Skip to main content

आयचाघोरसचा सिद्धांत

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शुक्रवार, 14/03/2014 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना तू माझा म सा वि(कायला) काढलास लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं चौकोनात फिरणार्‍या तुला वर्तुळात त्रिकोण काढून नव्वद अंशातून बगितलं हळूच टँजंट का मारलास मला? मी भेदतच होतो परिघ शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस? शेवटी कितीही वेगात फिरली तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, (एको)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7366
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

In reply to by स्पंदना

तुला भागुन तुझा गुणाकार करीन खूप हसलो :D एका कवितेचा भाग आहे का हे? पूर्ण देऊ शकाल का?

In reply to by खटपट्या

मेलेलं घोडं आहे ते. चामडं पण कुजलं आता. फेसबुकावर आल्रेडि हायेच, आजून लै ठिकाणी हाये. लिमिटेड प्रतिभेत ग्लोरिफाय होणारे हायेत ते.

In reply to by राघवेंद्र

पाय दिन असल्याचे एके ठिकाणी वाचले होते म्हणून त्याच दिवशी टाकली.

तुम्ही घेतलेलं टोपणनाव creative आहे व या कवितेमागची कल्पना देखिल. ‘टँजंट का मारलास मला? मी भेदतच होतो परिघ’ या दोन ओळी खुपच छान आहेत. पण बाकीच्या एवढया भेदून जात नाहींत. कांही तर tangent सारख्या फक्त स्पर्शून जातात.`