नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते. आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. दोन्ही गोष्टी आयटीमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या प्रमुख अंगाबद्दल शब्दशः खर्या असल्या तरी आयटी म्हणजे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नाही. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्येही बक्कळ पैसा आणि एसीमधील काम यांच्या जोडीनेच इतरही असंख्य भानगडी असतात. काही चांगल्या तर काही वाईट.
आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो. पण ते खरं नाही. या क्षेत्रात काम करणारे (आणि वास्तवाचे भान असलेले) चांगलेच ओळखून आहेत की आपण या क्षेत्रातले पाटया टाकणारे हमाल आहोत. आपल्याला मिळणारा बक्कळ पैसा हा केवळ चलनातील फरकाचा प्रताप आहे. तसेच अमेरिका आणि युरोप खंडांमध्ये वाढलेले संगणकीकरण परंतू स्वस्त आणि कुशल संगणक कामगारांची अनुपलब्धता हीसुद्धा आपल्याला सो कॉल्ड आयटीमधले बाप बनवण्यास कारणीभूत आहे. पुढे हे सारं आपण विस्ताराने पाहूच.
बरेच दिवसांपासून मनात होतं की उगाचच प्रतिसादाच्या पिंका टाकण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करावा. पण टंकायचा कंटाळा येत होता. त्याचबरोबर विषय कुठला निवडावा हे ही कळत नव्हतं. माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या प्रकाशात उलगडून दाखवावा की मानसशास्त्राचं बोट धरुन मनोविकारांबद्दल सहज सोप्या भाषेत लिहावं हे कळत नव्हतं. संगणक सुरक्षा या विषयावर काही खरडावं असंही कधी कधी वाटायचं. नुकतीच चालू झालेली प्रथम फडणीसांची मोबाईल उत्क्रांतीवरील सुंदर मालिका, त्याहीआधीची सोकाजीनानांची अत्याधुनिक तंत्रज्ञान सहज सोप्या भाषेत सांगणारी लेखमाला वाचून वाटलं की आपण आयटीवर का लिहू नये. आणि ठरवलं की आपण आयटीवरच लिहायचं.
कमी अधिक अशा साडे सात आठ वर्षांच्या माझ्या आयटी करीयरमध्ये खुप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या. काही आनंद देणार्या, काही आपल्या क्षमतेचा कस पाहणार्या, काही मनस्वी चीड आणणार्या, तर काही नैराश्येच्या खोल गर्तेत फेकून देणार्या. या सार्याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न असेल. मिपावर आयटीमधील रथी महारथी आहेत. ते माझ्या लेखनात काही चुका झाल्या तर दाखवून देतीलच. तसेच ते प्रतिसादांमधून आपले अनुभवही सांगतील, वाचकांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील याची मला खात्री आहे.
नमनाला घडाभर तेल वाहून झालं आहे. मुद्दयाचं असं काही लिहिलंच नाही. ते सारं आपण पुढच्या भागापासून पाहू.
तोपर्यंत, स्टे टयुन्ड* !!!
*स्टे टयुन्ड - हा आयटी मॅनेजर्सचा आवडता शब्दप्रयोग. शब्दशः अर्थ "तुमचा रेडीओ अमुक अमुक फ्रीक्वेंसीला टयून करा" एव्हढाच असला तरी आयटीमध्ये त्याला खुप मोठा अर्थ आहे. तुम्हीच पाहा:
प्रसंग १ : अबक आयटी कंपनी आपली कर्मचारी संख्या वाढवण्याच्या विचारात आहे. दे हॅव एक्स्पान्शन प्लान. या संदर्भात एका नामांकीत सरकारी संगणक शिक्षणसंस्थेच्या नोटीस बोर्डवर नोटीस लावली जाते. पोरं पोरी भराभर आपापले रिझुमे, सीव्ही जे काही असेल ते मॅनेजरच्या ईमेल आयडीवर पाठवतात. (कंपनी सध्यातरी छोटी असल्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजरच रीक्रुटमेंट, रीसोर्स मॅनेजमेंट पाहत असतात.) पोरांचा भरभरुन प्रतिसाद पाहून मॅनेजर हरखून जातो. रीप्लाय म्हणून केलेल्या ईमेलमध्ये पोरांना तो खुप मोठी मोठी स्वप्नं दाखवतो. शेवटी थोडंसं रीक्रुटमेंट प्रोसेसबद्दल, इंटरव्ह्यू शेडयुलबद्दल लिहितो लिहितो. अगदी शेवटची ओळ असते, स्टे टयुन्ड !!!
प्रसंग २ : कंपनीत अॅट्रीशन रेट वाढू लागला आहे. मॅनेजमेंटच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. याच गतीने पोरं पोरी जरी कंपनी सोडून जाऊ लागली तर एक दिवस कंपनीला टाळं ठोकावं लागेल याची त्यांना खात्री पटू लागली आहे. काहीतरी करणं भाग आहे. मग एचारमधील चार डोकी/मॅनेजमेंटमधील चार डोकी मिळून काहीतरी प्लान बनवतात. याच कंपनीत पोरांना कसं उज्ज्वल भवितव्य आहे याच्या लंब्याचौडया बाता केल्या जातात. हा प्लान एक खुपच वरचा मॅनेजर एक दिवस टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये सार्या कर्मचार्यांना समजावून सांगतो. त्याचं ते गाजरदर्षक भाषण संपवता संपवता तो म्हणतो, स्टे टयुन्ड !!!
