✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आयटीच्या गोष्टी - नमन

ध
धन्या यांनी
Sat, 02/16/2013 - 16:35  ·  लेख
लेख
नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते. आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. दोन्ही गोष्टी आयटीमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या प्रमुख अंगाबद्दल शब्दशः खर्‍या असल्या तरी आयटी म्हणजे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नाही. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्येही बक्कळ पैसा आणि एसीमधील काम यांच्या जोडीनेच इतरही असंख्य भानगडी असतात. काही चांगल्या तर काही वाईट. आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो. पण ते खरं नाही. या क्षेत्रात काम करणारे (आणि वास्तवाचे भान असलेले) चांगलेच ओळखून आहेत की आपण या क्षेत्रातले पाटया टाकणारे हमाल आहोत. आपल्याला मिळणारा बक्कळ पैसा हा केवळ चलनातील फरकाचा प्रताप आहे. तसेच अमेरिका आणि युरोप खंडांमध्ये वाढलेले संगणकीकरण परंतू स्वस्त आणि कुशल संगणक कामगारांची अनुपलब्धता हीसुद्धा आपल्याला सो कॉल्ड आयटीमधले बाप बनवण्यास कारणीभूत आहे. पुढे हे सारं आपण विस्ताराने पाहूच. बरेच दिवसांपासून मनात होतं की उगाचच प्रतिसादाच्या पिंका टाकण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करावा. पण टंकायचा कंटाळा येत होता. त्याचबरोबर विषय कुठला निवडावा हे ही कळत नव्हतं. माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या प्रकाशात उलगडून दाखवावा की मानसशास्त्राचं बोट धरुन मनोविकारांबद्दल सहज सोप्या भाषेत लिहावं हे कळत नव्हतं. संगणक सुरक्षा या विषयावर काही खरडावं असंही कधी कधी वाटायचं. नुकतीच चालू झालेली प्रथम फडणीसांची मोबाईल उत्क्रांतीवरील सुंदर मालिका, त्याहीआधीची सोकाजीनानांची अत्याधुनिक तंत्रज्ञान सहज सोप्या भाषेत सांगणारी लेखमाला वाचून वाटलं की आपण आयटीवर का लिहू नये. आणि ठरवलं की आपण आयटीवरच लिहायचं. कमी अधिक अशा साडे सात आठ वर्षांच्या माझ्या आयटी करीयरमध्ये खुप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या. काही आनंद देणार्‍या, काही आपल्या क्षमतेचा कस पाहणार्‍या, काही मनस्वी चीड आणणार्‍या, तर काही नैराश्येच्या खोल गर्तेत फेकून देणार्‍या. या सार्‍याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न असेल. मिपावर आयटीमधील रथी महारथी आहेत. ते माझ्या लेखनात काही चुका झाल्या तर दाखवून देतीलच. तसेच ते प्रतिसादांमधून आपले अनुभवही सांगतील, वाचकांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील याची मला खात्री आहे. नमनाला घडाभर तेल वाहून झालं आहे. मुद्दयाचं असं काही लिहिलंच नाही. ते सारं आपण पुढच्या भागापासून पाहू. तोपर्यंत, स्टे टयुन्ड* !!! *स्टे टयुन्ड - हा आयटी मॅनेजर्सचा आवडता शब्दप्रयोग. शब्दशः अर्थ "तुमचा रेडीओ अमुक अमुक फ्रीक्वेंसीला टयून करा" एव्हढाच असला तरी आयटीमध्ये त्याला खुप मोठा अर्थ आहे. तुम्हीच पाहा: प्रसंग १ : अबक आयटी कंपनी आपली कर्मचारी संख्या वाढवण्याच्या विचारात आहे. दे हॅव एक्स्पान्शन प्लान. या संदर्भात एका नामांकीत सरकारी संगणक शिक्षणसंस्थेच्या नोटीस बोर्डवर नोटीस लावली जाते. पोरं पोरी भराभर आपापले रिझुमे, सीव्ही जे काही असेल ते मॅनेजरच्या ईमेल आयडीवर पाठवतात. (कंपनी सध्यातरी छोटी असल्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजरच रीक्रुटमेंट, रीसोर्स मॅनेजमेंट पाहत असतात.) पोरांचा भरभरुन प्रतिसाद पाहून मॅनेजर हरखून जातो. रीप्लाय म्हणून केलेल्या ईमेलमध्ये पोरांना तो खुप मोठी मोठी स्वप्नं दाखवतो. शेवटी थोडंसं रीक्रुटमेंट प्रोसेसबद्दल, इंटरव्ह्यू शेडयुलबद्दल लिहितो लिहितो. अगदी शेवटची ओळ असते, स्टे टयुन्ड !!! प्रसंग २ : कंपनीत अ‍ॅट्रीशन रेट वाढू लागला आहे. मॅनेजमेंटच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. याच गतीने पोरं पोरी जरी कंपनी सोडून जाऊ लागली तर एक दिवस कंपनीला टाळं ठोकावं लागेल याची त्यांना खात्री पटू लागली आहे. काहीतरी करणं भाग आहे. मग एचारमधील चार डोकी/मॅनेजमेंटमधील चार डोकी मिळून काहीतरी प्लान बनवतात. याच कंपनीत पोरांना कसं उज्ज्वल भवितव्य आहे याच्या लंब्याचौडया बाता केल्या जातात. हा प्लान एक खुपच वरचा मॅनेजर एक दिवस टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये सार्‍या कर्मचार्‍यांना समजावून सांगतो. त्याचं ते गाजरदर्षक भाषण संपवता संपवता तो म्हणतो, स्टे टयुन्ड !!! प्रसंग ३ : अबक नावाच्या भारतीय आयटी कंपनीचा कखग नामक अमेरिकन तेल आणि वायू कंपनीशी आयटी सेवा पुरवण्यासाठीचा करार आहे. कधीतरी या अमेरिकन कंपनीचा एक उच्चपदस्थ अधिकारी अबक च्या भारतातील डेव्हलपमेंट सेंटरला भेट दयायला येतो. त्याच्यासाठी पायघडया घातल्या जातात, त्याला टोपी घातली जाते (सॉरी, पगडी घातली जाते), त्याची आरती केली जाते. या सार्‍या पाहूणचाराने तो भारावून जातो. शेवटी तो टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये भाषणाला उभा राहतो. आमच्या कंपनीला या वर्षी इतके इतकी मिलियन की बिलियन डॉलर नफा होणार आहे. पण हा नफा कमावण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून उत्तम अशा आयटी सेवेची अपेक्षा आहे अशा टाईपचं ते भाषण असतं. भारतीय कंपनीच्या मॅनेजरच्या डोळ्यांसमोर ऑनसाईट अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात. तो "क्लायंट" आपलं भाषण एकदाचं संपवतो. त्याचं शेवटचं वाक्य असतं, स्टे टयुन्ड !!!
  • आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
  • आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)

