसके सामने जाके नंबर मांगने से क्यू डरते हो?'
'मै डरता नही हू डूड मुझे मिलनी तो चाहिये वो!'
'मिल जायेगी... हिम्मत मत हारो. अगर नही भी मिली, तो भी ये शरीफो का तरीका नही है दोस्त. तुम भले अच्छे लडके हो, लेकिन लडकी पे गलत इम्प्रेशन पड सकता है.'
'ह्म्म्म!!'
'आय होप यू हॅव गॉट द पॉइंट डूड!! तो कहो, क्या सिफारिश है तुम्हारी?? कौनसा गाना लगाऊ?'
*
दुस-या दिवशी सकाळी चहा पावडर घ्यायला खाली उतरलो होतो, परतताना पुन्हा तीच तिच्या मैत्रीणीबरोबर दिसली. माझा विश्वासच बसेना. रात्रभर ती पुन्हा कधी समोर आली तर मी कसा बोलेन तिच्याशी, कसा नंबर मागेन वगैरे प्रॅक्टिस मी केली होती. पण ती इतक्या लगेच दिसेल असं खरंच वाटलं नव्हतं. तिला सुद्धा मी दिसलो, हसली. मी लगेच रस्ता ओलांडून तिच्याजवळ गेलो.
'हाय... कुठे सकाळी सकाळी?' नंबर माग...
'क्लासला... तू?'
'मी घरी जातोय दुकानात आलो होतो.' माग नंबर... माग नंबर...
'ओह...'
'अम्म.. आज भेटायचं आपण? संध्याकाळी?' अरे गधड्या हे काय विचारतोयस...? नंबर माग ना.
'हां?? आज?'
'हो म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नसेल तर...' उगाच डाऊट येईल तिला तू आधी नंबर माग.
'अम्म... आज नको, आपण उद्या भेटूया? आज मी बाहेर जात्येय संध्याकाळी. उद्या नक्की.'
'ओके. डन. बरं मग किती वाजता?' उद्या टांग दिली तर?? आत्ताच नंबर माग.
'अं... साडेपाच?'
'चालेल... भेटू साडेपाचला... इथे चौकाजवळ भेटू. ओके?' मित्रा चूक करतोयस... अजूनही वेळ गेलेली नाही नंबर माग!!
'ओक्के... बाय!!'
'अं...' वेरी गुड... कमॉन!!
'काय?'
'काही नाही... भेटू उद्या साडेपाचला, नक्की!! बाय' टांग तुझी साल्या. किती भिशील?
'बाय!!'
*
दुस-या दिवशी ती दिलेल्या वेळापेक्षा दहा मिटं उशीराने आली. आम्ही दोघं भटकत भटकत बोलायला लागलो. थातुर मातुर विषय निघाले, पण काही केल्या तिचा नंबर मागायची हिम्मतच होत नव्हती. का कोणास ठाऊक!!? चालत असताना मध्येच ती 'ओह शिट!' असं पुटपुटली आणि माझ्या डाव्या बाजूने चालत होती ती उजव्या बाजूला आली.
'काय गं काय झालं?'
'एक मिनीट थांब'... ...'अरे हा गेला ना आत्ता बाजूने, तो आमच्या कॉलनीत राहायचा. सायको आहे एक नंबरचा.'
'हो?? का काय केलं त्यानं?'
'अरे मी इथे या कॉलनीत नवीन आहे ना...'
'तू नवीन आहेस? पण या आधी सुद्धा दिसलीयस की मला ब-याचदा. आय मीन, मी लाजायचो नाही का ओळख दाखवायला?'
'अरे हो तेव्हा मी इथे बाजुच्या बिल्डींगमध्ये ट्यूशन ला यायचे तेव्हा दिसायचास तू... आता आम्ही इथे राहायला आलोय ना, तर हा मुलगा माझ्या मागे लागलाय.'
'हो?'
'हो ना... अरे आणि मला काय माहित ना की तो असा आहे म्हणून रे मी आपलं बोलायला वगैरे चांगला वाटला म्हणून चांगलं बोलत होते त्याच्याशी. ते ही हार्डली एकदोनदा!! तर लगेच नंबरच मागायला लागला रे!!' माझ्या पोटात भलामोठ्ठा खड्डा पडला. 'आणि मी दिलाही असता पण ती माझी फ्रेंड होती ना काल-परवा माझ्याबरोबर आपण भेटलो तेव्हा, तिने मला त्याच्याबद्दल आधीच सांगितलं नशीबाने... तो ना दिसेल त्या प्रत्येक मुलीच्या मागे लागतो.'
'हो?'