प्रसंग ३ : अबक नावाच्या भारतीय आयटी कंपनीचा कखग नामक अमेरिकन तेल आणि वायू कंपनीशी आयटी सेवा पुरवण्यासाठीचा करार आहे. कधीतरी या अमेरिकन कंपनीचा एक उच्चपदस्थ अधिकारी अबक च्या भारतातील डेव्हलपमेंट सेंटरला भेट दयायला येतो. त्याच्यासाठी पायघडया घातल्या जातात, त्याला टोपी घातली जाते (सॉरी, पगडी घातली जाते), त्याची आरती केली जाते. या सार्या पाहूणचाराने तो भारावून जातो. शेवटी तो टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये भाषणाला उभा राहतो. आमच्या कंपनीला या वर्षी इतके इतकी मिलियन की बिलियन डॉलर नफा होणार आहे. पण हा नफा कमावण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून उत्तम अशा आयटी सेवेची अपेक्षा आहे अशा टाईपचं ते भाषण असतं. भारतीय कंपनीच्या मॅनेजरच्या डोळ्यांसमोर ऑनसाईट अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात. तो "क्लायंट" आपलं भाषण एकदाचं संपवतो. त्याचं शेवटचं वाक्य असतं, स्टे टयुन्ड !!!
वाचने
31122
प्रतिक्रिया
115
मिसळपाव
प्रतिक्रिया
Its not a rocket science
In reply to looping by चिरोटा
रॉकेट सायन्स" सोपा असतय... **
In reply to Its not a rocket science by कपिलमुनी
थांबताहेत कशाला अॅप्रेझल
In reply to रॉकेट सायन्स" सोपा असतय... ** by धन्या
ते ही खरं आहे म्हणा...
In reply to थांबताहेत कशाला अॅप्रेझल by ५० फक्त
खर आहे
In reply to ते ही खरं आहे म्हणा... by धन्या
थोडी दुरुस्ती
In reply to looping by चिरोटा
फार वरवरचे होतय
आणि स्वताच्या काँमेन्ट्स पाहिजेत च
In reply to फार वरवरचे होतय by प्रसाद१९७१
नाही हो...
In reply to आणि स्वताच्या काँमेन्ट्स पाहिजेत च by ५० फक्त
हा लेख खुपच वरवरचा झाला आहे
In reply to फार वरवरचे होतय by प्रसाद१९७१
वाचतोय आतल्या (आय.टी. च्या)
सुरवात चांगली आहे, तपशिलवार
धन्याचा
हम्म...
In reply to धन्याचा by विलासराव
नाही हो...
In reply to हम्म... by दादा कोंडके
हम्म
सुरवात आवडली आहे.
मुलींना आयटी वालाच हमाल का
हा प्रश्न नक्की कोणाला आहे ?
In reply to मुलींना आयटी वालाच हमाल का by आशु जोग
डोमेन एक्स्पर्ट
आइटी हे डोमेन...
In reply to डोमेन एक्स्पर्ट by अत्रन्गि पाउस
+१
In reply to आइटी हे डोमेन... by वामन देशमुख
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
In reply to डोमेन एक्स्पर्ट by अत्रन्गि पाउस
हो हो मला हे माहित आहे
In reply to तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. by धन्या
आम्हाला मेकॅनिकल विंजिनियर
कॉलेजमधे असताना सगळी हिरवळ आय
In reply to आम्हाला मेकॅनिकल विंजिनियर by कॅप्टन जॅक स्पॅरो
क्रीम ऑफ क्रीम आयटीत जाऊ
In reply to कॉलेजमधे असताना सगळी हिरवळ आय by धन्या
तसे नाही ते!
In reply to आम्हाला मेकॅनिकल विंजिनियर by कॅप्टन जॅक स्पॅरो
आमच्याकडे डीप्लोमाला ० आणि
In reply to तसे नाही ते! by खेडूत
स्टे ट्युंड ....
२००९ च्या मंदीमध्ये आम्हाला
In reply to स्टे ट्युंड .... by बबन ताम्बे
त्या दिवसांची आठवण सुद्धा नको
In reply to २००९ च्या मंदीमध्ये आम्हाला by धन्या
एक फिरत असलेला आयटी मेसेज
एक खूप जुना फटू...
__/\__
In reply to एक खूप जुना फटू... by मोदक
सोयीसाठी...
अहो मग लिहाना
In reply to सोयीसाठी... by धन्या
"ऑनसाईट १" चे काश्मीर होऊन
In reply to सोयीसाठी... by धन्या
ऑनसाईट २ (आणि पुढेही)
In reply to सोयीसाठी... by धन्या
अरे वा हुच्च लोक्स ब्याक्स ..
जळजळ होत असल्यास ईणो घेणे.
In reply to अरे वा हुच्च लोक्स ब्याक्स .. by स्पा
व्हय जी
In reply to जळजळ होत असल्यास ईणो घेणे. by धन्या
"फुल स्यालरी ऑन बेंच" फक्त
In reply to व्हय जी by स्पा
(No subject)
In reply to "फुल स्यालरी ऑन बेंच" फक्त by धन्या
डोंट वारी , आल इज वेल