Book traversal links for आयटीच्या गोष्टी - नमन

  • आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
30839 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

२००९ च्या मंदीमध्ये आम्हाला

धन्या
Wed, 03/12/2014 - 20:22 नवीन
२००९ च्या मंदीमध्ये आम्हाला सिलिकॉन व्हॅलीमधून परतीचं विमान पकडावं लागलं होतं. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

त्या दिवसांची आठवण सुद्धा नको

अत्रन्गि पाउस
Wed, 03/12/2014 - 20:27 नवीन
रोज सकाळी १ २ प्रोजेक्ट्स गेल्याचे कळत होते... भल्या भल्यांची तंतरली होती....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

एक फिरत असलेला आयटी मेसेज

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 03/12/2014 - 20:25 नवीन
आयटीमधील एकेकाची विचारसरणी प्रोजेक्ट मॅनेजर- ९ बायका १ मुल १ महीन्यात डिलिवर करु शकतील. सॉफ्टवेअर ईंजीनीयर-एक मुल डिलिवर करायला १८ महीने लागतील. ऑनसाईट मॅनेजर- एक बाई १ महीन्यात ९ मुले देउ शकेल. मार्केटींग मॅनेजर- मी कोणाही बाई किंवा बाप्या शिवाय १ मुल डिलिवर करेन. रिसोर्स ऑप्टीमायझेशन टीम- आम्ही १ मुल कोणाही रिसोर्स शिवाय डिलिवर करु. डॉक्युमेंटेशन टीम--मुल डिलिवर होवो कि न होवो ,आम्ही ९ महीने नोंदी करणार ऑडीटर-झालेल्या मुलाबद्दल नेहेमीच असमाधानी टेस्टींग टीम-झालेले मुल बरोबर नाहिच,त्यात चुका काढा एच आर मॅनेजर- गाढवाला ९ महीने वेळ दिल्यास तेही १ मुल देउ शकेल. क्लायंट- असा माणुस ज्याला माहीतच नाही कि आपल्याला मुल हवे आहे.
  • Log in or register to post comments