'हो ना... आणि आता मी त्याला नंबर देत नाहीये ना तर कॉलनीतल्या माझ्या सगळ्या फ्रेंड्सचं डोकं खातो माझा नंबर मिळवण्यासाठी. एक दिवस हटली रे माझी आणि सगळ्यांसमोर झापला मी त्याला. पण तरी चरबी गेली नाहीये अंगातली त्याच्या... आता बघितलं ना कसा तोंड लपवून पळाला गांडू?'
मला यावर काय बोलावं, कसं रिअॅक्ट व्हावं काही कळेना... त्यात ती गांडू इतक्या सहज आणि मोठ्याने म्हणाली होती, की रस्त्यातून चालताना मी तरी इतक्या मोठ्याने शिव्या घालतो का असं मला वाटायला लागलं. मी अस्वस्थ झालो, आणि आपण नंबर मागायची घाई केली असती तर काय झालं असतं या कल्पनेने हसायला लागलो.
'काय रे असा का हसतोयस?'
'काही नाही...'
'काही नाही काय, सांग ना!!'
'अगं नाही... काहीतरी आठवलं.'
'काय?'
'अं...(आता काय सांगू?) अगं एक मुलगी आहे आमच्या कॉलेजमध्ये. हॉट आहे. जाम अॅटिट्यूड आहे तिच्यात. म्हणजे... तुझ्याएवढी सुंदर नाहीये, तरीही सॉलेड अॅटिट्यूड आहे तिच्यात...' मी पॉज घेऊन थांबलो, तिच्या चेह-याकडे तिची रिअॅक्शन पाहायला लागलो. चेहरा निर्विकार होता.
'हां... मग?? तिचं काय?' हात्तिच्या!!
'काही नाही, आमची नव्याने ओळख झाली होती कॉलेज नुकतंच सुरू झालं होतं ना... सो आपण कसं सगळ्यांशी ओळख वाढवतो वगैरे... तशी ओळख वाढवत होतो मी सगळ्यांशी...'
'मग?' अगं किती उत्सुकता? थांब जरा धीर धर... थाप मारायला ती आधी नीट सुचायला हवी ना!!
'मग.... मी एकदा नंबर मागितला तिच्याकडे. आणि अगदी सहज मागितला होता गं. तर म्हणते कशी, "सॉरी आय डोंट जस्ट गिव्ह माय नंबर टू एनिबडी..." मला एकदम शॉकच बसला गं. आणि ते सुद्धा सगळ्यांसमोर माहितीये!!'
'हा हा हा हा!! सॉलेड पोपट केला की रे तुझा तिने... इज्जत चा फालुदा झाला असेल तुझ्या ना?'
'मग काय!!' कमॉन हिच खरी संधी आहे... ती अजूनही हसत्येय! 'तू नाही ना करणार पोपट माझा?'
'हा हा... नाही रे माझ्यात एवढं अॅटिट्यूड नाहीये!! डोंट वरी!'
'मग... अं... देतेस नंबर??' मला माझ्या छातीतले वाढलेले ठोके जाणवत होते. तितक्यात आले त्याच्या मना आणि एक भटक्या कुत्रा जोरजोरात भुंकू लागला... तसा मी वेड्यासारखा दचकलो. ती अजूनच हसायला लागली.
'हा हा हा हा... केवढा घाबरलास तू?? श्शी!! घे नंबर...'
मी नंबर घेतला, मिस्ड कॉल दिला... ती तरीही हसतच होती. मला राहवेना...
'अगं ठीक आहे ना, होतं असं कधीकधी, मी घाबरलो नाही, दचकलो फक्त. नाहीतर मी घाबरत नाही कुत्र्यांना!!'
'होक्का?? बरं हा शूरवीर!! पण मी त्यासाठी हसत नाहीये. मला काहीतरी आठवलं अॅटिट्यूडवरून...'
'काय?'
'अरे... तू नाईट विद आफ्ताब ऐकतोस? एफएम धमाका वर?'
'हां?? अम्म्म... हो कधीकधी.. का गं?'
'परवाचं ऐकलंस??'
माझ्या छातीतली धडधड वाढतच चालली होती, सर्वांगाला घाम फुटत होता... आणि ती मला हसता हसता मोठ्या आवाजात मिस्टर एक्सची कहाणी सांगायला लागली.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
जबराट !!!! पु भा प्र
भारी!
रिस्पेक्ट ब्रो.
@तिने माझा अहंकार डिवचला होता
कहानी में ट्विस्ट उत्तम जमला
(No subject)
भारीच
अर्रे कसलं भारी...
प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे
हिरवळ! हिरवळ!!
हिरवळ! हिरवळ!
मस्त झाले आहेत दोन्ही भाग...
मस्तं!
आमच्या हीरोला हीरॉईन मिळणेकोच
एक नंबर्स मज्जा येतेय ....
>>>खुर्चीत पाय पोटाशी घेऊन भर
धमाल..
हम्म.... हा भाग थोडा कहानी मे