एक खूप जुना फटू...

मोदक
Wed, 03/12/2014 - 20:30 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

__/\__

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/12/2014 - 23:23 नवीन
Image removed. __/\__ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सोयीसाठी...

धन्या
Wed, 03/12/2014 - 23:18 नवीन
आयटीच्या गोष्टी - नमन (हा भाग) आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१) ऑनसाईट २ च्या लिखाणाची तयारी करत असताना "ऑनसाईट १" चे काश्मीर होऊन थेट अगदी स्तनपानापर्यंत गोष्टी गेल्यामुळे वैतागून लिखाण थांबवले होते. ऑनसाईट २ (आणि पुढेही) लिहिण्याची ईच्छा आहे. बघूया.
  • Log in or register to post comments

अहो मग लिहाना

हवालदार
Wed, 03/12/2014 - 23:46 नवीन
इछ्छेची अन्मलबजवणी त्वरीत करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

"ऑनसाईट १" चे काश्मीर होऊन

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/13/2014 - 14:50 नवीन
"ऑनसाईट १" चे काश्मीर होऊन थेट अगदी स्तनपानापर्यंत गोष्टी गेल्यामुळे
काल रात्री मोबाईलवर हा प्रतिसाद वाचला.. बेक्कार हसत होते बराच वेळ.. नवर्‍यानी विचारलं काय झालं तर त्याला म्हणाले... "एका धाग्याचं काश्मीर केलं होतं रे आम्ही.. मिपाच पब्लिक ना..!!!" तो धाग्याच काश्मीर ह्या शब्दापाशीच अडकला होता.. =)) तुमच्या ह्या प्रतिसादामुळे आठवलं.. घासुगुर्जींनी पार अगदी चार्ट बिर्ट लावले होते इथे!!! आणि मी न्यु मदर असल्याने एकदम ओथंबुन प्रतिसाद लिहीत होते! (अर्थात माझ्या स्टॅण्ड वर मी अजुनही ठाम आहे.. वन्स अ मदर.. ऑल्वेज अ मदर!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ऑनसाईट २ (आणि पुढेही)

शिद
गुरुवार, 03/13/2014 - 15:30 नवीन
ऑनसाईट २ (आणि पुढेही) लिहिण्याची ईच्छा आहे.
मग लिहा की.... आम्ही वाट पाहतोय. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अरे वा हुच्च लोक्स ब्याक्स ..

स्पा
गुरुवार, 03/13/2014 - 14:55 नवीन
अरे वा हुच्च लोक्स ब्याक्स ... बेंच प्रदान झालेला दिसतोय , विथ फुल स्यालरी चान चान
  • Log in or register to post comments

जळजळ होत असल्यास ईणो घेणे.

धन्या
गुरुवार, 03/13/2014 - 16:48 नवीन
जळजळ होत असल्यास ईणो घेणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

व्हय जी

स्पा
गुरुवार, 03/13/2014 - 17:34 नवीन
व्हय जी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

"फुल स्यालरी ऑन बेंच" फक्त

धन्या
गुरुवार, 03/13/2014 - 17:44 नवीन
"फुल स्यालरी ऑन बेंच" फक्त महाकाय आयटी कंपन्यांमध्ये असते रे. माझ्या बाबतीत म्हणशील तर "गेले ते दिन आणि राहील्या त्या आठवणी" असं झालंय आता. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(No subject)

स्पा
गुरुवार, 03/13/2014 - 19:02 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

डोंट वारी , आल इज वेल

स्पा
गुरुवार, 03/13/2014 - 19:03 नवीन
डोंट वारी , आल इज वेल
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा